✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

क्लिक! (कथा)

ज
जव्हेरगंज यांनी
Fri, 06/17/2016 - 00:11  ·  लेख
लेख
तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खाल्लं तरी चालेल ! ========================================================== हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय? मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्. मग लाल बटन दाबलं क्लिक पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे. दाराला कडी घालून आत बसलो. मांडीवर ब्याग घेतली. पकडीनं लॉक उचकाटलं. पण हे मटरेलंच वेगळं. तोडताबी येईना. पक्या कोरी मारुन आडवा पडलेला. मातीचा कुड एका लाथीत ढासळला असता. सुटकेस उचलून व्यवस्थित ठेवली. मग झोपलो. काय असेल आत? काहीही असो. माल मिळाल्याशी मतलब. सकाळी जाग आली तेव्हा पक्या अगोदरच उठून खटपट करत बसला होता. सुटकेस जवळपास उघडलीच होती त्याने. कानशीनं घासली होती कडेनं. मग लॉकच्या बाजूनं कातरत सुटला होता. मी म्हटलं, सर बाजूला, मी बघतो. एका हातानं लॉक वाकवून फिरवलं. मग पिळलं. शेवटी तुटलंच. सुटकेस उघडून आत बघतो तो काय, नुसती कापडं. बर्मुडे आणि लेंगे. छोटा बॉक्स दिसला, टाकला खिशात. खाली वायरी आणि लहानश्या ब्याटऱ्या. बरंच बारीक बारीक चिपळ्या टाईप मटरेल. त्याच्या खाली पुन्हा कापडं. ह्याट! पक्या म्हणाला, "माणसं वळखायला शीक. वायरमेनची ब्याग आणलीय. ह्यात तर झ्याx काय नाय" नाष्टा करायला आम्ही हॉटेलात गेलो. भजीपाव वगैरे हाणले. मग तसंच फिरत फिरत बसस्टँडवर आलो. आधीपण इथं एकदोन पाकीटं मस्त मारली होती. आता मोठा हात मारुन हे गाव सोडायचा विचार होता. पण काल माती खाल्यानं संभाळून राहावं लागणार होतं. पक्या सावज हेरत बाकड्यावर बसला होता. मी त्याच्या समोर बसून पाठीमागे लक्ष ठेऊन होतो. तेवढ्यात मला तो खिशातला बारीक बॉक्स आठवला. लगेच हातात घेऊन उघडला. सिगारेटच्या पाकीटाऐवढी वस्तू त्यात दिसली. हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय? मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्. मग लाल बटन दाबलं क्लिक पक्यानं आणि मी ती सुटकेस खोलायची जाम खटपट केली. मग तशीच घेऊन आलो खोलीवर. जिथं ड्रेनेजचं भोक उघडतं तिथंच आमची खोली. गढूळ पाण्याचे झरे वाहतात चोहीकडे. अर्थात गटारे. दाराला कडी घालून आत बसलो.. . . . सकाळी जाग आली तेव्हा... . . . नाष्टा करायला आम्ही हॉटेलात गेलो... . . . तेवढ्यात मला तो खिशातला बारीक बॉक्स आठवला. लगेच हातात घेऊन उघडला. सिगारेटच्या पाकीटाऐवढी वस्तू त्यात होती. हे म्हणजे मोबाईल सारखंच आहे. टायमरचा नॉब आणि लाल बटन. पण आहे तरी काय? मी नॉब फिरवला. जरासाच. नथिंग हॅपन्ड्. मग लाल बटन ?????? बापरे!!!! नको दाबायला. पुन्हा ती सुटकेस खोलायची खटपट करावी लागेल. आतापर्यंत हे चाळीसवेळा तरी झालं असेल. फेकून द्यावं का हे? भुताटकीच की!! साल्या