आहा ते सुंदर दिन हरपले

लेखनविषय:
लेखनप्रकार
आहा ते सुंदर दिन हरपले --------------------------------- निवांत क्षणी आठवणीच्या गल्लीत फेरफटका मारला स्वीट होम आठवले स्वीट होम उपाहार गृह मंडईतून आठवड्याची भाजीपाला खरेदी झाली कि कुमठेकर रोड वरील हे उपहार गृह त्याला भेट दिली नाही असा पुणेकर विरळाच इडली सांबार -साबुदाणा खिचडी -व उपमा ह्या त्या हॉटेल मधल्या फेमस डिशेस त्या काळी इडली सांबार वर शेव भुरभुरली जात असे नव्या पिढीला माहीत नसेल पण इडली सांबार च्या बाउल मध्ये दोन चमचे सायक तूप घातले जाई फोडणीत भरम साठ कोथिंबीर व तिखट असे त्यामुळे सांबार वर तर्रि चा तवंग असे हटके चवीचं सांबार खावे तर स्वीट होम मध्ये उपमा पण हटके चवीचा असे वर शेव भुरभुरली

झोल? चच्चडी?

लेखनप्रकार
मुंबई पुण्याच्या खाद्यजीवनात दक्षिणेकडील इडली-दोशा, उत्तरेकडील दाल-रोटी, सरसों दा साग तर पश्चिमेकडील खिचडी-कढी ,ढोकळा यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. पण पूर्वेचा संबंध संदेश-रसगुल्ल्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. "काछेर मानुष " (बंगाली भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरी) वाचताना मध्यमवर्गीय घरातील जेवणाचे बरेच उल्लेख आढळले. साहजिकच आपल्या मराठी घरात होणा-या रोजच्या आमटी-भात,खमंग काकडी, उकडलेल्या बटाट्याची भाजी अशा साध्यासुध्या जिनसांप्रमाणे बंगाली शाकाहारी जेवणात रोज काय करतात ? या प्रश्नाचा उदय झाला. उत्तरासाठी आंतर्जालावर शोध सुरू झाला. त्यातून काही माहिती मिळाली.

पाभेचा चहा

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

आमार कोलकाता - भाग २

लेखनप्रकार
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

आमार कोलकाता - भाग १

लेखनप्रकार
प्रास्ताविक आणि मनोगत :- 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.

दुष्ट दुष्ट बायको!

पारंपरिक बायकांच्यात, एक गोष्ट कॉमन असते. आई झाल्यावर त्यांच्यातली, बायको बरीचशी मरते. सगळ लक्ष मुलांकडे, त्यांचं सुख पहिलं! नवरा म्हणजे शंकराची पिंडी, वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं! ''अग तुला काही होतय का ? मी स्वंयपाक करू का ? " " तुम्ही स्वयं - पाक'च करता! तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) "कशाला मरतेस?

(गफ)

पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट)..

पूर्णब्रह्माचा अपमान!!

बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली.

भांड्याला भांड

लेखनविषय:
आज स्वयंपाक करता करता अचानक मनात विचार आला तो स्वयंपाक घरातील भांड्यांचा. आपल्या स्वयंपाक घरात भांडी एकमेकांच्या साथीने, गुण्यागोविंद्याने चविष्ट आणि कलात्मक पदार्थ बनवण्यासाठी किती संगठित होऊन काम करत असतात. त्यातील काही ठरलेल्या जोड्या म्हणजे पोळीपाट-लाटणं, तवा-कालथा, कढई-झारा, खल-बत्ता, चमचा-वाटी. थोड्या आधीच्या काळात गेलो तर कप-बशी, पाटा-वरवंटा, तांब्या-पेला, उखळ-मूस ही भांडी किंवा साधनेही कायम एकमेकांच्या साथीनेच काम करायची. तसं पाहील तर प्रत्येक भांड्याला धडपड करावी लागते अस नाही, जसं की वाटी-चमचा. वाटीतील पदार्थाचा आस्वाद देण्यासाठी चमच्यालाच धावाधाव करावी लागते.

स्वैपाकघरातून पत्रे ३

प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!
Subscribe to पाकक्रिया