मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

कोचिंग क्लासेस

प्रीत-मोहर ·
3

पूर्वग्रहासंबंधीत विस्कळीत विचार

शुचि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(१) क्वचित एखाद्या व्यक्तीबद्दल आपला एखादा ग्रह होऊन बसतो (२) आणि आपण त्या पूर्वग्रहदूषित दृष्टीनेच त्या व्यक्तीकडे पहातो. (३) खूपदा असे होते हेदेखील कळत नाही पण कधीकधी कळते की अरे आपला "विनाकारण(?)" असा ग्रह बनतो आहे. (४) जेव्हा त्रयस्थ दृष्टीने आपण आपल्याकडे असे पाहू शकतो, तेव्हा दोन मार्ग खुले असतात - (अ) आपण आपल्या पूर्वग्रहाशी = सहजप्रवृत्तीशी ठाम रहाणे किंवा (ब) दुसरा मार्ग हा की आपण आपल्या सहज प्रवृत्तीला = पूर्वग्रहाला विपरीत असे वर्तन करणे. (५) पण मग असा विचार येतो का आपला पूर्वग्रह खोडून काढायचा? का म्हणून आपल्या सहजप्रवृत्तीशी प्रतारणा करायची?

असाही एक समारंभ!

स्वाती दिनेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
याआधी- एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!
आजीकडे तिच्या वाढदिवसाचे फोटो पहायला काही खास दोस्तमंडळी जमली होती, त्यांच्या फर्माइशीवरुन व्हेज पुलाव आणि कॉर्न पॅटिस करुन नेले होते. शिवाय आजीने एक प्रकारचे क्रिमसॉसमधील श्वाइनफ्लाइश ( पोर्क) ३ ,४ प्रकारचे केक्स,कॉफी इ. तयारी केलीच होती. गप्पा मारत,खिदळत फोटो बघत असताना हान्स विमेलमान आजोबांचा विषय निघाला. हे विमेलमान आजोबा आता ९० वर्षांचे होणार होते.

शिवजयंतीची 'वरात'

महेश_कुलकर्णी ·
लेखनप्रकार
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले). सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण.

एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!

स्वाती दिनेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जून च्या शेवटच्या शनिवारच्या संध्याकाळी त्सेंटा आजीने ग्रीलचा बेत केला होता (होहो, म्हणजेच ते तुमचं बार्बेक्यू..) पण ती जरा सचिंत दिसत होती. कारण विचारले तर म्हणाली मागच्या आठवड्यात हॉल बुक केला पण हान्सीयुर्गान आता ट्रीपला जाणार आहे तो ३ आठवड्यांनी येणार, त्याच्यापुढे आमंत्रणपत्रं तयार करायची तर वेळ नाही.. म्हणून आम्ही ह्योक्स्ट मधल्या प्रिंटरांकडे जायचं म्हटलं तर ३०-३५ पत्रिका छापून द्यायला कोण तयार होणार?