टकलूचा बेक्कार खेळ दिसतोय हा! फेकतोच! नाहीतर नको. जरा विचार केला. हुशारीने वापरायला हवे. नॉबवर कंट्रोल हवे. योग्य टायमर सेट केला की झालं. मग एक प्रयोग केला. नॉब व्यवस्थित सेट केला. पाच मिनटाचा. अन उठून पक्याला जोरदार कानफटात लावली. "येडा झाला का बे?" म्हणून त्यानं चाकूच काढून दाखवला. मग त्याच्या पेकाटात लाथ घातली. मग मात्र आऊट ऑफ कंट्रोल होत तो चालूनच आला. झटक्यात लाल बटन दाबलं. क्लिक मग एक प्रयोग केला. नॉब व्यवस्थित सेट केला. पाच मिनटाचा. अन उठून पक्याला??? ग्रेट!!! हे घडतंय! आता मोठा हात मारायला पायजे. मजा येईल. पण कुठे? कुठे, कुठे? बँकेत? यस! पक्याला म्हटलं "चल, बँकेत जावू. आज तिकडंच हात साफ करु." "भंजाळला काय? रायफलवाला दारातच असतो" च्यायला होकी. क्लिक "चल त्या केसाळ हवालदाराला धुऊन काढू" "ख्खॉक..!" क्लिक "चल रंडीबाजारात जावू" "च्यायला आत्ता? रोकडा काढ मग, जावू लगीच" श्या. नरकात जा. क्लिक "कंडक्टर?" "आस्सं, बघू ट्राय मारुन" येस. कंडक्टरंच. फायनली! ऊसगावची येश्टी फलाट क्रमांक ३ वर उभी होती. लॉन्ग रुटची. पक्याला इशारा केला. तो मागे मागे येऊ लागला. "ह्ये हातात काय हाय तुझ्या?" हातातल्या यंत्राकडं बघत तो म्हणाला. "कुटं काय, हे व्हय, गेम हाय बारक्या पोरांची, टकलूच्या ब्यागेत सापडली" डायवर न कंडक्टर मिसळ हाणत बसले होते. कँटींगमध्ये. आम्ही एक कटींग मागवत बाजूच्या टेबलावर बसलो. पैशाची ब्याग कंडक्टरच्या गळ्यात होती. आठ दहा हजार तरी सहज पडले असते. पण साला हे मशीन असुनसुध्दा असली भुरटी चोरी म्हणजे तलवारीनं लिंबू कापण्यासारखं होतं. हरकत नाही. ट्रायल तरी घेतली पायजेच ना. बसला बसला न करंगळी वर करून पक्या मुतारीकडं निघून गेला. साल्याला वेळेची किंमत नाय. येश्टी लयीत लय १५ मिनटं थांबेल. दुसऱ्याबी येतील म्हणा, टेन्शन नाय. तर तो कंडक्टरबी उठून मुतारीकडंच गेला. वाव. गल्ल्यावर धा रुपय टाकून मी पण त्याच्या मागे निघालो. मुतारीत पक्या, कंटक्टर न मी. बाकी कुणी नाही. हीच वेळ आहे. चक्क मुतारीत! "काय नाना, प्यायची का दारु?" पक्याला वाईट सवय. पण असो. कंडक्टरनं रागानं त्याच्याकडं बघितलं. "ओ नाना, पैल्या धारंची हाय, घ्या राव" च्यायला गोची. पक्या नेहमीचा मार्ग वापरत होता. चालंतय, त्यात काय. "मुस्काड फोडल्यावर कळंल कारं? माज आलाय का?" कंडक्टरपण रगीलच होता. शेजारीच मी उभा होतो. पिशवीचा बंध जवळपास अर्धा कापून झाला होता. पण माझं लक्ष खिशातल्या मशीनकडं. शेवटी कात्री त्याला टोचलीच. श्या. तर मुतारीत मी उभा होतो. हातात पैशाची पिशवी होती. कंडक्टरचं मुडकं भिताडावर आपटून पक्यानं चाकू काढला होता. छ्या. आता हाफ मर्डर होणार तर. कदाचित फुलपण होऊ शकतो. हा म्हंजे लय मोठा बांबू. मी नॉब ऍंडजस्ट केला. क्लिक! क्रमशः
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12898 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

