सध्या मी जेष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या "Temple Architecture and Sculptures of Maharashtra" या अपरांतच्या पुस्तकाचे काम करत आहे. या पु्स्तकात प्राचीन महाराष्ट्रातील ४थ्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंतची अनेक मंदिरांच्या वैशिष्ट्यांची माहिती प्रकाशचित्रांसहित (फोटो) दिली जाणार आहे. या अंदाजे १००० वर्षाच्या काळात महाराष्ट्रात वाकाटक, चालुक्य, कलचुरी, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, सोळंकी, प्रतिहार अशा अनेक प्रमुख राजवटींच्या काळात किंवा या राजवटींची वैशिष्ट्ये असलेली मंदिरे बांधली गेलेली दिसुन येतात. हे पुस्तक येत्या २/३ महिन्यात पूर्ण होउन वाचकांना उपलब्ध होइल. डॉ. गो.बं. देगलूरकर सरांचा पहिल्यांदा हे पुस्तक इंग्लिश मधुन व नंतर मराठी मधुन प्रकाशित करण्याचा विचार आहे.
या पुस्तकासाठी मी अलिकडेच पश्चिम महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील व विदर्भातील काही मंदिरांची प्रकाशचित्रे घेण्यासाठी भटकंती केली. या भटकंतीत मला गावोगावात अनेक प्राचीन मंदिरे दिसली. यातीलच काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची प्रकाशचित्रे आपल्या समोर मांडावी या हेतुने मी हा प्रयत्न करत आहे. मी मंदिरांची त्रोटक माहिती व जास्त प्रकाशचित्रे जास्त देणार आहे कारण मंदिरांच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती आपल्याला डॉ. गो.बं. देगलूरकर सरांच्या पुस्तकातून मिळणार आहे. मात्र वाचकांना विनंती की पुढील मंदिरांची माहिती या मंदिराला मिळणा-या प्रतिसादावर अवलंबुन आहे.
पिंगळेश्वर मंदिर, पिंगळी, जिल्हा. परभणी .
पिंगळी हे गाव परभणी शहरापासून अंदाजे २७ कि.मी. अंतरावर आहे. पिंगळेश्वर मंदिर हे पिंगळी गावाच्या मध्यभागी आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराच्या समोर प्रचंड पुष्करणी आहे. सध्या ही पुष्करणी दुष्काळामुळे पूर्ण कोरडी आहे. मंदिर त्रिदल (तीन गर्भग्रुह असलेले) असुन मंदिरातील मुख्य देवता शिव आहे तर दुस-या एका गर्भग्रुहात आज एका गणपतीची मूर्ती आहे तर तिस-या गर्भग्रुहाची खोली सध्या सामान ठेवण्याची खोली म्हणुन वापरली जाते. संपूर्ण मंदिर दगडात बांधलेले असुन कदाचित कधीकाळी या मंदिराला विटांचे शिखर असावे असे वाटते. मंदिर अंदाजे अडीच ते तीन फुट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिराच्या समोरचा कक्षासनाचा भाग सोडल्यास मंदिर बाहेरुन खुपच साधे आहे. मंदिराच्या तीनही बाजूंच्या बाह्य भिंतीवर एकच नक्षिचा पट्टा आहे. देवकोष्ठे आहेत पण त्यात सध्या देवतांच्या मूर्ती नाहीत. मंदिराजवळच्या परिसरात इतरही छोटी मंदिरे आहेत तसेच अनेक जुन्या मंदिरांचे व वास्तुंचे अवशेष दिसुन येतात.
अजुनही मंदिर चांगल्या अवस्थेत असुन गावक-यांचा राबता मंदिरात दिसुन येतो. या मंदिरासोबतच परभणी परिसरातील जांब, बोरी, चारठाणा, जिंतुर अशा अनेक प्राचीन मंदिरे व अवशेष असलेल्या ठिकाणांनाही भेट देता येइल.
धन्यवाद !
मंदिराचा दर्शनी भाग
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
मंदिर व समोरील पुष्करणी
.
पुष्कणी मधील देवकोष्ठातील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती
.
नरसिंहाची भग्न मूर्ती
.
मंदिराची उत्तरेकडील बाजू
.
मंदिराची दक्षिणेकडील बाजू
.
मंदिराचा सभामंडप व खांब
.
मंदिराच्या मुख्य गर्भग्रुहाची फारच वाइट पध्दतीने रंगवलेली द्वारशाखा
.
मंदिराचा सुंदर कोरीव काम असलेला पण र्ंगवुन वाट लावलेला खांब
.
