नोकरी : एक सोडणे
टीप : खाली जे काही लिहिलंय ते गेल्या काही दिवसातले माझे अनुभव आहेत आणि १००% सत्य आहेत. अगदी नावेही बदललेली नाहीएत
माणूस जसा जसा मोठा होत जातो, फक्त वयाने नाही , मनाने मानाने आणि पैशाने , तेव्हा स्वतःची काही तत्वे काही नियम स्वतःच तयार करत असतो . समाजाचे नियम असतातच पण काय बरोबर काय चूक याचे , पण प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा हिशोब असतोच. आता तो हिशोब दुसऱ्याला पटतो कि नाही हा नंतरचा मुद्दा. यापूर्वी हा विचार फारसा करायचो नाही , पण गेल्या काही दिवसातले आलेले अनुभव इथे सांगावे वाटले म्हणून हा फाफट पसारा .
तर, " बास झालं बाहेरच्या गावात राहायचं नाटक. आता स्वतःच्या घरी स्वतःच्या गावात राहा आणि काय कमवायचं कमवा " असा आदेश मातोश्रींनी दिला आणि आम्ही बाहेर जायचे रस्ते स्वतःच बंद करून इथेच नोकरी शोधली आणि लागलो कामाला .
तर हा आमचा MD, ८-९ वर्षात नको तेवढं यश मिळालं . आणि कंपनी वाढली चांगली . माणूस टेक्निकली जबरदस्त आहे. पण थोड्या कटकट्या आहे असं ऐकलं होतं, पण तेव्हा पैश्याची गरज होती त्यामुळे समोर आहे त्याचा लाभ घ्यावा म्हणून नोकरीला लागलो. याला समोरच्याचं वय , पद आणि आपण कुठे आहोत हि जागा या गोष्टी न बघता हवं तसं बोलण्याची सवय . यामुळे कित्येक अगदी सुरुवातीपासून असलेले लोक दुखावून भरपूर नुकसान करून घेतलंय. एक-दोन कोर्ट केसीस हि झाल्या. पण शेपूट वाकडी ती वाकडीच . असो
झालं असं , कि या असल्या बोलण्याच्या मला हि दोनदा प्रसाद मिळाला, २ वर्षात फक्त दोनदा म्हणजे चांगलच नाही का ! बाकी आरडा ओरडा ऐकून घेतोच, चूक असताना घेतलाच पाहिजे . पण दोन्ही वेळा त्याने शिवी दिली आणि दोन्ही वेळा मी जमेल तेवढ्या आदराने हे सुचवलं कि शिवी न देता बोला. जी चूक असेल ती शिवी न देता दाखवून द्या. दोन्ही वेळा त्याने "अरे होतं कधी कधी . दुसऱ्याचा राग तिसऱ्या वर निघतो , एवढं मनावर नको घेऊ " इत्यादी पोथी वाचली.
तर आता , पुढील घटना अगदी तारखे प्रमाणे =]]
९ मे :
एक तर ५.३० ला ऑफिस सुटतं म्हणून हातातलं काम अर्धवट टाकून बाहेर पडायची सवय नाही . कितीही वेळ झाला तरी ते काम संपवून मगच बाहेर पडतो. त्यामुळे बहुतेकदा माझी ऑफिस मधून बाहेर पडायची वेळ ७-८ अशीच असते . आणि मालकाला सगळी कामे ५ नंतर सुचतात. आता हे तो मुद्दाम करायचा कि त्याला तेव्हाच आठवायचं हे तोच जाणे. पण त्याला काही नकार नवता माझा, या वयात काम करायला नकार देऊच नये नाही का ? तर या प्रकारे कैच्याकाय वेळेला काम करण्याची सवय असली . तरी एक नियम मी लावला होता, तो म्हणजे ऑफिस मध्ये असताना काय असेल ते सांगा , रात्र भर थांबून संपवेन काम हवं तर , पण एकदा गेट मधून बाहेर पडलो कि परत येणार नाही. (सर्वर बोम्बलला कि काहीही झालं तर येतोच माणूस हा भाग वेगळा , पण सर्वर काही रोज बंद पडत नाही ). तर अश्याच एका गोष्टीत अडकून १०.३० घरी पोचून जेवण करत होतो. आणि तेव्हाच फोन वाजला, मालकच होता .
म्हनला " आदित्य ऑफिस मध्ये ये पटकन , माझा सिस्टम प्रोजेक्टर ला लावायचाय"
खरं तर फक्त एक केबल लावायची असते फक्त. एक तर एप्रिल महिन्याच्या पगार अजून मिळालेला नवता. (अजुनी मिळालेला नाहीये हा भाग वेगळा ). आणि गेल्या वर्षभरात कैच्याकाय कारण देऊन कधी २०% कधी ३०% पगार कट केला होता . पहिले दोनदा मी भांडून ओरडून विनवण्या करून तो काढून घेतला होता , तेव्हा मला वाटलं कि खरोखर कंपनी तोट्यात आहे. तिसरेंदा कट केला तेव्हा मी अकौंटस मधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल कडे लक्ष द्यायला लागलो. पहिले दोनदा कापला तेव्हा आधी नवीन मर्क्स घेतली होती आणि दुसरे वेळी फ्रांस ट्रीप झाली होती साहेबांची, पूर्ण परीवाराला घेऊन. सहल करा,पण लोकांचे पैसे बुडवून नाही . आणि ते हि हक्काचे पैसे. आणि तिसरे वेळी समजलं कि बंगला मोठा बांधतोय , सेन्ट्रल एसी आणि इत्यादी . असो
या सगळ्यामुळे आधीच चिडलेला होतो , तरी शांतपणे म्हणालो कि आत्ताच घरी आलोय, एवढ्याश्या कामासाठी आता परत येता येणार नाही. आणि तसंही हि इमर्जन्सी नाहीये.
यावर माणूस भडकला , " भोसडीच्या , पैसे देतो तुला कामाचे. जेव्हा बोलवेल तेव्हा यायचं. इमर्जन्सी आहे कि नाही मी ठरवणार तू नाही "
एक तर शिवी हा प्रकार प्रचंड चीड आणणारा आहे , म्हणजे . मैत्री खात्यात चालत असतात, पण एकदा तुम्ही ऑफिस किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी आला कि भाषेवर ताबा हवाच. त्यामुळे माझा हि पारा चढला , " हे बघ , पैसे घेतो ते काम करून . तुझी चाटून नाही . शिव्या आपल्या घरी द्यायच्या, मी आत्ता येणार नाहीये . जे उखडायचं ते उखड " आणि फोन कट केला .
आता या प्रकारानंतर नोकरी जाणार हे तर निश्चित होतं. १५ मिनिटात एच आर चा फोन आला . कि उद्या आलास कि आधी सरांच्या केबिन मध्ये ये . पण सकाळी मी गेलोच नाही केबिन कडे आणि कोणी बोलावलं हि नाही .पुढचे दोन दिवस काहीच बोललं नाही कोणी . हा HR आणि इतर सिनियर लोकांकरवी त्याने शांत राहण्याचा धमकीवजा सल्ला दिला होता .
१२ मे :
आमच्या एका मोठ्या क्लायंट कडून लोक आले होते , पुढचे ३ दिवस मीटिंग , प्रोजेक्ट टेस्टिंग इत्यादी प्रकार चालणार होते .सकाळी ८ ते संध्याकाळी ८ असा त्यांचा ३ दिवसाचा कार्यक्रम , या सगळ्यासाठी (कमीत कमी मीटिंग साठी तरी ) मी आणि आमचा इलेक्ट्रिशियन कायम आसपास असणं गरजेचं होतं. अवेळी पाउस आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेलं रस्ता रुंदीकरण यामुळे विजेचा काही भरोसा नवता.
पहिले दोन दिवस गेले आरामात , वीज कित्येकदा गेली . पण UPS आणि जनरेटर च्या भरोश्यावर चालून गेले दिवस. तिसरे दिवशी घोळ झाला. मीटिंग दरम्यान वीज गेली . आणि गेली ती गेली २ तास आलीच नाही . स्टोर्स च्या गोंधळा मुळे डीजेल नवतं आणलेलं.त्यामुळे जनरेटर बंद होता आणि व्हायचं तेच झालं. UPS बंद पडला. मिटिंग रूम मधेच बसलेलो होतो मी, लगेच फोनाफोनी करून इलेक्ट्रिशियन ला बोलवून आम्ही दोघांनी खिशातले पैसे घालून डीजेल आणलं , जनरेटर चालू केला पुढच्या ५ मिनिटात, हे सगळं होई पर्यंत कोणी काहीच बोललं नाही . वीज चालू झाली तसं आम्ही दोघे रूम मध्ये गेलो आणि आलेल्या लोकांकडे माफी मागितली , त्यांनीही "छोटीशी गोष्ट आहे रे, एवढं काय त्यात " म्हणून टाळून दिला विषय .
