किवी आणि कांगारूंच्या देशांत १० : महान् महासागरी रस्ता आणि १२ भक्त (The Great Ocean Road and 12 Apostles)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
14 May 2013 - 11:14 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

===================================================================

...मात्र प्रत्येक पेंग्विन दररोज परततोच असे नाही. काहीजण आठवडा दोन आठवडे समुद्रातच राहतात. तेथे होत असलेल्या संशोधनकार्याचा भाग म्हणून दररोज परतणार्‍या पेंग्विन्सची मोजदाद केली जाते. आम्ही गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशी १४९० पेंग्विन परत आले होते. तेथल्या एका वॉर्डनच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या दिवशी त्यापेक्षा थोडे जास्तच परत आले असावेत... अर्थात त्या मोजणीपेक्षा पेंग्विनच्या झुंडी, त्यांचे डुगूडुगू चालणे, एकमेकाला समजून घेणे, दुसर्‍यासाठी थांबणे आणि अंधारात न चुकता बरोब्बर आपापल्या घरट्यांकडे जाणेच जास्त मोहवून गेले !

आज मेलबर्नमधला तिसरा दिवस प्रवाशांना आपल्या आवडीप्रमाणे हवे ते करायला पूर्णपणे मोकळा सोडलेला होता. पर्याय होते मेलबर्न शहरामधली आकर्षणे पाहणे (संग्रहालये, नाटक-सिनेमा, चर्च, वगैरे); यार्रा दरीच्या खोऱ्यातल्या द्राक्षांच्या बागा आणि वाईनरीजची सफारी; किंवा महान् महासागरी रस्ता आणि त्याच्या बाजूला असलेला सागरी स्तंभांच्या नैसर्गिक चमत्काराची सफारी. वायनरी पूर्वी पाहिलेली असल्याने तिचे नाव काटले गेले. नंतर मानवाने निर्माण केलेली शहरी आकर्षणे निसर्गाच्या प्रयोगशाळेतील चमत्कारांपुढे पराजित झाली. आणि साडेअकरा तासांच्या The Great Ocean Road and 12 Apostles या सफारीसाठी ग्रे लाईनच्या बसमधून आम्ही आठ वाजता हॉटेलवरून निघालो.

पहिल्या बसने आम्हाला फेडरल चौकातल्या कंपनीच्या मुख्यालयाजवळ आणून सोडले. तेथून मेलबर्नच्या वेगवेगळ्या भागांतून जमवलेल्या सर्व प्रवाशांना घेऊन एक भली मोठी दुमजली बस सफारीला निघाली. आज आकाश निरभ्र होते आणि कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे शहराबाहेर पडण्यापूर्वी मेलबर्नच्या वेगळ्या भागाचे चांगले दर्शन झाले. त्याची ही काही चित्रे...

 n..................

.

.

अर्ध्या तासातच आम्ही शहराबाहेर पडलो आणि दोन्ही बाजूला हिरवागार परिसर सुरू झाला. मात्र झाडे बहुसंखेने नीलगिरीचीच होती. गाइड त्यांच्या वेगवेगळ्या जाती दाखवत होता पण मला तरी ते सगळे सारखेच दिसत होते ! तासाभराने आम्ही एका निसर्गरम्य तळ्याच्या काठी चहा घ्यायला थांबलो...

.

.

ड्रायव्हर-कम-गाईडने स्वतः जुन्या काळी ग्रेट ओशन रोडचे काम करणारे मजूर बनवत तशा प्रकारे शेकोटी पेटवून त्यावर टिन्ड फूडच्या रिसायकल केलेल्या डब्यात चहा (बिली बीफच्या डब्यांत बनवत असत म्हणून त्याला "बिली टी" म्हणतात) बनवला. चहा, क्रॅकर्स, ऑस्ट्रेलियन वेजेमाईट (एका प्रकारचा यीस्टचा पदार्थ, जो क्रॅकर्स / ब्रेडवर लावून खाल्ला जातो), सँडविचेस आणि ब्रावनी (केक आणि बिस्किट यांच्यामधला एक गोड पदार्थ) असा बेत होता. गाइडने रस्ता बनवण्याच्या कामावर असलेल्या मजुरांच्या कहाण्या सांगून आणि त्यांनी स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी शोधलेले खेळ दाखवून आमचे मनोरंजन केले...

तेथून पुढे सगळा रस्ता समुद्र किनाऱ्याने होता आणि जागोजागी पोहण्यासाठी सुंदर असे छोटे मोठे समुद्रकिनारे दिसत होते...

येथून पुढे एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असा रस्ता सुरू झाला तो शेवटपर्यंत. डोंगरांवर श्रीमंत लोकांची वैशिष्ट्यपूर्ण आकाराची घरे दिसत होती...

.

.

.

पुढचा थांबा होता द ग्रेट ओशन रोडच्या सुरुवातीचा...

द ग्रेट ओशन रोड हा २४३ किमी लांबीचा ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणपूर्व किनार्‍यावरचा रस्ता राष्ट्रीय संपत्ती (National Heritage) म्हणून गणला गेला आहे. त्याची बांधणी पहिल्या महायुद्धावरून परतलेल्या सैनिकांनी १९१९ ते १९३२ या कालावधीत केली आणि तो त्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे स्मारक म्हणून समजला जातो. त्यामुळे हा रस्ता ऑस्ट्रेलियन जनमनात मानाचे स्थान पटकावून आहे. याशिवाय त्याच्या आजूबाजूच्या सौंदर्यासाठीही तो प्रसिद्ध आहे.

या रस्त्याच्या प्रवेशकमानीजवळच एक प्रशस्त समुद्रकिनारा आहे...

.

निसर्गसौंदर्य पाहत पाहत आमची त्या महामार्गावरून सफर सुरू आणि अर्ध्या तासातच लोर्ने नावाचे एक छोटेसे पण टुमदार गाव लागले. तेथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबलो..

.

मग परत मधे मधे फोटो थांबे घेत पुढे सफर सुरू झाली...

.

.

.

.

मधूनच एखादे गाव लागत होते...

आणि परत नवीन निसर्गदृश्य सुरू होत होते...

.

.

.

.

कॅमेर्‍याला जराही उसंत मिळत नव्हती ! जवळ जवळ चार तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या या सफारीच्या एका जगप्रसिद्ध आकर्षणाजवळ पोहोचलो... १२ भक्त उर्फ 12 Apostles बघायला !

The Twelve Apostles म्हणजे द ग्रेट ओशन रोडवर असलेल्या पोर्ट कँपबेल राष्ट्रीय उद्यानात किनार्‍याशेजारी समुद्राच्या पाण्यात असलेले चुनखडीच्या दगडांचे सरळसोट उभे सुळके. दक्षिणसमुद्राच्या लाटा आणि त्यावरून येणार्‍या पावसाच्या आणि वार्‍याच्या माराने झालेल्या झिजेमुळे या सुळक्यांची निर्मिती झाली आहे. हे निसर्गनिर्मित आश्चर्य बघायला जगभरातून लोक येत असतात. जरी याचे नाव पुर्वी असलेल्या १२ मोठ्या सुळक्यांवरून पडले असले तरी एकूण सुळक्यांची संख्या जास्त आहे. शिवाय एखादा सुळका खूप झीज होऊन कोसळल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

हे निसर्गाचे रूप नीट बघायला मिळावे म्हणून तेथे हेलिकॉप्टरची सफारीची सोय आहे...

हेलिकॉप्टरने आकाशात भरारी घेतली आणि काहीच मिनिटात ते समुद्रावरून भिरभिरू लागले आणि निसर्गाने तासून काढलेल्या उभ्या कड्याने बनलेला समुद्रकिनारा आणि ते करताना मधे मधे उरलेले भर समुद्रातले उभे उंच सुळके दिसायला सुरुवात झाली...

.

.

.

.

.

.

.

यानंतर अगदी समुद्रकिनार्‍यावर असलेले यातले काही मोठे सुळके बघायला निरीक्षण सज्जे बनवले आहेत तेथे गेलो. आकाशातून मनोहर दिसणार्‍या त्या कड्यांचे आणि सुळक्यांचे रूप जवळून जमिनीवरून खूपच रौद्र भासत होते...

.

.

काही सुळक्यांची झीज होऊन चित्रविचित्र आकार तयार झालेले आहेत...

.

एका ठिकाणी खाली उतरून समुद्रकिनार्‍याकडे जाणारा मार्ग होता...

.

.

एका ठिकाणी छोटीशी गुहा बनून तिच्यात लवणस्तंभ तयार झालेले दिसले...

तर एका ठिकाणी जवळ जवळ चारी बाजूंना कडे असलेले छोटे लॅगून आणि त्याचा स्वतःचा बीच तयार झाला होता...

कड्यांचे आणि सुळक्यांचे विचित्र आकार बघावे तेवढे थोडेच होते...

.

.

.

किती बधितले तरी मन भरत नव्हतं. पण परत निघणे भाग होते... साडेतीन तासांचा परतीचा प्रवास करायचा होता.

परतीच्या वाटेवर पोर्ट कँपबेल नावाच्या एका छोट्याश्या पण सुंदर गावात अल्पोपाहारासाठी थांबलो...

.

.

.

परतीचा रस्ता आता समुद्रकिनारा सोडून आतल्या भागातला होता. बहुतांश नीलगिरी वृक्षांनी सजलेला असला तरी इथला निसर्गसुद्धा आपल्या वैशिट्यपूर्ण सौंदर्याचे दिमाखाने प्रदर्शन करत होता...

.

परत येईपर्यंत संध्याछाया चांगल्याच पसरू लागल्या होत्या...

.

आजचे रात्रीचे जेवण भारतीय रेस्तरॉमध्ये घ्यायचे ठरवले होते. पण आता जेवणासाठी भटकायचा उत्साह उरला नव्हता. हॉटेलजवळच्या चिनी रेस्तरॉमध्ये झटपट मिळणारा प्रॉन फ्राईड राईस आपलासा केला आणि खोलीवर परतलो. बिछान्याला पाठ टेकताच निद्रादेवीने कुशीत घेतले.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

14 May 2013 - 11:40 pm | सुहास झेले

नेहमीप्रमाणे धम्माल... त्या कड्यांचे फोटो तर निव्वळ अप्रतिम :) :)

पुढे?

मोदक's picture

15 May 2013 - 12:04 am | मोदक

वाचतोय..

फटू बघतोय..

प्यारे१'s picture

15 May 2013 - 12:07 am | प्यारे१

मस्त!
अ‍ॅज युज्वल.

स्पंदना's picture

15 May 2013 - 6:49 am | स्पंदना

किती टिपु अन किती नको अस होत या ग्रेट ओशन रोडवर.
ट्वेल्व्ह अपॉस्टल्सकडे पोहोचायच्या थोडेआधी एका रस्त्याच्या वळणावर समोर पातळ डोंगरकडा, अन त्याच्या अलिकडे पसरलेली सपाट शेती. त्या दोंगर कड्यावर उभे राहुन त्या शेतीकडे पहाव की पल्याडच्या सगरकिनार्‍याकडे ते उमगत नव्हत.
तुम्ही जे पहिले बीचचे फोटो दिले आहेत, तेथे समुद्र किनार्‍यावर लाव्हा पसरलेला दिसतो, माझ्याकडे आहेत फोटोज पण शोधावे लागतील. हा लाव्हा कुठे रोपसारखा, तर कुठे बुडबुडे फुट्ल्यासारखा दिसतो. पण ते पहाताना तो प्रचंड तापमानाचा लाव्हा कसा फसफसत या समुद्रात शिरला असेल ते जाणवुन अंगावर काटा येतो.
मस्त चालली आहे सफर तुमची. तुम्ही पहिला टाकलेला वेड्यावाकड्या खोडांचा फोटो माझाही आवडता आहे. तेथे जी रेस्तरॉ आहेत त्यात, पॅनकेक विथ कॅरेमलाइझ्ड बनाना+ वॅनिला आइसक्रीम असा मेन्यु असतो ब्रेकफास्टला. अप्रतिम!

प्रचेतस's picture

15 May 2013 - 9:17 am | प्रचेतस

खूप सुंदर आणि नेत्रसुखद.

भन्नाट सफर होते आहे.

अक्षया's picture

15 May 2013 - 11:50 am | अक्षया

+ १

उदय के'सागर's picture

15 May 2013 - 9:18 am | उदय के'सागर

जितके ते समुद्र किनारे आणि सुळके सुरेख तितकेच ते छोटे छोटे गावं पहायला ही मजा येते. अश्या गावांचा आणि तिथल्या रहिवाश्यांचा हेवा वाटतो :) (आणि त्या निसर्गाचं मनापासून जतन करणार्‍यांना तर कोटी कोटी प्रणाम)

मस्तच एकदम.. ते कड्यांचे फोटो खरच अप्रतिम....

सौंदाळा's picture

15 May 2013 - 10:05 am | सौंदाळा

नेहमीप्रमाणेच मस्त, सुंदर
आपले बॉलीवुड्वाले इकडेच जातात वाटते त्या सुळक्यांच्या आजुबाजुला शुटींग करायला.

nishant's picture

15 May 2013 - 10:25 am | nishant

काय सुंदर दिसतोय समुद्रकिनारा...आहाहा...मजा आगया...

जिओ!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2013 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले, मोदक, प्यारे१, aparna akshay, वल्ली, अधाशी उदय, Mrunalini, सौंदाळा, nishant आणि संजय क्षीरसागर : आपणा सर्वांच्या सहलीतील सहभागासाठी अनेक धन्यवाद !

अनिरुद्ध प's picture

15 May 2013 - 12:04 pm | अनिरुद्ध प

वाचत आहे,पुढे येवुद्या.

बॅटमॅन's picture

15 May 2013 - 1:05 pm | बॅटमॅन

सुळके खूप आवडले. बाकी बिल्डिंगा अगदी आपल्याकडच्या जुन्या इमारतींसारख्याच आहेत. अपर्णा म्हणताहेत तसे काढले असतील तर लाव्ह्याचेही एखाददुसरे फटू येऊद्या, मजा येईल बघायला. :)

सूड's picture

15 May 2013 - 2:14 pm | सूड

मस्त !! तुमची सगळीच प्रवासवर्णनं वाचत असतो पण प्रतिसाद देतोच असं नाही. प्रत्येक भागाशेवटी पुभाप्र लिहीलंय असं समजावं ;)

चित्रगुप्त's picture

15 May 2013 - 2:56 pm | चित्रगुप्त

खरे भटकबहाद्दर बुवा तुम्ही. समुद्रातील कड्या-खडकांचे फोटो फार आवडले.

स्मिता.'s picture

15 May 2013 - 3:10 pm | स्मिता.

सुळक्यांचे आणि त्यांच्या पायथ्याशी असलेल्या रौद्र रूप असलेल्या समुद्राचे फोटो फार आवडले. एकूण सहला छान होते आहे.

सानिकास्वप्निल's picture

15 May 2013 - 7:52 pm | सानिकास्वप्निल

सुळक्यांचे फोटो खूप आवडले
सहल मस्तं सुरु आहे...वाचत आहे

यशोधरा's picture

15 May 2013 - 9:03 pm | यशोधरा

मस्त. किती चित्रविचित्र गोष्टी पहायला मिलत आहेत तुम्हांला अणि तुमच्यामुळे आम्हांला.
अपर्णाचा प्रतिसादही आवडला.

किलमाऊस्की's picture

15 May 2013 - 9:56 pm | किलमाऊस्की

तुमची सगळीच प्रवासवर्णनं वाचत वाचली आहेत. प्रतिसाद देणं जमतंच असं नाही. पुभाप्र. :-)

पैसा's picture

16 May 2013 - 12:47 am | पैसा

ते समुद्रकिनार्‍याजवळच्या कड्याचे फोटो खासच आलेत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2013 - 12:54 am | डॉ सुहास म्हात्रे

अनिरुद्ध प, बॅटमॅन, सूड, चित्रगुप्त, स्मिता., सानिकास्वप्निल, यशोधरा, हेमांगीके आणि पैसा : आपणा सर्वांना सहलीतील सहभागाबद्दल धन्यवाद !

नानबा's picture

16 May 2013 - 9:19 am | नानबा

ज..ब..र..द..स्त..
प्रचंड सुंदर. कडे आणि सुळके तर क्या बात!!

श्रिसोनु's picture

16 May 2013 - 4:35 pm | श्रिसोनु

लेखनात फोटोज कसे टाकायचे ?

प्रचेतस's picture

16 May 2013 - 4:44 pm | प्रचेतस

फोटो चिकटवण्यासाठी येथे पहा
http://www.misalpav.com/node/13573

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 1:52 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रथम फडणीस, श्रिसोनु आणि वल्ली : अनेक धन्यवाद !

रेवती's picture

17 May 2013 - 1:57 am | रेवती

नेहमीप्रमाणेच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 2:08 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

चेतन माने's picture

17 May 2013 - 12:14 pm | चेतन माने

ते बारा भक्त आणि समुद्रकिनारा खास आवडला आणि काय फोटू काढलेत राव तुम्ही एकदम झक्कास .
:):):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2013 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !