नितंब (विडंबन)

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
10 Dec 2016 - 11:13 am

पेर्ना, एक नितांतसुंदर कविता, कदंब.
कदंब

सळसळणारी वसने देही, विस्तीर्णाचे दान
समांतराचा ध्यास बुडाशी, सममितीचे भान

गजगामिनी तुझी चाल अन् नाजुकशी पाऊले
वार्‍यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले

"हिरवाई"वर तांबूस हळदी, केसर भरले तुरे
चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे

घटद्वयी की म्हणू नितंब, खूप तुझे भरजरी
पानोपानी म्हणून डोलते कान्ह्यांची बासरी

अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला
मोह वाटुनी सोडून येई आम्रफले बावळा

रुंदरुंदशा मऊ गादीसम दाट तुझी सावली
मिळेल का विश्रांत जीवाला, छळते मज काहिली

जिलबीविडंबन

प्रतिक्रिया

पैसा's picture

10 Dec 2016 - 12:02 pm | पैसा

हे विडंबन का स्वतंत्र कविता!

कपिलमुनी's picture

10 Dec 2016 - 12:29 pm | कपिलमुनी

हा आयडी आज ऍक्टीव झाला !

अत्रुप्त आत्मा's picture

10 Dec 2016 - 1:08 pm | अत्रुप्त आत्मा

The मामी इज बॅक.

फेदरवेट साहेब's picture

10 Dec 2016 - 1:13 pm | फेदरवेट साहेब

हे ठुमी लिवलेला इज ऑसम, द लॉर्ड ला ठुमची खविता वाच्युन आणंद झ्यालेला हाय.

पगला गजोधर's picture

10 Dec 2016 - 1:50 pm | पगला गजोधर

बऱ्याच दिवसांनी विडंबन टाकले रे दमाम्या.....

अटलांटाला गेला होता की काय इतके दिवस ???? असे आमच्या ह्यांचे मत...

मा मो ऑ

एस's picture

10 Dec 2016 - 2:41 pm | एस

भीषण शुंदर!

दमामि's picture

10 Dec 2016 - 2:54 pm | दमामि

सर्वांना__/\_

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2016 - 6:11 pm | टवाळ कार्टा

Kim चा एक फोटोपण लावायचा कि ;)

पगला गजोधर's picture

10 Dec 2016 - 6:21 pm | पगला गजोधर

Ass

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Dec 2016 - 1:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी कविता आवडत होती म्हणून ती ३ ते ४ वेळा वाचली गेली होती पण..... अर्थ लक्षात येत नव्हता.
वरील फोटो बघितले आणि कवीला काय सांगायचे आहे ते झटकन समजले.
पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

11 Dec 2016 - 3:58 pm | चांदणे संदीप

कोनतरी बोल्याच हय 1 picture = 1000 words
विडंबन ठीकच! :)

Sandy