Skip to main content

फिलिंग आवसमला

लेखक फुंटी यांनी रविवार, 24/07/2016 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग आवसमला... वरती अवसान न्याचरल सुखाच अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5275
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

_/\_ 'आवसमला'या शब्दाचा अर्थ कळाला तर फार बरे होईल!

In reply to by जव्हेरगंज

=) =)))

हे पण फेसबुकावर टाकायचं ना! लाइकले असते!

या "फिलिंग आवसम"च्या नादात पब्लिकने आमच्या ताम्हीणी घाटाची माती केली मागच्या तीन चार वर्षात. :(

लोकांसाठी "ह्यो" मोठ्ठा टोला.... चाबूक.

पावसाळ्यात दर रविवारी या असल्या "यो" लोकांमुळे हापिसातुन घरी पोचायला उशीर होतो. पैजारबुवा,

=))

कवितेचं शीर्षक वाचून 'फीलिंग ऑस्सम ला' असं मलेशियन इंग्लिशमध्ये म्हटल्यासारखं वाटलं. आपण जसं प्रत्येक वाक्याला 'ऑस्सम वाटतंय रे' किंवा 'ऑस्सम आहे नै' असं म्हणतो तसं मलेशियात आणि सिंगापूरमध्ये 'ला' म्हणतात. ते फार गोड वाटतं. आणि तसं म्हणणाऱ्या काही गोड मुलींची आठवण असेल तर अजूनच...

मस्त