किवी आणि कांगारूंच्या देशांत ०२ : ऑकलंड - वाईतोमोच्या काजव्यांच्या गुहा - रोतोरुआ

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
2 May 2013 - 8:30 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

...इतका थकवा आला होता तरी झोपण्याची केवळ धडपडच चालू होती. दर तासाला झोपमोड होत होती. सव्वाचार वाजले तरी हॉटेलच्या रिसेप्शनवरून काही फोन येत नाही असे बघून स्वतःच फोन फिरवला. विमानतळावरून बॅग आली का म्हणून चौकशी केली तर बेलबॉय म्हणाला, "हो आलीय, घेऊन येतो". बॅग खोलीत ठेवताना म्हणतो कसा, "साडेतीनलाच बॅग आली पण उगाच कशाला तुमची झोपमोड करायची म्हणून फोन केला नाही." आता याचे मी काय करू? इकडे मी बॅग आली नाही म्हणून तळमळतोय आणि हा झोपमोड करायला नको म्हणून बॅग घेऊन बसला होता ! मात्र बॅगेला बघूनच इतके भरून आले की त्याला मनोमन माफ करून टाकले !

परत एकदा झोपण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण सगळ्या कटकटींमुळे वाढलेल्या अ‍ॅड्रिनॅलिनच्या स्तराने असेल किंवा जेटलॅगमुळे (दम्माम आणि ऑकलंड यातील वेळेत १० तासांचा फरक आहे) असेल झोप येईना. मग सरळ उठून सकाळचे नित्यनियम आटपून टाकले. आतापर्यंत मन:स्थितीची गाडी रुळावर आली होतीच पण मोबाईल आणि कॅमेर्‍याच्या बॅटर्‍याही पूर्ण चार्ज झाल्या होत्या. पावले सहजच खोलीच्या गॅलरीकडे वळली.

ऑकलंडचा मध्यवर्ती भाग काहीश्या उंच इमारतींनी गजबजलेला असला...

तरी उपनगरांत मात्र झाडीत वसलेल्या एकदोन मजली इमारतीच आहेत....

अशा आधुनिकता आणि निसर्ग यांच्या संगमाबरोबर सुंदर सागर किनारा लाभल्यामुळेही या शहराला एक अनोखे सौंदर्य लाभलेले आहे. न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर असलेल्या या शहराची लोकसंख्या १४ लाख म्हणजे न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या जवळ जवळ एक त्रितियांश आहे. न्यूझीलंड मधील मूळ निवासी 'मावरी' जमातीची सर्वात जास्त लोकसंख्याही याच शहरात आहे. २०११ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात या शहराला राहण्यासाठी जगातले तीन नंबरचे शहर म्हणून नावाजले होते.

गॅलरीतून दिसणारा प्रसन्न परिसर डोळ्यात साठवला आणि सहलीचा मूड जमू लागला. कालच्या गडबडीत खाणे थातूरमातूरच झाले होते. आता ऐकू येणारा आवाज हा आजूबाजूच्या झाडांतील पक्षांचा नसून पोटातील कावळ्यांचा आहे हे ध्यानात आले आणि त्वरित न्याहारी हादडायला रवाना झालो. कालच्या सहलपूर्व सभेत मी गैरहजर असल्याने न्याहारी करताना सहल निर्देशकाने जमेल तेवढ्या लोकांची ओळख करून दिली. बाकीचे बसमध्ये भेटणार होतेच. बहुतेक सर्व मनमोकळे लोक होते त्यामुळे सहल मजेत होईल असे मत झाले आणि मागचे सर्व विसरून आता सहलीची मजा लुटायचा मूड पूर्णपणे जमला.

ग्लोबसने सहलीच्या फीमध्येच सामानवाहतूकीची सोय अंतर्भूत केलेली असल्याने ठरलेल्या वेळेस बॅगा खोलीबाहेर ठेवल्या की आपले काम संपले. त्यानंतर त्या मोजून बसमध्ये ठेवण्याची आणि गंतव्यस्थानी पोहोचल्यावर तेथील खोलीवर आणून देण्याची व्यवस्था सहल निर्देशक बस चालक आणि हॉटेल कर्मचार्‍यांकरवी चोख करून घेत असे. हातातल्या पिशव्या सोडून बाकी सगळे सामान बसच्या पोटात टाकून आरामात प्रवास सुरू झाला.

आज प्रथम ऑकलंड शहराची सफर करून मग पुढे जायचे होते. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर लगेच समोर आला तो हा स्कायसिटी टॉवर... तोच तो, ज्याच्या टोकावर असलेल्या फिरत्या रेस्तरॉमध्ये जेवायचा माझा कालचा बेत विमानकंपनीने उधळवून लावला होता...

