मिर्जा गालिब हे शायरी मधलं एक अजरामर नाव. गालिबची "हजारो ख्वाहिशे ऐसी" हि गझल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. कितीतरी लोकांनी याचं रसग्रहण आपापल्या शब्दात केलं आहे त्यात माझीही एक भर घालतो.
"हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ , लेकिन फिर भी कम निकले"
यामध्ये गालिबने माणसाच्या कधीही न संपणाऱ्या इच्छा आकांक्षांचं वर्णन अगदी अचूक शब्दात केलं आहे. एक एक इच्छा पूर्ण करताना जन्म संपेल अशा हजारो इच्छा आहेत. तशा माझ्या बऱ्याच इच्छा पूर्ण झाल्या आहेत, पण तरीही कमीच झाल्या आहेत.
"डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर
वो खून जो चश्म-ऐ-तर से उम्र भर यूं दम-ब-दम निकले"
माझ्या डोळ्यातून जे अश्रू समान रक्त वाहत आहे त्यासाठी माझ्या कातिल (प्रियसी) ला घाबरण्याची काही गरज नाही, याबद्दल त्याला कोणी शिक्षा देणार नाही.
"निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन
बहुत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले"
या ओळींचा अर्थ कळण्यासाठी 'आदम' ची गोष्ट माहिती असायला हवी. आदम हा मूळपुरुष खुल्द म्हणजे स्वर्गात राहत होता. त्याने खुदाची आज्ञा मोडल्यामुळे त्याला स्वर्गातुन हाकलून दिल गेलं. गालिबने येथे त्याची स्वतःशी तुलना केली आहे. स्वर्गातुन आदमला हाकलून दिलेलं आत्तापर्यंत ऐकलं होत पण त्यापेक्षाही बेअब्रू होऊन तुझ्या गल्लीतून मी निघालो.
"भ्रम खुल जाये जालीम तेरे कामत कि दराजी का
अगर इस तुर्रा-ए-पुरपेच-ओ-खम का पेच-ओ-खम निकले"
तुझ्या उंचीचा भ्रम क्षणात विरून जाईल जर डोक्यावरील पगडीतून कुरळे केस बाहेर आले तर
"मगर लिखवाये कोई उसको खत तो हमसे लिखवाये
हुई सुबह और घर से कान पर रखकर कलम निकले"
जर कुणाला तिला पत्र लिहायचं असेल तर माझ्या कडून लिहून घ्यावं. मी तर सकाळ झाली कि लगेच लेखणी कानाला लाऊन घराबाहेर पडतो.
"हुई इस दौर में मनसूब मुझसे बादा-आशामी
फिर आया वो जमाना जो जहाँ से जाम-ए-जम निकले"
या दरम्यान माझं मदिरेशी नात जुळलं. आणि मग प्रत्येक प्याल्यात मला तिचेच रूप दिसू लागलं. 'जाम-ए-जम' म्हणजे असं जादुई भांड किंवा प्याला ज्यामध्ये आपल्याला हवी ती व्यक्ती किंवा गोष्ट दिसते.
"हुई जिनसे तव्वको खस्तगी की दाद पाने की
वो हमसे भी ज्यादा खस्ता-ए-तेग-ए-सितम निकले"
मला ज्यांच्या कडून ( माझ्या या अवस्थे बद्दल) सांत्वनाची अपेक्षा होती ते तर माझ्या पेक्षाही वाईट अवस्थेत होते.
"मुहब्बत में नहीं है फ़र्क जीने और मरने का
उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले"
प्रेमामध्ये जगण्यात आणि मरण्यात फारसा फरक नसतो. ज्या व्यक्तीवर आपण मरत असतो त्या व्यक्तीकडे बघूनच जगतो.
"जरा कर जोर सिने पर कि तीर-ऐ-पुरसितम निकले
जो वो निकले तो दिल निकले, जो दिल निकले तो दम निकले"
जरा माझ्या छातीवर जोर देऊन आतमध्ये घुसलेला बाण काढा कुणीतरी. बाण बाहेर आला कि त्याबरोबर माझं हृदयही बाहेर येईल आणि त्याबरोबर माझे प्राणही!
"खुदा के बासते पर्दा ना काबे से उठा जालिम
कहीं ऐसा न हो याँ भी वही काफिर सनम निकले"
कृपा करून पडदा बाजूला करू नका, कदचित इथे तीच माझी प्रियसी असेल.
"कहाँ मयखाने का दरवाजा ' गालिब' और कहाँ वाइज़
पर इतना जानते हैं , कल वो जाता था के हम निकले"
कुठे मदिरालयाचा दरवाजा आणि कुठे 'वाइज' म्हणजे धर्माचा उपदेशक! पण मला एवढ नक्की माहिती आहे कि मी मदिरालयातुन बाहेर पडलो कि तो आत जातो!
यावरून मला 'कूछ तो लोग कहेंगे' या गाण्यातील ओळी आठवल्या.
"हमको जो ताने देते है, हम खोये है रंगरलियों में,
हमने खुद उनको भी आते देखा है इन गलीयोमे"
गालिबची शायरीची एक वेगळीच शैली होती. तो दुःखद गोष्ट सुद्धा काही वेळा विनोदी पद्धतीने मांडत असे. त्याची प्रतिभाशक्ती तर अप्रतिमच होती. जगजीत सिंग यांच्या आवाजात गालिबची हि गझल म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. तुमच्या संग्रहात जर हि गझल असेल तर या निमित्ताने पुन्हा एकदा जरुर ऐका.
वाचने
3625
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
सुंदर रसग्रहण
"मी तर सकाळ झाली कि लगेच लेखणी कानाला लाऊन घराबाहेर पडतो."
कामावर निघालेला
In reply to "मी तर सकाळ झाली कि लगेच लेखणी कानाला लाऊन घराबाहेर पडतो." by निर्धार
बँग ऑन
In reply to कामावर निघालेला by चांदणे संदीप
हे हे भारी होता जोक ;)
In reply to कामावर निघालेला by चांदणे संदीप
हा हा...
In reply to कामावर निघालेला by चांदणे संदीप
संदर्भ असा की
In reply to "मी तर सकाळ झाली कि लगेच लेखणी कानाला लाऊन घराबाहेर पडतो." by निर्धार
आभारी आहे
In reply to संदर्भ असा की by घायाळ
"हुई इस दौर में मनसूब मुझसे
"डरे क्यों मेरा कातिल क्या
बरोबर
In reply to "डरे क्यों मेरा कातिल क्या by गंम्बा
जबर! हि गझल कुणी आठवून द्यावी