किवी आणि कांगारूंच्या देशांत ०९ : मेलबर्नमधली भटकंती, कोलोनियल ट्रॅमकार रेस्तरॉ आणि पेंग्विन परेड

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
13 May 2013 - 4:55 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

===================================================================

...परतेपर्यंत संध्याकाळ झाली होती. बरेच थकायलाही झाले होते. हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका रेस्तरॉला राजाश्रय देऊन खोलीवर परतलो आणि निद्रादेवीच्या आधिन झालो.

आज जरा आरामात उठायला मिळाले कारण आज सकाळी मेलबर्न मध्येच भटकंती करायची होती म्हणून बस जरा उशीरा म्हणजे नऊ वाजता निघणार होती. त्यामुळे उशीरा उठून आरामात आटपून सवाआठला न्याहारीला गेलो. न्याहारीच्या जागेवरून दिसणार्‍या गल्लीत कोणत्याही महानगरात होते त्याप्रमाणे सकाळची लगबग सुरू झाली होती...

बस निघाली आणि थोड्याच वेळात एक ब्रिटिश जमान्यातली आणि काहिशी ओळखिची वाटावी अशी इमारत आली...

हे फ्लिंडर्स रेल्वे स्टेशन. याचा आकार थोडासा ओळखीचा वाटेल. कारण हे मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे (म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनसचे) आकाराने लहान आणि कमी कलाकुसर असलेले छोटे जुळे भावंड आहे. याबाबत आमच्या सहल निर्देशकाने सांगितलेली कहाणी ही अशी... या दोन इमारतींचे आराखडे एकाच वेळेला तयार करण्यात आले आणि त्यातला मोठा आराखडा त्याकाळी सोन्याच्या शोधामुळे (गोल्ड रशमुळे) महत्त्व आलेल्या मेलबर्नला पाठवायचे ठरले होते. मात्र इंग्लंडच्या बाबू लोकांनी घोळ करून मोठा आराखडा मुंबईला आणि छोटा मेलबर्नला पाठवला. त्याकाळच्या (१९व्या शतकाचा दुसरा भाग) संथ बोटींनी होणार्‍या पत्रव्यवहारांमुळे दोन्हीकडे आराखडे वापरून बरेच बांधकाम झाल्यानंतर हा घोळ ध्यानात आला. पण तेव्हा खूप उशीर झाला होता आणि मुंबईला मोठे रेल्वे स्टेशन मिळाले.

फेडरेशन चौकातला SBS टीव्ही स्टुडिओ...

मेलबर्नच्या भटकंतीत काढलेली अजून काही चित्रे...

.

.

मेलबर्नला गार्डन सिटी असे का म्हणतात याचे उत्तर वारंवार मिळत होते...

.

मेलबर्नची ट्रॅम...

या ट्रॅमचे जाळे शहरभर आहे आणि ट्रॅमचे रूळ अगदी रस्त्यांच्या मध्यभागी आहेत...

शहरातला फेरफटका संपवून सेंट पॉल्स कॅथिड्रल हे गोथिक शैलीत बांधकाम केलेले एक भव्य चर्च बघायला गेलो...

.

.

तेथून पुढचा थांबा होता फिट्झरॉय बाग...

.

.

.

बागेच्या सौंदर्याबरोबर या बागेत अजून दोन खास गोष्टीं पाहण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तेथे असलेले इंग्लिश एल्म जातीचे वृक्ष. एकेकाळी इंग्लंड आणि सर्व युरोपभर पसरलेले हे वृक्ष डच एल्म रोगाच्या साथीचे शिकार बनून जवळ जवळ नष्ट झाले आहेत आणि युरोपात काही ठिकाणीच आणि तेही मुख्यतः छोट्या झाडांच्या स्वरूपात शिल्लक आहेत. मात्र फिट्झरॉय बगिचा युरोपपासून दूर असल्याने येथे ह्या दुर्मिळ वृक्षांच्या रांगा अजून शिल्लक आहेत...

आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि हवाई बेटांची सर्वप्रथम सफर आणि नाविक पाहणी करणार्‍या कॅप्टन जेम्स कुकचे खानदानी घर (Cooks' Cottage)...

खरेतर हे घर ग्रेट आयटन (नॉर्थ यॉर्कशायर, इंग्लंड) या गावी कुकच्या वडिलांनी बांधले होते. कुक लहाणपणीच घरातून बाहेर पडला होता आणि त्याचे बहुतेक सगळे आयुष्य समुद्रसफरी करण्यात गेले. त्यामुळे तो या घरात फार काळ राहिला नसावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हे घर इतर कोणाच्या तरी मालकीचे झाले होते. १९३३ साली रसेल ग्रिमवाल्ड नावाच्या एका ऑस्ट्रेलियन माणसाने हे घर ८०० पौंडांना विकत घेतले आणि त्याची वीट न वीट मोकळी करून, बोटीत भरून, मेलबर्नला आणून, ते तेथे परत जसे होते तसे उभे केले ! अगदी त्याच्यावर असलेली आयव्हीची वेलसुद्धा मूळ वेलीच्या छाटून आणलेल्या तुकड्यापासून वाढवलेली आहे !

तेथून पुढे परत बसची सफर सुरू झाली. काही वेळाने वाटेत हे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे मेलबर्न फुटबॉल मैदान दिसले...

मग आम्ही मेलबर्नच्या फॉर्म्युला वन रेस ट्रॅकवरून बसने सफर केली !!!...

.

.

मेलबर्नमध्ये राखीव कार रॅली ट्रॅक नाही. कार रॅलीच्या वेळेला हा रस्ता खास पद्धतीने बदलून त्याचे ट्रॅकमधे रूपांतर केलेजाते... आणि रॅली संपली की परत त्याचा सर्वसामान्य रस्त्यासारखा उपयोग करतात !

पुढे बंदरावर थोडा फेरफटका मारला..

यानंतर पुढचे खास आकर्षण होते मेलबर्नच्या जगावेगळ्या "कोलोनियल ट्रॅम कार रेस्तरॉ" मधले दुपारचे जेवण...

१९८३ पासून सुरू झालेले हे नावीन्यपूर्ण रेस्तरॉ जुन्याकाळच्या ट्रॅमच्या डब्यांबरहुकूम बनवलेल्या आणि खर्‍याखुर्‍या ट्रॅमच्या रुळांवरून जाणार्‍या ट्रॅममध्ये आहे. उत्तम जेवणाचा आस्वाद घेत असताना ते आपल्याला मेलबर्न आणि त्याच्या काही उपनगरांतून फिरवून आणते. आतापर्यंत बोटीवरच्या जेवणाची, फिरत्या रेस्तरॉमधली मजा ऐकली/अनुभवली होती. पण ट्रॅममध्ये बसून गावभर फिरत जेवायची ही पहिलीच वेळ होती !

.

जेवणही फाकडू होते... शँपेनने सुरुवात, चिकन लिवर अ‍ॅन्ड कोनॅक पॅटे अपेटायझर, सियर्ड कांगारू एन्ट्री, ग्रील्ड चिकन ब्रेस्ट मेन आणि शेवटी शेफ्स सिलेक्शन ऑफ लोकल चीज. जेवण अंगावर आले नसते तरच नवल होते. हॉटेलवर आल्यावर तासभर आडवे होणे साहजिक होते !

पण फार उसंत होती कोणाला? तासानंतरचा गजर लावून थोडीशी डुलकी घेतली इतकेच. तीन वाजता निघणार्‍या "पेंग्विन परेड" नावाच्या सफारीला बाहेर पडलो. मेलबर्नच्या रंगीबेरंगी उपनगरांतून मार्ग काढत बस फिलिप बेटाच्या दिशेने निघाली...

.

दीड तासांच्या बसप्रवानानंतर आम्ही फिलीप बेट या प्राणिसंरक्षक क्षेत्रात पोहोचलो. हे बेट मुख्य भूमीला एका पुलाने जोडलेले आहे. पोचेपर्यंत बराच काळोख दाटून आला होता. त्यामुळे आणि गाडीच्या वेगामुळे रस्त्याच्या बाजूने दिसणारे कांगारू आणि स्थानिक पक्षी कॅमेर्‍याने टिपू शकलो नाही :( .या बेटावर एका लहान आकाराच्या पेंग्विन्सची मोठी वस्ती आहे. हे पेंग्विन सकाळी मासे पकडण्यासाठी समुद्रात जातात आणि रात्र झाल्यावर घोळक्याने परतात आणि अंग वाळवीत बेटावरच्या जमिनीवरच्या बिळांसारख्या आपल्या घरट्यांत जातात.

संशोधनकार्याचा भाग म्हणून काही घरटी जरा जास्त चांगली बनवून त्यांना क्रमांक दिलेले दिसले....

पेंग्विन्सचा परतीचा मार्ग ठरलेला आहे आणि त्याच्या बाजूला प्रेक्षकांना बसून बघण्यासाठी बैठका व पेंग्विनच्या बरोबरीने चालत जाण्यासाठी लाकडी मार्ग केलेला आहे.

.

अंधार झाला की पेंग्विन झुंडीने येतात आणि हाता दोनहातावर असलेल्या प्रेक्षकांकडे ढुंकूनही न पाहता आपल्या साथीदारांशी हितगुज करत, कोणी मागे पडले तर त्याच्याकरता थांबत, आपल्या डुगूडुगू चालीत घरट्यांकडे जातात. पेंग्विनना इतक्या जवळून बघताना प्रवश्यांना काय करू आणि काय नको असे होऊन जाते. मात्र फ्लॅशने पेंग्विनना त्रास होऊ नये म्हणून कॅमेर्‍यास सक्त मनाई आहे आणि त्याची अंमलबजावणी तेथील वॉर्डन्स मोठ्या सजगपणे करत असतात. त्यामुळे या एका अत्यंत मनोहारी आणि आनंददायक निसर्गोत्सवाचे फोटो नाहीत... असं वाटलं की डोळ्यांनी साठवलेल्या स्मृतींचे फोटो काढायची काहीतरी सोय हवी होती.

मात्र प्रत्येक पेंग्विन दररोज परततोच असे नाही. काहीजण आठवडा दोन आठवडे समुद्रातच राहतात. तेथे होत असलेल्या संशोधनकार्याचा भाग म्हणून दररोज परतणार्‍या पेंग्विन्सची मोजदाद केली जाते. आम्ही गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशी १४९० पेंग्विन परत आले होते. तेथल्या एका वॉर्डनच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या दिवशी त्यापेक्षा थोडे जास्तच परत आले असावेत... अर्थात त्या मोजणीपेक्षा पेंग्विनच्या झुंडी, त्यांचे डुगूडुगू चालणे, एकमेकाला समजून घेणे, दुसर्‍यासाठी थांबणे आणि अंधारात न चुकता बरोब्बर आपापल्या घरट्यांकडे जाणेच जास्त मोहवून गेले !

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

चिकन लिवर अ‍ॅन्ड कोनॅक पॅटे अपेटायझर, सियर्ड कांगारू एन्ट्री, ग्रील्ड चिकन ब्रेस्ट मेन आणि शेवटी शेफ्स सिलेक्शन ऑफ लोकल चीज

फोटो न दिल्याबद्दल धन्यवाद!

वाचतोय!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 5:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

चिकन लिवर अ‍ॅन्ड कोनॅक पॅटे अपेटायझर रेस्तरॉच्या दोन नंबरच्या फोटोत दिसत आहे. इतर पदार्थ त्यांची सहप्रवाशांबरोबर तारीफ करता करता केव्हा पोटात गेले ते कळलेच नाही. फोटो काढलेच नाही तर चिकटवणार कसे??? :( +D

चिकन लिवर अ‍ॅन्ड कोनॅक पॅटे अपेटायझर, सियर्ड कांगारू एन्ट्री, ग्रील्ड चिकन ब्रेस्ट मेन आणि शेवटी शेफ्स सिलेक्शन ऑफ लोकल चीज

फोटो न दिल्याबद्दल धन्यवाद!

वाचतोय!!

दिपक.कुवेत's picture

13 May 2013 - 5:30 pm | दिपक.कुवेत

निव्वळ निशब्दः. ज्या फोटोत सायकलस्वार आहेत त्या रस्त्याचे फोटो विषेश आवडले. पाउस होता का हो? अस ढगाळ वातावरण मला फार आवडत विषेशत फिरायला :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

मधून मधून पाऊस पडत होता. पण सहलीची मजा खराब करण्याइतका नाही.

मेलबर्नमधे सायकल स्वारांसाठी खास वेगळ्या लेन आहेत आणि त्यांच्यावर चारचाकी अथवा इतर कोणीही अतिक्रमण केलेले दिसले नाही.

हो आणि त्या सायकल स्वारांनी आम्हाला धडकु नये म्हणुन आम्ही काळजी घ्यायची असते, त्यांना स्वतःला त्यांच्या जीवाची अजिबात काळजी नसते. सकाळच्या धावपळीत हे सायकल्स्वार म्हणजे....राहु दे!

प्यारे१'s picture

13 May 2013 - 5:46 pm | प्यारे१

नेहमीचाच प्रतिसाद.
वरच्या एका रस्त्यावरुन पुण्यातले १७६० रस्ते ओवाळून टाकावेत.

-नव बृहन्पुणेकर प्यारे

बॅटमॅन's picture

14 May 2013 - 2:48 am | बॅटमॅन

वरच्या एका रस्त्यावरुन पुण्यातले १७६० रस्ते ओवाळून टाकावेत.

च्यायला तुलना करून करून पण पुण्याची करता होय ;)

(काडी टाकली ऐसाजे).

मोदक's picture

14 May 2013 - 2:56 am | मोदक

ए गप्रे बॅटम्याना...

माझ्या नवीन धाग्यावर अवांतर कर एक वेळ.. पण इथे नको!!

(चला.. झैरात पण झाली!:D )

प्यारे१'s picture

14 May 2013 - 12:27 pm | प्यारे१

पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.
-प्यारेबंड्या ;)

उदय के'सागर's picture

13 May 2013 - 6:13 pm | उदय के'सागर

अप्रतिम :)

केवढी ती हिरवळ आणि काय ते निसर्ग-सुख. एवढ्या मोठ्या शहराचे (मेलबर्न) असे रुप असू शकते... सुरेख केवळ सुरेख....

नित्यनियमाने आणि लवकर लवकर भाग टाकल्या बद्दल धन्यवाद....तरीही 'पु.भा.प्र.' म्हणण्याचा मोह आवरत नाही :)

झकास्स्स...मस्त सफर चालु आहे. मेलबर्नचे फोटो पाहुन सारखे सिडनीमध्ये घालवलेल्या २ वर्षांच्या आठवणी ताज्या होत आहेत. :(

सौंदाळा's picture

13 May 2013 - 7:01 pm | सौंदाळा

खल्लास एकदम.
ऑस्ट्रेलिया ट्रिप्मध्ये खेळाबद्दल काही आकर्षणे होती का? संग्रहालय भेट, काही माहिती, मैदानाला भेट वगैरे..
कारण ऑस्ट्रेलियन लोक खेळ्प्रेमी वाटतात. क्रिकेट,रग्बी,जलतरण,टेनिस,हॉकी इ. अनेक खेळ आवडीने खेळतात / बघतात.