३२८ मीटर उंच असलेला हा टेलेकॉम टॉवर दक्षिण गोलार्धातली सर्वात उंच वास्तू समजली जाते आणि तो ऑकलंडच्या आकाशरेखेचा एक अविभाज्य घटक आहे.

गजबजलेल्या पण नीटनेटक्या शहरी भागातून जातानाचे फोटो...

.

ऑकलंडचे बंदर आणि त्याचा परिसर खास बघण्यासारखा आहे. तेथील मुख्य गोष्टी म्हणजे चारचाकीच्या आठ लेन असलेला हार्बर ब्रिज...

`

१९९५ साली शिडांच्या बोटींच्या स्पर्धेत अमेरिकेच्या बलाढ्य संघाला हरवून टीम न्यूझीलंडने जागतिक कीर्तींचा 'अमेरिकाज् कप' जिंकला तेव्हापासून तर तेथे आपल्या चारचाकीवर कमी आणि खाजगी बोटीवर जास्त प्रेम केले जाते ! न्यूझीलंडला आपल्या दर्यावर्दीपणाचा फार अभिमान आहे हे अनेक गोष्टींवरून सहज स्पष्ट होते. उदाहरणार्थ, हे बंदरावर मोक्याच्या ठिकाणी अभिमानाने ठेवलेले एका अजस्त्र जहाजाच्या नांगर वर-खाली करण्याच्या यंत्रणेतले भले मोठे चक्र...

आणि जगात सर्वात जास्त दरमाणशी संख्या असणार्‍या खाजगी बोटी (सहल निर्देशकाच्या माहितीप्रमाणे न्युझीलंडमध्ये दर दोन माणसांमागे एक खाजगी बोट आहे !) ...

आणि त्यातल्या काही बोटी ऑकलंड आकाशरेखेच्या पार्श्वभूमीवर बंदरात विहार करताना दिसत होत्या...

तेथून जवळच मायकेल जोसेफ सॅवेज या न्यूझीलंडच्या पहिल्या पंतप्रधानाला अर्पण केलेल्या बागेत गेलो. अत्यंत साधेपणाने बनवलेले हे स्मारक खूपच नीटनेटके होते आणि अनेक सुंदर फुलझाडांनी सजलेले होते...

मुख्य म्हणजे जरा उंचीवर असलेल्या या बागेतून शहर आणि बंदराचे मनोहारी दर्शन होते...

.

मावरी लोकांचे सामाजिक केंद्र...

येथून पुढे आम्ही वाइकातो या निसर्गरम्य विभागातून वाईतोमोच्या काजव्यांच्या गुहा बघायला निघालो. ही त्या वाटेवरची काही क्षणचित्रे...

.

.

.

तीन कोटी वर्षांपूर्वी भूगर्भाच्या हालचालीमुळे येथील समुद्रतळातील चुनखडीचे खडक पाण्याच्या वर येऊ लागले आणि पावसाच्या व नदीच्या पाण्याने त्यांची झीज होऊन त्यांच्या पोटात गुहा निर्माण झाल्या. ही प्रकिया जगात अनेक ठिकाणी झाली आहे. पण येथील गुहांना विशेष महत्त्व दिले आहे त्यांत घर करून राहिलेल्या स्वयंप्रकाशीत किड्यांनी. Arachnocampa luminosa हे जीवशास्त्रीय नांव असलेल्या डासांच्या आकाराच्या कीटकांच्या असंख्य अळ्या वाइतोमोच्या गुहेच्या छतावर वस्ती करतात. या अळ्या त्यांच्या शरीरात होणार्‍या रासायनिक प्रक्रियेने प्रकाश निर्माण करतात. त्या छतापासून लोंबणारे चिकट धागे निर्माण करतात. प्रकाशामुळे आकर्षित झालेले कीटक या धाग्यांना चिकटतात आणि अळ्यांचे भक्ष्य बनतात. या किड्यांमुळे गुहेचे छत अंधार्‍या रात्री तार्‍यांनी भरलेल्या आकाशासारखे दिसते. हा निसर्गाचा चमत्कार आपण या गुहांतून वाहणार्‍या नदीच्या प्रवाहातून जाणार्‍या होडीत बसून आपण पाहू शकतो.

मात्र या किड्यांवर फ्लॅशचा परिणाम होऊन ते प्रकाश निर्माण करण्याची प्रक्रिया काही तास बंद करतात म्हणून या बोटीच्या सफरीत फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे आंतरजालावरचे हे एक चित्र वानगीदाखल साभार देत आहे...

