मी बी ढेकर देईन म्हणतो : हवाबाणी तडका
कधी चवीची, कधी अगदीच पांचट,
लाल तर्रीची मिसळ कधीतरी ओर्पीन म्हणतो
मी बी ढेकर देईन म्हणतो...!!
मिसळीवर तवंगतर्री
भेटली काय, न भेटली काय
मिपाकार्याला रवंथ करायची
उपजत सवयच हाय
जिलबीतून पाकरस
सुटला काय, न सुटला काय
मिपाकार्याला तोबरे भरायाची
सवयच हाय
शेवटच्या तुकड्यापर्यंत
मी बी दाबून खाईन म्हणतो...!!
चयापचयाची काळजी
सोडून देईन म्हणतो
मी बी हाटेलामधीच
चूळ भरीन म्हणतो...!!
अपचनाचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या हावऱ्या मिपाकर्याले
उपास-तापास लंघनाची अक्कलच नाय