एक स्वप्न होत माझं...!
एक स्वप्न होत माझं
तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं
तुझ्यासाठी कोणत्याही परिस्थितिला
निडरपणे सामोरं जायचं
माझ्या सुखात तुला हसवायचं
अन् तुझ्या मी रडायचं
तुझ्या ओठांवरच्या एका हास्यासाठी
काहिहि करायचं
एक स्वप्न होत माझं
तुझं मन जिंकायच
एक स्वप्न होत माझं
तुझ्यासोबत तुझ्या घरात राहायचं
त्या घराला आपलं घर बनवायचं
आपल्या घराला सजवायचं
घरातल्या प्रत्येक गोष्टीसोबत
आपलं नात जपायचं
घर फुलाप्रमाणे फुलवायचं
फक्त एक स्वप्न होत माझं