जगणे...!
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो
मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो.
ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो
गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो.
लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची
जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो.
ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी
भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो.
ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी!
मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो.
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो......
....
अत्रुप्त...