(फेंदारलेल्या मिशा....)
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे.
दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते.
मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे.
पाहून स्वप्ने सत्तेची
बोकाळली आहे संराशा१
आता कोठे होऊ लागल्यात
पाठवणी जराश्या
का करीशी भणभण
या वखवखलेल्या सत्ताबाजारात
आता कोठे मिळविल्यात
खुर्द्यात चवल्या जराश्या
आजूबाजूला बोंबाबोंब किती
कोण ऐकेल माझे
घायाळ झाली आता
कोठे माझी दमाची भाषा
ना रुजते मन माझे
या झाकोळल्या विजनात
राहतं नाही माझ्या
कृष्ण्कर्मे आडोश्या
फरपटत जात आहे मी
दशाहीन झाल्या या मिशा
दाविती दर्पण मज
या फेंदारलेल्या मिशा.
१ संराशा= संजय राऊतांची ले़खणीशाई
व्वा....
=))
संराशा =))
खि खि खि
कसं काय सुचतं हो तुम्हाला?
=))
पैजारबुवां
विडंबन अतिशय आवडले हेवेसांनलगे
:)
मेरेको वाट्याच. कोईतो
हाहाहा
:)))
मस्त !!!
=)))))
अवांतर: नाखुकाका हा पिक्चर पाहिला का ?
लैच ....