आता नवीन सेटींग?

कंजूस
Fri, 06/17/2016 - 06:51 नवीन
आता नवीन सेटींग?
  • Log in or register to post comments

1+

बाबा योगिराज
Fri, 06/17/2016 - 07:53 नवीन
ख्या ख्या ख्या. मायला लै झ्याक...!!!
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/17/2016 - 08:44 नवीन
वाचतोय. पुभाप्र ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एकूणात

चांदणे संदीप
Fri, 06/17/2016 - 09:07 नवीन
स्फोट होणार तर! Sandy
  • Log in or register to post comments

तिनदा वाचुन झाली, काय कळेना

राजाभाउ
Fri, 06/17/2016 - 10:27 नवीन
तिनदा वाचुन झाली, काय कळेना ,कुणीतर डिकोड करुन सांगा हो.
  • Log in or register to post comments

Portable time machine?

अभ्या..
Fri, 06/17/2016 - 11:22 नवीन
Portable time machine?
  • Log in or register to post comments

+११११

टवाळ कार्टा
Fri, 06/17/2016 - 11:27 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भारीच!

गुंड्या
Fri, 06/17/2016 - 11:23 नवीन
भारीच!
  • Log in or register to post comments

ओक्के,

नीलमोहर
Fri, 06/17/2016 - 11:27 नवीन
टाईम मशीन.. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

टाईम मशीन आहे तर...

किसन शिंदे
Fri, 06/17/2016 - 12:14 नवीन
टाईम मशीन आहे तर...
  • Log in or register to post comments

वाचतोय...

संजय पाटिल
Fri, 06/17/2016 - 13:08 नवीन
पुढचा भाग लवकर टाका..
  • Log in or register to post comments

tom cruise च्या एका war

विअर्ड विक्स
Fri, 06/17/2016 - 15:38 नवीन
tom cruise च्या एका war movie ची आठवण झाली …
  • Log in or register to post comments

Edge of Tomorrow

लालगरूड
Sat, 06/18/2016 - 19:31 नवीन
Edge of Tomorrow
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

क्लिक...

वपाडाव
Fri, 06/17/2016 - 15:54 नवीन
म्हणजे टाइम मशिन नसेल... कदाचित टाइम स्टॉपिन्ग मेक्यानिस्म असेल...
  • Log in or register to post comments

नाही नाही... डौट क्लिअर झाला

वपाडाव
Fri, 06/17/2016 - 15:56 नवीन
नाही नाही... डौट क्लिअर झाला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

ह्म्म्म, Edge of Tomorrow

शब्दबम्बाळ
Fri, 06/17/2016 - 16:01 नवीन
ह्म्म्म, Edge of Tomorrow मध्ये असे होते पण त्यासाठी नायकाला मरावे लागत होते... तुम्ही "1 मिनिट टाइम मशीन" हा व्हिडिओ पाहून मग लिहिलंय का? सेम टू सेम स्टाइल आहे! फक्त त्यात १ मिनिट ची टाइम मशीन आहे. खूपच भारी आहे कल्पना ती...
  • Log in or register to post comments

जव्हेरभौनीच खरडफळ्यावर

अभ्या..
Fri, 06/17/2016 - 16:04 नवीन
जव्हेरभौनीच खरडफळ्यावर टाकलेला एक व्हीडीओ. एक जण चौकात मशीन घेऊन येतो डीज्जे सारखे. डिस्क स्क्रॅच केली की टाइम तसा फिरतो. तोच व्हिडो त्यानी कथेत फिट्ट केलाय पक्या विक्याच्यासाथीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

"1 मिनिट टाइम मशीन" हा

जव्हेरगंज
Fri, 06/17/2016 - 19:52 नवीन
"1 मिनिट टाइम मशीन" हा व्हिडिओ पाहून मग लिहिलंय का?>>>> करेक्ट!!! खरंतर टाईम मशीनवर लिहायचं होतं. व्हिडीओतली कल्पना आपसुकच उतरली ! खरडफळ्यावर टाकलेला एक व्हीडीओ.>>>> तो वेगळा. हे वेगळं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

क्लिक...

तुषार काळभोर
Fri, 06/17/2016 - 16:02 नवीन
क्लिक.... भाग-२! क्लिक.... भाग-३!! . .. ... .... च्यायला मिपावर असं पायजे होतं!
  • Log in or register to post comments

=))

असंका
Fri, 06/17/2016 - 16:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

भारी

जगप्रवासी
Fri, 06/17/2016 - 17:13 नवीन
हे मी १० वेळा टाइप करून प्रकाशित केल तरी परत तेच होतंय, ओ जव्हेर भाऊ क्लिक करू नका ना… एकसारखं तेच लिहून कंटाळा आला.
  • Log in or register to post comments

वा

आनंद कांबीकर
Sat, 06/18/2016 - 00:40 नवीन
मस्तच! पण आधी चॉकलेट द्यायची शक्कल भारिच!
  • Log in or register to post comments

भारीच झालाय क्लिकक्लिकाट!

रातराणी
Sat, 06/18/2016 - 13:36 नवीन
भारीच झालाय क्लिकक्लिकाट!
  • Log in or register to post comments

मस्त आयडिया!

स्वीट टॉकर
Mon, 06/20/2016 - 09:58 नवीन
पुढच्या भागाची वाट बघतोय! का 'क्लिक' केलं की पुढचा भाग आपोआप येणार? 'चॉकलेट' ची आयडिया टॉप!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा