डबलक्लिक!!

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
19 Jun 2016 - 1:40 pm

तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खा !
डबलक्लिकच्या आधी इथ मात्र सिंगल क्लिक! केलच पाहिजे!

==========================================================

तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट.

खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो. होऊंदे सर्दी खोकला.

"हेलो बॉस, इथर न्यू सेंट्रल किधर है?" काळा गॉगल शोभत होता फ्रेंच कटवर.
माहितीचा पत्ता असेल तर सांगायला मजा येते. पण इथून न्यू सेंट्रल म्हणजे लय किचकट.

"मै उधरीच जारा हू, क्रॉसींग के उस पार"
हा अस्सा फुल भिजलेला मी. अंगावर एक म्हणून कोरडी जागा नव्हती. नाकावरची माशी उडवावी तसं काच लावून घेत तो म्हणाला
"बैठो"

झ्झूम कार निघाली. मी तर कुडकुडतच होतो. एसी लावला होता साल्याने. वर केक खात मोबाईलशी खेळत बसला होता मागच्या शिटवर. याचा ड्रायव्हर एवढा काळा असेल वाटलं नव्हतं.

"और भाई, जरा गाना बिना चला दो"
मग ड्रायव्हरनंसुद्धा नाकावरची माशी उडवली.

डोळे झाकले तर बाहेर पाऊस पडतोय हे कळलंसुद्धा नसतं. एवढी शांतता. पावसाचं सोडा, गाडीचा आवाजही कान देऊन ऐकवा लागत होता. गुबगुबित गाद्यांची अलिशान गाडी.

तेवढ्यात फ्रेंच कटचा मोबाईल वाजला.

"हा बोल मास्टर"
"..........."
"क्या?"
"..........."
"मै यहा चुदवाने नै आया"
"..........."
"तो मै क्या करु?"
"..........."
"च्युत्या समजा है क्या?'
"..........."
"बेटा, तू टेलरसे बात कर रहा है, इतना याद रख"
"..........."
"किसी का भी भोसडा फाडो, डिल तो आजही होगी"
"..........."
"चलेगा"
"..........."
"आता मै उधर"
"..........."
"१० ठिक रहेगा"
"..........."
"न्यू सेंट्रल?"
"..........."
"डन'

साला फ्रेंच कट कसला खतरनाक बोलतो. डिट्टो बेडकासारखा. खर्ज म्हणतात त्याला.

"गाडी ऑरलँड ले चलो" हा तर हुकूमच.
ड्रायव्हरनं गाडी थांबवली.
"बॉस, आप उतरो, हम उधर नै जारे"
गपचिप खाली उतरलो. खरंतर त्याला "थँक्स फॉर द लिफ्ट" म्हणायचे होते. पण गाडी झ्झूम. फवारेच फवारे.

फुटपाथवर आलो.
किती धो धो पाऊस पडतो आहे. त्याचा हाय डेफिनेशन मनात आवाज घुमतो आहे. आभाळ म्हणजे डॉल्बी डिजीटलच. फुल व्हॉल्यूमच्या राक्षसी गडागडाटात कोणीही टरकेल.
उंच उंच इमारती. गगनचुंबीच. खाली एक छोटीशी टपरी. चहाची. (ऑफकोर्स उफाळत्या)
द पॉप्युलर डेस्टिनेशन इन मुसळधार पाऊस.

जागोजागी गळणाऱ्या त्या टपरीच्या शेडमध्ये निवांतपणा असा नव्हताच. लाकडी फळकुटावर कुडकुडत मी बसलो आहे. कटींग चहा पितो आहे. वर बीडीपण ओढतो आहे.

टेलर नामक फ्रेंच कट असावा तरी कोण? डोक्यात किडा वळवळला. न्यू सेंट्रलला रात्री दहा वाजता? कसलतरी डिल? बघूयातरी.
आता कुठे सहा वाजत आले होते. चार तास करायचं तरी काय?
मग निघालो चालत, भिजत, पाणी उडवत.

न्यू सेंट्रल आलो तेव्हा रेल्वे आदळाआपट करत जात होत्या. पाऊस असला म्हणून काय झालं. घंट्याची थांबते मुंबई.
एक बाकडं पकडलं. आणि झोपलोच.

स्वप्नात पक्या दिसला. पक्या आमचे जिगरी दोस्त. श्रीहरीकृपेने आमच्याच झोपडीत राहतात. अंडी खातात. बिड्या ओढतात. रेल्वे स्टेशन त्यांना खूप आवडतं. मूळचे खिसेकापू. हाफमर्डर एक्सपर्ट. आतापावतो चार पोलीसतरी धुतलेत त्यांनी. या पावसाळ्यात कुठे ऊलथले होते त्यांचे त्यांना माहीत.

बऱ्याच वेळानं जाग आली. जबरदस्त अंधार पडला होता. आज इथच मुक्काम टाकण्यास हरकत नव्हती.
फलाटावरच्या लांब एका कोपऱ्यात गर्दी दिसली. बक्कळ पोलीसपण दिसले.
चप्पल घालून निघालोच तिकडे. धो धो पावसात चिकचिक गर्दी. रेनकोट घातलेले पोलीस कुत्री घेऊन उभे होते. फ्लॅश मारुन फोटोच फोटो.
वाट काढत मध्ये आलो तर काय, फ्रेंच कट आडवा पडलेला. पावसात त्याचं रक्तपण वाहून जात होतं. चार पाच गोळ्या तरी नक्की झाडल्या असणार. छताडावर.
घड्याळात बघितलं १०:३० झाले होते.
विश्वासच बसेना. डोक्यात भुंगा पेटला. आतापर्यंत विसरून गेलेलं ते मशीन बाहेर काढलं. प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलं होतं भिजू नये म्हणून.
मी नॉब ऍंडजस्ट केला.

क्लिक!

मग निघालो चालत, भिजत, पाणी उडवत.

न्यू सेंट्रल आलो तेव्हा रेल्वे आदळाआपट करत जात होत्या. पाऊस असला म्हणून काय झालं. घंट्याची थांबते मुंबई.
एक बाकडं पकडलं. आणि ???
नको!
ही वेळ झोपायची नाही.

बसून राहिलो तसाच. फलाटाच्या लांब कोपऱ्यावर नजर मारली. फक्त काळोख.
भिकारी येत होते, जात होते. वेळ जात गेला तशी गर्दीही कमी होत गेली.
मी एक कटींग मागवला. बऱ्याच बिड्या फुकल्या. पेपर आणून वाचला. कालीगंगा!

शेवटी घड्याळात दहाचा टोल पडला. मी सावध झालो.
जबरदस्त बॉडी असलेले चौघे जण माझ्यापुढून फलाटावरच्या कोपऱ्यात निघून गेले.
मी नॉब ऍंडजस्ट केला.

क्लिक!

भिकारी येत होते, जात होते. वेळ जात गेला तशी गर्दीही कमी होत गेली.
मी एक कटींग मागवला. बऱ्याच बिड्या फुकल्या. पेपर आणून वाचला. कालीगंगा!

घड्याळात दहाला पाच कमी होते. मी चालत चालत फलाटावरच्या कोपऱ्यात गेलो. दाट काळोखात एका झुडपाआड लपून बसलो. डेंजर पाऊस होता.

जबरदस्त बॉडी असणारे चौघे जण तिथे चालत आले. प्रत्येकाकडं एकेक छत्री. त्यातला एकाकडं तपकिरी सुटकेस. भली मोठ्ठी.
मागून फ्रेंच कट येताना दिसला. एकटाच. त्याच्या हातात एक काळी सुटकेस. छोटीशीच
हातानं क्रॉस करुन तो म्हणाला,
"जीझस"
"जय माता दी" छत्रीवाला पुढे होत म्हणाला.

"और मास्टर, साले तेरी गाडी किधर अटक गयी थी ?, चार घंटेका लॉस हुआ मेरा"

"जाणता हू, मजबूरी थी, वैसेभी तेरी फ्लाईट कल सुब्बा है"

"भाड मे जा, फटाफट माल खाली कर, अर्जंसी नै समजेगा तू"

"एक बात बता टेलर, तेरेको इतना अर्जंसी क्यूं है?"

"तुझसे मतलब? अरे तू भाडमे जाना साले, पैले मेरको माल दे"

मास्टर पिस्तूल काढून सरळ फ्रेंच कटवर रोखतो.

"सॉरी टेलरभाय, उपर से ऑर्डर है इसलिये, नै तो आपुन इस झमेले नै पडता"

"व्हाट द फक?"

"तेरी रशियन डिल पहुंच गयी है बॉसतक, बाय बाय"

धडाम धुड. धाड धाड धूडूक!

डोळ्यासमोर फ्रेंच कट जमीनीवर कोसळला. आणि दोन्ही बॅगा घेऊन चौघेजण फरार. ये डील तो बडा जबरी हुआ!

बसल्या बसल्या विचार केला. तसा आपण काही समाजसेवक नाही. पण एक शक्कल सुचली.
मी नॉब ऍंडजस्ट केला.

क्लिक!

नाकावरची माशी उडवावी तसं काच लावून घेत तो म्हणाला
"बैठो"

झ्झूम कार निघाली. मी तर कुडकुडतच होतो. एसी लावला होता साल्याने. वर केक खात मोबाईलशी खेळत बसला होता मागच्या शिटवर. याचा ड्रायव्हर एवढा काळा असेल वाटलं नव्हतं.

"और भाई, जरा गाना बिना चला दो"
मग ड्रायव्हरनंसुद्धा नाकावरची माशी उडवली.

डोळे झाकले तर बाहेर पाऊस पडतोय हे कळलंसुद्धा नसतं. एवढी शांतता. पावसाचं सोडा, गाडीचा आवाजही कान देऊन ऐकवा लागत होता. गुबगुबित गाद्यांची अलिशान गाडी.

"और टेलरभाय, क्या चल रहा है" मागे वळून बघत मी म्हणालो.
करकचून ब्रेक दाबत गाडीच थांबवली.
"कौन है बे तू?"
"म.. म.. मै मास्टर का आदमी, वो सुटकेस मेरे पास देने को बोला है" जाम घाबरलो होतो खरंतर.

"और माल?"
"वो ऑरलँड मे आपके केबिन मे मिलेगा"
"फक, तेरेको कैसे पता?, मैने तो ऑरलँड अभी बुक भी नै किया"

तेवढ्यात फ्रेंच कटचा मोबाईल वाजला.

"हा बोल मास्टर"
"..........."
"क्या?"
"..........."
"तो फिर ये पंटर कौन हे मेरे गाडीमे"
"..........."
"एक मिनीट रुक जा"
कट.

सायलेन्सर लावलेली रिवॉलव्हर बाहेर काढत तो म्हणाला.
"सीबीआय से आया तू? अब उपर जाके चोदूगिरी कर"

मी नॉब अगोदरच ऍंडजस्ट केला होता.

क्लिक!

धो धो पावसात मी सुटकेसच्या दुकानात गेलो. सेम टू सेम बॅग विकत घेतली. मास्टरसारखी. साडे तीन हजार रुपये खर्च झाले. साली बॅग हाय का भूत. मग भरले त्यात बिस्कीटाचे पुडे.

तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट.

खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो. होऊंदे सर्दी खोकला.

"हेलो बॉस, इथर न्यू सेंट्रल किधर है?" काळा गॉगल शोभत होता फ्रेंच कटवर.

"डील इधरीच होगी" मी विचारपुर्वक ठोकलं.
हातातल्या तपकिरी बॅगकडं त्यानं क्षणभर बघितलं. अन चमकलाच.

"क्या मतलब?"
"मास्टरने भेजा है मुझे, वो नै आयेगा, गाडी फस गयी है उसकी, गड्डेमे"
"पर... पर.... यहा? "
"जादा सोचो मत टेलरभाय, आपका टाईम कितना किमती मालूम है हमको"
"जीझस"
"जय माता दी"
"ला चल माल दे" त्याची सुटकेस मला देत तो म्हणाला.
माझी बॅग त्याला दिली.
"मास्टर को मेरा सलाम बोलना" गाडी झ्झूम.

पावसाला आज काय मरण नव्हतं. धो धो कोसळतच होता. झोपड्याकडं झपाझप पावलं टाकत निघालो. हातात काळी बॅग होती. त्यात जबरदस्त माल असणार. डोळेच पांढरे होणार.

झोपड्यात आलो. कडी लावून घेतली. पक्या उताणा पडला होता. साला आयत्या वेळी उगवला. मला बघून जागा झाला.
विदाऊट लॉकची ती बॅग झटक्यात उघडली. माझं सोडा पक्यानेसुद्धा डोळे पांढरे केले. हजार हजाराचे बिंडेल खच्चून भरलेले. उभं आयुष्य मोजण्यात जाईल.

फटाफट घर आवरलं. सॅकमध्ये कापडं भरली. बॅगेतला रोकडा प्लास्टिकमध्ये गुंडाळून कापडात लपवला. सगळं झोपडं पुसून घेतलं. गटारात मोकळी बॅग टाकून दिली. ह्यातच वेळ गेला.

रात्रीच्या दहा वाजून गेल्या होत्या. पोलीस कधीपण टपकू शकतात. पाठीला सॅक अडकवून मी आणि पक्या जंक्शनवर आलो. समोर दिसेल त्या रेल्वेत चढलो.

धडधडत रेल्वे पळत सुटली. फ्रेंच कट जिंदाबाद म्हणत असतानाच न्यू सेंट्रलला गाडी थांबली.
मी सहज बाहेर बघितले आणि हादरुनच गेलो.
फलाटावरच्या एका कोपऱ्यात बरीच गर्दी जमली होती. रेनकोट घातलेले पोलीस पंचनामा करत होते. फ्लॅश मारुन फोटोच फोटो. मुसळधार पावसात मला दिसत होते अस्ताव्यस्त पडलेले चार मृतदेह.
जबरी फायरींग झाली असणार.

मला मशीन आठवलं. खिशामध्ये सुरक्षित होतं. बाहेर काढून मी प्रेमानं त्याच्यावर हात फिरवला. लाल बटन दाबायची आता अजिबात गरज नव्हती.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

वाल्मिक's picture

19 Jun 2016 - 1:45 pm | वाल्मिक

मी पायला

लालगरूड's picture

19 Jun 2016 - 2:14 pm | लालगरूड

लय झाक

विंटरन्याशनल स्टोर्‍या सुरु झाल्या की राव. भारीच.
व्हिज्यलाइझ होताहेत पटकन. लगे रहो.

तुषार काळभोर's picture

19 Jun 2016 - 2:29 pm | तुषार काळभोर

हत्तीदादा, एक नंबर गोष्ट!

चांदणे संदीप's picture

19 Jun 2016 - 3:39 pm | चांदणे संदीप

हत्तीदादा

=))

एक नंबर गोष्ट!

+१
सुरस आणि चमत्कारिक किंडोफ्फ!!

Sandy

असंका's picture

19 Jun 2016 - 2:48 pm | असंका

अहाहा!! काय सुंदर...!

धन्यवाद..

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2016 - 3:10 pm | टवाळ कार्टा

भन्नाट

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Jun 2016 - 3:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रिन्स ऑफ पर्शिया: सॅन्ड्स ऑफ टाईम ची कन्सेप्ट दिसते!! मस्त आहे हे वेगळे सांगणे न लगे

जव्हेरगंज's picture

19 Jun 2016 - 3:28 pm | जव्हेरगंज

डबलक्लिकच्या आधी इथ मात्र सिंगल क्लिक! केलच पाहिजे!

कन्सेप्ट समजून जाईल!!

संजय पाटिल's picture

19 Jun 2016 - 3:20 pm | संजय पाटिल

आयला भारीच...
पण संपली कि काय?
अजून येउदे की...

जव्हेरगंज's picture

19 Jun 2016 - 3:29 pm | जव्हेरगंज

प्लॉट सुचला की लगेच येणार !!!

डबलक्लिकनंतर आता राइट क्लिक आणी मग स्क्रोल येउद्या. स्क्रोलिंग ला लै मज्जा यील ;)

एस's picture

19 Jun 2016 - 3:39 pm | एस

गुड वन!

धनंजय माने's picture

19 Jun 2016 - 4:04 pm | धनंजय माने

गोष्ट भारिये.

अवांतर:- मिपाचे पहलाज निहलानी कुठे गेले? ;)

किसन शिंदे's picture

20 Jun 2016 - 9:24 am | किसन शिंदे

कोण म्हणायचे हे पहलाज निहलानी?

विवेकपटाईत's picture

19 Jun 2016 - 4:21 pm | विवेकपटाईत

कोट्यावधी रुपये खर्च करून जेवढी पब्लिसिटी सिनेमाला मिळाली नसती, त्याहून जास्त पब्लिसिटी मिळवून दिली. बहुतेक निर्मात्यासोबत पेग मारत असतील.

जव्हेरगंज's picture

19 Jun 2016 - 8:59 pm | जव्हेरगंज

हा नक्की कसला बाउंसर टाकलाय?
काय कळ्ळा नाय :(

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Jun 2016 - 8:47 am | कैलासवासी सोन्याबापु

जाऊ द्या हो ! कायम प्रचार मोड मध्ये असतात ते!

अकॅसेण्ट मध्ये लिहित असले तरी आपलेच आहेत ते

:D :D

पटाईत काका अन जव्हेरभाऊ दोघंही हलके घ्या अजिबात त्रास नका करून घेऊन

धनंजय मानेंची आगाऊ माफी मागून

(टवाळ) बाप्या

धनंजय माने's picture

20 Jun 2016 - 10:16 am | धनंजय माने

बापु, कइसन हो भईया.
इ लोगोंका तनिक च्यवनप्राश या बादाम खिलाना ससुरा!

तर्राट जोकर's picture

4 Jul 2016 - 12:30 am | तर्राट जोकर

पतंजली?? फिर्से...?

किसन शिंदे's picture

20 Jun 2016 - 9:25 am | किसन शिंदे

बहुदा पटाईत काकांना उडता पंजाबच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा असावा.

पटाईत काकांनी बरोबर दिलाय प्रतिसाद,
जव्हेरभाऊंच्या ह्या धाग्यात सुरुवातीच्या संभाषणात असलेले अपशब्द पाहून माने साहेबानी आपले पहलाज निहलानी उर्फ सेन्सॉर नाही का ईचारलेले, त्याला पटाईत काकांनी मार्मिक टोला मारलाय.

जेपी's picture

19 Jun 2016 - 4:32 pm | जेपी

मस्तय..

कविता१९७८'s picture

19 Jun 2016 - 11:22 pm | कविता१९७८

शेवटच क्लीक आवडल

लोथार मथायस's picture

20 Jun 2016 - 4:30 am | लोथार मथायस

भन्नाट

बाबा योगिराज's picture

20 Jun 2016 - 8:36 am | बाबा योगिराज

जरा त्ये क्लिक वाल मशीन आमाला बी द्या की.

आवड्यास.
पुभाप्र.

नाखु's picture

20 Jun 2016 - 8:48 am | नाखु

मस्त.

अवांतर : चार-दोन तासासाठी मशीन देणे (हाफीसात अर्जंट काम आहे) पुन्हा आणून देतो.

चाकरमानी नाखु

किसन शिंदे's picture

20 Jun 2016 - 9:24 am | किसन शिंदे

भन्नाट आहे कथा.

स्पा's picture

20 Jun 2016 - 10:30 am | स्पा

तुकडाच पाडलात राव

गुंड्या's picture

20 Jun 2016 - 10:38 am | गुंड्या

नाद लागलाय मशीनचा... :)

राजाभाउ's picture

20 Jun 2016 - 10:58 am | राजाभाउ

जबराट.
क्लिक .... क्लिक .... क्लिक येउ दे लवकरच

चांदणे संदीप's picture

20 Jun 2016 - 12:37 pm | चांदणे संदीप

काश! :(

याच नावाचा ॲडम सॅंडलरचा तुफान कॉमेडी हॉलिवूडपट आहे... अशीच थीम असलेला, फक्त त्यात भूतकाळाऐवजी भविष्यात फास्ट फॉरवर्ड व्हायची सोय असलेला रिमोट असतो.

Sandy

चांदणे संदीप's picture

20 Jun 2016 - 12:37 pm | चांदणे संदीप

काश! :(

याच नावाचा ॲडम सॅंडलरचा तुफान कॉमेडी हॉलिवूडपट आहे... अशीच थीम असलेला, फक्त त्यात भूतकाळाऐवजी भविष्यात फास्ट फॉरवर्ड व्हायची सोय असलेला रिमोट असतो.

Sandy

आदिजोशी's picture

20 Jun 2016 - 1:20 pm | आदिजोशी

१ नंबर आहे कथा :)

मोदक's picture

22 Jun 2016 - 8:41 am | मोदक

+१११

एक नंबर कथा आहे.

प्राची अश्विनी's picture

20 Jun 2016 - 7:13 pm | प्राची अश्विनी

जब्बरदस्त!__/\__

drshantiprasad's picture

20 Jun 2016 - 7:50 pm | drshantiprasad

जबरदस्त

आनन्दा's picture

20 Jun 2016 - 7:56 pm | आनन्दा

___/\___

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Jun 2016 - 8:18 pm | भाग्यश्री कुलकर्णी

भारी.

रातराणी's picture

21 Jun 2016 - 1:38 am | रातराणी

डॉन आहात!

चाणक्य's picture

21 Jun 2016 - 4:57 pm | चाणक्य

लई आवडली.

बोका-ए-आझम's picture

21 Jun 2016 - 8:03 pm | बोका-ए-आझम

हे असं काहीतरी लिहा. लय भारी! थोडा हायपरलिंक झोलझाल आहे पण मस्त जमलेला आहे!

जव्हेरगंज's picture

21 Jun 2016 - 8:53 pm | जव्हेरगंज

हायपरलिंक झोलझाल काय झाला आहे!!

सांगा म्हणजे मलाही कळेल !!

अशा लिखाणावर पहलाज निहलानी उर्फ सेंसॉरने काही आक्षेप घेतला तर त्यांच्यासारखे *** तेच. १ नंबर . येऊद्या अजून . चांगली सिरीज बनेल .

कैलासवासी's picture

24 Jun 2016 - 4:49 pm | कैलासवासी

+१ लय भारि

तर्राट जोकर's picture

4 Jul 2016 - 12:30 am | तर्राट जोकर

जव्हेरभौ, एक नंबर सोनं... कातिल चीज लिव्लिया. आवड्यास.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jul 2016 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार

और आने दो

पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

9 Jan 2017 - 10:08 pm | ज्योति अळवणी

खरच मस्त जमत तुम्हाला

mayu4u's picture

11 Jan 2017 - 10:18 am | mayu4u

जव्हेर भाऊ, शि सा न!

टर्मीनेटर's picture

2 Sep 2017 - 6:01 pm | टर्मीनेटर

क्लिक! क्लिक! क्लिक!
जब्राट...

सुमीत भातखंडे's picture

5 Sep 2017 - 1:16 pm | सुमीत भातखंडे

.