माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?
शाकाहार मांसाहार असे म्हटले कि लगेच माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मतही अभिनिवेशाने मांडू लागतात. आता Non Vegetarian चं भाषांतर अ-शाकाहारी असे काहीतरी होईल, मांसाहारी नाही म्हणून मुद्दाम वरच्या प्रश्नात तसे लिहिलेले आहे.आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाण टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. (मला कधी कधी कळतच नाही आपल्या धर्माचं, म्हणजे एकादशी,चतुर्थीला भाज्या पण चालत नाहीत पण हे उपरोल्लेखित प्राणीजन्य पदार्थ चालतात.