सल...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
23 Oct 2016 - 8:54 am

सल

लाव धार माझ्या खंजिरी
घेईन म्हणतो जरा ऊरी
नाही सहन होत आता
तुझ्या आठवणीची मुजोरी

तुझी आठवण आहे काचरी
दिवस रात्र मला जाचरी
नको आता आयुष्याची शंभरी
नको तुझ्या आठवणींची शिदोरी

सांग तुला पण हेच का वाटते
माझी आठवण डोळा दाटते
बुडवून टाक अश्रूच्या सागरी
आयुष्यातील एक सल बोचरी

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

प्रेम म्हणजे काय

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
23 Oct 2016 - 2:30 am

प्रेम प्रेम म्हणता तुम्ही प्रेम म्हणजे काय??
साखरेचा गोडवा की दुधावरली साय??

प्रेमाला ना कसले बंधन म्हणता तुम्ही कसे..
जाती गोती विणूनी माणूस कुंडलीच अभ्यासे..
कुंडलीतले शनी नि मंगळ पैदा करती दोष..
३६ गुण जुळता तुम्हा मिळतो तो संतोष..
गोंधळात या विसरून जाता मुलांचा तो अभिप्राय..
प्रेम प्रेम करता तुम्ही अहो प्रेम म्हणजे काय??
साखरेचा गोडवा की दुधावरली साय??

कविता

"स्व"....

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
22 Oct 2016 - 3:43 pm

कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ ....
कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ....

व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच.....
जगात काय तो एकटा शहाणा मीच !

एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान.....
आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !?

आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ?
का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ?

जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार.....
स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..!

सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे
माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे

अभय-लेखनआता मला वाटते भितीकरुणशांतरसवावरशिक्षण

वेग...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
22 Oct 2016 - 9:25 am

वेग

मरण एवढे सोपे झाले
जगणे अवघड झाले आहे
आता यम एकटा नाही
जागोजागी त्याचे चेले आहे

म्हातारे कोतारे मरती
तरुण मरती रस्त्यावरती
मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते
लहानपणीच आयुष्य संपले आहे

सारे ओढवून धेतलेस तू मानवा
वेगाने तुला भारले आहे
आपल्याच भाऊबंदास
तू स्वतः मारले आहे

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

तीन्ही डिबेटमधे जिंकून, अमेरिकन दुर्गेची- हिलरीची, ८ नव्हेंबरकडे आगेकूच

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
22 Oct 2016 - 8:02 am

"हिलरीने ट्रम्पला तिसर्‍या डिबेटमधे सफशेल पाडलं हे खरं आहे का रे भाऊ?"

"नक्कीच. अरे, शेवटी चिडून ट्रम्प चक्क तिला म्हणालाही
"दुर्गे दुर्घट भारी.."
त्याच्या द्दष्टीने,
"Nasty woman"
पण ती त्याच्याकडे बघून हसली मात्र.
"मी जिंकलो तरच निवडणूकीच्या रिझल्टला मान्यता देईन" असं दुसर्‍या दिवशी सकाळी म्हणाला.पोरकटपणाची परिसीमा म्हटली पाहिजे."

"आता पुढे काय होणार असं तुला वाटतं भाऊ?"

राजकारणलेख

जो अभ्यास करेल तो पास होईल

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
21 Oct 2016 - 11:58 pm

विजय कोणाचा

आमच्या देशावर अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमण केले. त्यामधे बाबर होता, अहमदशहा अब्दाली होता. हे सगळे आक्रमक मुस्लिम होते म्हणून आम्ही याचे वर्णन ईस्लामिक आक्रमण असे करतो. आता प्रश्न असा आहे की या आक्रमणांमागे ईस्लामची प्रेरणा होती का आणि विजय मिळाला असेल तर तो ईस्लामच्या तत्त्वज्ञानाचा विजय मानायचा का

म्हणजे मग ईस्लाम विरुद्ध हिंदू तत्त्वज्ञान असा सामना झाला का . .

ईस्लामला मानणारे जे देश आहेत उदा बांगलादेश, पाकिस्तान. त्यांची अवस्था आज काय आहे. ते जगावर राज्य करु शकतील असे वाटते का

धर्मविचार

भारतीय सैनिक

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 11:20 pm

भारतीय सैनिक

राष्ट्र रक्षितो वीर होवूनी बलाढ्य खमका परवत..
नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत...

शूरवीर तो धर्मवीर तो कर्तव्यदक्ष पुत्र..
भूमीरक्ष तो शत्रूभक्ष तो हिंदूस्वराज्य मित्र..
स्वाभिमानी तो प्राणदानी तो देशप्रेमी तो राणा..
तप्तसूर्य तो प्रांतधैर्य तो हिंदोस्तानी बाणा..
युद्ध खेळतो श्वास वेचूनी मनी स्थापितो भारत..
नयन दाटूनी अश्रू कथिती सैनिकाचे मनोगत...

धोरण

हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
21 Oct 2016 - 8:08 pm

भटुरे नाव ऐकल्यावर मैद्याचे छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात. या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात. (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते). मैद्याच्या भटुरर्या सारखे हे भटुरे पण फुलतात. आपल्या मराठमोळ्या पोळी एवढे मोठे पण दुप्पट जाड नक्कीच असतात. आपण आपल्या पद्धतीने भटुर्यांचा आकार निश्चित करू शकतो.

शेतकरी राया..

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 7:38 pm

शेतकरी राया...

अपुला शेतकरी राया, शेती प्रेमाची करतो..
अवघ्या भुकेल्या जनांची, ओंजळ प्रितीने भरतो..

अपुला शेतकरी राया, नांगर ओढतो जोमानं..
पिक हलते डुलते, शेती खुलते प्रेमानं..

अपुला शेतकरी राया, धनधान्य खुलवितो..
सार्या जगाचा तो बाप, जगी प्रेम फुलवितो..

अपुला शेतकरी राया, कर्जाखालीच राबतो..
पर्जन्याच्या वाटेवर, तोच एकला थांबतो..

अपुला शेतकरी राया, रोज जगतो मरतो..
जगा धान्य पुरवूनी, पोटी भाकरी भरतो..

अपुला शेतकरी राया, संसाराचे सोने करतो..
जगा सुखी करवूनी, स्वत: गरिबीमधे झुरतो..

समाज