तेथून निघून वाटेत ओटोरोहांगा नावाच्या एका छोट्या गावात अल्पोपहाराठी थांबलो...

न्यूझीलंडवर निसर्गाने काहीही हातचे न राखता कृपा केली आहे आणि न्यूझीलंड त्या सौंदर्याची पुरेपूर काळजी घेत आहे याची जाणीव ऑकलंड-रोतोरुआ या बस प्रवासाच्या सगळ्या मार्गावर वारंवार होत होती.

.

.

रोतोरुआ आले आणि ही जाणीव प्रकर्षाने झाली...

आज दिवसभरचा प्रवास बसने होता तरी या सगळ्या निसर्गसौंदर्याने तो सफरीची मजा वाढवूनच गेला. त्यामुळे भुर्रकन विमानातून न आणता हा प्रवास बसने ठेवण्याच्या ग्लोबासच्या कल्पकतेचे कौतुकच वाटले. रोतोरुआला पोहोचेपर्यंत साडेचार वाजले होते.

थोडा वेळ आराम करून आणि शॉवर घेऊन तरतरीत होऊन बाहेर पडलो. मावरी कलादर्शनाचा (कंसर्ट) आणि खास मावरी (हांगी) जेवणाचा बेत असलेल्या कार्यक्रमाला जाण्यासाठी साडेसहाला सगळे लॉबीत जमलो. कार्यक्रमाचे ठिकाण हॉटेलच्या जवळच अगदी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक मावरी स्वागत समारंभाने झाली...

.

.

जुन्या काळी मावरी अनोळखी अतिथीला प्रथम "तुला खाऊ का गिळू" अश्या आविर्भावात डोळे वटारून, जीभ बाहेर काढून, शड्डू ठोकून आणि वेगवेगळे भयकारक आवाज काढून "म्या लय भारी हाय" हे दाखवून देत आणि मग झाडाची छोटी डहाळी त्याच्यासमोर थोडे अंतर ठेवून जमिनीवर ठेवत असत. जर त्या नवख्याने डोळ्याला डोळा भिडवत न घाबरता ती डहाळी उचलली तर त्याने मैत्रीचा प्रस्ताव मान्य केला आहे असे समजून त्याची खातीरदारी सुरू करायची... अन्यथा एकतर तो घाबरट आणि म्हणून मैत्रीला लायक नाही किंवा आक्रमक आहे असे समजून त्याला मारून खायचे अशी ही प्रथा. आमच्यातल्या एकाला थोडे प्रशिक्षण देऊन त्याला आमचा नेता बनवले आणि मोठ्या गमतीने हा प्रसंग सादर केला. आमच्या नेत्याने डहाळी उचलल्यावर "ठीक आहे, आता तुम्हाला न खाता तुम्हालाच आमचे खास हांगी पद्धतीने शिजवलेले जेवण खायला देऊन तुमचा सन्मान करू." असे जाहीर केले !

नंतर जेवणाच्या हॉलशेजारच्या हांगी मुदपाकखान्यात नेऊन त्यांची जेवण बनवण्याची प्रकियाही दाखवली...

.

.

या पद्धतीत सरपणाने गरम केलेल्या दगडी गोट्यांवर पदार्थ ठेवून नंतर ते झाकून ठेवून शिजवतात. मात्र आता स्वच्छता आणि आरोग्यासंबद्धीच्या कडक सरकारी नियमांमुळे वर दिसणारे दगडी गोटे सोडले तर इतर सर्व साधने अत्याधुनिक होती आणि उष्णतेसाठी लाकडांऐवजी गॅस वापरतात. जेवण बुफे पद्धतीने आणि भरपूर निवड असणारे व चवदार होते त्यामुळे मजा आली. जेवण झाल्यावर मग मावरी संस्कृती, त्यांचे संगीत व नृत्य याची ओळख देणारा बहारदार कार्यक्रम झाला त्याची काही क्षणचित्रे...

.

.

.

.

.

सगळा कार्यक्रम संपेपर्यंत साडेदहा वाजले असावे. हॉटेलवर परत येताना सर्वांच्या तोंडी किती मजा आली याचीच चर्चा होती. खोलीत परतल्यावरच गेल्या तीन दिवसांच्या दगदगीचा थकवा जाणवू लागला. पण सहलीची छान सुरूवात झाल्याने खुशीने झोपी गेलो.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

मोदक's picture

2 May 2013 - 8:40 pm | मोदक

भारी!!! वाचतोय!

(आता माझे नाव पायजे हां ;-) )

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2013 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

बर बाबा. तुला खास स्वतंत्र धन्यवाद! आता खूश? +D

मोदक's picture

2 May 2013 - 9:08 pm | मोदक

:-))

सामान्य वाचक's picture

2 May 2013 - 8:40 pm | सामान्य वाचक

लवकर पुढचे भाग टाका.

सानिकास्वप्निल's picture

2 May 2013 - 8:58 pm | सानिकास्वप्निल

मजा आली वाचताना
पुभाप्र :)

सुहास झेले's picture

2 May 2013 - 9:27 pm | सुहास झेले

जबदरस्त... हाही भाग अप्रतिम. तुमच्यासोबत आमचीही सफर सुरु आहे... आता पुढे कुठे जायचं? :) :)

मुक्त विहारि's picture

2 May 2013 - 10:33 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

प्यारे१'s picture

3 May 2013 - 12:02 am | प्यारे१

>>>>अन्यथा एकतर तो घाबरट आणि म्हणून मैत्रीला लायक नाही किंवा आक्रमक आहे असे समजून त्याला मारून खायचे अशी ही प्रथा.

रेसिपी?????????? आपले शेफ्स सुधारणा सुचवतील ;)

वेल सफर छान सुरु आहे. आहोतच बरोबर.

अभ्या..'s picture

3 May 2013 - 2:33 am | अभ्या..

मस्तय एकदम न्यूझीलंड.
ते झिंगालाला हुर्रर्रर्र च्या डान्सचे फोटो पण लै भारी. फोटो बघताना मागं म्युझिक ऐकू येत होतं. :)

श्रीरंग_जोशी's picture

3 May 2013 - 4:00 am | श्रीरंग_जोशी

खुसखुशीत लेखनशैलीमुळे वाचताना मजा आली अन त्यास सुंदर चित्रांची साथ मिळालेली आहे.
मावरी जमातीची वेशभूषा रेड इंडियन्सच्या वेशभूषेशी जवळीक साधणारी वाटली.

न्युझिलंडचे राष्ट्रीय चिन्ह फर्न वॄक्षाचे पर्ण आहे, त्याबद्दल तिथे काय भावना आहेत यावर पुढील भागात माहिती दिल्यास हर्ष वाटेल.

Fern Leaf NZ

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरकारी इमारती आणि एअर न्युझीलंड सोडून इतर कोठे हे फर्नच्या पानाचे राष्ट्रीय चिन्ह दिसले नाही.

न्युझीलंडचे मावरी लोक हे तैवानमधून प्रथम मेलॅनेशियामध्ये (पॉलिनेशिया) आणि तेथून नंतर इ स १२५० ते १३०० मध्ये न्युझीलंडच्या उत्तर बेटात समुद्रमार्गे स्थलांतरीत झालेल्या जमातींचे वंशज आहेत.

अमेरिकन रेड इंडियन्स सायबेरिया-मगोलिया-उत्तर चीन येथून अलास्कात जाऊन नंतर संपूर्ण उत्तर आणि दक्षिण अमेरिकाभर पसरले. हे स्थलांतर मुख्यतः १२,००० वर्षांपूर्वी त्या काळात सायबेरिया आणि अलास्का यांना जोडणार्या जमिनीवरून झाले. आता हे दोन भूभाग बेरींग समुद्राने विभागलेले आहेत.

रेवती's picture

3 May 2013 - 4:01 am | रेवती

न्यूझीलंडच्या निसर्गसौंदर्याबद्दल ऐकले होते. ते खरेच तसे आहे हे पाहून छान वाटले. सगळे फोटू, माहिती ग्रेट!

प्रचेतस's picture

3 May 2013 - 9:17 am | प्रचेतस

मजा येतीय वाचताना.
ही सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.

सुहासश्री, धन्यवाद.

सुज्ञ माणुस's picture

3 May 2013 - 9:45 am | सुज्ञ माणुस

माझ्या स्वप्नातीत अश्या ठिकाणी तुम्ही पोहोचला आहात. सर्व काही हेवा वाटावा असेच :)
सुपर्ब फोटोज :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 11:45 am | डॉ सुहास म्हात्रे

सामान्य वाचक, सानिकास्वप्निल, सुहास झेले, मुक्त विहारि, प्यारे१, अभ्या.., श्रीरंग_जोशी, रेवती, वल्ली, संजय क्षीरसागर आणि सुज्ञ माणुस : आपल्या सर्वांना सहलीतील सक्रिय सहभागाबद्दल अनेक धन्यवाद !

अनिरुद्ध प's picture

3 May 2013 - 1:00 pm | अनिरुद्ध प

माहिती अत्यन्त सुन्दर तसेत उत्कन्ठापूर्वक आहे.एक विचारायचे आहे कि हे काजवे वर्शभर दिसतात कि कसे कारण्,भारतात किन्वा कोकणात हे साधारणपणे पावसापुर्वि दिसतात.असो पुढे चालुदे वाट पहात आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपण पावसाळ्यात पाहतो ती आपल्याकडच्या काजव्यांची पूर्ण कीटक अवस्था. न्युझीलंडामधल्या या गुहेत Arachnocampa luminosa या नावाच्या किटकाची अळी अवस्था असते आणि ही अवस्था ६ ते १२ महिने चालू असते... म्हणजे हा निसर्ग चमत्कार बारमाही असावा. मात्र नक्की माहिती नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 2:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपण पावसाळ्यात पाहतो ती आपल्याकडच्या काजव्यांची पूर्ण कीटक अवस्था. न्युझीलंडामधल्या या गुहेत Arachnocampa luminosa या नावाच्या किटकाची अळी अवस्था असते आणि ही अवस्था ६ ते १२ महिने चालू असते... म्हणजे हा निसर्ग चमत्कार बारमाही असावा. मात्र नक्की माहिती नाही.

मस्त झालाय हा पण भाग. पु.भा.प्र. :)

चेतन माने's picture

3 May 2013 - 1:47 pm | चेतन माने

जेवणाच्या थाळीचा फोटू नाय टाकलात!! असो. उन थोडं रणरणतं वाटतय का? (किंवा माझ्यावरच कदाचित आत्ताच्या मुंबईतल्या गर्मीचा परिणाम असेल, म्हणून मलाच तसं वाटतंय!). सर्व फोटू झकास आलेत.
पुभाप्र :):):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 3:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

जेवणाच्या थाळीचा फोटू नाय टाकलात!! पुढच्या भागात येईल :)

उन थोडं रणरणतं वाटतय का? न्यु़झीलंडच्या जरा पुढे सरकलेल्या उन्हाळ्यामुळे तापमान १० ते १५ डि. से. होते आणि आकाश निरभ्र होते... म्हणजे तेथे फिरायला छान वातावरण.

स्मिता.'s picture

3 May 2013 - 2:23 pm | स्मिता.

हॉलिवूड चित्रपटांत बघून न्यूझिलंड माझे ड्रिमलँड आहे. तिथल्या सफरीची सुरुवात छान झाली आहे. आता पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
सगळ्या भागांवर प्रतिक्रिया देणं जमलं नाही तरी ते आवर्जून वाचले जातील याची खात्री असू द्या :)

पैसा's picture

3 May 2013 - 2:53 pm | पैसा

आता पुढे कुठे जायचं आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

बर्‍याच ठिकाणी जायचे आहे... आता तर नुसती सुरुवात झालीय :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

Mrunalini आणि स्मिता. : अनेक धन्यवाद !

nishant's picture

3 May 2013 - 3:31 pm | nishant

हांगी पदधतिच्या जेवणात नक्कि काय असते?
फोटो आणि वर्णन आवडले... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

हांगी ही फक्त शिजविण्याची पद्धत वेगळी आहे; शिजवलेले पदार्थ नेहमीचेच म्हणजे भाज्या (मुख्यतः भोपळा), मांस, मासे वगैरे असतात.

ही पद्धत काहिशी कोकणात वालांची पोपटी लावतात तशीच आहे.

विसोबा खेचर's picture

3 May 2013 - 3:36 pm | विसोबा खेचर

लै भारी चित्रलेख...जियो..!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2013 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद तात्या !

श्रिया's picture

4 May 2013 - 11:56 am | श्रिया

खूप मस्त झाला आहे हा भाग! फोटो हि खासच.
किड्यांनी निर्माण केलेला प्रकाश फोटोत असल्याप्रमाणे निळसर असतो कि अजूनही काही छटा असतात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2013 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

किड्यांचा प्रकाश पांढरा आणि काहिशी निळसर छ्टा असलेला असतो... इतर रंगछ्टा नसतात. पण त्यामुळे गुहेचे छत म्हणजे अंधार्‍या निरभ्र रात्रीसारखे तार्‍यांनी भरलेले दिसते.

कोमल's picture

5 May 2013 - 9:04 pm | कोमल

खूप छान वर्णन, आणि फोतु पण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2013 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !