महत्वाची सूचना

Primary tabs

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
4 Apr 2016 - 5:47 pm

सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत.

मिसळपाव हे आपले सर्वांचे आणि सर्वांसाठी असले तरी वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात. कृपया हे प्रकार टाळावेत आणि संस्थळावरील आपला वावर सभ्यतेच्या मर्यादांमधे बसतो आहे ना हे प्रत्येकाने पहावे. तसेच आपला तोल किंवा भान सुटते आहे का याकडे लक्ष द्यावे. असे घडत असल्यास त्याला दुसरा कोणी जबाबदार आहे वगैरे सबबी न देता प्रगल्भतेने वागून आपला संस्थळावरील वावर सर्वांनाच किमान सुसह्य होईल हे प्रत्येकाने पहावे. कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा. धाग्यावर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रयत्न करू नये.

जे सदस्य याचा विचार न करता दुसर्‍या कोणाला अपमानास्पद अशा प्रकारचे धागे, प्रतिसाद यांचे लिखाण करतील, किंवा संपादकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंगा माजवतील/अन्य सदस्यांना किंवा व्यक्तींना उद्देशून असांसदीय भाषा वापरतील अशांचे सदस्यत्व आणखी कोणत्याही सूचनेशिवाय त्वरित स्थगित केले जाऊ शकते याची नोंद सर्वांनी कृपया घ्यावी. अशी अप्रिय वेळ येऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सद्स्यावर राहील. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

4 Apr 2016 - 6:02 pm | मी-सौरभ

नोन्द घेतल्या गेली आहे

पिलीयन रायडर's picture

4 Apr 2016 - 6:32 pm | पिलीयन रायडर

ओके!

काही डिक्लेअर्ड डु आयडी केवळ ट्रोलिंग करायला येतात. चिथावणारे मुद्दे काढतात. त्यांना चाप बसायला मिपा संपादक मंडळ काय करण्याचा विचार करत आहे?

बोका-ए-आझम's picture

4 Apr 2016 - 6:49 pm | बोका-ए-आझम

एका सदस्याने वापरलेल्या अश्लाघ्य भाषेबद्दल दिनांक ७ मार्च २०१६ या दिवशी संपादक मंडळाच्या सदस्यांना व्यनि केलेला आहे. त्यावर अजूनही काही कारवाई झालेली नाही. काही उत्तम लेखन आणि प्रतिसाद देणाऱ्या आयडींनी जेव्हा इथे वाचनमात्र राहायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या वागणुकीचं आश्चर्य वाटलं होतं पण आता ही घोषणा वाचल्यावर त्यांचा निर्णय बरोबर होता हे लक्षात आलेलं आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Apr 2016 - 10:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. +३००००.

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2016 - 8:04 pm | टवाळ कार्टा

मुळात असे आयडी उडाल्यावरही परत येतात आणि "मीच तो" असे जाहिरही करतात...नवीन आयडीने परत आल्यावर उडालेल्या आयडीने केलेली घाण नवीन आयडीच्या अकाउंटमध्ये धरत नाहीत का?

अस्वस्थामा's picture

4 Apr 2016 - 8:35 pm | अस्वस्थामा

अगदी अगदी.. एक्दम वॅलिड पाँईंट..! आणि हे एक दोन नव्हे कित्येक वेळेस परत येतात तरी त्यांना "संधी" दिली जाते. हे तर अगदीच हाईट वाटतं.
म्हणजे लखोबा लोखंडे मारामारी केली म्हणून तडीपार केला गेला. तो जॉर्ज फर्नांडिस म्हणून परत आला तर चालेल. अगदी तो स्वतः "मीच तो लखोबा लोखंडे" असे सांगत असेल तरी चालेल फक्त त्याने "लखोबा लोखंडे" हे नाव वापरायला बंदी. इथे आम्हाला एक आयडी मिळवायला झालेले कष्ट आठवले की हे लखोबा (अथवा लखूबाई) कित्ती कष्टातून जात असतील आणि येत असेल याचे मात्र आश्चर्य वाटते.. :)

पिलीयन रायडर's picture

5 Apr 2016 - 11:06 am | पिलीयन रायडर

हेच सांगायला आले होते.

