अकोला आणि अमरावतीचे कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 5:35 pm

नमस्कार,

दिनांक ११ ते १६ जुलै ह्या दरम्यान, अकोला आणि अमरावती येथील काही शेतकर्‍यांना भेट द्यायचा आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांचा विचार आहे.

आधी अकोला आणि मग अमरावती, असा बेत आहे.

तर, महत्वाचा मुद्दा असा की, अकोला आणि अमरावती ह्या भागात कुणी मिपाकर आहेत का?

ते जर शेती करत असतील तर फारच उत्तम.

कळावे, लोभ आहेच.तो वाढावा ह्या निमित्ताने हा प्रपंच.

आपलाच,

मुवि.

मौजमजामाहितीमदत

रत्नागिरी कट्टा.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 5:14 pm

गेले काही दिवस बराच व्यस्त होतो आणि शेती विकत घ्यायला किती प्रयास पडतात ह्याचा अनुभव पण घेत होतो.वडीलोपार्जित शेती नसल्याने त्रास जरा जास्तच होत होता.

शोधा-शोध करत असतांनाच आमच्या एका ओळखीच्या मित्राकडून देवरूखला एका जणाला शेती विकायची आहे, असा निरोप मिळाला.आता देवरूखला जायचेच आहे तर बसणीला पण जावून येवू म्हणून मग रत्नागिरीत मुक्काम करायचे ठरवले.साहजिकच आमच्या शिरस्त्याप्रमाणे, रत्नागिरीत कुणी अहे का? अशी दवंडीपण पिटवली.

मौजमजालेख

मी एक शेतकरी.....भाग १.... शेतीसाठी लागणार्‍या मुलभूत गोष्टी....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 3:16 pm

डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची? ह्या संबंधीच चर्चा केल्यास उत्तम.

पुढील भागा पासून आंबा शेती, काजू शेती, आवळा शेती, मत्स्य शेती, मधमाशा पालन असे विषयवार लेख घेवू या.जेणेकरून इतरांना विषयवार लेख शोधायला अडचण येणार नाही.

=====================================

थोडे स्वतः विषयी.

मी मारून मुटकून इंजिनियर झालेलो.म्हणजे ३ वर्षाचा डिप्लोमा करायला ९ वर्षे घेतलेला.(१९८१ ते १९९०)सुदैवाने डिप्लोमा झाल्यावर नौकर्‍या मिळत गेल्या आणि जसा-जसा अनुभव मिळत गेला तसा-तसा पगार पण वाढत गेला.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचारमाहिती

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ११: मानव हाच प्रश्न आणि मानव हेच उत्तर

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 12:58 pm
संस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रविचारलेख

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 10:40 am

नमस्कार,

गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच.

मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो.

सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे. (किंबहूना मला माझ्या शेतीचे आर्थिक नियोजन करतांना ह्यांच्या लेखांचा खूप फायदा झाला आणि पुढे पण होईलच.)

ह्या माहितीमुळेच, मी शेतकरी होवू शकलो.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचार

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 11:42 pm

दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!

हे ठिकाणवावरसमाजराहणीमौजमजाप्रकटनविचारबातमीअनुभव

चॉकलेट - ४

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 11:17 pm

चॉकलेट-१

चॉकलेट-२ (क्लिक!)

चॉकलेट-३ (डबलक्लिक!)

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

क्लिक!

कथाप्रतिभा

हायकू (?)

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
3 Jul 2016 - 8:51 pm

दूर डोंगराच्या माथी
आले उतरू आभाळ
... झाडावर पानगळ

दूर क्षितिजरेषेला
फुटे प्रकाशाचा पंख
.... मनावर काळा डंख

निळ्याशार तळ्याकाठी
गूज प्रेमाचे वाजते
चैत्रचांदणी लाजते...

झुंजूमुंजू पहाटेला
किरणाचा सूर्यरंग
... ओथंबले ओले अंग

कवितामुक्तक