प्रतिक्रिया
4 Apr 2016 - 3:29 pm | माहितगार
१) छायाचित्र अद्याप दिसत नाहीएत,
२) चर्चेत सहभागी आणि वाचकांकडून कशा प्रकारचे साहाय्य आपणास अभिप्रेत आहे
4 Apr 2016 - 3:35 pm | माहितगार
पिंगळा शब्दाशी संबंधीत खालील स्थलनावे महाराष्ट्र डाटाबेस मध्ये आढळली त्यातील काही ठिकाणी संबंधीत देवतेची मंदीरे आहेत का ते तेथील मंडळीच सांगू शकतील
नाशिक 4154 Sinnar सिन्नर 551197 Vadgaon Pingala वडगाव पिंगळा
अमरावती 4006 Morshi मोर्शी 532307 Nerpingalai नेरपिंगळाई
अकोला 3992 Murtijapur मूर्तिजापूर 530229 Pingala पिंगळा
परभणी 4118 Parbhani परभणी 546749 Pingali पिंगळी
सातारा 4259 Man माण 563419 Pingali Bk पिंगळी बु
सातारा 4259 Man माण 563420 Pingali Kh. पिंगळी खु.
रायगड 4179 Roha रोहा 554359 Pingalsai पिंगळसई
नाशिक 4145 Baglan बागलाण 550081 Pingalwade पिंगळवाडे
जळगाव 3969 Amalner अमळनेर 527432 Pingalwade पिंगळवाडे
नाशिक 4149 Dindori दिंडोरी 550581 Pingalwadi पींगळवाडी
ठाणे 4167 Shahapur शहापूर 552769 Pingalwadi पींगळ्वाडी
रायगड 4174 Karjat कर्जत 553598 Pinglas पिंगळस
पुणे 4188 Ambegaon आंबेगाव 555493 Pinglewadi Landewadi "पिंगळवाडी लांडेवाडी "
नांदेड 4098 Hadgaon हदगाव 544524 Pingli पिंगळी
बुलडाणा 3976 Sangrampur संग्रामपूर 528297 Pingli Bu. पिंगळी बु.
बुलडाणा 3976 Sangrampur संग्रामपूर 528296 Pingli Khu. पिंगळी खु,
परभणी 4118 Parbhani परभणी 546712 PINGALI KOTHALA पिंगळी कोथळा
सिंधुदुर्ग 4280 Kudal कुडाळ 566803 Pinguli पिंगुळी
6 Apr 2016 - 5:55 pm | इरसाल
रायगड-कर्जत-पिंगळेवाडी पण अॅडवा
26 Dec 2016 - 4:29 pm | सांरा
गोराळा गावाजवळ डोंगरावर पिंगळाई देवीचे पुरातन मंदिर आहे. ते नेरपिंगळाई पासून ९ किमी दूर आहे.
4 Apr 2016 - 3:46 pm | चांदणे संदीप
लिंकवरून पाहायचा प्रयत्न केला पण अतिशय लहान दिसतात.
फ़ोटो क्रमाने असे दिसतात,












१)पिंगळेश्वर मंदिर व पुष्करणी
२)मंदिर व समोरील पुष्करणी
३)मंदिराचा दर्शनी भाग.
४)मंदिर व समोरील पुष्करणी
५)पुष्करणीमधील देवकोष्ठ
६)पुष्करणीमधल्या देवकोष्ठातील चामुंडेची भग्न मूर्ती
७)पुष्करणीमधील अजुन एक देवकोष्ठ व त्या मधील महिषासुरमर्दिनीची भग्न मूर्ती
८)दक्षिणेकडून दिसणारे मंदिर
९)उत्तरेकडून दिसणारे मंदिर
१०)मंदिरातील मंडप, खांब व समोरील मुख्य गर्भग्रुह
११)मंदिराच्या मुख्य गर्भग्रुहाची द्वारशाखा व शिवलिं
१२)मंदिरातील सध्या रंगवलेले पण मूळचे सुंदर कोरीव काम असलेले खांब.
Sandy
4 Apr 2016 - 4:06 pm | माहितगार
देवकोष्ठ म्हणजे काय असते ?
-('अ'ज्ञानी माहितगार)
4 Apr 2016 - 3:46 pm | प्रचेतस
ह्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहात आहेच.
छायाचित्रे मात्र दिसत नाहीयेत.
4 Apr 2016 - 3:56 pm | माहितगार
ऑनलाईन सर्च मधून पुढे येणारी माहिती 'पिंगला' हे पक्षाचे नाव आहे. (छायाचित्र आणि लेख मराठी विकिवर उपलब्ध)
*पिंगलाक्ष हे शिवाच्या दहा नावांपैकी एक आहे. आणि नावाच्या उपयोगाचा पक्षी पिंगलाशी संबंध असण्याची शक्यता. संदर्भ झीवृत्त
*पुराण अख्यायिका
*'पिंगळा जोशी' भविष्य कथन करुन उपजिवीका करणारी भटकी जमाती असावी. संदर्भ १, २, ३, ४, ५
*पिंगळा नावाची नदी सुद्धा आहे संदर्भ
4 Apr 2016 - 4:05 pm | माहितगार
* पिङ्गल नावाचे छंदशास्त्रावरील सुत्रकार/भाष्यकार होऊन गेले.
* 'पिंगळा' हा शब्द नाडी योगाशीही संबंधीत दिसतो आहे.
4 Apr 2016 - 4:07 pm | प्रचेतस
पिंगळा म्हणजे लहानग्या घुबडाची एक जात. पण शंकराच्या पिंगळाक्ष ह्या नावाचा पक्ष्याच्या नावाशी काहीच संबंध नाही.
पिंगळाक्ष - पिंगल अक्ष म्हणजेच ज्याचे डोळे लालसर तपकिरी रंगाचे आहेत असा. (पिंगल हा वर्णवाचक शब्द असून त्याचा अर्थ लालसर तपकिरी असा आहे).
4 Apr 2016 - 4:21 pm | माहितगार
'पिंगळाक्ष - पिंगल अक्ष म्हणजेच ज्याचे डोळे लालसर तपकिरी रंगाचे आहेत असा.'
4 Apr 2016 - 4:02 pm | उगा काहितरीच
इतक्या जवळ असूनही कधी योग नाही आला पहायचा. यावेळी परभणीला गेल्यावर नक्की पाहीन . धन्यवाद
4 Apr 2016 - 4:56 pm | जव्हेरगंज
4 Apr 2016 - 5:02 pm | माहितगार
हे बरे पडते आहे, शिवलिंग आणि कोरीव कामाचा खांब याचेही असेच सुस्पष्ट छायाचित्र उपलब्ध करता आल्यास पहावे. धन्यवाद
6 Apr 2016 - 2:17 pm | Parag Purandare
पुन्हा एकदा फोटो अपलोड करुन पाहिले पण अपलोड केलेले फोटो दिसत नाहीयेत. या वेळेस फ्लिकर.कॉम वरुन फोटोंच्या लिंक्स दिल्या होत्या. पण जमलंय असे वाटत नाही.
धन्यवाद !
6 Apr 2016 - 2:19 pm | Parag Purandare
जव्हेरगंज यांचे आभार, त्यांच्या प्रयत्नांमुळे काही फोटो तरी दिसु शकले.
6 Apr 2016 - 7:35 pm | दुर्गविहारी
वरील यादीतील
सातारा 4259 Man माण 563419 Pingali Bk पिंगळी बु
सातारा 4259 Man माण 563420 Pingali Kh. पिंगळी खु.
रायगड 4179 Roha रोहा 554359 Pingalsai पिंगळसई
या तिन्ही गावाना भेट दिली आहे. या ठिकाणी विषेश मन्दीरे नाहीत, पिंगळसई गावात पेशवेकालीन गजाननाचे सुन्दर मन्दिर आहे. हे गाव किल्ले अवचितगडाच्या पायथ्याशी वसले आहे.
6 Apr 2016 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
मंदिर छोटेखानी असले तरी त्याच्यासमोरची पुष्करणी खास आवडली !
7 Apr 2016 - 12:22 am | अमेरिकन त्रिशंकू
पिंगळा = घुबड = नॉक्टुआ इंडिका = स्पॉटेड आउलेट
https://en.wikipedia.org/wiki/Spotted_owlet
मोल्सवर्थमध्ये
पिंगळा (p. 516) [ piṅgaḷā ] m (पिंगल S) Little spotted owl, Noctua Indica. 2 also पिंगळाजोशी m A term for a description of fortuneteller who always predicts good.
7 Apr 2016 - 3:16 am | अमेरिकन त्रिशंकू
अजुन एक आठवलं
पिंगळावेळ नावाचा जी.ए. कुलकर्ण्यांचा एक कथासंग्रह पण आहे.
http://www.goodreads.com/book/show/16028044-pingalavel
7 Apr 2016 - 3:53 am | जुइ
पुष्करणीचे फोटो विषेश आवडले.