Skip to main content

राहणी

सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 19/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात. गाडी थोडी पुढं जाउन पुन्हा त्या तरुणांच्या दिशेने येते, पुन्हा कर्र्र्र्र्र्र ब्रेकचा तोच आवाज पण यावेळी गाडितुन दोघं जण खाली उतरतात, त्या तरुणांच्या दिशेनं जायला लागतात.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

टॉप ५ आहारविषयक भ्रमनिरास

लेखक खादाड अमिता यांनी रविवार, 10/04/2011 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षात आपल्या आहारात खूप विविधता आली असून आपण बरेच पाश्चात्य पदार्थ पण खातो, करून बघतो. तसेच, आपली आरोग्य आणि आहारा विषयी जागरूकता देखील वाढली आहे. तर जेव्हा आपल्याला एवढ्या माध्यमातून माहिती मिळत असते तेव्हा त्याच बरोबर बरेच समज गैरसमज पण उदभवत असतात. आज मी इथे असेच काही भ्रमनिरास करत आहे. जर ह्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही समज, प्रश्न असतील तर मला जरूर कळवा, मी त्याचे समाधान करण्याचा जरूर प्रयत्न करेन. १.

जगायचं कसं?

लेखक विनीत संखे यांनी रविवार, 10/04/2011 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
एका पेंशनर ची डायरी.... आज मी आणि सौ मालाड येथे इनॉर्बिटला मॉलमध्ये गेलेलो. हा मॉल म्हणजे पन्नास वर्षांच्या मुंबईत गुजारलेल्या आपल्या आयुष्यात प्रथमच तिचे सिंगापूर (किंवा शांघाय) होण्याच्या स्वप्नात उचलेले पहिले मोठे पाऊल असल्याचे मनोमन वाटले. (वास्तविक हे एवढे मोठे पहिले पाऊल उचलल्यावर, मुंबईचा पाय मुरगळून ती त्याच पाऊलावर बसकण मारणर होती हे निश्चित होतं... पण पाऊल उचलल्याशी मतलब ... काय? ) मॉल भारी होता. शनिवार संध्याकाळ असल्याने गजबजलेलाही होता.

डायलॉग इन द डार्क

लेखक सहज यांनी रविवार, 10/04/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
असे काय करतोस/तेस, दिसत नाही का? आंधळा/ळी आहेस का? असे बोल आपण इतरांना बोललो असु किंवा ऐकून घेतले असतील. नुकतेच 'डायलॉग इन द डार्क' ह्या प्रदर्शनाबद्दल एका परिचितांकडून कळले. त्यांचा अनुभव रोचक वाटला. त्यामुळे आपणही हे प्रदर्शन 'बघून' नव्हे अनुभवुन यावे असे ठरवले होते. ह्या प्रदर्शनाबद्दल थोडक्यात म्हणायचे तर 'अंधांच्या विश्वाची झलक' ह्या तीन शब्दात वर्णन करता येईल. बरेचदा आपण प्रदर्शन 'पहायला' जातो पण इथे संपूर्ण अंधार असल्याने आपले डोळे काहीच कामाचे नसतात. डायलॉग इन द डार्क हे प्रदर्शन डॉ.