#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - समाप्त
नमस्कार मंडळी..
बरोबर एक वर्षांपूर्वी मी आज केलेला व्यायाम...!! या उपक्रमाची सुरूवात झाली. धागा टाकण्यापूर्वी हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होतीच. पण सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आणि रोजचा व्यायाम नोंदवायला सुरूवात केली.
नियमीत व्यायामपटूंचे धाग्यावर येणारे प्रतिसाद पाहून अनेकांनी व्यायाम सुरू केल्याचे, फार कांही नांही तर चालणे सुरू केले आणि धाग्याचा फायदा होत आहे हे आवर्जून कळवले. आपल्या मित्रांचे / नातेवाईकांचे ग्रुप तयार करून व्यायाम सुरू केल्याचे वाचताना भारी वाटत होते. या दरम्यान डिसेंबर-जानेवारीमध्ये भटकंतीवर असताना गविंना धागा टाकण्याची विनंती केली आणि गविंनी उपक्रमाला नवीन स्वरूप दिले. चालण्याची सुरूवात कशी झाली हे सांगून त्यांची चालण्याची वाटचाल शेअर करायला सुरूवात केली. मी दर महिन्याला एकाच प्रकारचा धागा टाकणे थोडे कंटाळवाणे झाले असतेच. पुढच्या महिन्यात डॉ श्रीहास यांनी सायकलिंग आणि रनिंग चॅलेंजची कल्पना मांडून एकच धमाल उडवून दिली. एकएकटे किंवा वेगवेगळ्या टीम तयार करून सायकलस्वार मंडळींनी "५० किमी सायकल किंवा १० किमी रनिंग सलग ७ दिवस" ही आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण केले. या दरम्यान एकदा अभ्याने अप्रतीम लोगो तयार करून दिला व प्रशांतने #मिपाफिटनेस असे या उपक्रमाचे अधिकृत नामकरण केले.
यथावकाश मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास अशी टीम #मिपाफिटनेस तयार झाली. आंम्हाला सल्ला द्यायला (आणि अनेकदा आमच्या अचाट कल्पनांना जमिनीवर आणायला) पिरा आणि प्रसाद दाते सोबत होतेच. त्यानंतर आमच्यात चर्चांवर चर्चा झडू लागल्या. दर महिन्याला एक वेगळा व्यायामपटू मिपाकर आपली व्यायामगाथा सर्वांसमोर मांडू लागला. मिपाकरांच्या कौशल्याची रेंज आणि चिकाटी बघून थक्क व्हायला होत होते. ज्युदो ते मॅरेथॉन रनिंग, सायकलिंग ते सूर्यनमस्कार, कोणते अॅप वापरायचे, हार्ट रेट मॉनिटरचा उपयोग काय वगैरे चर्चा झडू लागल्या. वेल्लाश्री आणि आप्पांची जुगलबंदी होत होतीच. यातच एकदा कधीतरी पाध्येंनी "राजकारण, समाजकारण याप्रमाणे व्यायाम हा देखील केसाची पिसं काढण्याचा उत्तम विषय आहे." असे वाक्य टाकून मिपाकरांची चिकित्सक वृत्ती 'हायलाईट' केली. अर्थात या सर्व विचार मंथनातून भरपूर प्रमाणात उपयोगी माहिती मिळत गेली. ती माहिती वैद्यकीय दृष्ट्या सोपी करून सांगण्याचे काम डॉक्टर खरे आणि एक्काकाकांनी उत्साहाने केले.
..या उपक्रमाच्या एक वर्षाच्या प्रवासाबद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे, अजुनही बरेच वेगवेगळे विषय हाताळण्यासारखे आहेत, ते खेळ खेळणारे मिपाकरही आहेत मात्र कुठेतरी थांबायला हवे म्हणून "आज केलेला व्यायाम" या उपक्रमाचा शेवट करत आहोत. नवीन उपक्रम सध्या तरी ठरलेला नाही त्यामुळे कांही महिन्यांनी नवीन शिलेदारांसह मिपाफिटनेसचा लोगो पुन्हा बोर्डावर झळकू लागेलच. तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर तुम्हीही जरूर सामील व्हा..!
या उपक्रमात लेखन करणार्यांचे, व्यायामपटूंचे, सायकल सायकल ग्रुप मेंबर्सचे आणि प्रोत्साहन देणार्या सर्वांचे अनेक आभार्स..!!!
टीम #मिपाफिटनेस
मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास, पिलीयन रायडर व प्रसाद दाते.वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा उपक्रम मिपावरचा अतिशय
चुकून दोन वेळा पोस्ट झाली
चालू ठेवा हो. बंद नका करू.
+१
समाप्त वगैरे काही नाही.
सहमत आहे गवि.. पण नवीन
आज करणार होतो तो व्यायाम हा
=))
काही तरी नवीन करूया आता.
स्तुत्य उपक्रम होता
हा शेवट नाहीच ....