Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Sun, 12/11/2016 - 07:22
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
समाज
जीवनमान
राहणी
प्रवास
भूगोल
देशांतर
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
माहिती
विरंगुळा
मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे. तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे. १. 'साडी'तील सौंदर्य (-वती) ... २. या भावनांतील गीत पुराणे... ...... ४. चेहरे ... ५. निसर्गचित्रे ... ६. व्यक्तीचित्रे (पाश्चात्त्य) ... ७. किल्ले, प्रासाद, प्रार्थनागृहे.... ... ८. राजाधिराज आणि राणीसरकार ... ९. अभिनेत्री ... आणखीही बरेच काही.....(सूचनांचे स्वागत आहे). (क्रमशः) .... आगामी भाग २: 'साडी'तील सौन्दर्य(-वति)
  • Log in or register to post comments
  • 11873 views

प्रतिक्रिया

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 12/11/2016 - 09:42

Permalink

अनेक फोटो टाकून बँड विड्थ व्यापण्यापेक्षा

प्रत्येक कॅटेगरीतल्या सर्वोत्तम ( किंवा २/३) प्रतिमा टाकून, त्याचा रसास्वाद घेणं इष्ट होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 12/11/2016 - 10:16

Permalink

सुंदर धागा कल्पना !

सुंदर धागा कल्पना ! तुमच्या रसिक दृष्टीतून चित्रे पहायला नेहमीच मजा येते. प्रत्येक चित्राबरोबर तुमची टिप्पणी जरूर टाका, म्हणजे आम्हाला कलाकाराच्या दृष्टीतून दिसलेले चित्रही बघायला मिळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 12/11/2016 - 18:43

In reply to सुंदर धागा कल्पना ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

शब्दात काही लिहीणे

@ संजय सर आणि डॉ. म्हात्रे: सूचनांबद्दल आभार. खरेतर चित्रांविषयी शब्दात काही लिहीणे माझ्यासाठी खूपच अवघड आहे, तरी यथानुशक्त्या प्रयत्न करेन. कदाचित 'मला या चित्रात काय आवडले' असे काहीतरी लिहू शकेन.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/12/2016 - 00:24

In reply to शब्दात काही लिहीणे by चित्रगुप्त

Permalink

असंच काही तरी करावं

म्हणजे चित्राचा आस्वाद कसा घ्यावा, त्यामागे चित्रकाराची भूमिका काय आहे , रंगांचा मनावर होणारा परिणाम, बॅकग्राऊंडचं वैशिष्ठय...... वगैरे कळतील. नुसती कलाकृती पाहून तितकासा उलगडा होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sun, 12/11/2016 - 10:45

Permalink

अप्रतिम ! निव्वळ अप्रतिम !!!!!!!!!!!!!

अत्यंत सुंदर !!!!!!!! क्रमांक १ उजवी बाजु (भावशुन्य) क्रमांक ९ उजवी बाजु (भडक) च्या दोन सुंदरी वगळता बाकी सर्व अत्यंत सुंदर नेत्रसुखद. चित्रगुप्त सर तुम्ही चांगल्या मुड मध्ये दिसताय याचा फायदा उचलुन काही खुप आवडलेल्या ( पण शुन्य कळलेल्या ) पेंटींग टाकतो प्लीज भाष्य करावे आम्हालाही थोडा आनंद मिळेल. थोडीफार चित्र कसे पाहावे समजेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sun, 12/11/2016 - 11:14

Permalink

यावर कृपया भाष्य करावे ही नम्र विनंती

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 12/14/2016 - 16:16

In reply to यावर कृपया भाष्य करावे ही नम्र विनंती by मारवा

Permalink

निंफ्स अँड द सेटीर

निंफ्स अँड द सेटीर आहे बहुदा हे, मला नक्की नाही सांगता येत आहे पण 'वासना कसे एका जीवाला ग्रासतात' हे दाखवायचा एक यशस्वी प्रयत्न चित्रकाराने ह्यात केला आहे, त्या नग्न स्त्रिया म्हणजे सेलेस्टिअल निंफ्स (स्वर्गलोकातल्या अप्सरा) असून त्यांना जलक्रीडा करताना आशाळभूत कामातुर नजरेने पाहणाऱ्या एका सेटीरला (अर्धमानव अर्धअज म्हणजेच अर्ध शरीर मानवी अन अर्ध बकऱ्याचे असणारा एक ग्रीक पुराणातला जीव) पाण्याच्या तळ्यात ओढत आहेत, जे काही त्या सेटीरला तितकेसे रुचले नाहीये अन तो अप्सरांच्या त्या प्रयत्नांना विरोध करतोय, काही निंफ्स तळ्याच्या पलीकडल्या किनाऱ्यावर असून त्या कदाचित घाबरलेल्या असाव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 12/11/2016 - 12:29

Permalink

छान आहेत चित्रं.

