शिवजयंतीची 'वरात'
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ
ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले).
सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण. तरुण मंडळीना तर काय करू आणि काय नको असे झाले होते.
शिवजयंतीनिमित्त एका तरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी मिरवणूक काढण्याचे ठरवले.
उंट, घोडे , भगवे ध्वज, डॉल्बी, वेशभूषा या सगळ्यांची जुळवाजुळव सुरु झाली.
मिरवणुकीची जय्यत तयारी झाली.
संध्याकाळी एकजण पुढे घोडयावर शिवाजी महारांजांच्या वेशात घोडयावर स्वार झाला..दुसऱ्या घोडयावर अजून एक जण सेनापतीच्या वेषात स्वार झाला.
पाठीमागे ३ उंट ज्यावर अनेक बाल मावळे स्वार झाले..साधारणपणे ३ लोकांमध्ये एक या पद्धतीने २०-२५ भगवे ध्वज डोलू लागले..त्यापाठीमागे पायदळामध्ये तरुण मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते... आणि या सगळ्यांच्या पाठीमागे (कदाचित शिवाजी महाराजांची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी) ४०७ टेम्पो चे रथामध्ये रुपांतर केलेले डॉल्बी वाहन. त्यावर सुद्धा अनेक भगवे ध्वज फडकत होते...
मिरवणूक निघण्यास सज्ज झाली...सगळ्यांनी आपापल्या जागा, ध्वज, वेशभूषा नीट केल्या. त्या सर्व लवाजम्याला एका मोहिमेवर निघालेल्या शिवाजीमहाराजांचे रूप देण्यात आले...आता फक्त सगळे वाट पाहत होते ते फक्त डॉल्बीच्या ललकारीची.
DJ ने त्याच्या ठेवणीतली एक तबकडी काढली आणि डॉल्बीने ललकारी दिली....
.
.
.
.
.
.
.
.
.
"कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला.......बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला:"
इथे शिवाजी महाराजांना नव्याने माहिती मिळाली की रिक्षावाला त्यांची वाट बघतो आहे....
पुढे कोणकोणती गाणी शिवाजी महाराजांनी ऐकली ते सांगायलाच नको...
आणि अशा पद्धतीने शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीचे 'वराती' मध्ये रुपांतर झाले.
वर्गीकरण
अग्ग्ग्ग्ग्गं!
" रीस्क " कवितेची आठवण झाली
त्यानंतर
In reply to त्यानंतर by स्वैर परी
सहमत
दयनीय, शोचनीय
लोकमान्य टिळक.... तेच होते ना
In reply to लोकमान्य टिळक.... तेच होते ना by प्यारे१
लोकमान्यानी
काल एका व्हिडो मधे आम्ही 'शिव
In reply to काल एका व्हिडो मधे आम्ही 'शिव by परिकथेतील राजकुमार
.
मस्त ! हेच असेच शिवजयंती
In reply to मस्त ! हेच असेच शिवजयंती by अवलिया
+१
In reply to +१ by सुहास..
जल्लोष...
In reply to जल्लोष... by प्रसन्न केसकर
बर्याच कार्यक्रमात शिवाजी
In reply to बर्याच कार्यक्रमात शिवाजी by पाषाणभेद
खरे शिवाजी महाराज चित्रातल्या
In reply to खरे शिवाजी महाराज चित्रातल्या by नितिन थत्ते
म्हणूनच '(चित्रातल्या)' असे
अवलिया, अगदी बरोबर... आम्हीही
प्रकाटाआ
संपूर्ण आणि बिनशर्त पाठिंबा
In reply to संपूर्ण आणि बिनशर्त पाठिंबा by ३_१४ विक्षिप्त अदिती
-१
In reply to -१ by सहज
-१
In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
-१
In reply to -१ by सहज
असहमतीवर सहमत होऊ या
In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हिंदू शीला ची गाणी.
In reply to हिंदू शीला ची गाणी. by राजेश घासकडवी
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
पासपोर्टाने ब्रिटिश असून
In reply to पासपोर्टाने ब्रिटिश असून by राजेश घासकडवी
साफ माघार घेत आहे.
जुलूस होण्यापुर्वी या
असल्या उन्मादाला आवर घालणे मुश्कील आहे.
चुरचुरीत लेखन
महेशराव तुतारी फुंकुन मिरुवणूकीची सुरुवात करण्याचे दिवस गेले.
In reply to महेशराव तुतारी फुंकुन मिरुवणूकीची सुरुवात करण्याचे दिवस गेले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपुलाची वाद आपणाशी...!
In reply to आपुलाची वाद आपणाशी...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हं
In reply to महेशराव तुतारी फुंकुन मिरुवणूकीची सुरुवात करण्याचे दिवस गेले. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवाजी महाराजांच्या मिरवणूकीत
माझे म्हणणे
आमची ती शीला अन त्यांची ती ... मुन्नी!