मी थेंब की झाड की माणूस ??

फुंटी's picture
फुंटी in जनातलं, मनातलं
31 Jul 2016 - 11:58 am

भर पावसात झाड निश्चल उभी आहेत.शब्दशः एकही पान हलत नाही.स्थितप्रज्ञतेने बरसणार्या पावसाचा जणू स्वीकार करत आहेत.
मी माणूस रहात नाही पण मग मी एक थेंब की झाड ? की दोन्ही ?
हं आता लिहिताना माणूस झालो पुन्हा.झाड लिहू शकत नाहीत.अनुभवत असतातच.पाऊस बरसत असतो .तोही लिहू शकत नाही...
खोताचा प्रभाव पडतोय माझ्यावर...की श्याम मनोहरांचा...झाडांना आणि पावसाला प्रभावाच काही पडलेल नाही.मला पडलय मी माणूस आहे..

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

छान होती सुरुवात अचानकच लवकरच थांबलात तुम्ही
पोटेन्शीयल होत या मुक्तकात
जमल्यास विस्तार करावा ही नम्र विनंती
वाचायला आवडेल.

जव्हेरगंज's picture

31 Jul 2016 - 6:40 pm | जव्हेरगंज

अर्धवट वाटलं. पण मस्त आहे !

फुंटी's picture

31 Jul 2016 - 7:24 pm | फुंटी

धन्यवाद...प्रयत्न करीन..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2016 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदाच भरपूर लिहा, मिपा कुठे पळून जाणार नै.
अन वाचकही कुठे जानार नै......

-दिलीप बिरुटे

नीलमोहर's picture

31 Jul 2016 - 11:03 pm | नीलमोहर

छान लिहिलेय

कवितानागेश's picture

31 Jul 2016 - 7:01 pm | कवितानागेश

अजून लिहा

ज्योति अळवणी's picture

1 Aug 2016 - 10:56 am | ज्योति अळवणी

छान. अजून थोड निट लिहील असत तर अजून मजा आली असती.