एव्हरीबडी लव्हज रेमंड आणि आपण

येडाफुफाटा's picture
येडाफुफाटा in जनातलं, मनातलं
5 Apr 2016 - 4:27 pm

एव्हरीबडी लव्हज रेमंड नावाची एक अफलातून sitcom विनोदी मालिका आहे. सध्या चालू असलेली सुमित संभाल लेगा हि मलिक हि ह्या मालिकेची सीन to सीन नक्कल आहे. कोणी साराभाई वेर्सस साराभाई मालिका पाहिली असेल तर तीही ढोबळ पणे यावरच बेतली असल्याचे लक्षात येईल. या मालिकेत एका इटालियन परिवारातील त्यांच्या प्रत्येकाच्या स्वभावाने दररोज होणाऱ्या गमती जमती दाखवल्या आहेत. तर कोण आहेत त्यांच्या परिवारात

कलाप्रकटन

अर्निंग इट राइट

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
5 Apr 2016 - 3:16 pm

मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं.

समाजविचारमत

तू .....

अपरिचित मी's picture
अपरिचित मी in जनातलं, मनातलं
5 Apr 2016 - 2:15 pm

तू .....
काल yahoo चा mail box उघडला आणि मन भरभर दहा वर्षापूर्वी जाऊन उभं राहिलं...
इंजिनीरिंग कॉलेज.... होस्टेल लाईफ... अगदी मंतरलेले दिवस..... आणि तू सोबत...
तुला सांगू, स्वर्ग गवसल्याची अनुभूती होते ना तशी मला प्रेमात पडल्यावर झाली होती..
Online Chatting ने आपली झालेली ओळख.. बऱ्याचदा एकाच cyber कॅफेत बसून तू मला केलेले mails ... अर्थात तेंव्हा तू मला माहिती नव्हतास ...
नंतर माझा तुला भेटण्याचा आग्रह... आणि शेवटी बऱ्याच प्रयत्नां नंतर तू तयार...

kathaaलेख

बोबडी कविता!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
5 Apr 2016 - 1:01 pm

बाबाच्या पोटावर
झोपतय एक वेडं पिल्लू
तोंडामध्ये अंगठा धरून
हसतंय हळू खुदूखुदू!

इवल्याशा बोटांच्या
इवल्या इवल्या मुठीने
ढुशी देत सारख्या सारख्या
करतयं बाबाला गुदूगुदू!

बा - बा - का - का
मध्येच हसू खळखळून
बोबड्या बोलांच गाणं एक
फिरतंय घरभर दुडूदुडू!

- संदीप चांदणे

कविता माझीबालसाहित्यकलासंगीतवाङ्मयकविताबालगीतसाहित्यिकमौजमजा

प्राजक्त

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Apr 2016 - 11:04 am

कसे पारिजातास सांगू सख्यांनो जरा आवरी रे गंधा तुझ्या
सखी मोगरीही धुंदावली बघ विसरून अस्तित्वगंधा तिच्या

नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी
प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी

फुलावे किती सडे मौक्तिकांचे जणू प्रित तुजवर मोगरीची जडे
कधी सांडती आंसवे दोन, पाठी कधी थाप ती कौतुकाची पडे

इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला
नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला .

विशाल कुलकर्णी

मुक्त कविताकविता

धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
4 Apr 2016 - 7:53 pm

ऋण आणि व्याज यांच्या बाबतीत फसवणूकीचा इतिहास सोबतीने कुटूंब, समुह, देश यांच्यावर रास्त स्वरुपाचे नसलेल्या ऋण आणि व्याज या मुळे उध्वस्त होण्याची वेळ येणे खरेच खेद कारक असते. यामुळे कदाचित काही (कदाचित बहुतेक) धर्मसंस्था धर्मविचार ऋण आणि व्याज व्यवहाराचा निषेध करतात अर्थात अगदी टोकाची भूमिकाही इस्लाम सारख्या एखाद दुसर्‍या धर्मातून घेतली जाताना दिसते. ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे ह्या टोकाच्या नकारात्मक बाजू ह्या निषेधार्ह निश्चित आहेत.

धर्मअर्थकारणअर्थव्यवहारविचार

महत्वाची सूचना

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
4 Apr 2016 - 5:47 pm

सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत.

शिक्षण संस्थांच्या जाहिराती; किती ख-या-खोटया?

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
4 Apr 2016 - 4:46 pm

सध्या एप्रिल महिना सुरू आहे. सध्या विविध शिक्षण संस्थांच्या मोठमोठया जाहिराती सुरू झाल्या आहेत. या जाहिरातींना भाळून न जाता पालक व विद्यार्थ्यांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. त्यातून दोघांचेही होणारे नुकसान टळू शकेल. कारण सध्याचे कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क लाखोंच्या घरात असते. त्यामुळे जाहिरातींच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या मदतीसाठी ASCI आहेच. त्याचा वापर ग्राहकांनी करून स्वत:ची फसवणूक टाळावी.

मांडणीअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकशिक्षणप्रकटनविचारबातमीअनुभवमतशिफारससल्ला

पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .

Parag Purandare's picture
Parag Purandare in भटकंती
4 Apr 2016 - 3:23 pm

सध्या मी जेष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या "Temple Architecture and Sculptures of Maharashtra" या अपरांतच्या पुस्तकाचे काम करत आहे. या पु्स्तकात प्राचीन महाराष्ट्रातील ४थ्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंतची अनेक मंदिरांच्या वैशिष्ट्यांची माहिती प्रकाशचित्रांसहित (फोटो) दिली जाणार आहे. या अंदाजे १००० वर्षाच्या काळात महाराष्ट्रात वाकाटक, चालुक्य, कलचुरी, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, सोळंकी, प्रतिहार अशा अनेक प्रमुख राजवटींच्या काळात किंवा या राजवटींची वैशिष्ट्ये असलेली मंदिरे बांधली गेलेली दिसुन येतात.