किवी आणि कांगारूंच्या देशांत १६ : केर्न्सचे उष्णप्रदेशिय प्राणिसंग्रहालय आणि सिडनीतील सायंकाळ

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
1 Jun 2013 - 3:13 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

…ही सगळी गंमत पाहत समुद्रकिनार्‍यावरून फिरत फिरत हॉटेलवर परतलो.

आज सर्वप्रथम केर्न्सचे उष्ण्प्रदेशिय प्राणिसंग्रहालय बघायचे होते. मुख्य म्हणजे आमची आजची न्याहारी प्राणिसंग्रहालयाच्या उपाहारगृहात होणार होती. साडेसातला बस निघाली आणि केर्न्सच्या वेगळ्या पण तशाच सुंदर उपनगरांतून आमचा प्रवास सुरू झाला. केर्न्सला निसर्गाने भरभरून सौंदर्य प्रदान केले आहे आणि तिथल्या लोकांनी आणि शासनाने त्याची ममतेने जपणूक केलेली आहे हे सतत जाणवत होते...

.

थोड्याच वेळात आम्ही गावातून बाहेर पडलो आणि उसाची शेते सुरू झाली...

 \

साधारण अर्ध्या तासाने आम्ही प्राणिसंग्रहालयाच्या प्रांगणात पोहोचलो...

उपाहारगृह प्राणिसंग्रहालयाच्या खूप आतमध्ये आहे. त्यामुळे तेथे जायच्या वाटेवरही अनेक प्राणी दिसत होते...

.

.

उपाहारगृह म्हणजे फक्त छप्पर आणि चारी बाजूला उघडा असलेला एक मंडप होता. न्याहारी करतानाही खाताना त्रास होणार नाही इतपत दूर असलेल्या पिजर्‍यातले प्राणी दिसत होते. न्याहारी नेहमीसारखीच होती. उष्णप्रदेशिय फळे मात्र भरपूर ठेवली होती... ही माझ्या खास आवडीची गोष्ट होती ! आजूबाजूचे प्राणी पाहत आणि गप्पा मारत मजेत न्याहारी झाली...

न्याहारी संपत आली असताना प्राणिसंग्रहालयाची एक वॉर्डन कोआला घेऊन तेथे आली आणि सगळ्यांना त्याला हातात घेऊन फोटो काढण्याची घाई झाली...

१५ एकर क्षेत्रफळाच्या या प्राणिसंग्रहालयामध्ये ऑस्ट्रेलियातील बहुतेक सर्व सस्तन पाणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी बघायला मिळतात. त्यांचे वेळापत्रक पाळले तर काही खास प्राणी आणि पक्ष्यांचे कार्यक्रमही बघता येतात. अर्थात आम्हाला दुपारी १:१० ला सिडनीला घेऊन जाणारे विमान पकडायचे असल्याने ते बघणे शक्य नव्हते. म्हणून सहल कंपनीने एका वॉर्डनकरवी संग्रहालयाच्या सगळ्या भागांची माहिती सफर आयोजली होती. ती करताना टिपलेली ही काही चित्रे...

झाडातून डोकावणारा तांबडा पांडा...

लेमूर...

सदर्न कॅसोवरी...

वोंबाट...

कांगारू...

.

मगरी...

.

एका वेळेला तीन कोंबड्या गट्ट करून पहुडलेला अजगर...

कोआलाच्या अनेक मुद्रा...

 .............

काही पक्षी...


इथली सफर संपवून आम्ही सिडनीचे विमान पकडायला विमानतळावर गेलो. विमानतळावर सगळेजण प्राणिसंग्रहालयाच्या मूडमध्येच होते आणि मग एका अमेरिकन कन्येने संग्रहालयाच्या दुकानातून घेतलेल्या कोआलाचे लाड सुरू झाले...


विमान वेळेवर सुटले आणि आम्हाला घेऊन २,००० किमी साघारण तीन तासात पार करून ४:१० ला सिडनीला पोहोचले. सिडनीचा विमानतळ शहरापासून बराच दूर आहे. त्यामुळे हॉटेलवर पोहोचेपर्यंत शहराच्या बर्‍याच भागाचे दर्शन झाले...

.

हॉटेलवर पोचून शॉवर वगैरे घेऊन तरतरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. आज संध्याकाळ मोकळीच होती. तेव्हा नेहमीच्या सवयीने नकाशा घेऊन एकटाच रपेट करायला बाहेर पडलो...

मग ध्यानात आले की अरे सिडनी हार्बर ब्रिज जवळच आहे. दहा मिनिटात चालत सिडनी बंदरावर पोचलो आणि त्या पुलाचे रात्रीचे सुंदर दर्शन झाले...

बंदरातून फेरफटका मारताना रात्रीच्या जेवणासह जलसफारीची जाहिरात दिसली. ही तर डबल बेनेफिट स्कीम झाली... जेवायचे तर होतेच पण आता जलसफारीही मिळतेय म्हटल्यावर लगेच तिकीट काढले. सफारी सुरू व्हायला ४०-५० मिनिटे वेळ होता म्हणून तसाच बंदरातून पुढे फिरत निघालो...

रस्त्यात बसून आपल्या कलेचे प्रदर्शन करणार्‍या कलाकारांच्या मधून आणि दुतर्फा असलेल्या रेस्तराँच्या गर्दीतून वाट काढत पुढे गेलो तर बंदराच्या पलीकडच्या टोकाला असलेले सिडनी ऑपेरा हाउस पुढे आले...

.

जलसफारीची वेळ होत आली तसा मागे फिरलो आणि सफारीच्या धक्क्यावर आलो. थोड्याच वेळात आमच्या डिनर क्रूझ बोटीने सर्क्युलर क्वे नावाचा धक्का सोडून मार्गक्रमण करायला सुरुवात केली...

बोटीवरच्या तीन मजल्यांवर जय्यत तयारी होती...

पियानोच्या साथीसह गायिकेचे सुंदर गाणे...

आणि चवदार जेवण... शँपेनने सुरुवात झाली. Seared chicken breast roast tomato couscous, chorizo, shaved Jamon iberico with capsicum jam असे भन्नाट लांबलचक नाव असलेली एंट्री (स्टार्टर) होती...

Organic chicken breast with champignon mushroom jus, roast sweet potato with baby beans हा मुख्य कोर्स होता...

Slow backed raspberry and apple crumble with cream हे शेवटचे गोडधोड म्हणून होते (क्षमस्व ! जेवण चवदार होते. ते खाण्याच्या नादात ह्याचा फोटो राहिलाच :( )

आणि मुख्य म्हणजे सिडनी बंदराचा बाजूने सरकत जाणारा नजारा होता...

.

.

.

.

अडीच तासाच्या सफरीत चवदार जेवणाने तृप्त झालेले पोट, सुमधुर गाण्यांनी भरलेले कान आणि सिडनी बंदराच्या रात्रीच्या शोभेने निवलेले डोळे घेऊन शतपावली करत हॉटेलवर परतलो.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)

===================================================================

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

1 Jun 2013 - 3:22 pm | सुहास झेले

भारीच... !! डिनर क्रूझ बोट तर क्या केहने.... :) :)

आता पुढचा मुक्काम कुठे?

चेतन माने's picture

1 Jun 2013 - 4:25 pm | चेतन माने

मस्त फोटू आलेत प्राणीसंग्रहालयाचे. सिडनी बंदरात काय झगमगाट आहे वॉव !!!
ओपेरा हाउस ला भेट होणारच असेल तुमची पुढे ……
पुभाप्र :):):)

अशु२००९'s picture

1 Jun 2013 - 5:00 pm | अशु२००९

मस्त फोटो आले आहेत ...

पैसा's picture

1 Jun 2013 - 8:24 pm | पैसा

पुढचा मुक्काम कुठे?

जॅक डनियल्स's picture

2 Jun 2013 - 1:01 am | जॅक डनियल्स

नेहमी सारखे कातील छायाचित्रण आणि लिखाण !

तो फोटो मधला अजगर हा ऑस्ट्रेलिया मधला नसून भारतीय उपखंडातील किंवा दक्षिण आशियाई प्रदेशातील रेटीक्युलेटेड अजगर आहे. (Reticulated Python)
अजून आंतरजालावर शोधल्यावर " ती अजगराची मादी असून, लांबीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिला त्यांनी तिच्या वेड्या स्वभावामुळे "सायको स्याली"(psycho Sally)असे नाव दिले आहे."

या १०० किलोच्या सायको स्याली ने गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये ७५ अंडी घातली, हा एक प्रकारचा ऑस्ट्रेलिया झू मधला विक्रम होता.
तुम्ही नशीबवान आहात की या सायको स्याली ने तुम्हाला दर्शन दिले...;)

रेवती's picture

2 Jun 2013 - 1:47 am | रेवती

वाह! भारी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2013 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले, चेतन माने, अशु२००९, पैसा, जॅक डनियल्स आणि रेवती : सहलितील सहभागासाठी धन्यवाद !

@ जॅक डनियल्स : अधिक माहितीबाद्दल धन्यवाद. तेथे तर फक्त Tropical North Queensland मध्ये सापडणारे प्राणी आहेत असे लिहिले होते !

जॅक डनियल्स's picture

2 Jun 2013 - 12:09 pm | जॅक डनियल्स

हो तसे असेल, पण मला तो अजगर पहिल्या वर reticulated python (ऑस्ट्रेलिअन कार्पेट अजगर वेगळा दिसतो) वाटला म्हणून मी अंतरजाल शोधले, तेंव्हा मला ही उरल मिळाली,
शंभर किलोची वेडी स्याली ! ;)

रोचक! कोआलाला हातात घेतल्याचा फटू न लावल्याबद्दल निषेध. ते हिरवे साप मोठ्या अळ्यांसारखे दिसताहेत.

बाकी सिडनीही मस्तच. ते ऑपेरा हौसच्या वर्णनाची वाट बघतोय.

चंबु गबाळे's picture

11 Jul 2013 - 9:40 am | चंबु गबाळे

सर्व प्रची सुंदर.. जाण्याची इच्छा आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2013 - 11:00 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या प्रवासासाठी शुभकामना !

मस्त सफर चालली आहे. :)
<पाकरु मोड ऑन> तो कोआला कित्ती कित्ती क्युट दिसतो !<पाखरु मोड ऑफ> ;)

बाकी लटकलेले अजगर एकदम भारी वाटले ! तो पांडा पाहुन मोगली आठवला. :)