पण आमचा बॉस, "You bloody bastards, can't even keep a single thing working? now fuck off from here before i fire you" म्हणाला. नागलिंग , जो माझ्याबरोबर या सगळ्यात धावपळ करत होता . त्याला हि माझ्याबरोबर झालेले सगळे घोळ माहिती होतेच , आणि त्यालाही हा प्रसाद आधी मिळाला होता, तरी त्याने शांत पणे उत्तर दिलं. " Sir, once again. do not abuse. it is not our mistake that stores department didn't do their job"
यावर आलेला क्लायंट हि परत म्हणाला कि सोडून द्या हा विषय आणि पुढच्या कामाला लागा .
पण मालकाला राग आवरत नवता. त्याने हातातला वायरलेस माउस आमच्याकडे भिरकावला. तो लागला नागलिंग च्या डोक्यावर, आणि काही कळायच्या आत हा माणूस टेबल वर उडी मारून मालकाची कॉलर पकडून त्याला मारायच्या बेतात होतात. कसं बसं आवरलं त्याला सगळ्यांनी.
आलेल्या लोकांसमोर गोंधळ नको घालायला एवढी अक्कल बहुदा , त्यामुळे तेव्हा काही नाही झालं . पुढचे दोन दिवस आम्ही दोघेही प्रचंड कामात होतो. त्यामुळे लक्ष गेलंच नाही बाकी गोष्टींकडे.
१६ मे :-
हा दिवस तर अगदीच मजेदार होता, कंपनी मध्ये मराठे आडनाव असलेले आम्ही २ लोक आहोत, एक मी, आणि दुसरा रम मराठे, (नाही , मी नाव चुकलेलो नाही . मुद्दाम तसं लिहिलंय. त्याचं नाव राम आहे . पण वाचा खाली, कारण कळेलच ) हे मशीन शॉप मध्ये असतात, माणूस पन्नाशीत आहे, पण तरी सोबत काम करणाऱ्या तरण्या पोरांपेक्षा जास्ती काम करतात , पण एकच गोष्ट वाईट म्हणता येईल अशी म्हणजे, दुपारच्या जेवणासोबत कमीत कमीत "१५" तरी रम लागतेच. आणि ती तो कच्ची घेतो. पण , त्याचा कधी कोणाला त्रास नाही होऊ दिला. वर आणि हे सगळं करून हि वेळच्या वेळी सगळे पार्ट तयार असायचे ड्रील करून . या सगळ्या प्रकारामुळे आम्ही त्यांना रम मराठे बोलवत होतो. कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसापासून असल्यामुळे हे सगळे प्रताप चालून जात होते . HR सुद्धा अधे मध्ये सांगून जायचे , पण सगळ्यांना माहित होतं कि याने काही फरक पडणार नाहीये. २-३ दिवस जायचे मध्ये आणि माणूस परत "नीट " व्हायचा.
तर त्या दिवशी काही घोळ झाला होता बहुदा आणि सकाळीच चढवून आले होते मराठे साहेब कामावर. आणि याची बातमी HR ने मालकाला दिली होती . आणि या हुशार माणसाला वाटलं कि मी पिउन आलोय कामावर आणि त्याने मला बोलावलं केबिन मध्ये.
ऑफिस मध्ये पोचल्याबरोबर मला केबिन मध्ये बोलावण्यात आलं . जाताना HR हि होताच सोबत , तो बडबडत होता . "आदित्य शांतपणे सोडव जे असेल ते , तो माणूस मोठा आहे आणि भरपूर ओळखी आहेत आणि उगाच भांडण वाढवू नको " आत गेल्यावर हि मालकांनी तेच सगळं सांगितलं. पण गोड बोलत. शालजोडीतून धमक्या देणं चाललं होतं. मी हि हसत हसत म्हणालो. "सर माझ्या घरातले मोठे कधी शिव्या देत नाहीत, ना कधी आवाज चढवतात. जे असेल ते समजावून सांगतात नीट . त्यामुळे त्यांच्याबद्दल चा आदर कित्येक पटींनी वाढलाय. लोकांशी नीट वागलात तर हि अशी वेळ येणार नाही . राहिली गोष्ट हे प्रकरण सोडवायची , तर मला लेखी माफी पाहिजे . किंवा सगळ्यासमोर हे कबुल करा कि तुम्ही मला शिवी दिली आणि तुम्ही चुकला. मी हि विसरून जाईन. तुम्हालाही लोकांचे पैसे कापत ट्रिप्स करता येतील "
शेवटचं वाक्य वर्मी बसलं बहुदा, आणि त्याने फोन उचलला . कोणा पिंटू जैन ला फोन लावला. आणि माझ्याकडे बघत म्हणाला कि एक कामगार दारू पिउन दंगा करतोय, मदत हविए लवकर ये.
काय होतंय हे समजत होतं, भीतीने फाटून हातात आली होती. तरी शांत बसून होतो . तसाही खुर्चीवरून उठलो असतो तर पाय कापत असल्यामुळे पडलोच असतो बहुदा . पुढच्या १०-१५ मिनिटात उगाच फालतू बडबड झाली . आणि तेवढ्यात एक माणूस आत आला . अशी उंची जास्त नाही , पण कमावलेलं शरीर होत चांगलंच . तो आत आला , माझ्याकडे लक्ष गेलं नसावं बहुदा. पण माझ्या जीवात जीव आला होता . कारण हा पिंटू जैन म्हणजे माझ्या शाळेतला २ वर्ष सिनियर, प्रवीण जैन . दोनदा नापास होऊन नववीत असताना माझ्या वर्गात आला होता . आणि दोन गल्ल्या सोडून घर होतं. आणि तेव्हा चांगला मित्र होता . पण त्यानंतर तो हि सगळी "समाजसेवा " करू लागला आणि आमचा संबंध संपला होता . योगायोग म्हणा , चांगलं नशीब म्हणा किंवा आणखी काही . पण मला मारायला माझाच वर्ग मित्र बोलावला होता .
एकदम बोलून गेलो . "काय बे ए भुसनळ्या , लग्न झालं म्हणे बे तुझं " आणि तो हि एकदम ओळख पटून "अद्द्या भाड्या , पुण्यात होतास कि , इकडी कधी आलास, आणि तुझे बाबा येउन गेले लग्नाला. तू चुकवलास साल्या " म्हणत माझा हात हातात घेतला .
आसुरी आनंद काय असतो माहितीये? तो झाला होता मला =]]
बाकी काही बोलू न देता त्याला म्हणालो कि मलाच मारायला बोलावलंय याने , आणि वरची सगळी कर्म कहाणी ऐकवली . आणि तो मालकावर च उलटला , कन्नड मध्ये त्यालाच शिव्या शाप देऊन शेवटी त्याचा वेळ वाया घालवल्या बद्दल ओरडून निघून गेला , आणि जाताजाता मला पगार डबल करून नोकरीवर ठेऊन घेण्याचा सल्ला देऊन गेला.
मी हि उठलो , तिथलाच एक कागद उचलला, आणि नोकरी सोडण्याची नोटीस देऊन केबिन मधून बाहेर पडलो.
पुढचा आठवडा एच आर आणि माझ्या मध्ये मेल मेल चे खेळ झाले , पगार जवळपास ७५% वाढवण्याची ऑफर दिली , पण यासगळ्यानंतर इथे काम करण्याची अजिबात इच्छा नवती.
माझ्या मित्राला हे सगळं सांगितल्यावर त्याने आपल्या कंपनीत बोलून फोनवर इंटरव्यू हि घ्यायला लावला होता , आणि १ जून पासून नोकरीवर रुजू होण्याचा मेल हि आलाच होता २५ तारखेला.
तरीही एक नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्या जागेसाठी ४-५ उमेदवार देऊन ठेवले होते. त्यांचे इंटरव्यू हि चालले होते . पण अजुनी एक शेवटचा किडा वळवळत होता मालकात. त्याने मला बोलवून सांगितलं कि आम्ही तुला black list करतोय , आणि बेळगावातली दुसरी कुठलीही कंपनी तुला घेणार नाही . तुझ्या नवीन कंपनीत हि हे करूच , तू कुठे काम करतोस हे शोधायला वेळ लागणार नाही. असं काही होईल याचा अंदाज होता मला ,आणि तसं मी नवीन कंपनीत बोलून हि ठेवलं होतं. आणि तिथल्या एच आर ने सांगितलं होतं त्याप्रमाणे, हि वाक्यं ऐकल्यानंतर मी कसं बसं हसू आवरत त्याला फोन लावला मालकाच्या केबिन मधूनच.
आणि फोन स्पीकर वर ठेवला. संवाद पुढील प्रमाणे .
मी : किरण सर, आदित्य मराठे बोलतोय, परवा आपलं बोलणं झालं होतं . तर माझे इथले बॉस तुमच्याशी बोलणार आहेत .
किरण : दे फोन दे .
दीपक (म्हणजे जुन्या कंपनीचा मालक ) : kiran ,this is deepak here, you might know me. I am the MD of this company.. this guy aditya is working here, and we are not relieving him in any case. and even if he does. i would like to inform you that he drinks on duty and his behavior is not suited in a professional organization.
I am sure that when a company like us says that,. you won't hire him.
किरण : Mr. Deepak, first of all. you cannot just call me kiran as if you know me. basic manners suggest you add " Mr" before someone's name.
second , these threats of black listing Mr. Aditya are a big fat joke. and if you want to take any legal actions, I would suggest you to please go ahead. I can assure that even aditya can take you on easily ,as during our discussion about this issue he mentioned that his close relative is an advocate specializing in labor cases. and apart from that. we are just way out of your league sir. so clear out whatever balances are pending and leave him be. and if not.. well, he is our employee from first of June. and i can guarantee you that only thing blacklisted after we are done with you will be you and your company.
आदित्य, बाळ तू ये १ तारखेला , आपली बस येते ९.३० वाजता बोगारवेस ला. भेटू तेव्हाच .
आणि फोन कट .
तिथून जे बाहेर पडलो ते तिथला दिवस हि पूर्ण न करता घरी पोचलो . आठवडा भर घरी नुसता झोपून काढलाय.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्ही IT मध्ये असे करून
असे केलेळी लोक पाहण्यात आहेत
मग तुम्हाला IT माहीत नाही
MNC मध्ये resign मारा
जबराट , जाम जुने किस्से
लिहा लिहा
=]]
वड ए वड!
पहिलीच ओळ वाचली नाही का ?
म्हायत्ये, खुट्टा हलवून पक्का
भारी रे
यस सर
रीलीव्हींग आणि एक्सपिरीयन्स
वाह वाह लायिच भारी लिहिलाय
कायप्पावर तर काही वेगळेच
=]]]]
आम्हालाही अँडवा
आमाला पावर नाय...ज्यांना हाय
अरे वा, हुच्च लोकांचा वेगळा
शॅम्पेन ना? असेल असेल.. =))
शिंदे सरकार .. हे काय नवीनच
अद्द्या हुच्च आहे?
असु शकतो अद्द्या हुच्च
माझे काय?
...
खि खि खि....
काय माणूस तरी!
भन्नाट रे
च्यामारी
डेअरिंग है बॉस.......
सुन्न करणारे अनुभव
अस्वस्थ करणारा अनुभव. कसे काय
मला समजले कुठली कंपनी आहे ही
कुठलं म्हणे ?
टेक मी होम
ते होय =]]
झकास!
मेरे को नाहीन मिल
तुमचा मालक हाफ मॅड आहे हे
रच्याकने, त्या (वायरलेस माऊस
डसला असेल =]]
'नारबाची वाडी' मधला मनोज
=))
हे असे सणकू डोक्याचे एम डी/
गुड जॉब.
अशा ठिकाणी काम करणं अवघड होउन
मस्त!! मी आधीची कुंपणी सोडली
हॉरीबल आहे हे!!! तुमच्या
आयला काय मुर्ख माणुस आहे तो
फक्कड