अनन्न्या's picture

13 May 2013 - 7:01 pm | अनन्न्या

म्हणजे चांगल्या गोष्टीच पाहायला मिळणार पण तुम्ही इतक्या ठिकाणी फिरता, मला सांगा या देशांमध्ये गरीब लोकांच्या वस्त्या नाहीत? भारताचे फोटो दाखवताना नेहमी तिथले गलिच्छ फोटोच दिले जातात. अमेरीका. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशात झोपडपट्ट्या नाहीच की कधी दाखवत नाहीत?

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

न्युझीलंडमधे बसने बरेच फिरलो पण झोपड्या किंवा गलिच्छ्पणा कोठेच दिसला नाही. तशी न्युझीलंडची लोकसंख्या ४०-४५ लाखच आहे आणि सन २०१२ मधे दरडोई उत्पन्न २५,००० डॉलरच्या वर होते. ही सुबत्ता समाजाच्या सर्व स्तरांत विभागली गेली आहे. तसेच गेल्यावर्षी भ्रष्टाचारमुक्ततेत न्युझीलंडचा पहिला नंबर होता हे ही फार महत्वाचे आहे. मुख्य म्हणजे मावरी लोकांच्या मताला आणि हक्कांना महत्व दिले जाते.

ऑस्ट्रेलिया पुढच्या भागांत पाहूच.

सुहास झेले's picture

13 May 2013 - 7:51 pm | सुहास झेले

नेहमीप्रमाणे निव्वळ अप्रतिम..... सेंट पॉल्स कॅथिड्रल चर्च विशेष आवडले. खादाडीचे फोटो नसल्याने जळजळ कमी झालीय :) :)

आता पुढे?

पैसा's picture

13 May 2013 - 8:23 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच लै भारी! प्रतिसाद क्रमशः !

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१, अधाशी उदय, शिद, अनन्न्या, सुहास झेले आणि पैसा : सुंदर प्रतिसादांसाठी धन्यवाद !

अर्धवटराव's picture

13 May 2013 - 9:49 pm | अर्धवटराव

बाबुलोकांची चुक मुंबईच्या पथ्यावर पडली म्हणायची :)

अर्धवटराव

फोटो मस्तच! मेलबर्नची गार्डने बघताना बीजिंग सफरीतील उद्याने आठवत होती. बाकी अस्सल ब्रिटिश शैलीतील चिरेबंद इमारतींचे एक खास वेगळेच आकर्षण असते ते कुक कॉटेजमध्ये प्रकर्षाने जाणवते. मेलबर्न मस्त देखणे शहर दिसतेय.

बाकी, तुम्हाला फार वेगळे असे काही वाटले नसावे इथे, रैट्ट? विशेषतः टापटीप अन इतर गोष्टी तर नेहमीच्याच ;)

हे लहान लहान पेंग्विन जेंव्हा चालत असतात तेंव्हा त्यांच्या पावलांचा टप टप थप थप असा आवाज होतो. कधी एखाद पिल्लु घरट्याबाहेर येउन आईची वाट पहात असत. ते एव्हढ बिचार दिसत ना की बस.
पार्किंग लॉट मधे गाडीच्या खाली आजुबाजुला पेंग्वीन नाही याची खात्री करुन मगच गाडी हलवावी लागते, माझी दोन्ही मुलं गाडीत बसायला तयार नव्हती ते पेंग्वीन पाह्यल्यावर. चुकुन गाडीखाली येइल म्हणुन गाडीबरोबर चालत पार्किंगच्या बाहेर आले होते दोघेही.
जेंव्हा पेंग्विन परततात तेंव्हा त्याची शिकार करायला सील येतात. ते ही पहाण्याजोग असत पण मग उगाचच वाईट वाटत रहात.

नेहमीप्रमाणेच मस्त लिखाण आणि अप्रतिम फोटु. वाचायला आणि फोटु पहायला जब्राट मजा येतेय. पुभाप्र.

सुनील's picture

14 May 2013 - 10:03 am | सुनील

सफर झकासच चाललीय.

बाकी त्या सियर्ड कांगारूचा फोटो नाही तर नाही, निदान कांगारू चवीला कसे लागते ते तरी सांगायचेत!

मुंबईचे विक्टोरिया टर्मिनस १८८८ सालचे तर मेलबर्नचे १९१० चे. तेव्हा स्टेशनांची अदलाबदल ही "अर्बन लीजंड" असावे, असे वाटते.

कूकचे घर जसेच्या तसे पुन्हा उभारणारांना सलाम! (अवांतर - जगाची दोनदा जलप्रदक्षिणा करणारा हा दर्यावर्दी जेम्स कूक हवाई बेटाजवळ झालेल्या दंगलीत "पोहोता येत नसल्यामुळे" मृत्यूमुखी पडला, हे विचित्रच! - ही अर्बन लीजंड नसावी!!)

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2013 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे

सियर्ड कांगारू म्हणजे साधारणपणे कांगारूचे स्टेक असते. कांगारूचे मांस चवहीन आणि वातड (चूई) लागले. ऑस्ट्रेलिया भेटीतला अनुभव म्हणून एकदा खायला ठीक आहे. मात्र इतर सर्व पदार्थ खूप चवदार बनवले होते.

विक्टोरिया टर्मिनसचा किस्सा ऐकून मी परत आल्यावर त्याचा संदर्भ शोधायचा प्रयत्न केला... पण काही हाती लागले नाही. पण तो किस्सा त्याने मी लिहीला आहे त्यापेक्षा जास्त रंगवून अगदी आवर्जाने सांगीतला होता. म्हणून या लेखात त्याच्या नावेच नमूद केला आहे.

nishant's picture

14 May 2013 - 10:29 am | nishant

सचित्र वर्णन वाचताना मज्जा येत आहे..

मुक्त विहारि's picture

14 May 2013 - 11:06 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2013 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे

अर्धवटराव, बॅटमॅन, aparna akshay, प्रथम फडणीस, सुनील आणि nishant : आपणा सर्वांना सहलीतील सहभागासाठी धन्यवाद !

@ मोदक : आप्ली 'साईट' घेटलि म्हुन्शान आजून एक डाव धन्यवाद बरका... [स्वगत्मोड] आता ते झैरातीचं... पन र्‍हाऊदे... आप्ली 'साईट' घेटलि नायका त्येनी? मंग ते चालतं. त्योबी लेख लई बेस हाय ! [/स्वगत्मोड] +D

@ बॅटमॅन : ही वरची केवळ गम्मतच आहे, टिप्पणी नाही. जरा ह घ्या.

बॅटमॅन's picture

14 May 2013 - 12:20 pm | बॅटमॅन

हॅ हॅ हॅ :D

सानिकास्वप्निल's picture

14 May 2013 - 12:38 pm | सानिकास्वप्निल

सहलीचा आनंद घेत आहे
पुभाप्र :)

चेतन माने's picture

14 May 2013 - 12:40 pm | चेतन माने

गार्डन भव्य असू शकत, पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल आणि खड्डे नसू शकतात, शहर इतकं सुंदर असू शकतं हे आम्हा मुंबैकरांच्या नशिबातच नाही!!!
बाकी हा आणि मागचा दोन्ही भाग छान झालेत, मज्जा येतेय वाचताना.
अनेक धन्यवाद आणि पुभाप्र :):):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2013 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सानिकास्वप्निल आणि चेतन माने : अनेक धन्यवाद !

नेहमीचेच कौतुक समजून घ्यावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2013 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

हा भागही छान लिहिलाय..

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 1:52 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !