मिसळपावचे आधिकारीक धोरण
नमस्कार,
आज दिनांक १३/०७/१० ला मिसळपावच्या धोरणांना प्रसिध्दी देतांना आनंद होत आहे. ही धोरणे मिसळपावची यापुढील मार्गदर्शक असतील. यापुढे मिसळपाववर वावर करतांना आणि लेखन करतांना सदस्यांना ही धोरणे मान्य आहेत असं गृहीत धरल्या जाईल.
१. मिसळपावावरील लेखनात ललित किंवा वैचारिक लेखन, गद्य, पद्य, पाककृती यांना स्थान दिले जाईल. या व्यतिरिक्त खेळीमेळीचे धागे मिसळपावावर ठेवले जातील. लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल. एखाद्या सदस्याने मिसळपावाचे सदस्यत्व सोडले असता त्याचे लेखन प्रकाशित ठेवण्याचा किंवा अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेईल.
२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.
३. आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे झाल्यास मिसळपावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करता येईल.
४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.
५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.
६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.
७. संपादकीय धोरणात परिस्थिनुरुप बदल करण्याचे हक्क संपादकांकडे राखीव आहेत. त्याचा वेळोवेळी वापर करता येईल. गरज भासल्यास सदस्यांना जाहीर निवेदनामार्फत तशी सूचना दिली जाईल.
८ . वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी.
९. संकेतस्थळावरील अडचणी, लेखांचे संपादन, संपादनाविषयी तक्रारी यांच्यावर निघणारे धागे संपादन मंडळाला अनावश्यक वाटल्यास त्वरित उडवले जातील आणि त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.
मिसळपावाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी वरील सूचनांचे पालन करावी अशी अपेक्षा आहे. सदस्यांना लेखनविषयक धोरणांची जाणीव करून देण्यास आणि वेळोवेळी मदत करण्यास संपादक मंडळ नेमलेले आहे. लेखनविषयक प्रश्न असल्यास जाहीर लेख न टाकता संपादकांना खरडी किंवा व्यक्तिगत निरोपांद्वारे विचारावेत. संपादक मंडळ या आयडीवर निरोप पाठवूनही हे प्रश्न विचारता येतील.
प्रतिक्रिया
वाचक आणि संपादक
म्हणून या धोरणाचा पाठपुरावा मी करेन.
+१
+१
सदस्यांनीपण संपादक हे आपापली वैयक्तिक आयुष्य सांभाळून हे काम करत आहेत हे ध्यानात ठेवावे अशी विनंती करतो. शिवाय, संपादकांचे एखादे कृत्य पटले नाही तर संपादक मंडळाकडे विचारणा करावी. त्यासाठी जाहिर काथ्याकूट करू नये. सगळ्यांनाच सगळे माहित नसते (किंबहुना सगळ्याच गोष्टी संपादक पुढे आणू शकत नाहीत हे ध्यानात ठेवावे) आणि त्यामुळे संपादकांच्या कृत्यांमागच्या भूमिकेबद्दल गैरसमज होऊ शकतात.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
+२
+१, अत्यंत महत्वाचा मुद्दा.
अगदी हेच म्हणायचे आहे.
बाकी धोरणे उत्तम आहेतच, त्याचे काटेकोर पालन करण्याचा व सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिल.
जाता जाता : प्रभु मास्तर, जियो ! मास्तरांचा प्रतिसाद म्हणजे 'कळस' आहे, १००% सहमत.
------
छोटा डॉन
वा !!
धोरण जाहीर झाले हे चांगले झाले.
नवी घटना उत्तम आहे. बरीचशी पूर्वीच्या नियमावलीसारखीच आहे. या धोरणप्रसिद्धीमुळे वातावरण निवळण्यास आणि शांतता प्रस्थापित होण्यास बहुधा मदत व्हावी.
अर्थातच नवी घटना निर्माण झाली तरी सगळे नियम काही पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेले नसतात. लिहिणे शक्यही नसते. घटना राबवताना घेतल्या जाणार्या निर्णयांमधून त्या घटनेचे अर्थ कसे लावावे हे स्पष्ट होत जाते. याला केस लॉ म्हणतात. विशेषतः जेव्हा दोन कलमांमध्ये विसंगती निर्माण होते तेव्हा या केस लॉज चा फारच उपयोग होतो.
परंतु हे जे धोरण जाहीर झाले आहे त्यात केस लॉजची बहुधा गरजच पडणार नाही किंवा उपयोग होणार नाही इतके हे धोरण स्पष्ट आणि असंदिग्ध आहे.
उत्तम.
नितिन थत्ते
नितिन,
नितिन, मूळातच मिपाकडे एखाद्या कोर्ट अथवा तत्सम दृष्टीने का बघावे? हे एक सर्वांनी एकत्र येण्याचे, हसत खेळत एकत्र वेळ घालवायचे, दोन द्यायचे / दोन घ्यायचे, एकमेकांना समृद्ध करायचे स्थळ आहे या भावनेतून का वावरू नये? धोरण असणे आवश्यक झाले हे खरे. पण या धोरणाचा उपयोग होण्याची वेळ कमीत कमी यावी हे आपण सगळ्यांनीच बघणे हितकर. आज पर्यंत टाळी कधी एक हाताने वाजली नाही आणि या जगाच्या अंतापर्यंत तरी वाजणार नाही हे नक्की. अधिक काय सांगावे? आपण सगळेच सूज्ञ आहोत.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
+१ अगदी मान्य!
तांत्रिक क्लिष्टता आणि नियमांचा कीस काढणे यासाठी धोरणे नाहीत. एखाद्या मोठ्या एकत्र कुटुंबात वावरताना सगळ्यांनी खेळीमेळीने रहावे अशा हेतून घराचे म्हणून काही नियम असतात आणि ते सर्वांनी पाळावेत अशी अपेक्षा असते, थोडीफार चेष्टामस्करी, कधी रागलोभ हे चालायचेच पण मर्यादेतच. त्या अनुषंगाने ह्या धोरणांकडे पाहावे!
चतुरंग
सहमत आहे
सहमत आहे.
(मर्यादांच भान व भीती दोन्ही बाळगुन असणारा)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
प्रकाश घाटपांडे
फलज्योतिष चिकित्सा मंडळ
वा...
क्रमांक ७, ८, ९ मधील तरतूद सर्वाधिक महत्त्वाची. मोलाचीही. आवश्यकही होती. क्रमांक ९ तर संपादकांच्या हातचे ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्रासारखाच दुर्मिळतेने त्याचा वापर होईल अशी संपादकांकडून आणि (माझ्यासह) सदस्यांकडूनही अपेक्षा.
धोरणाचा मान हा सर्व सदस्यांनी राखायचा आहे!
संपादक हे आधी सदस्य आहेत त्यामुले तेही ह्यात आलेच.
एकदा असा मान ठेवला गेला की बाकी गोष्टी आपसूकच येत जातात जेणेकरुन अस्त्राचा वापर कमीतकमी अथवा नगण्य होतो!
(समाधानी)चतुरंग
काटेकोर प्रयत्न
नवी धोरणे आवडली. त्यांचे पालन करण्याचा काटेकोर प्रयत्न माझ्याकडून होईल.
(आशावादी) प्रियाली
योग्य धोरण
धोरणाचे स्वागत.
मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे.
_________
मालकांची कृपा॥
अत्यंत योग्य विधान.
मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे.
संपादक मंडळात असलेल्या सर्व सदस्यांचा विचार विनिमय असतोच. कोणा एक-दोघांच्या मताने निर्णय होत नाहीत. सदस्यांबाबत काही वैयक्तिक मत असले/नसले तरी ते संपादनाच्या आड येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. सर्वांचा मिळून तेवढा अनुभव निश्चितच जमा झालेला आहे. तेव्हा तुम्ही केलेली अपेक्षा गैरवाजवी नाही! धन्यवाद!
चतुरंग
श्री. क्रेमर
मिपावरील संपादक मराठी आंतरजालावर बराच काळ कार्यरत असावे असे दिसते. त्यांच्या आंतरजालावरील प्रदीर्घ वावरामुळे नकळत का होईना काही सदस्यांविषयी त्यांच्या मनात काही एक मत निर्माण झालेले असावे. असे असतांना ते या मतांना बाजूला ठेऊन निर्णय घेत असतील/ घेतील अशी अपेक्षा आहे.
आपल्या नेहमीच्या आयुष्यात जेव्हा आपण लोकांना प्रत्यक्षात भेटतो, वावरतो तरी एवढी मतंमतांतरं असतात. पूर्वग्रह असतात. म्हणूनच आपण माणूस आहोत. नाहीतर देव बनलो असतो नाहीतर संत वगैरे. इथे जालावर तर बहुतांसी लोक नक्की कोण हे पण आपल्याला माहित नसते. पूर्वग्रह वाढायला बराच वाव असतो. तरीही संपादक बहुतांशवेळा तटस्थ बुद्धीने वागायचा प्रयत्न करतातच. पण शेवटी 'टू अर इज ह्युमन' या न्यायाने उन्नीसबीस होतच असते. पण कोणत्याही समस्येचे / भांडणाचे निराकरण नीट संवाद साधून होणे शक्य असते. तसेच व्हावे. एवढीच इच्छा.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
त्याविषयी
हे खटकले. मागे जेव्हा नीलकांतने सगळी सूत्रे हातात घेतली तेव्हा अधिक पारदर्शकता आणली जाईल अथवा तत्सम काही तरी म्हटल्याचे आठवते आहे.
असो धोरण जाहीर झाले बरे झाले.
पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न होता आहे आणि राहिल.
सहमत आहे
सहमत आहे
पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न होता आहे आणि राहिल.
*खेळ विभागाचं काय रे, कांता??
असं बघा...
हे खटकले.
असं लिहिलं असलं तरी, बहुतांश वेळेला स्पष्टीकरण देणं किंवा संवाद साधणं असं काही संपादक करतच असतात. ते समोर येत नाही. ते ही समोर येणं आणि सदस्यांनी ते समजून घेणं आवश्यक आहे.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
तुमच्याशी
तुमच्याशीही सहमत आहे. मला स्पष्टीकरण मिळालं होतं. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही.
