Making of photo and status : ५. गगनभरारी!
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
नाच नाचूनी अति मी दमले थकले रे नंदलाला
या गाण्यावर कुठल्यातरी एका वर्तमानपत्रात फार अप्रतिम लेख आला होता .... सुरुवातीस गाणं ऐकताना कोणीतरी नर्तकी नाचून दमली आहे असं वाटतं पण नीट ऐकल्यावर काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर या षड्रिपूंच्या पाशात अडकल्यामुळे व्यथित झालेले मन परमेश्वराची सुटकेसाठी करुणा भाकत आहे हे लक्षात येतं असा साधारण या लेखाचा आशय होता ... त्यातच गायिका , संगीतकार , गीतकार यांबद्दलही थोडीफार माहिती होती .
एका भिताडावरून उडी हाणताना नेमकं एक भगुणं मधी आलं आणि भुऱ्या सामानासकट खाली कोसळला. चिंचेखालच्या कुत्र्याने कान टवकारले. गडद अंधारात उन्मळून पडलेला भुऱ्या त्याला दिसला आणि ते दबकून गेलं. सवंदडीतली म्हैस बिथरली. हुकल्यासारखा क्षणोक्षणी लागून विझणारा एक जुनाट बल्ब बोचऱ्या थंडीशी लढत होता. मंद हवेची एक झुळूक बाजरीच्या ताटातून सळसळत निघून गेली.
भुऱ्यानं सावध कानोसा घेतला. चप्पल अर्धवट तुटलं होतं. नडगी फुटली होती. हात सालवटून निघाले होते. डोक्याला मुक्का मार बसला होता.
एसीने थंडगार झालेल्या आपल्या रूममधल्या गुबगुबीत गादीवर ब्लँकेट ओढून झोपलेल्या बंड्याने अजून एकदा कूस बदलली. त्याला काही तरी टोचल्याची भावना झाली. अर्धवट झोपेत असल्याने 'सुख टोचत असेल' असा विचार मनात येऊन त्याने ब्लँकेटखाली हात घातल्यावर टोचणारी वस्तू सुख नसून चार्जरची पीन आहे हे त्याच्या लक्षात आले.
नमस्कार मंडळी !!
कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.
नमस्कार मंडळी..
बरोबर एक वर्षांपूर्वी मी आज केलेला व्यायाम...!! या उपक्रमाची सुरूवात झाली. धागा टाकण्यापूर्वी हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होतीच. पण सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि रोजचा व्यायाम नोंदवायला सुरूवात केली.
नुकताच पावसाळा संपलेला असतो, सर्वांनाच उत्साहाचे टॉनिक पाजणारा दिवाळीचा मोठा सण ही झालेला असतो आणि अशातच एका प्रसन्न सकाळी अचानक गारवा जाणवु लागतो. ईतक्या दिवस न एकु येणारी कुठल्यातरी दुरवरच्या मंदिरातील काकड आरती आणि लांबवर धावणार्या रेल्वेची शिट्टी एकु येउ लागते. हळुवार थंडीची चाहुल लागते आणि जाणीव होते, आली एकदाची थंडी. मन प्रसन्न करणारा हा काळ. पावसाच्या रिपरिपीमुळे कंटाळलेले मन सुखावते. अगदी घरकोंबड्या मंडळींनाही उत्साहात मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर बाहेर काढणारा हा काळ. भरपुर सुकामेवा खाउन शरीराच्या बलाची वर्षभरासाठी बेगमी करायला लावणारा हा काळ.
मोखाड्यातलं एकदम दरीतला पाडा ' आमले ' गाव. जंगलात वसलेलं. वाड्याहुन खोडाळ्याकडे जाणार्या बाजुला हमरस्ता सोडुन दरीत उतरायचं. इनमिन ६५ कुटुंब. गावाशेजारुन वाहणार्या नदीमुळे पावसाळ्यातला चार महिने बाहेरच्या जगाशी संपर्क नाही अशी अवस्था होती, अगदी मागच्या वर्षापर्यंत.
आता नदीवर लोखंडी पुल टाकलाय चालत जाण्यासाठी. गावात अजुनही महावितरण पोहोचलेले नाही.