पिस्तुल्या

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 5:01 pm

नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे.

समाजशिक्षणचित्रपटप्रकटनआस्वादमाध्यमवेध

आम्रोत्सव

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 4:12 pm

रामराम मंडळी,
मिपावर आम्रोत्सव चालू झाल्याची कुण कुण आम्हाला लागली बरं का. एकाहून एक पारंपरिक अन अभिनव पाककृती येताहेत.
या पूर्वीही अनेक आंबा पाककृती मिपावर येऊन गेल्यात. या धाग्यातून त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय.
काही माझ्या नजरेतून सुटल्याही असतील. जागरूक मिपाकर त्यांचे दुवे प्रतिसादातून जरूर देतीलच याची खात्री आहे.
 

क्रमांक
पाककृती
सुगरण/बल्लव

पाकक्रियाआस्वाद

भूतकाळ सुरु होतो...

Anonymous's picture
Anonymous in जे न देखे रवी...
8 Jun 2016 - 3:38 pm

मोकळं आकाश
मोकळा तो रस्ता
सकाळची वेळ
कोवळ्या उन्हाचा तो खेळ

सदा सडा प्राजक्ताचा
त्यांवर राज्य ते दवाचं
कंसात काळजी त्या फुलांची
बळी जाई पावली नकळत

मागे अंगणात वृंदावनं
मुंग्या जणू देती पहारे
कधी साखर कधी नारळाचे
कधी ताट नैवेद्याचे

मागे विहीर दगडी
अखंड थंडगार त्यात पाणी
काठावर शेवाळं सुंदर
जणू सांगे विहिरीची कहाणी

गोठ्यात जीव काळे
हंबरती तहानेने जोरात
साखळी सोडता हळूच
वाट जाई थेट हौदात

कविता माझीकविता

...आणि मॅनीमल प्ल्यानेटात निवडून येताना .... :( :( :( :) :) :)

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 3:01 pm

"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :)

कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :)

आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ? :) :)

इतिहाससमाजभूगोलगुंतवणूकराजकारणस्थिरचित्रविरंगुळा

नोकरी : एक सोडणे

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 1:00 pm

टीप : खाली जे काही लिहिलंय ते गेल्या काही दिवसातले माझे अनुभव आहेत आणि १००% सत्य आहेत. अगदी नावेही बदललेली नाहीएत

माणूस जसा जसा मोठा होत जातो, फक्त वयाने नाही , मनाने मानाने आणि पैशाने , तेव्हा स्वतःची काही तत्वे काही नियम स्वतःच तयार करत असतो . समाजाचे नियम असतातच पण काय बरोबर काय चूक याचे , पण प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा हिशोब असतोच. आता तो हिशोब दुसऱ्याला पटतो कि नाही हा नंतरचा मुद्दा. यापूर्वी हा विचार फारसा करायचो नाही , पण गेल्या काही दिवसातले आलेले अनुभव इथे सांगावे वाटले म्हणून हा फाफट पसारा .

मुक्तकअनुभव

ताल व सुसंगती

वैशाली अर्चिक's picture
वैशाली अर्चिक in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 11:35 am

मला वाटते लहानपणापासून तालाचे आणि आपले नकळत नाते जुळत असते. बाळाला झोपवताना एका विशिष्ठ लयीत वर खाली होणारी मांडी, अंगाई म्हणताना पाठीवर थोपटताना दिलेला ताल ह्या सर्व गोष्टी बाळाला शांत करतात ह्या त्यातील स्पर्शामुळे व लयीमुळे. बरेचदा मी असे ऐकले आहे की बायकोची झोपमोड होते जर का नवऱ्याने घोरण्याची लय बदलली तर ! काय असतो हा ताल किंवा लय? ज्याला इंग्रजीत आपण rhythm म्हणतो. एका विशिष्ठ वेळेने परत परत होणारी गोष्ट म्हणजे ताल. प्रामुख्याने ह्याचा संबंध आपण फक्त संगीताशीच लावतो. पण असे नाहीये. आपल्या आजूबाजूला हा ताल सगळीकडेच सापडतो. आपल्या छातीत होणारी धडधड ही तालबद्ध असणेच हिताचे असते.

मांडणीलेख

एक्सेल एक्सेल - भाग ८ - इफ चा फॉर्म्युला

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
8 Jun 2016 - 11:09 am

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८

आठवा भाग - इफ चा फॉर्म्युला
8

आंबा इडली

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
8 Jun 2016 - 9:39 am

मिपावर आंबा पाककलाकृतींचा बराच पूर आलाय त्यात माझी ही एक लाट..हमखास यशस्वी कालाकृती.

सगळी भाचरुंडं लहान असताना रत्नागिरीला माहेरी गेलं की,न्याहारी ,जेवणात काहीतरी नवं करावं लागायचं.त्याआधी एक ट्रिप आजोळी गुहागरला व्हायचीच.तिथे आंबे महामूर.येताना आंब्या-फणसाची भेट ठरलेलीच. अजूनही माझ्याकडे आजोळाहून आंब्याची पेटी येतेच,गेले तरी आणि नाही गेले तरी.

गिरिस्थानांची सम्राज्ञी ............उधगमंडलम (उटी)

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in भटकंती
7 Jun 2016 - 5:26 pm

आमची गिरिस्थानांची राणी असलेल्या उटीला भेट देण्याची इच्छा या उन्हाळ्यात पूर्ण झाली.त्याबद्दल संक्षिप्त वृत्तांत देत आहे. काही फोटू जालावरून साभार