अशा तक्रारी दुसर्यांच्या असू नयेत, एवढीच इच्छा!
सहमत आहे
मागे काही काळ बरीच उडवा उडवी झाली होती आणि मग त्याचे का उडाले माझेच का नाही असा खाली प्रियाली यांनी म्हटले आहे तसा कीस काढला गेला होता.
संपादकांनी प्रतिसाद न उडवता तिथेच XYZ कारणासाठी हा प्रतिसाद काढण्यात आलेला आहे असे लिहीले तर बरेच प्रश्न सुटतील असे सुचवावेसे वाटते.
XYZ कारणासाठी हा प्रतिसाद काढण्यात आलेला आहे
ती कारणे ढोबळमानाने धोरणात दिलेली आहेत प्रत्येक संपादित प्रतिसादात हे देणे शहाणपणाचे नाही.
------------------
औषधाच्या रॅपरवर साईडइफेक्ट्स लिहिलेले असतात. कोणाला काहीच साईडइफेक्ट दिसणार नाही काहींना बरेचसे दिसतील ते ज्याच्यात्याच्या प्रकृतीधर्मावर अवलंबून आहे. प्रत्येकाला स्वतंत्र स्पष्टीकरण देणे शक्य नसते तसेच काहीसे. गोळाबेरीज सांगितलेली असते बाकी तारतम्य..
चतुरंग
प्रत्येका
+१
सहमत आहे.
फक्त एक विनंती अशी आहे की जर एखाद्या संपादकाने एखादा धागा अथवा प्रतिक्रीया उडवल्यास त्याची जबाबदारी सर्व संपादक मंडळाने घ्यावी.
बर्याचदा असे दिसते की एखाद्या उडालेल्या धाग्याविषयी / प्रतिसादाविषयी सदस्याकडून जाहिररीत्या (जे ह्यापुढे शक्य नाही) अथवा खरडवहीत विचारणा झाली तर बरेचसे संपादक 'छे मी तेंव्हा न्हवतोच' , 'धागा अजुन उघडलाच नाहिये, बघुन सांगतो' 'काय सांगता ? तुमचा प्रतिसाद उडाला ? कधी ?' अशी विधाने करुन मोकळी होतात. 'तो मी न्हवेच' असे दाखवायची धडपड बर्याचदा स्पष्ट दिसते. ह्यामुळे विनाकरण संबंधीत मजकुर संपादीत करणारा संपादक हा चुकीचा ठरतो. त्यानी जे काय केले त्याला इतर संपादकांचा पाठींबा न्हवता अथवा इतरांना ते माहितीच नाही अथवा संपादकांच्यात एकमेकात ताळमेळ नाही असा काहीसा चुकीच संदेश सदस्यांपर्यंत जातो.
हे टाळता आल्यास बरे होईल असे वाटते. उडालेल्या धाग्याविषयी / प्रतिसादा विषयी 'योग्यरीत्या' विचारणा झाल्यास, फक्त 'संपादक मंडळ' ह्या आयडीच द्वारे खुलासा व्हावा असे सुचवावेसे वाटते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
असे होत असते
प्रतिसाद काढण्यापेक्षा अप्रकाशित जेव्हा केला जातो तेव्हा असे लिहीणे कठीण असते. नाहीतर कल्पना करा की प्रत्येक अप्रकाशित प्रतिसादाबरोबर एक संपादकांचा प्रतिसाद की "हा वरचा प्रतिसाद का अप्रकाशित केला". मी पूर्वी जेव्हा लेख किंवा प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत तेव्हा सदस्याच्या ख. व. मध्ये लिहीले आहे. पण काही सदस्य या चांगुलपणाचा फायदा घेतात. तेव्हा आमचा वेळ घालवून प्रत्येक सदस्याच्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देणे अवघड आहे. समजून घेऊ शकाल, असे वाटते.
संपादक प्रतिसादातील काही वाक्ये ठेऊन आक्षेपार्ह वाक्ये शक्यतो अशासाठी काढत अशासाठी नाहीत, की त्यामुळे नक्की गदारोळ कशामुळे झाला याचे संदर्भच नाहीसे होतात! अप्रकाशित प्रतिसादांमुळे संपादक मंडळाकडे संदर्भ राहतात.. असो.
ढोबळ स्पष्टीकरण
काय राहील आणि काय काढले जाईल त्याचे ढोबळ स्पष्टीकरण येथे दिलेले आहेच. बर्याचदा सदस्यांना संपादित लेखनावर काथ्याकूट करून हवा असतो तो करत, कीस काढत राहणे मला अनावश्यक वाटते.
+१
तेच माझ्या प्रतिसादात लिहिले आहे. धोरण अतिशय स्पष्ट आहे.
संपादकांचा/संपादक मंडळाचा निर्णय फायनल.
म्हणूनच नियम ४ ते ९ ऐवजी तेवढा एकच नियम लिहून पुरला असता.
(वेलणकर जिंकले असा धागा मनोगतावर टाकावा म्हणतो).
वातावरण कलुषित केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून आता एक ऑगस्टपर्यंत लेखन रजा.
नितिन थत्ते
नाही
मिपावर कुठच्याच प्रश्नाला उत्तरे न देणे, प्रश्नाला कधीच प्रतिसाद न येणे, अपेक्षित नव्हते आणि बहुतांशी केले नाही. जेव्हा कधी केले आहे त्या १०% वेळा आधी उत्तरे देऊन, समजुतीने सांगून समझोत्याचे प्रयत्न केले आहेत.
तेव्हा हा निर्णय एकेरी नाही. इथे तुम्हाला माहिती असलेल्या चालकांनी आणि संपादकांनी एकत्रितरित्या घेतला आहे.
टेक इट इजी
अवश्य घ्या! आणि मोकळ्या मनाने परत या.
(प्रतीक्षेत) प्रियाली
पारदर्शकता निश्चित आहे
मिपाच्या धोरणांच्या अंमलबजावणीत बर्याच अंशी पारदर्शकता राहिली आहे.
परंतु प्रत्येक वेळी एका सदस्याने उठून एक नवीन धागा सुरू करायचा, त्या त्या वेळी असलेल्या आपल्या प्रश्नांची ताबडतोब उत्तरे देण्यास वेठीला धरायचे, इतकेच नाही तर संपादकांना कुत्रे, आणि अशाच असभ्य किंवा इतर बोचर्या विशेषणांनी संबोधायचे आणि पारदर्शकतेची अपेक्षा करायची हे कठीण आहे हे तुम्ही समजू शकाल..
सहमत
सहमत आहे.
या निमित्ताने संपादकही आपली बाजू मांडत आहेत हे बरे आहे. या निमित्ताने सगळेच काही एकतर्फी आहे असे नाही हे सदस्यांना समजेल. दुसरी बाजूही समोर येत आहे.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
दुसर्या
दुसर्या बाजूला याहीपेक्षा जास्त मुद्दे आहेत यासाठी मुद्दामच उपप्रतिसाद. पण नो मोअर कमेंट्स!
धोरण आलं हे उत्तमच. मिपा उत्तरोत्तर प्रगती करत राहो.
अदिती
अदिती
Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध
-- स्वाक्षरी सल्लागार कार्यकर्ते यांच्याकडून प्रीअप्रूव्ह्ड
नवीन धोरणे
नवीन धोरणे जाहीर झाल्याचा आनंद होत आहे.
संपादकांवर होणारे शाब्दीक हल्ले आता थांबायला हवेत.
वाट्टेल त्या भाषेत व्य. नि. करण्याचे प्रमाण आता जवळ जवळ थांबेल अशी आशा वाटते. संपादक हे कोणाचेही 'नोकर' नाहीत तर मिपावरील प्रेमापोटी काम करत आहेत हे गेल्या काही दिवसांत जाणवून द्यावेसे वाटत होते. सदस्यांनी स्वत: टारगट प्रतिसाद देवून ते उडवल्यावर निषेध व्यक्त करणे हे निव्वळ स्वार्थीपणाचे वाटते.
रेवती
नवीन
नवीन धोरणांचे पालन करण्याचा काटेकोर प्रयत्न करीन.
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
+१
>> संपादक हे कोणाचेही 'नोकर' नाहीत तर मिपावरील प्रेमापोटी काम करत आहेत
+१
संपादकांना खरड किंवा व्यनि कसा पाठवावा
संपादकांना खरड किंवा व्यनि कसा पाठवावा. मला पावर नाय.
______________
|| संपादकांची कृपा ||
धोरणाचे
धोरणाचे स्वागत.
लंबुटांग यांच्या सुचनांना (आणि त्यावरील प्रतिसाद) जोडणी म्हणुन.
सहसा मॉडरेटर लॉग्स हे इतर मॉड्स ना बघता येतात. कुठल्या संपाद्काने संपादन केले आहे हे सर्वांना समजले तर तक्रारनिवारण संपादकांना सोपे होइल असे वाटते. लॉग्स ची सोय झाली तर उत्तम.
(किंवा/शिवाय) अप्रकाशीत केलेल्या प्रतिसादात जर संपादक एखादी 'नोट' लावु शकत असेल तरीही तक्रारनिवारण सोईचे होईल.
संपादन कीतीही निरपेक्ष असले तरी प्रतिसादकांच्या तक्रारी येणारच त्यामुळे (स्पष्टीकरण दिले जाणार नाही ही) भुमिका थोडी ढिली असावी असे वाटते.
-Nile
-Nile
लेख किंवा
लेख किंवा प्रतिसाद अप्रकाशित केल्यावर त्याचे स्पष्टिकरण मिळावे असे वाटणे साहजिक आहे. वस्तूस्थिती पाहता प्रत्येक संपादक अठवड्याला एखाद्दुसरा लेख व दहावीस प्रतिसाद अप्रकाशित करत असला तर फक्त लेखाच्या अप्रकाशित करण्याबाबत स्पष्टेकरण देणे शक्य होते. तसेही संपादक प्रतिक्रिया अप्रकाशित करण्याबाबत वेळ काळ पाहून निर्णय घेतात.
रेवती
मला असेच
मला असेच काहीसे म्हणायचे आहे. मला संपादकांबद्दल कोणतीही तक्रार नाही आहे पण कारणे माहित नसल्यास उगाच गैरसमज वाढतात आणि मग संपादकांवरच पक्षपातीपणाचा आरोप होतो. जो टाळण्यासाठी वरचा प्रतिसाद होता.
माझी स्वतःची terminology समजण्यात अडचण होते आहे बहुतेक. अप्रकाशित केल्यास तो normal user ना वाचता येत नसावा पण database मधे राहत असावा जो नंतर प्रकाशित करता येऊ शकतो. प्रतिसाद अप्रकाशित करून मग उत्तर देण्यासाठी प्रतिसाद देणे ही एक जास्त step आहे मान्य पण तसे केल्यास नंतरची प्रश्नोत्तरी वाचेल असे वाटते.
प्रतिसाद Delete केल्यास मग संपादकांना खरडी केल्या जातात मग संपादक वेळ मिळेल तेव्हा उत्तर देतात. ह्या सगळ्या घोळात संपादकाने आपले नावच लिहीले नसेल तर मग अजूनच गोंधळात भर मधल्या काळात संपादकांबद्दलचा संताप gtalk व इतर ठिकाणी मित्रांशी बोलताना shareकेला जातो आणि मग एकंदरच वातावरणाबाबत इतरांच्या मनातही एक प्रकारचा prejudice तयार होतो. म्हणून प्रतिसाद / धागा संपादित केल्यास तिथेच नाव व कारण लिहिण्याची सुचवणी वर केली होती.
हे एक उत्तम उदाहरण.
लंबूटांग,
आता प्रसिद्ध झालेली धोरणे आहेत ती आत्तापासून पुढे लागू होतील. याआधी काय झाले त्या धाग्यांचे दुवे देऊन चर्चा करण्यात हशील नाही कारण हे रेट्रोस्पेक्टिव इफेक्टने होत नाहीये!
पुढे जाताना कशाप्रकारे सदयांची वर्तणूक हवी हे महत्त्वाचे आहे!
तुझा मुद्दा समजला आहे.
चतुरंग
दुवा
दुवा दिलेले 'संपादनाचे एक चांगले उदाहरण' म्हणुन असावे असे मला वाटते.
@लंबुटांग,
इथे मॉड लॉग्स नसावेत असे वाटते.
वरती चित्रा, चतुरंग (आणि इतर) यांनी दिलेले मुद्दे मान्य आहेत (कीती वेळ प्रतिसाद/स्पष्टीकरण देत रहाणार वगैरे), संपादकांचा त्रास मान्य आहे म्हणुनच सदर सुचना केली आहे.पुर्विच्या वारंवार-दिर्घ 'माझा प्रतिसाद का उडाला' प्रकारच्या प्रकरणांमध्ये गैरसमजाने मोठा वाटा उचलला आहे असे वाटते.
-Nile
-Nile
+१
दुवा देण्याचा तोच उद्देश होता.
जसे वरील दुव्यामधे केलेले आहे त्याप्रमाणे प्रतिसाद का आणि कोणी उडवला हे लिहावे ज्याने पुढील गैरसमज टळतील.
अप्रकाशित आणि डिलीट
डिलीट केल्यास प्रतिसाद कोणालाच दिसत नाही.
याउलट प्रतिसाद अप्रकाशित केल्यास तो वाटल्यास पुन्हा प्रकाशित करता येतो. आधी सांगितल्याप्रमाणे त्याचा संदर्भ राहतो.
प्रतिसादातले एखादे वाक्य काढले तर असे वाक्य का काढले ते लिहीत बसणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे हे काम वेळखाऊ आहे. एखाद्या दुसर्या प्रतिसादाबाबतीत हे ठीक आहे, पण जेव्हा एकामागोमाग एक असे धडाधड प्रतिसाद येत असतात, तेव्हा हे करणे शक्य असले तरी ते करता येईल याची खात्री देता येत नाही.
ह्या सगळ्या घोळात संपादकाने आपले नावच लिहीले नसेल तर मग अजूनच गोंधळात भर
हे का? संपादक आपली जबाबदारी जाणतात - संपादकांचे नाव माहिती होऊन काय होणार आहे? prejudice एका कोणा संपादकाविरूद्ध तयार होणार.
मी स्वतः यापूर्वी जेव्हा संपादन केले आहे तेव्हा त्याची जबाबदारी सर्वांसमोर उचलून केले आहे, पण माझ्याप्रमाणेच संपादनाचा निर्णय हा संपादकमंडळाची सदस्य म्हणून माझ्या सहसंपादकांनी योग्य विचार करून घेतला आहे हे मी निदान सुरवातीला धरते. अर्थात व्यक्ती आहेत म्हटले की मतभेदही असतात.. तेव्हा एखाद्या निर्णयासंबंधी मला प्रश्न असले तर मी ते सहसंपादकांना सरळ विचारेन. त्याची धुणी शक्यतो ते तेवढे महत्त्वाचे असल्याशिवाय उघड्यावर धुणार नाही. (तरी क्वचित कधी एखाद्या प्रसंगी इथे उघड्यावर त्या प्रश्नांची धुणी धुण्याइतके ते महत्त्वाचे असतील तर तसेही करेन!).
महत्त्वाचा मुद्दा असा की संपादकांचे अधिकार अमर्यादित नाहीत तर त्यांच्यावर अधिक तारतम्य बाळगण्याची जबाबदारी आहे हे मिसळपावचे सर्व संपादक जाणतात.
मगाशी
मगाशी शेवटचा प्रतिसाद म्हटले होते पण काही खुलासे.
संपादक आपली जबाबदारी जाणत नाहीत असे मी तरी कुठेच म्हटले नाही. संपादकाचे नाव माहित असल्यास सर्व संपादकांना खरडी व्यनि तरी केले जाणार नाहीत. मागे खरडवह्या चाळताना २-३ संपादकांनी एका सदस्याला सांगितलेले पाहिले की मी तरी नाही केला संपादित दुसर्या कोणी केला असेल. हा सर्व त्रास तरी वाचेल.
मी संपादकांनी त्यांची धुणी कशी आणि कुठे आणि कितीजणांनी मिळून धुवावीत ह्याबद्दल काहीच म्हटलेले नाही. संपादक कोणत्या प्रश्नाची धुणी कशी धुतात इतकी पारदर्शकताही अपेक्षित नाही. केवळ कोणत्या नियमाचे उल्लंघन केले म्हणून प्रतिसाद/ लेख उडाला आणि आपली बाजू मांडायची झाल्यास कोणासमोर मांडावी हे माहित असल्यास बाकीचे त्रास वाचतील.
प्रतिसाद का उडाला हे सांगितले
जाईलच असे नाही (बर्याचदा फक्त धागा भरकटवणे ह्यासारखे फालतू उद्देश असतात त्यामुळे) लेखन उडाले तर मात्र निश्चितच व्यनि मधून कारणासह सांगितले जाईल तसेच हा व्यनि कोणा एका संपादकामार्फत न येता 'संपादक मंडळ' ह्या आयडी कडून येईल.
चतुरंग
गैरसमज नको
तुम्ही असे काही म्हटलेत असे सुचवायचे नाही. तुम्ही म्हणता त्या प्रश्नांचा त्रास मला स्वतःला झालेला आहे. मी स्वतः दरवेळी संपादन जबाबदारी घेऊन केले आहे त्यावेळी काही सदस्यांचे मत संपादनच नको/किंवा केल्यास उत्तरे देणेच नको असे होते. तेव्हा मतांतरे राहणारच. यापेक्षा सदस्यांना एकच छापील उत्तर मिळेल ते परवडेल.
मसंवर धुणी धुणे हा अगदी नेहमी वापरला जाणारा शब्द झाला आहे, त्यामुळे तो तसाच वापरला आहे - तुम्हाला लागावे म्हणून नाही.. तेव्हा व्यक्तिगत मतभेदांमुळे धुणी धुणे हे होणारच असले तर ते उघड्यावर करावे का पडद्याआड व्हावे यासंबंधीचे माझे मत ती शक्यतो पडद्याआड धुवावीत असे आहे. (माझ्या मागील काही आठवणींवरून).
आपली बाजू मांडायची झाल्यास कोणासमोर मांडावी हे माहित असल्यास बाकीचे त्रास वाचतील.
बाजू "संपादक मंडळ" यांच्याकडे मांडावी.
खुलाश्याबद्दल धन्यवाद
सर्व संपादक आता संपादक मंडळ हा एकच आयडी वापरणार असतील तर खूपच छान. प्रत्येक संपादकाला खरडी करायला नकोत
. माझ्या वरील request/ suggestion चा एकमेव उद्देश गैरसमज आणि सदस्य आणि संपादकांमधील अनावश्यक खरडी टाळणे हाच होता जो संपादक मंडळ ह्या आय डी मुळे बर्याचशा प्रमाणात साध्य होईल
*
नाही मला धुणी धुणार वरून काही वैयक्तिक काहीच वाटले नाही. माझेही मत पडद्याआड धुवावीत असेच आहे.end result सभासदाला कळावा असे म्हणणे होते. असो. पण मला हे ही माहित नव्हते की मसंवर धुणी धुणे हा अगदी नेहमी वापरला जाणारा शब्द झाला आहे.
शुद्धलेखनाबाबत काय धोरण
शुद्धलेखनाला पूर्वीसारखेच फाट्यावर मारले जाणार काय? की केलेल्या सूचनांवर विचारही केला जाईल?
______________
|| संपादकांची कृपा ||
मिपाची
मिपाची धोरणे पुन्हा एकवार नव्याने प्रसिद्ध केल्याबद्दल नीलकांता तुझे मनापासून आभार..
सर्व धोरणे परखड, स्पष्ट आणि उत्तम असून स्पृहणीय आहेत..
नीलकांता, तुला व तुझ्या सा-या संपादक मंडळाला आणि पर्यायाने मिपाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा..
-- तात्या अभ्यंकर,
संस्थापक, मिसळपाव डॉट कॉम.
-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!
स्वागत
धोरण जाहिर केल्याबद्दल व्यवस्थापनाचं अभिनंदन व नव्या धोरणाचं स्वागत.
वर टोपणनाव यांनी म्हटल्याप्रमाणे संस्थळ खाजगी आहे, तेव्हा मी स्वतः ते कोणा सज्जनाने मला खेळायला दिलेलं मुक्तांगण आहे असं मानतो (निदान जोपर्यंत या संस्थळातून आर्थिक उत्पन्न शून्य आहे तोपर्यंत तरी). संपादक हे रेफरी आहेत, व धोरण हे खेळाचे नियम आहेत असं समजतो. शक्यतो नियमांमध्ये राहाण्याचा कसोशीने प्रयत्न करावा, व रेफरीने फाऊल म्हटलं तर कमीत कमी निषेध करून निर्णय मान्य करावा. हे मी तरी पाळण्याचा प्रयत्न करतो, करेन.
त्याचबरोबर चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे हे सदस्यांनी चालवलेलं संस्थळही आहे. व्यवस्थापनाची भूमिका अनिर्बंध नसावी, लेव्हल प्लेयिंग फील्ड असावं, नियम वापरण्याच्या पद्धतीत सातत्य असावं, व चढत्या श्रेणीने कठोरता दिसावी अशी व्यवस्थापनाकडून सदस्यांची अपेक्षाही रास्त आहे.
व्यवस्थापन व सदस्य, किंवा काही सदस्य व इतर काही सदस्य यांत 'अस व्हर्सस देम' अशी फूट होऊ नये यासाठी हे धोरण उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो.
श्रावण मोडक यांनी खाजगीत एकदा म्हटलं होतं की 'मिपा ही साधीसुधी वेबसाईट नसून ते मराठीसाठीचं एक माध्यम आहे'. या धोरणांतून आणि सदस्यांच्या व व्यवस्थापनाच्या वागणुकीतून ते साकार होईल ही आशा.
माझं ऐसी अक्षरे वरील लेखन
ऐसी अक्षरे वरील नवीन लेखन
अभिनंदन आणि धन्यवाद
नीलकांत,

सुस्पष्ट धोरणाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
माझ्याकडून "नो फर्स्ट ओवररूलींग" चे आश्वासन देतो
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
ऋषिकेश
------------------
माझे मिपावरील लेखन इथे वाचा
उत्तम प्रतिसाद
या धाग्यावरील हा प्रतिसाद मला सगळ्यात जास्त आवडला.
"नो फर्स्ट ओवररूलींग" हे दोन्ही बाजूने महत्वाचे आहे. एका हाताने टाळी वाजत नसते. मात्र या धाग्यातील एकंदरीत प्रतिसादांत सर्व काही संपादकांमुळेच होत आहे असा तक्रारीचा सूर आहे. जर कोणी कागाळ्या करणारे, वातावरण गढूळ करणारे अथवा इतर जे काही ध्येयधोरणांमधे सांगितलेल्याशी विसंगत लिहीत असेल तर आम्ही त्या लेखात/चर्चेत/प्रतिसादांत वगैरेत भाग घेणार नाही असे देखील सदस्यांनी ठरवले तर उद्या संपादक मंडळाची गरजच भासणार नाही! कारण हक्क आणि जबाबदारी यांचे विभाजन न होता ते सगळेच एकत्रितपणे वापरत असतील.
--------------------------------
, तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. 
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (
-Nile जर कोणी
-Nile
अहो इथेच तर वांदा आहे ना. ह्यावर एकमत झाले तर मतभेद होणारच नाही. प्रश्न उठणारच नाहीत.
फक्त उदाहरणादाखल (माझे प्रतिसाद उडवायचे असतील तर उडवा भले, पण माझ्या प्रतिसादांत काय चुक आहे हे मला कळले तर तसले प्रतिसाद मी पुन्हा देणार तरी नाही म्हणुन प्रश्न)
आता माझे 'काय इनोदी लिहुन राह्यले' किंवा 'राजे पुणेरी नाही' ह्य प्रतिसादांत धोरणांचे उल्लंघन कुठे होत आहे हे मला काही कळत नाहीए. आता मी काय करु? हे असे माझ्या बाबतीत वारंवार होत असेल तर मी प्रश्न विचारु नये का? वगैरे मतभेदाचे मुद्दे आहेत. म्हणुन तक्रारनिवारणाची सोय हवी असे वाटते. मी मागे केलेल्या तक्रारींचे निवारण झालेले नाही. (किंवा मी मुद्दाम त्रास देतो असा माझ्यावर आरोपही झालेला नाही)
-Nile
पुढच्या वाटचालीसंदर्भात
वर एका ठिकाणी चतुरंगने म्हणल्याप्रमाणे going forward ही ध्येयधोरणे वापरावीत. त्याचा संदर्भ हा आधीच्या गोष्टींसाठी वापरू नये असे वाटते. त्याच संदर्भात, जर कधी काही खटकले तर संपादक मंडळाला अवश्य व्य.नि. करावा.
बाकी माझा मूळ मुद्दा जरा वेगळा होता. एखाद्या सदस्याने चालू केलेल्या कागळ्यांकडे इतर सदस्यांनी लक्षात आल्यावर देखील, अशा लेखनास प्रोत्साहन द्यावे का नाही या संदर्भात माझे विधान होते.
--------------------------------
, तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. 
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (
उत्तम!! एकद
उत्तम!!
एकदम परखड आणि उत्तम धोरणे!
- (संपादक)प्राजक्ता
http://www.praaju.net/
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
आमच्या लेखी
संपादक म्हणतील ते अंतिम असते.त्यामुळे संपादकांच्या धोरणाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही.शुध्दलेखना बाबत मिपाने कडक धोरण करावे असे मनापासून वाटते.
डास एक्स्परिमेंट
चर्चा वाचुन मला 'डास एक्स्परिमेंट' हा चित्रपट आठवला...
खरंतर संपादक हे पण सदस्यच आहेत...पण ( संपादकांना) अधिकार मिळाल्याबरोबर इतर सदस्यांना ते शत्रुपक्षातले, आपल्यावर कायम अन्याय करायला टपलेले वाटायला लागतात. आणी संपादकांना वाटायला लागतं की कितीही चांगलं काम केलं तरी सदस्यांना त्याची जाणीव/किंमत नाही! धोरणांची अंमलबजावणी करायला कधीतरी कठोर पावलं उचलली जातात. निषेध म्हणुन मग सदस्य बंड करतात. असं हे सगळं दुष्ट्चक्र आहे...कुठेही जा, हे होणे अटळ आहे...
आधिकारीक
आधिकारीक शब्द मलाही खटकला. वर कोणी म्हटल्या प्रमाणे तो 'अधिकॄत' असा असायला हवा.
धोरणे उत्तम आहेत. फक्त धोरण क्र. ६ तेवढे पटले नाही. मिपावर अनेक वेळा २-३ ओळींचे धागे निघाले आहेत आणि त्यावर सविस्तर आणि बरीच नविन माहिती मिळेल अशा चर्चा घडलेल्या आहेत. उदा. कोणा प्रसिध्द व्यक्तीचे निधन / त्यांना श्रध्दांजली , एखाद्या ठिकाणाबद्द्ल / बाबीबद्द्ल माहिती विचारणे वगैरे.
एखादा प्रश्न एका ओळीचा असू शकतो पण त्यावरचे उत्तर सविस्तर असू शकते तसेच काहिसे.
शिवाय बर्याच लोकांना लेखनकला अवगत नसते त्यामुळे ते खूप लिहू शकत नाहीत. मुख्य विषयाच्या २-३ ओळी लिहिल्या तरी त्यांना खूप लिहीले असे वाटू शकते. पण प्रतिसादात ते खुलू शकतात. कारण इतरांच्या प्रतिसादावरून बरेच मुद्दे त्यांच्या लक्षात येऊ शकतात. अर्थात हा दुय्यम मुद्दा मुख्य मुद्दा वर लिहीलाच आहे.
त्यामुळे धोरण क्र. ६ जरा शिथिल असावे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
जय महाराष्ट्र , जय मराठी !
क्र. ६ चे धोरण
क्र. ६ बद्दल तुमचे म्हणणे खरे आहे. हे धोरण शिथिलच आहे याची खात्री बाळगावी. धोरणांत प्रत्येक मुद्दा विस्ताराने लिहिता येत नाही परंतु अशा धाग्यांची शहानिशा करून लेखकास मजकूर वाढवण्याची विनंती करता येईल.
चौकशीप्रधान धागे वगैरे आवश्यकतेनुसार तसेच ठेवले जातील असे वाटते.
संपादक कोण
संपादक कोण कोण आहेत पण? अन त्यांचा आयडी वेगळा असावा जेणेकरून ते ओळखू यावेत.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
परत एकदा
परत एकदा नियम सर्वांसमोर ठेवल्याबद्दल धन्यवाद.
(मिपाचे नियम आधिपासुनच पाळत आलेला) धनंजय
---------------
धनंजय बोरगांवकर
धोरण जाहीर
धोरण जाहीर केल्याबद्दल धन्यवाद व त्याचे स्वागत!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
धोराणाबाबत
वाचले. सहमत!!
आदर्श...
मला 'कौल' मधिल लेख दिसत
मला 'कौल' मधिल लेख दिसत नाहियेत.
काय करावे लागेल ?
.......................
भवतु सब्ब मंगलं.
धोरणाबाबत
धोरणे पटली, सहमत आहे.
प्रत्येक गोश्टीला नियम व आटी आसव्यात व त्याचे पालन व्हावे आसेच वाटते.
धन्यवाद !
विनित
विनित