खव्याचे काय करू?

इना's picture
इना in पाककृती
13 Oct 2016 - 1:24 am

माझ्याकडे गाजर हलवा करायला आणलेला खवा शिल्लक आहे, तरी झटपट करता येतील अशा रेसिपी सूचवाव्यात अशी विनंती.

बऱ्याचदा आपण एखादा पदार्थ करण्यासाठी काही विशिष्ट साहित्य आणतो पण ते पूर्ण वापरले जात नाही तर इतर कुणाला ह्या धाग्यावर असे प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावेत, इथल्या पाककलानिपुण सदस्यांच्या सूचनांचा माझ्यासारख्या नवशिक्या स्वैपाकघरात लुड़बुड करणाऱ्याना फायदा होईल आणि सामान वाया जाण्याचे दुःखही होणार नाही.

धन्यवाद

अशी सजेल दिवाळी

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 11:35 pm

नमस्कार मंडळी,

श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ. सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि आनंदाची अशी दिवाळीच मला खुणावू लागली.मग काय विचार पक्का झाला आणि कामाला सुरवात कॆली.
दिवाळी म्हटलं की सर्वप्रथम आठवतॊ तॊ आकाश कंदील.तॆंव्हा सादर आहॆ,

क्विलींगचा आकाश कंदील.......

कलासद्भावनाशुभेच्छा

अंधार्या रस्त्यावरची लिफ्ट

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 10:24 pm

मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू.

कथाkathaaलेख

मैत्रिणीचा ..... प्रतिसाद ("मैत्रीण " ला ).....

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
12 Oct 2016 - 3:03 pm

मित्र मैत्रिणींनो , धन्यवाद !!!! 'मैत्रीण 'हि कविता तुम्हाला आवडली. माझ्या ज्या मैत्रिणीसाठी हि कविता उमटली, त्या मैत्रिणीने त्या कवितेला दिलेला प्रतिसाद इथे पोस्ट करत आहे .... ...... ...... ......

तुझी साधी आठवण काढली तरी तुला हाक जाते
तुझ्या मनाच्या कोपऱ्यात माझीच हाक ऐकू येते
मग तुझ्या देशातला वारा माझ्या देशी धावत येतो
प्राजक्ताचं झाड नसूनही प्राजक्ताचा वास येतो
मग मीही त्या वार्यासोबत शेवरीचं फूल पाठवते
अन शेवरीच्या कानात माझी खुशाली कळवते
आपला असा संवाद घडतोय हे कुणालाच कळत नाही
कित्ती बरंय नै?

कविता

(फेंदारलेल्या मिशा....)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
12 Oct 2016 - 9:27 am

अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे.

दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते.

मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे.

पाहून स्वप्ने सत्तेची
बोकाळली आहे संराशा
आता कोठे होऊ लागल्यात
पाठवणी जराश्या

का करीशी भणभण
या वखवखलेल्या सत्ताबाजारात
आता कोठे मिळविल्यात
खुर्द्यात चवल्या जराश्या

अविश्वसनीयआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलरतीबाच्या कविताहास्यविनोदमौजमजा

शिवरायांचा कालचा दसरा

भटकंती अनलिमिटेड's picture
भटकंती अनलिमिटेड in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 9:19 am

भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज घुमत होता. तिथे गेले नऊ दिवस देवीचा जागर चालू होता. शारदीय नवरात्रीचे दिवस. दशमीचा चांदवा अस्ताला चालला होता. गंगासागराशी सातमजली मनोर्‍यांसोबत त्याचे सुंदर प्रतिबिंब पडलेले. शरदाच्या चांदण्यात गडावर विविधरंगी रानफुलांचा रानसोहळा चालू होता. त्यात सोनकीने ठिकठिकाणी सुवर्णझळाळी आणली होती. भुईरिंगणी, चिरायतीची पखरण गडाच्या सपाटीवर रंग भरत होती.

संस्कृतीइतिहासकथाप्रकटन

अंधारलेल्या निशा...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
12 Oct 2016 - 8:30 am

अंधारलेल्या निशा...

पाहून स्वप्ने उद्याची
सोकावली आहे निराशा
आता कोठे जागू लागल्यात
आठवणी जराश्या

का करीशी वणवण
या रखरखलेल्या वाळवंटात
आता कोठे विसावल्यात
उन्हात सावल्या जराश्या

आजूबाजूला कोलाहल किती
कोण ऐकेल माझे
वाचाळ झाली आता कोठे
माझी मौनाची भाषा

ना भिजते मन माझे
या कोसळत्या पावसात
राहतं नाही माझ्या
आठवणी पारोश्या

भरकटत जात आहे मी
दिशाहीन झाल्या या दिशा
दाविती उजेड मज
या अंधारलेल्या निशा

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

हजारो ख्वाहिशे ऐसी

ईंद्रधनु's picture
ईंद्रधनु in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 1:28 am

मिर्जा गालिब हे शायरी मधलं एक अजरामर नाव. गालिबची "हजारो ख्वाहिशे ऐसी" हि गझल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. कितीतरी लोकांनी याचं रसग्रहण आपापल्या शब्दात केलं आहे त्यात माझीही एक भर घालतो.

"हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ , लेकिन फिर भी कम निकले"

यामध्ये गालिबने माणसाच्या कधीही न संपणाऱ्या इच्छा आकांक्षांचं वर्णन अगदी अचूक शब्दात केलं आहे. एक एक इच्छा पूर्ण करताना जन्म संपेल अशा हजारो इच्छा आहेत. तशा माझ्या बऱ्याच इच्छा पूर्ण झाल्या आहेत, पण तरीही कमीच झाल्या आहेत.

गझलआस्वाद

देगा देवा....

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
11 Oct 2016 - 8:23 pm

देगा देवा एकच दान
मना लागे समाधान
होऊ नये उंच एवढा
इतर वाटती लहान !!१!!

देगा देवा एवढे बळ,
सोसण्या आयुष्यातली झळ,
जगणे कर एवढे सुंदर,
मरण तर आहे अटळ !!२!!

देगा देवा दया- माया,
व्हावे मी एखाद्याची छाया,
झालो आधार न कोणाचा,
तर व्यर्थची गेली ही काया !!३!!

देगा देवा एवढे ज्ञान,
असे भल्या-बुऱ्याची जाण,
अहंकार न अंगी यावे,
असावे मज सदैव भान !!४!!

देगा देवा सदाचार,
उजळत जावे माझे विचार,
अंतरीतला राम विजयी व्हावा
रावणाचे करून संहार !!५!

कविता माझीकविता