छान आहेत चित्रं.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 12/11/2016 - 19:01

Permalink

Bouguereau

@ मारवाश्री आणि कंजूसपंत, चित्रे आवडत आहेत, हे वाचून छान वाटले. मारवाश्री तुम्ही दिलेल्या बुगेरो (William Bouguereau १८२५-१९०५) च्या चित्राबद्दल लवकरच लिहीतो. बुगेरोवर नुक्तेच एक मोठे पुस्तक प्रकाशित झालेले आहे, ते घेण्याचा विचार करतो आहे. बुगेरो हा चित्रकार फ्रेंच अ‍ॅकॅडेमिक कलेचा कळस म्हणता येईल, परंतु पुढे आधुनिक कलेच्या पाठीराख्यांनी त्याची हेटाळणी करून कलाइतिहासातून त्याला बाद केले, ते एक शतक. आता पुन्हा त्याचे पुनर्मुल्यांकन होऊन प्रतिष्ठा मिळत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sun, 12/11/2016 - 21:10

Permalink

चित्रगुप्त सर मनापासुन धन्यवाद !

या माहीतीसाठी व त्याहुन सुरेख बुगेरोच्या दुव्यासाठी दंडवत स्वीकारावा _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 12/11/2016 - 21:35

Permalink

बुगेरो

बुगेरो विषयी विकिपिडिया पेक्षाही जास्त चांगली माहिती, विविध लेख आणि चित्रे खालील दुव्यावर आहेतः http://www.artrenewal.org/pages/artist.php?artistid=7
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 12/12/2016 - 22:24

Permalink

छान धागा

मलाही तुमच्याकडून निव्वळ चित्रांपेक्षा त्यावरचे भाष्य जास्त वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गंम्बा on Tue, 12/13/2016 - 17:38

Permalink

चित्रगुप्तजी, तुम्ही सर्व भाग

चित्रगुप्तजी, तुम्ही सर्व भाग फक्त "'साडी'तील सौन्दर्य" विषयावर केलेत तर फार चांगले होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Tue, 12/13/2016 - 19:01

Permalink

खरोखरच सुंदर, मला ४ आणि ९

खरोखरच सुंदर, मला ४ आणि ९ नंबरची चित्रे जास्त आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Tue, 12/13/2016 - 20:08

Permalink

चित्रगुप्तजी, प्रत्येक चित्रावर भाष्य आणि रसग्रहण आवडेल.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Wed, 12/14/2016 - 15:23

Permalink

Sundar kalpana

Sundar kalpana
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 12/14/2016 - 18:31

Permalink

धागा नाही पटला.

धागा नाही पटला. जालीय साध्या चित्रांपेक्षा डेव्हिड, पिएता , द बर्थ ऑफ द व्हीनस, क्रियेशन ऑफ ऍडम, स्टारी नाईट, चार्ट ऑफ हेल अशा जगविख्यात कलाकृतींवर तुमचं भाष्य अपेक्षित होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 12/14/2016 - 22:50

Permalink

नजरेतून निसटणार्‍या सुंदर प्रतिमा

डेव्हिड, पिएता , द बर्थ ऑफ द व्हीनस, क्रियेशन ऑफ ऍडम, स्टारी नाईट, चार्ट ऑफ हेल अशा जगविख्यात कलाकृतींवर तुमचं भाष्य अपेक्षित होतं.
एका अर्थी खरं आहे, परंतु अश्या विख्यात कलाकृतींवर टनावारी साहित्य उपलब्ध आहे, त्यासमोर मी आणखी काय पणती लावणार ? परंतु सर्वसामान्य नेटकराच्या नजरेतून निसटणार्‍या अनेक सुंदर प्रतिमा असतात. त्यांचा शोध घेण्याचा एक प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com