उदा:- नानासाहेब केंजळे म्हणुन अनेक स्त्री आयडींच्या खव मध्ये दंगा करुन अक्षरशः स्वतःला उडवुन घेतलं आणि १० व्या मिनिटाला गरिब चिमणा ह्या नावाने मला व्यनि केला "हं तर काय म्हणत होतात तुम्ही?" ह्या आशयाचा. जणु काही चहा पिऊन आलो, चला गप्पा कंटिन्यु करुया. अजुनही हा आयडी मुद्दाम प्रक्षोभक विधाने करत फिरत असतो. दंगा करण्याचा, चर्चा भरकटवण्याचा हेतु स्पष्ट दिसतो. माझ्याकडे असलेले पुरावे / व्यनि / सापडल्यास स्क्रिनशॉट मी देते. कारवाई होणार का?

हे असले आयडी मिपा नांदतं ठेवायला एका अर्थी मदतच करत असतात हे मान्य आहे. पण अशाने एकंदरीतच मिपावर चर्चाच नको असे माझे तरी मत होत आहे. मी गेले काही दिवस आपोआपच वामा मोड मध्ये जातेय. असं अनेकांच होत असेल कारण खुप लोक लिहीताना दिसत नाहीत आजकाल.

एकम्दरीत मिपाला माझा कायमच सपोर्ट असला आणि उगाच "गेले ते दिन गेले" सुर आळवायला मला आवडत नसलं तरी ज्या वेगाने डु आयडी येतात त्यावर मी कायमच प्रश्न विचारला आहे आणि आजतागायत उत्तर मिळालेलं नाही. ह्या धाग्यावर फारशा कधी न दिसणार्‍या आयडींना जुन्या आयडींवर चिखल फेकताना पाहुन आश्चर्य वाटत आहे.

जगप्रवासी's picture

5 Apr 2016 - 4:10 pm | जगप्रवासी

अगदी मनातलं बोललात. एकंदरीत त्या धाग्यावरील गरीब चिमणा यांचे प्रतिसाद वाचून काय बोलावे हेच कळेना म्हणून काहीच प्रतिसाद न देता फक्त वामो ओन केला.

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 6:41 pm | अमृता_जोशी

वाचले.

मार्कस ऑरेलियस's picture

4 Apr 2016 - 6:44 pm | मार्कस ऑरेलियस

असांसदीय भाषा म्हणजे नक्की काय हे स्पष्ट केल्यास तिचा वापर टाळणे सोप्पे जाईल असे सुचवु इछितो, विशेष करुन खालील उल्लेख असांसदीय आहेत का असे विचारायचे आहे :

१.हस्तमध्ये दुग्ध कलश घट्ट पकड
२.पुचुपुचु दुगध्दओढनाथाय नम्:
३.मतिमंद बिनडोक आत्मकुंथणाचा विजय असो!
४.एष धर्म: टनाटन:
५. ** शेपुट घालणे

मतभेद असणे हे प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे मात्र ज्याचे मत पटत नाही त्याची वरील शब्दात टीका करणे सांसदीय आहे काय ?
सांसदीय असांसदीय शब्दांच्या व्याख्या ते वापरणार्‍या आय डी नुसार बदलतात काय ?

अमृता_जोशी's picture

4 Apr 2016 - 6:53 pm | अमृता_जोशी

सांसदीय असांसदीय शब्दांच्या व्याख्या ते वापरणार्‍या आय डी नुसार बदलतात काय ?

हे मान्य. आमचे साधे साधे प्रतिसादही उडवले जातात; पण काही मोजक्या आयडींचे अत्यंत वाह्यात व अश्लील प्रतिसाद तसेच ठेवले जातात.

आणि प्रगो सर यांनी जे प्रतिसाद वरती दिलेले आहेत ते एका आत्म्याशी संबंधित आयडीचे आहेत.

हा आयडी मिपा वरील जुना जाणता आयडी आहे. त्यांच्याकडून आजकाल असेच प्रतिसाद येतात धाग्यांवर.

आपल्याला समोरच्याचा मुद्दा पटत नसेल तर चर्चेने आणि प्रतिवादाने तो सोडवला जातो.

असे प्रतिसाद देऊन या आयडीच्या आत्म्यास कोणता आनंद मिळतो कोणास ठाऊक.

असो या आयडी वर आता संपादक मंडळ काय कारवाई करते हे पाहण्यास मी उत्सुक आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Apr 2016 - 7:00 pm | श्री गावसेना प्रमुख

एक गरीब सभासद इस्लाम ची झाहिरात करायला येतो त्यांच्याकडेही बघावं,हे काय पीस चॅनेल आहे काय.

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 11:19 pm | टवाळ कार्टा

तुम्हीही तुम्हाला आवडत्या धर्माची जाहिरात करा की...सर्वधर्मसहभाव अस्लाच पाहिजे

जव्हेरगंज's picture

4 Apr 2016 - 7:07 pm | जव्हेरगंज

शेपूट घातलेले कितीतरी डुआयडी इथेतिथे घाण करत सुटतात.
त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाल्यास आनंद वाटेल.

(वाटल्यास त्यांचा IP Address ही ब्लॉक करुन टाका किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाका )

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 12:22 pm | मराठी कथालेखक

वाटल्यास त्यांचा IP Address ही ब्लॉक करुन टाका

Static IP घेतात का ते ? :)

कुकी वापरून करता येईल काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2016 - 7:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही स्वच्छता आवश्यक आहे. निवेदनातील भापो.
काही सदस्यांना सुचना द्यायचीही आवश्यकता नाही. आभार.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2016 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा

जाणीवपूर्वक जिथेतिथे सुधारणावादाची धिंड काढणारे, आणि मुद्द्यात सरळ प्रतिवाद न करता आल्यावर त्याला सुधारणावादाचा बुरखा, स्वमतांध दाम्भीकता असे कुजकट धोरणी शब्द वापरणे,आणि ठरवून प्रयत्नपूर्वक संघटितपणे आगी लावत फिरणे हे वर्तन संसदीय आहे काय!?

हे हि कळावे.. अशी विंनती

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 7:53 pm | एकांतप्रेमी

http://www.misalpav.com/user/9160
हाच का सुधारणावाद?
एका हिंदु देवतेबद्दल चित्रगुप्त यांनी काढलेले टुकार फालतू उद्गार आणि आपण त्यावर केलेले ख्या ख्या?
देवतांना अशा घृणास्पद भाषा वापरणार असाल तर याहून वाईट ऐकायची तयारी ठेवावी सुधारणावादाच्या खाली नंगा नाच करणार्यांनी...

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 7:56 pm | एकांतप्रेमी

http://www.misalpav.com/comment/770334#comment-770334
वर दुवा चुकलाय.

आणि जिथे तिथे हिंदू धर्माला टनाटनि धर्म म्हणून टार्गेट करणारे आणि प्रत्युत्तर आल्यास अडाणी, अंधश्रद्ध,मागास,बुरसटलेले असे कुजकट
धोरणी शब्द वापरणे,आणि ठरवून प्रयत्नपूर्वक संघटितपणे
आगी लावत फिरणे हे वर्तन संसदीय आहे काय!?
हे हि कळावे.. अशी विंनती

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 9:00 pm | एकांतप्रेमी

अगागा अगागा
ऊटीवला फुरोगामी बुद्धीमंदांचा बाजार

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2016 - 9:07 pm | अत्रुप्त आत्मा

संघा'ची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्य वाद. :)

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 9:12 pm | एकांतप्रेमी

संपादित

सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.

मार्कस ऑरेलियस's picture

5 Apr 2016 - 12:38 pm | मार्कस ऑरेलियस

संघा'ची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्य वाद. :)

संघाची भुमीका ?? काय संबंध ? एकांतप्रेमी संघाचे प्रवक्ते आहेत काय ? उगाचच संघावर चिखलफेक होय ?

माझा सरपंचांना हाही प्रश्न आहे की एका व्यक्तीवर केलेली टीका संपादित होते मग एका समुहावर केलेली टीका का संपादित होत नाही ? येथे संघाचा काडीमात्र संबंध नसताना त्यांच्यावर चाललेली चिखलफेक सांसदीय आहे काय ?

नाना स्कॉच's picture

5 Apr 2016 - 12:44 pm | नाना स्कॉच

हे फ़क्त संघापुरतेच की कुठल्याही संस्थेवर चिखलफेक होऊ नये (साधक बाधक चर्चा भाग अलाहिदा) असे म्हणाल आपण? हे जाणून घ्यायला आवडेल!

मार्कस ऑरेलियस's picture

5 Apr 2016 - 12:54 pm | मार्कस ऑरेलियस

+१

हे फ़क्त संघापुरतेच की कुठल्याही संस्थेवर चिखलफेक होऊ नये (साधक बाधक चर्चा भाग अलाहिदा) असे म्हणाल आपण?

नानांना अगदी अनुमोदन ! कोणत्याच समुहावर मग तो संघ असो कि मिम , आर्य सनातन वैदिक धर्म असो की इस्लाम, आस्तिक असो वा नास्तिक , सामुहिकरित्या चिखलफेक योग्य नाही !

इथे काही आयडी वारंवार संघ , सनातन धर्म , आस्तिक लोकांच्या श्रध्दांवर टीका करत असतत त्यांना कधी समज दिली जाते ते पाहु आता !!

नाना स्कॉच's picture

5 Apr 2016 - 1:00 pm | नाना स्कॉच

अत्यंत आभारी आहे! आपल्याइतकी maturity विरळ लोक दाखवतात!! नाहीतर आजवरच्या अनुभवात (वाचनमात्र असताना पासुनचा अनुभव) वेगळे बोलतो, संघाला बोल लावल्यावर विद्ध होणारी मंडळी स्वतः मात्र खुशाल अमुक एक नेत्यांचे नावच एक शिवी आहे म्हणत असत , असो it was a pleasure interacting with you sir.

आतिवास's picture

4 Apr 2016 - 7:43 pm | आतिवास

स्पष्ट सूचना आवडली.
पण एक निरीक्षण असं आहे की काही ठरावीक सदस्यांनी वारंवार असभ्य भाषा वापरली तरी त्यांच्यावर काही कारवाई झाल्याचं दिसत नाही. सर्व आयडींना जोवर एक नियम लावला जात नाही, तोवर हे असचं चालू राहणार असं खेदपूर्वक नमूद करते.

भाऊंचे भाऊ's picture

5 Apr 2016 - 1:55 pm | भाऊंचे भाऊ

इंटोलारंस चा उघड पुरस्कार करणारे महाभाग इथेच प्रतिसाद देत असताना आपला आवाज कोणी शहाणपणाचा मानेल यावर माझा विश्वास नाही.... तरीही सहमत आहे

धन्यवाद, माझ्या आयडीच्या बाबतीत आलेल्या वैयक्तिक प्रतिसादांवर योग्य ती कारवाई केली गेली आहे, हेही नमूद करु इच्छितो.

फक्त एखाद्या आयडीच्या साध्यात साध्या प्रतिसादावर काही मंडळी 'हीन प्रतिसाद' म्हणून रीघ लावतात आणि 'पुचुपुचूदुग्धओढनाथाय' सारखा प्रतिसाद तितकाच कानाडोळा करुन दुर्लक्षिला जातो. वर 'कोणी लिहीलंय पेक्षा काय लिहीलंय त्याला महत्त्व दिलं जातं' असं छातीठोकपणे सांगितलं जातं.

असो, विषय निघाला आहे म्हणून लिहीलं. अन्यथा छान चाल्लंय.

