धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
4 Apr 2016 - 7:53 pm

ऋण आणि व्याज यांच्या बाबतीत फसवणूकीचा इतिहास सोबतीने कुटूंब, समुह, देश यांच्यावर रास्त स्वरुपाचे नसलेल्या ऋण आणि व्याज या मुळे उध्वस्त होण्याची वेळ येणे खरेच खेद कारक असते. यामुळे कदाचित काही (कदाचित बहुतेक) धर्मसंस्था धर्मविचार ऋण आणि व्याज व्यवहाराचा निषेध करतात अर्थात अगदी टोकाची भूमिकाही इस्लाम सारख्या एखाद दुसर्‍या धर्मातून घेतली जाताना दिसते. ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे ह्या टोकाच्या नकारात्मक बाजू ह्या निषेधार्ह निश्चित आहेत. कुटूंब/देश कितीही कर्जात गेले तरी त्यांचा शेवटचा घास, शेवटच्या खोलीचा निवारा, उत्पनाच्या स्रोताचा शेवटचा हिस्सा जसे की शेताचा शेवटचा तुकडा कधीही हिरावला जाऊ नये असेच मलाही वाटते.

ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे अशा गोष्टीं विरुद्ध धर्मसंस्थांनी नैतीक जबाबदारी म्हणून सामाजिक प्रबोधनाचा प्रयत्न करुन, आर्थीक दुर्बळांच्या मागे आर्थीक स्रोत उभे करण्यास सधनांना प्रवृत्त करणे ह्यात धर्मसंस्था सकारात्मक जबाबदारी निश्चितच निभावू शकते. पण त्या पलिकडे फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे या गोष्टींवर वचक बसवण्याचे काम राज्यसंस्थेचे असावे धर्मसंस्थेचे नव्हेच. धर्मसंस्थेचा अर्थव्यवहारातील मर्यादे बाहेरचा हस्तक्षेप स्वतःच्या कार्य परीघाच्या मर्यादा समजून न घेणारा आणि अज्ञानश्रद्धामुलक ठरु शकतो.

बरे एवढे करुन आपापल्या धर्मांचा ऋण-व्याज विरोधात गवगवा करणार्‍या भक्तांचे वागणे नेहमीच आदर्श राहीले असे नाही. ओट्टोमन साम्राज्याच्या सरत्या काळात ते साम्राज्य युरोपीयन ऋणकोंच्या जाळ्यात अडकलेले होते. अगदी ताजे उदाहरण मध्यपुर्वेतील युएई चे वाचण्यात येत आहे.

धर्मसंस्थेचे ऋण विषयक अर्थशास्त्रातील अज्ञानश्रद्धा नेमकी कुठे उघडी होते ? समजा एक खूप मोठा व्यवसाय आहे, व्यवसायात तात्पुरती मंदीची स्थिती आल्यामुळे अथवा त्यापेक्षा मोठ्या कस्टमरचे पेमेंट येण्यास उशिर झाला तर १) असे व्यवसाय कात्रीत सापडले जाऊन पेमेंट्स उशीरा होऊ शकतो याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परीणाम त्या व्यवसायाच्या अथवा त्या व्यवसायाचे कस्टमर असलेल्या व्यवसायांच्या पगारी नौकरदारांवर होऊन त्यांना पगार वेळेत होणार नाहीत २) वस्तुपुरवठ्यास पैसे चुकते करण्या विषयी करार मोडले जाऊन कायदेशीर बडगा व्यवसायांवर येऊन पुर्ण व्यवसाय ठप्प होऊ शकतो वर युएई ची बातमी दिली आहे तसे शिक्षांनाही सामोरे जावे लागू शकते ३) मुख्य म्हणजे खेळत्या भांडवलाचा तात्पुरता गॅपमुळे त्या त्या इंडस्ट्रीचे संपूर्ण अर्थचक्र अडचणीत येऊ शकते आणि याचा फटका लाँग्र टर्म मध्ये सर्वसामान्य व्यक्तींना बसण्याचीही शक्यता असू शकते.

अजुन बारकाईने पाहील्यास एखाद्या व्यक्तीस पेमेंट मध्ये काही दिवसांची सवलत देणे हे ही अप्रत्यक्ष ऋण असते पण हे अशी सवलत घेणार्‍या व्यक्तीस विवीध वेळी उपयूक्त ठरत असू शकते, समजा एक पगारदार व्यक्ती आहे त्याच्या घरी अबकड अडचण आहे त्याने त्याच्या स्वतःच्या दोन महिन्याच्या पगारा एवढी उचल घेतली तर ते अप्रत्यक्षपणे ऋण असते पण दुसर्‍या बाजूने स्वतःचेच पैसे आधी घेतले असून स्वत;च्या अडचणीच्या प्रसंग अभिमानाने निभावून नेला असतो. या गोष्टींचा विचार धर्मसंस्थेच्या अज्ञानश्रद्धा करत नाहीत.

गरीब परीवारांना मायक्रो फायनान्स, स्वमदत गट, सहकारी बँका असे प्रकार हेल्दी पतपुरवठा करुन गरीबीतील जिणे सुसह्य करण्यास हातभार लावू शकतात. मदत केलेले दान पैसे जबाबदारीची भावना देतातच असे नाही पैसे वापस करावयाचे असल्यास जबाबदारीची भावना येते, आणि गरजु आणि स़क्षम व्यक्तींना संधीचा सुयोग्य फायदा घेता येऊ शकतो.

अर्थात खेळत्या भांडवला बाबत तसेच व्यवसाय व्यवस्थापनात कठोर शिस्त बाळगलीच पाहीजे. पण एकुण कायतर ऋण आणि व्याज विषयक निर्णय अर्थशास्त्र आणि व्यावसायीक प्रगल्भतेवर अवलंबून असावेत त्याचे नियंत्रण राज्यसंस्थेची जबाबदारी धर्मसंस्थेचा परीघ ऋण-व्याज व्यवहाराचा अमानवी चेहरा सौम्य करण्यासाठी लागणार्‍या प्रबोधना पलिकडे खासकरुन (अंध)अज्ञानश्रद्धांना खतपाणी देणारा टोकाचा असू नये असे वाटते.

धर्मअर्थकारणअर्थव्यवहारविचार

प्रतिक्रिया

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 7:55 pm | अमृता_जोशी

छान! सविस्तर प्रतिसाद निवांत वेळ काढून देते!

lgodbole's picture

4 Apr 2016 - 8:37 pm | lgodbole

समजुन घ्यावे... त्याच्या आतच विनाकारण वरडु नये.

१. पैशाची देव घेव करण्याला इस्लामचा विरोध नाही... ठेवीदार हे व्याज घेतात ... पण हे व्याज सोडुन उर्वरीत पैसा कुठे जातो ? ब्यान्केचे सर्व खर्च वगळता ब्यान्केचा तो नफा ब्यान्केतच रहातो. त्याऐवजी ठेवीदाराना बिझनेस पार्टनर मानुन तो नफा ( तोटा ) वाटावा . असे पवित्र पुस्तक सांगते.

२. इन्शुरन्समध्येही हेच लागु होते... १ ०० लोक प्रिमियम भरतात. दोन लोकाना क्लेम मिळतो... ज्यांच्या बाबतीत रिस्क घडत नाही , त्यांचे पैसे बुडतात... रिस्क कव्हर ही काल्पनिक गोष्ट असल्याने त्याची खरेदी विक्री ' पवित्र पुस्तकाला मंजुर नाही.... इथेही तेच सुचवले आहे.... विमेदार हे बिझनेस पार्टनर ठरावेत... ज्याना क्लेम मिळत नाहीत , त्यानाही नफा ( तोटा ) यात हिस्सेदार करावे....

प्रायोगिक तत्वावर प्रयोग सुरु आहेत.

lgodbole's picture

4 Apr 2016 - 8:44 pm | lgodbole

http://www.islamic-banking.com/takaful_insurance.aspx

इस्लामिक ब्यान्क व तकाफुल गुगलुन पहा.

माहितगार's picture

4 Apr 2016 - 10:00 pm | माहितगार

समजुन घ्यावे... त्याच्या आतच विनाकारण वरडु नये.

याचे प्रयोजन काय ?

ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे अशा गोष्टीं विरुद्ध धर्मसंस्थांनी नैतीक जबाबदारी म्हणून सामाजिक प्रबोधनाचा प्रयत्न करुन, आर्थीक दुर्बळांच्या मागे आर्थीक स्रोत उभे करण्यास सधनांना प्रवृत्त करणे ह्यात धर्मसंस्था सकारात्मक जबाबदारी निश्चितच निभावू शकते.

हे समजून घेणे नाही का ? हि समजून घेणारी भूमिका आपल्या पाहण्यात आत्ता पर्यंत किती वेळा आली आहे ?

आता उलट नाण्याची दुसरी बाजू जी वरील लेखात मांडली आहे ती समजून घेण्याचा अज्ञानश्रद्ध ग्रंथप्रामाण्य आणि अज्ञानश्रद्ध शब्दप्रामाण्यात का असू नये ? अर्थशास्त्र और गव्हर्नन्स के अंगने आपका क्या काम है ? हा प्रश्न धर्मसंस्थेने अभिप्रेत परीघ ओलांडल्यामुळे निर्माण होतो किंवा कसे.

मुद्रा, चलन आणि वस्तु विनिमय, मागणी-पुरवठा, तेजी मंदीची चक्रे अर्थशास्त्राच्या परिघात येतात तो स्वतंत्र मोठ्या अभ्यासाचा विषय आहे. जेणो काम तेणो ठाये. (कथीत) धार्मीकपुस्तके लिहिले गेले त्या काळात अर्थशास्त्रीय विचार आणि लोकशाही राज्यव्य्वस्था प्रगत नव्हत्या आज अर्थशास्त्रीय विचार आणि लोकशाही राज्यव्य्वस्था प्रगत स्थितीत उपलब्ध असताना मानवी जिवनातील अज्ञानमुलक अडथळे नाही तिथे कुरवाळण्यात काय पॉईंट आहे. धर्मसंस्थेने स्वत:च्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओळखावयास हव्यात आणि धर्मसंस्था स्वतःच्या परीघाच्या मर्यादा ओळखण्यात नापास होत असेल तर लोकांनी धर्मसंस्थेस स्वतःची मर्यादा ओळखण्यास येत असलेल्या अपयशाची मर्यादा ओळखावयास हवी.

माहितगार's picture

4 Apr 2016 - 10:07 pm | माहितगार

अर्थशास्त्र और गव्हर्नन्स के अंगने आपका क्या काम है ?

आपका = धर्मसंस्था

भंकस बाबा's picture

5 Apr 2016 - 8:34 am | भंकस बाबा

इस्लामिक पतसंस्था ही संकल्पना मुळी 90च्या दशकात चालु झाली, कारण काय तर बैंकिंग प्रणाली इस्लामी मुलतत्वात् बसत नाही. अफाट पैसा असुनदेखिल इस्लामी देशातील जनता आर्थिक स्थेर्य उपभोगु शकत नाही. आताचे उदाहरण घेतले तर तेलउत्पादक देश जे बहुत करून मुस्लिम आहेत जेव्हा तेलाला दुसरा पर्याय येईल तेव्हा उपाशी मरतील. एथेनॉल, बायोडिझेल, सौरऊर्जा,अणुऊर्जा असे अनेक पर्याय येत आहेत. तरिही हे अडाणी विमा सारखी भविष्य सुरक्षित करणारी वस्तु घेताना पवित्र पुस्तकाचा आधार घेतात. कम्युनिझम यांना मान्य नाही आणि भांडवलशाही पचत नाही, काय करावे या लोंकाचे?

माहितगार's picture

5 Apr 2016 - 11:33 am | माहितगार

इस्लामिक पतसंस्था

हे काय असते ? -म्हणजे मला माहीत आहे काय असते पण अर्थशास्त्र आणि व्यावसायिक आस्थापनेच्या कार्यात मानवतेचा दृष्टीकोण, मानवतेचा चष्मा, मानवतेच्या दृष्टीकोणातून येणारी राज्यसंस्थेचे अंकुष मान्य आहेत, शब्द/ग्रंथ/व्यक्ती/इश्वर प्रामाण्यातून अज्ञानश्रद्धेचा अथवा अंधश्रद्धेचा प्रभाव असणारे धर्मसंस्थेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप मला व्यक्तीशः त्यांनी परीघाबाहेर जाऊन केलेली अप्रस्तुत ढवळाढवळ वाटते. मी खाली सदस्य:कंजूस यांना सविसतर प्रतिसाद दिला आहेच.

इस्लामीक बँकीग एवजी मानवतेचा चेहरा असलेले बँकींग ही टर्मीनॉलॉजी मला अधिक पटते. एनी वे को-ऑपरेटीव्ह बँकींग आणि (कथित) इस्लामीक बँकींगच्या तुलनेचा एक चांगला पेपर या दुव्यावर मी सध्या वाचतो आहे कदाचित इतरांनाही वाचण्यास आवडेल. असो.

भंकस बाबा's picture

5 Apr 2016 - 1:20 pm | भंकस बाबा

मला बैंकिंग म्हणायचे होते.

भंकस बाबा's picture

5 Apr 2016 - 1:23 pm | भंकस बाबा

मला बैंकिंग म्हणायचे होते.

भंकस बाबा's picture

5 Apr 2016 - 1:31 pm | भंकस बाबा

इस्लामी देशांना हे करणे भाग पडले असावे, म्हंनजे तुम्हाला पावलोपावली अडत असताना तुम्ही कधिपर्यन्त हट्ट चालु ठेवणार?त्याआधि पण अशी काही सिस्टम असावी पण ना नफ़ा ना तोटा धर्तीवर असावी.
माझे ज्ञान या बाबतीत तोकडे आहे, माहितगार साहेब जास्त प्रकाश टाकतील.

lgodbole's picture

5 Apr 2016 - 6:25 pm | lgodbole

हिंदुंच्या पुस्तकात अर्थशास्त्र , उत्क्रांती विमान , इतिहास , टेस्ट ट्य्ब बेबी , ब्रह्मास्त्र , खगोल्ल vidyaàà इ इ आहेत असे म्हणुन नाचणारे लोक मुसलमानांच्या पुस्तकाaअ ब्यान्क व इन्शुरन्सबाबत काही आहे , असे समजले की मात्र चवताळुन उठतात ! म्हणे धार्मिक पुस्तकात ब्यान्क कशाला ?

तर्राट जोकर's picture

5 Apr 2016 - 6:34 pm | तर्राट जोकर

हो, पण हिंदूंच्या पुस्तकातल्या कल्पनारंजनानुसार हिंदूंचे जीवन चालत नाही. हिंदुंचे जीवन त्यांच्या मर्जीने चालते. तिकडे तुमचं धार्मिक पुस्तक फोटो काढू की नको, जेवण किती करु, सिगरेट पिऊ की नको असल्या अगदी फालतु गोष्टीतही लुडबूड करते त्याचं काय? वाचा हिथं : http://www.darululoom-deoband.com/english/

माहितगार's picture

5 Apr 2016 - 7:24 pm | माहितगार

हिंदुंच्या पुस्तकात..

१) धागा लेखात धर्मसंस्था हा शब्द धर्मसंस्थेचे नाव काहीही असले तरीही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील अज्ञानश्रद्ध लुडबूडीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे.
२) धागालेखातील टिका शक्यतेवढी बुद्धीवादी पद्धतीने आहे,-यात चवताळणे कुठेही नाही- मिसळपाववरील अर्थशास्त्राचे कोणतेही विद्यार्थी माझ्या मांडणीत दोष असतील तर दोष दिग्दर्शन करु शकतात. मी कोणत्याही विषयाकडे शक्य तेवढ्या खुल्यामनाने पाहून विरुद्ध बाजूचेही विचार मोकळेपणाने तपासण्यास तयार असतो हा मोकळेपणा आपल्या मांडणीला पुन्हा रिव्हिजीट करण्याची तयारी काळानुसार बदलण्याची तयारी धर्मसंस्थांकडे आहे का ? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
३) इस्लाम धर्माची भूमिका त्यातल्या त्यात अधिक टोकाची असल्यामुळे त्यांचे त्यांनाच खुपते आहे असे नाही आहे ना ?

४) आणखी एका प्रश्नाकडे हा लेख लक्षवेधतो ते व्यवहारातील विरोधाभासांकडे गंमत पहा आपल्याला स्वतःला ग्रंथ प्रामाण्य मान्य आहे पण मी मांडलेल्या मानवतावादी भूमिकेला आपला हा प्रतिसाद उडवून लावताना दिसतो आहे. म्हणजे ग्रंथ प्रामाण्य मानवतावादापेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर हा तुमच्या मानवी भूमिकेतला विरोधाभास आहे किंवा धर्मसंस्थेच्या ग्रंथातील मानवतेच्या उद्देश विसरला जाऊन शब्दांना अधिक महत्व येते आहे म्हणजे धर्मसंस्थेच्या मागे मानवता वादाचा काही एक उद्देश असेलच तर अयशस्वी होतो आहे किंवा कसे अशी शंका वाटते.

कंजूस's picture

5 Apr 2016 - 7:04 am | कंजूस

मुख्य मुद्दा काय आहे?१) ठेवीदार अथवा धन उसने देणाय्रांचे हित जपणे ,/२) कर्ज घेणाय्राचे तारण कोणत्या पर्िस्थितीत जप्त होता कामा नये? /३) धर्मसंस्थांची याविषयीची ढवळाढळ

माहितगार's picture

5 Apr 2016 - 10:59 am | माहितगार

उलट्या क्रमाने येतो

मुद्दा क्रमांक १) धर्मसंस्थांची याविषयीची त्यांच्या परीघाबाहेर जाऊन अनावश्यक आणि अज्ञानमुलक अर्थशास्त्र आणि राज्यसंस्थेतील ढवळाढवळ

मुद्दा क्र. २) कर्ज घेणाय्राचे तारण पूर्णतः जप्त करणे अथवा आजीबात जप्त न करणे या दोन्हीही टोकाच्या भूमिका आहेत. २अ) किमान सुरक्षा कवचास अपवाद देऊन अधिकतम तारण जप्त करण्यास हरकत नाही म्हणताना अधिकतम भांडवलाची उपलब्धता भांडवलाच्या उपयोगातील एफीशीअन्सी साठी खासगी कमर्शीअल बँकिंगचे कशी तारक ठरु शकते ते समजावून घेण्याची देण्याची गरज असते आणि नेमक्या या स्तरावर ध्रर्मसंस्थाचे काही दृष्टीकोण अथवा वर्तन अज्ञानमुलक असू शकते.
२ब) कोणत्याही ऋण-व्याज व्यवहाराला मानवी चेहरा असतो, (पेंशन स्कीम्सचा अपवाद सोडून) व्यक्तीशः राहत्या घरावर कर्ज घेण्याच्या मी नैतीक दृष्टीने विरोधात आहे आणि कुणी असे कर्ज समजा माझ्याकडून घेतले तर त्याच्या कुटूंबाच्या डोक्यावर छतासाठी किमान एक खोली शिल्लक रहावी असे मला मानवी भूमिकेतून वाटते.
२क) उत्पन्नाचा स्रोत जसे की शेती आहे तारण म्हणून पूर्ण शेतीच जप्त केली तर कुटूंबाचा उत्पन्नाचा स्रोत पूर्ण बंद होतो. ॠण घेण्याच्या जोखीमरुपी द्युताचा निर्णय भले युधीष्ठीर घेत असतो पण त्याच्या परीणामांची क्षती युधीष्ठीराच्या उर्वरीत कुटूंबास उठवणारी ठरु नये
२ड) ऋण-व्याज व्यवहाराच्या कोणत्याही परीणामातून गुलामी, वेठबिगारी बालमजदूरी हे परिणाम असू नयेत
२ई) अतीव्याज सावकारी, फसवणूकी आणि पैसे वसुलीच्या मेथडॉलॉजीत अमानवता घडू नयेत म्हणून अंकुष हवा.
३) मुद्दा क्रमांक २ब, २क, २ड, २ई काळजी घेण्याची कार्यकारी जबाबदारी राज्यसंस्थेची आहे धर्मसंस्थेने या राज्यसंस्थेच्या कार्यकारी जबाबदारीत ढवळा ढवळ करण्याचे कारण नाही.
४) २ब, २क, २ड, २ई बाबत अर्थशास्त्र अर्थ संस्था आणि राज्यसंस्था यात ढवळा ढवळ न करता, अंधश्रद्धा म्हणून अथवा एखाद्या पुस्तकाने, माणसाने, देवाने सांगीतले म्हणून नव्हे तर मानवी भूमिकेतून नैतीक प्रबोधन धर्मसंस्थेने करण्यास हरकत नसावी.

माहितगार's picture

5 Apr 2016 - 11:04 am | माहितगार

२क) अर्धे राहीले, उर्वरीत शेत तारण म्हणून गेले तरीही शेताचा छोटासा तुकडा कसण्यासाठी शिल्लक रहावा किंवा इतर व्यवसाय असतील तर नवा गृहोद्योग मायक्रो उद्द्योग चालू करण्या इतपत किमान भांडवल शिल्लक राहावयास हवे, किमानस्वरुपी स्रोतावर जप्ती येऊ नये.

lgodbole's picture

5 Apr 2016 - 12:58 pm | lgodbole

कर्ज काढताना काढणार्‍याने तितकी जमीन शिल्लक ठेउन फक्त उरलेल्याच जमिनीवर कर्ज घ्यावे.

तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?

माहितगार's picture

5 Apr 2016 - 1:17 pm | माहितगार

तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?

संपूर्ण घर / संपुर्ण जमीन तारणासाठी कायद्यानेच ग्राह्य धरु नये. लोन देणारे घेणारी व्यक्ती यांच्या निर्णयाचा फटका कुटूंबाला अंशतः बसणारच असतो पण पूर्ण कुटूंब उघड्यावर येणे आणि निर्णय कर्त्याच्या चुकांची शिक्षा कुटूंबातील उर्वरीतांना विशेषतः कच्च्या बच्च्यांना कमीत कमी व्हावी हे मानवी भूमिकेतून पाहीले पाहीजे. व्यवसाय माणसांसाठी असतात माणसे व्यवसायासाठी नसतात, कोणताही व्यवसाय मानवतेच्या वर असू नये असे माझे व्यक्तिगत आग्रही मत आहे.

lgodbole's picture

5 Apr 2016 - 1:53 pm | lgodbole

तुमच्याकडे एक घर आहे की चार ? शेत चारच एकर आहे की अजुन दोन एकर आहे , हे ब्यान्केला कसे समजणार ? जे तारण तुम्ही देणार त्यावर ब्यान्क कrj देणार .

बायकापोरांसाठी शिल्लक ठेवणे ही व्यक्तीची जबाबदारी असते. ब्यान्केची नाही.

lgodbole's picture

5 Apr 2016 - 12:58 pm | lgodbole

कर्ज काढताना काढणार्‍याने तितकी जमीन शिल्लक ठेउन फक्त उरलेल्याच जमिनीवर कर्ज घ्यावे.

तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?

हा एक्स्ट्रा प्रतिसाद पुन्हा प्रकाशित झालेला दिसतोय, संपादकांनी उडवल्यास बरे असेल .

तुमचे म्हणणे बरोबर वाटतंय परंतू आता जसे एक दोघे दहशतवादी कारवाया करतात म्हणून साठीच्या वरच्या स्त्री पुरुषांसकट सगळ्यांचीच विमानळावर नागडी तपासणी होते तसंच एक दोन कर्ज बुडवे निघतात त्याचा भुर्दंड सर्वांनाच उटपटांग व्याज भरण्यात आणि तारण गमावण्यात होतो.

तेच ना वड्याचे तेल वांग्यावर निघू नये

lgodbole's picture

5 Apr 2016 - 6:32 pm | lgodbole

गणिताला वैदिक गणित म्हटलं तर चालतं !

पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर मात्र आर्थिक क्षेत्रावर धर्माचे आक्रमण !

माहितगार's picture

5 Apr 2016 - 7:32 pm | माहितगार

गणिताला वैदिक गणित म्हटलं तर चालतं !

गणितशास्त्राला न झेपणारे अथवा अज्ञानश्रद्ध ग्रंथ प्रामाण्य त्यात आले तर त्यावर टिका होणारच. मग गणित विषयातील धर्मसंस्थेच्या आक्रमणाबद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित होतील.

खगोलशास्त्रीय अंधश्रद्धा जसे की ग्रहणे, राहु केतु इत्यादींना राक्षस समजणे या आणि अशा अज्ञानश्रद्धांवर टिकेस हिंदू धर्मासही सामोरे जावे लागले आहे. इतर धर्मीयांच्या बाबतीत देर होते पण काळानुसार दुरुस्त येतात, शास्त्र आणि विज्ञानाच्या बाबतीत काळाची पावले मागे नेण्याचे प्रमाण कमी आहे ही त्यांची जमेची बाजू असे माझे व्यक्तिगत मत. चुभूदेघे.

माहितगार's picture

5 Apr 2016 - 7:54 pm | माहितगार

१) वैदीक गणित हा शब्द प्रयोग धार्मीक नव्हे सांस्कृतीक प्रकाराचा वाटतो, ० ते ९ या अंकांचा उल्लेख बर्‍याचदा अरेबीक न्युमरल्स असाही केला जातो हा सांस्कृतीक उल्लेख आहे जे संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करतात ते यास धार्मीक उल्लेख समजू शकतात. माझ्या हाताशी संदर्भ नाहीत पण वैदीक गणिताचा प्रत्यक्ष वेदांशी संबंध किती आहे या बाबत साशंकता व्यक्त केले गेल्याचे पाहीले आहे, त्या चर्चांचा मतितार्थ काही असो हिंदू संस्कृतीस प्रसंगी कुरकुरत का होईना टिका सहन करण्याची अधिक सवय असावी.

२) शास्त्रार्थ नावाने पुर्वपक्ष उत्तरपक्ष मांडून टिका प्रतिटिका चिकित्सा करण्याची त्या शिवाय तर्कशास्त्रांची उद्धरणे उधृत करण्याची एक मनमोकळी परंपरा हिंदू संस्कृतीच्या पाठीशी आहे त्यामुळे चिकित्सा टिका आणि काळानुरुप सावकाश का होईना बदलण्याची एक प्रक्रीया त्या संस्कृतीत दिसते हि त्यांची जमेची बाजू

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2016 - 12:55 am | डॉ सुहास म्हात्रे

हिंदु-अरेबिक न्युमरल सिस्टिम (सद्या इंग्लिश भाषेमधे वापरली जाणारी) इ स च्या पहिल्या ते चवथ्या शतकात भारतात निर्माण केली गेली आणि भारतातून अरबस्थानात आणि तेथून पुढे युरोपात प्रसरण पावली.

अरेबिकमधे वापरल्या जाणार्‍या न्युमरल्सना हिंदु किंवा हिंदी न्युमरल्स असे म्हणतात.

अरेबिक भाषेत अक्षरे उजवीकडून डावीकडे लिहिली जातात परंतू आकडे मात्र भारतिय/युरोपियन भाषांप्रमाणेच डावीकडून उजवीकडे लिहिले जातात.

पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर...

आपली वैचारीक गल्लत होते आहे, आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत बँकींग केले आणि त्यात इस्लामिक, अरेबीक, ज्यू, ख्रिश्चन असे कोणतेही नाव बँकेस दिल्यास या धागा लेखास देणे घेणे नाही.

या धागा लेखातील टिका परीघा बाहेर जाऊन आधूनिक अर्थशास्त्राचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे ग्रंथ अथवा शब्द प्रामाण्यावर आहे. इथे बँकेच्या नावाचा संबंध नाही.

माहीतगार साहेब, इस्लामिक बँकिंग ही अनेक देशात पाळली जाणारी बँकिंगपद्धती आहे, बँकेचे नाव नव्हे असं नोंदवून खाली बसतो. चर्चा रोचक आहे. आभार.

माहितगार's picture

6 Apr 2016 - 9:12 am | माहितगार

माहीतगार साहेब, इस्लामिक बँकिंग ही अनेक देशात पाळली जाणारी बँकिंगपद्धती आहे, बँकेचे नाव नव्हे

गवि, रामायण झाल्यावर सीता कोण ते सांगतायसा ?, मी धर्मसंस्थेच्या कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन अज्ञानश्रध परोक्ष अपरो़क्ष हस्तक्षेपा बाबत तर साशंकता व्यक्त करतो आहे. माझी साशंकता मानवता आधारीत डोळस बँकीग बद्दलसुद्धा नाही माझी साशंकता ग्रंथप्रामाण्याधारीत अज्ञानश्रद्ध बँकींग बद्दल आहे.

आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत बँकींग केले आणि त्यात इस्लामिक, अरेबीक, ज्यू, ख्रिश्चन असे कोणतेही नाव बँकेस दिल्यास या धागा लेखास देणे घेणे नाही.

मूळ प्रतिसादकर्त्याचं वाक्य

"पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर मात्र आर्थिक क्षेत्रावर धर्माचे आक्रमण !""

यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना इस्लामिक धार्मिक आर्थिक नियमांनुसार चालणारी बँक असाच अभिप्रेत दिसत होता.

केवळ उपरोक्त वाक्यामुळे समज होऊन ती गुस्ताखी झाली..!! माफी..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2016 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना इस्लामिक धार्मिक आर्थिक नियमांनुसार चालणारी बँक असाच अभिप्रेत दिसत होता.

इस्लामिक बँकिंग हा शब्दप्रयोग "केवळ इस्लामिक / शरिया नियमांबरहुकूम चालणार्‍या बँकिंग"साठीच वापरला जातो.

या बँका सर्वसाधारणपणे मुस्लिम लोक/संस्था स्थापन करतात आणि इस्लाम हा राष्ट्रधर्म मानणार्‍या देशांत आहेत. पण, तसे असणे ही मूळ अट नाही तर शरियाचे पालन ही मात्र आवश्यक अट आहे. पाश्चिमात्य देशांतील आधुनिक बँकिंग व वित्त कायद्यांच्या कक्षेत शरियाची तत्वे बसवणे ही एक तारेवरची कसरत आहे... पण, शरियाचे पालन करण्याचा आग्रह धरणार्‍या अनेक अतीश्रीमंत (हाय नेट वर्थ) मुस्लिम गिर्‍हाइकांना आकर्षित करण्यासाठी पाश्चिमात्य बँकाही या ना त्या प्रकारे इस्लामिक बँकिंग विभाग उघडू लागल्या आहेत.

माहितगार's picture

6 Apr 2016 - 1:26 pm | माहितगार

...साठीच वापरला जातो.

१) माहितीएना साहेब, सर्वसामान्य आकलनाचा भाग आहे, पण धागा चर्चेतला मुद्दा वेगळा आहे.
२) शेवटी आपण जे निदर्शनास आणत आहात त्यात मानवता हा गाभा असल्याचे आश्वासन नाही, केवळ व्यावसायिक उद्दीष्टाने ग्रंथप्रामाण्याचे लांगुलचालन असे म्हणावयाचे आहे का आपल्याला ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Apr 2016 - 1:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

या जगात, सोईची तत्वे पुढे करणे हे नेहमीचेच आहे. मात्र, त्यांचा उपयोग करून कोणता परिणाम साधायचा हे ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते... हे पण नेहमीचेच आहे.

हे सर्व काहीसं १००% शुद्ध साम्यवाद किंवा १००% शुद्ध स्वदेशीवाद किंवा शंभर टक्के शुद्ध स्वयंपूर्णतावाद यांसारखं आहे.

थोडक्यात बोलायचं तर जगात आपोआप अस्तित्वात असणारे काही आर्थिक / सिस्टिमशी संबंधित फोर्सेस आहेत. त्यांची नावं आणि स्वरुप आपल्याला आवडत नसलं आणि आपण ते टाळून अन्य मार्गाने व्यवहार करायला गेलो की गावाला वळसा घालून, मानेमागून फिरवून घास आणल्यावर इ इ इ असं बरंच काही झाल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण टाळू पाहात असलेले ते दुष्ट दुष्ट बैट्ट वैट्ट फोर्सेस / एन्टीटीज वेगळ्या नावाने आपल्या सिस्टीममधे अस्तित्वात आलेल्याच आहेत.. किंबहुना त्या होत्याच.

व्याज,कर्ज,भांडवल, असमान वेतन, विषमता, पगार, अनुदान, गरिबी, श्रीमंती, पिळवणूक, गुलामगिरी, जातीयवाद, अस्मिताबाजी, शोषण.. सगळ्या सगळ्याला सर्व सिस्टीम्समधे इक्विव्हॅलंट आहेतच आहेत. GUI वेगळा फक्त.

lgodbole's picture

6 Apr 2016 - 2:39 pm | lgodbole

कर्ज बुडवुन दुसर्‍याना देशोधडीला लावण्याचं समर्थन करणारे लोक इस्लामिक ब्यान्केत मानवता आहे का ? असा आक्रोश करत आहेत.

इस्लाम शब्दाबाबत इतका फोबिया असेल तर चाणक्यसुत्रे वाचुन त्या तत्वावर चालणारी एखादी चाणक्य ब्यान्क काढावी.

इस्लाम शब्दाबाबत इतका फोबिया असेल तर...

इस्लाम शब्दाचा अंशभरही फोबीआ नाही, उलटपक्षी विशीष्ट धर्मशब्द कमीत कमी फोकस करण्याच्या दृष्टीने धर्मसंस्था हा शब्द वापरला आहे. आधुनिक अर्थशास्त्रावर आधारीत ज्ञानयुक्त तसेच मानवता या मुल्याला अनुसरुन संयत आग्रह असल्यामुळे चाणक्य असो वा इतर धर्म धर्माधारीत ग्रंथप्रामाण्या बद्दल मुलतः शंका व्यक्त केली आहे.

...मानवता आहे का ?

यात आक्रोश कुठेही नाही, आधुनिक अर्थशास्त्रावर आधारीत ज्ञानयुक्त तसेच मानवता या मुल्याला अनुसरुन संयत आग्रह आहे.

कर्ज बुडवुन दुसर्‍याना देशोधडीला लावण्याचं समर्थन...

असे समर्थन धागा लेखाने कुठेही केलेले नाही केवळ मानवी मुल्यांचा आग्रह मान्य केला आहे.

माहितगार's picture

6 Apr 2016 - 3:38 pm | माहितगार

केवळ मानवतावादी मुल्यांचा आग्रह मान्य केला आहे. असे वाचावे

lgodbole's picture

6 Apr 2016 - 4:52 pm | lgodbole

कर्जदाराचे शेत व घर मानवतेच्या नावाने त्यालाच ठवावे , ब्यान्केने तेतारण असले तरी घेउ नये , असा आग्रह धरणे म्हणजे इतर ठेवीदार बुडावेत , असेच म्हणण्यासारखे आहे.

मानवतेची इतकी कळकळ असेलच तर घरात मोफत भोजनालय सुरु करुन इतराना तुम्ही रोज अन्नदान करावे. तुम्ही कराल ? मग ब्यान्क व इतर ठेवीदारानी हे का करायचे म्हणे ?

माहितगार's picture

6 Apr 2016 - 5:11 pm | माहितगार

कर्जदाराचे शेत व घर मानवतेच्या नावाने त्यालाच ठवावे , ब्यान्केने तेतारण असले तरी घेउ नये , असा आग्रह धरणे म्हणजे इतर ठेवीदार बुडावेत , असेच म्हणण्यासारखे आहे.

*आपण परस्पर टोकाचे अर्थ काढत आहात ? मी शेताचा उदरनिर्वाहासाठी आयुष्यात पुन्हा उभे टाकण्यासाठीचा तुकडा अथवा आर्थीक स्रोत असे म्हटले म्हणजे उर्वरीत तारण शेतावर टाच आणू नये असे म्हटलेले नाही.
*घराची एक खोली एवढे किमान छत डोक्यावर बाकी रहावे म्हणजे उर्वरीत घराबद्दल टाच आणू नये असे म्हटलेले नाही.-हा कर्ज घेणार्‍या व्यक्तिंनी राहत्या घरावर कर्ज घेणे होता होईतो टाळावे असेच वाटते-

अशा किमान स्वरुपाच्या गोष्टी तारणाचा भाग म्हणूनही बँकानी घेऊ नयेत. व्यक्तिची एकुण माल मत्तेची माहिती सातबारे इनकम टॅक्स इत्यादी स्टेटमेंट मधून मिळू शकते.

लिमिटेड लाएबिलिटी कंपनी असते त्यात भागभांडवला पलिकडे शेअरहोल्डरची व्यक्तिग्त मालमत्तेवर सहसा टाच येत नाही; त्याच पद्धतीने घराची एक खोली आणि शेताचा अथवा आर्थीक स्रोताचा एक शेअर लिमिटेड लाएबिलिटी कायद्याने कव्हर केला की संपले.