कळावे.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2016 - 9:05 pm | अत्रुप्त आत्मा

@पुचुपुचूदुग्धओढनाथाय >> यात हीन काय आहे??? लहान बालक भाम्डयातुन दुग्धप्राशन करताना जी लीला करते तीच
हस्तमध्येदुग्धकलशघट्ट पकड पुचुपुचु दुगध्दओढनाथाय नम्: यातून गमतीने अधोरेखित केलेली आहे. हे तर आमचे अत्यन्त खेळीमेळीने केलेले चिडवा चिडवीचे संदर्भ आहेत. त्यांना इथे मुद्दाम सँघटीतपणे का बरे ओढून आणले जात आहे?

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 9:10 pm | एकांतप्रेमी

http://www.misalpav.com/comment/825201#comment-825201
याचे उत्तर द्या णा पैले

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2016 - 9:16 pm | अत्रुप्त आत्मा

...

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2016 - 9:17 pm | टवाळ कार्टा

+११११११११११

जव्हेरगंज's picture

4 Apr 2016 - 9:17 pm | जव्हेरगंज

मग आमची "लय जोरात पिकल्यात आंबं" का म्हणून उडवली असेल ब्वॉ!

एका बागायती शेतकऱ्याची गाथा होती ती !

('आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ते कारटं' हे असले प्रकार येथे चालूच असतात हे खेदाने म्हणावेच लागेल )

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2016 - 9:29 pm | टवाळ कार्टा

आयला...डुआयडी सापडला की तुम्चा...ती कवीता मला दुसर्या आयडीने व्यनीने पाठवलेली ना =))

जव्हेरगंज's picture

4 Apr 2016 - 10:13 pm | जव्हेरगंज

आपण सगळं काही याच आयडीने करतो. कविता वाचलेली दिसत नाही तुम्ही! तुम्हाला दुसरीच कविता कुण्या तिसऱ्यानं पाठवली असेल!

आपण डुआय च्या भानगडीत कधी पडलो नाय ब्वॉ! बाकी तुमच्या कुठल्या आयडीला कविता पोहोचली म्हणायची?

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 12:20 am | टवाळ कार्टा

तुम्ची कवीता मला पाठवाल का? बहुतेक मी वाचली नव्हती :)
आणि मला ज्या आयडीने ती कवीता पाठवलेली ती कवीता बहुतेक तुम्च्या कवीतेचे विडंबन असावे...आयमायस्वारीबर्का :)

जव्हेरगंज's picture

5 Apr 2016 - 10:06 am | जव्हेरगंज

ती कवीता बहुतेक तुम्च्या कवीतेचे विडंबन असावे.

आधि मला ते विडंबन पाथवा. मग मी पथव्तो.

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 2:14 pm | टवाळ कार्टा

असे कसे...तुम्ही कवीता पाठवा...मग कळेलच डुआयडी आहे की नाही :)

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 4:39 pm | टवाळ कार्टा

=))
मग तो आयडी तुम्चा डुआयडी नाही....बाकी धुडगूस जब्रा ;)
ती क्विता पाठवलीये

जव्हेरगंज's picture

5 Apr 2016 - 4:46 pm | जव्हेरगंज

ती क्विता पाठवलीये

ते तर मझ्याच कवितेच विदम्बन आहे. बाकि याचे महान विदम्बन्कार कोन अस्तिल याचा विचार कर्तोय.

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 11:20 pm | टवाळ कार्टा

विचार करून झाला की लिश्ट कळव्वा ;)

लहान बालक भाम्डयातुन दुग्धप्राशन करताना जी लीला करते तीच

अरेच्चा!! फारच निरागस आहे हे!! काय मग बुवा तुम्ही आज हस्तमध्येदुग्धकलश घट्टपकड करुन पुचुपुचुदुग्ध ओढलेत की नाही?

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 2:18 pm | टवाळ कार्टा

आरारारा

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2016 - 2:29 pm | अत्रुप्त आत्मा

आपली खरडवही पहा.

खरं तर यापेक्षा फार चांगली कामं पुढ्यात आहेत. तुम्ही सार्वजनिक मुद्दा मांडला होतात. उत्तर देखील इथेच दिलंत तर बरं होईल.