Skip to main content

पाकक्रिया

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.

डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.

वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.

(ही पहा पाडली गजल)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 16/05/2017 10:25 या दिवशी प्रकाशित केले.

आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले

पेरणा सांगायलाच पाहिजे का?

ही पहा पाडली गजल,

ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी
दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,

उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू,
शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी,

कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली,
रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी,

हो! जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी,
मीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी,

एका पाकिस्तानी गाढवाची किंमत..

लेखक माहितगार यांनी शनिवार, 29/04/2017 16:01 या दिवशी प्रकाशित केले.

तुम्ही काही वेगळ्या रुपकाच्या अर्थाने धागा लेख उघडला असेल तर अंमळ चुकला आहात. हि पाकिस्तानच्या प्रसिद्ध अंग्रेजी दैनिक डॉननेच दिलेली बातमी आहे. तुम्ही म्हणाल कि असते एकेका प्राण्याला किंमत, तशीच असेल पाकिस्तानी गाढवालाही किंमत, त्यात विशेष ते काय ? विशेष बाब अशी कि पाकिस्तानी गाढवांच्या किंमतीची चर्चा सिंधच्या विधानसभेत झाली, आणि चर्चेचा उद्देश्य तसा किंमत नव्हताच मुळी ४७०० गाढवांची त्यांच्या पोलीसांना म्हणे कातडी मिळाली जी कुणी चिनी व्यापारी चीनला घेऊन जाणार होता.

पुस्तकदिनानिमित्त विडंबन- (बघ माझी आठवण येते का?)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी रविवार, 23/04/2017 21:25 या दिवशी प्रकाशित केले.

सौमित्र आणि शेक्सपिअर दोघांची क्षमा मागून :-

रात्री दिव्याखाली ’मॅकबेथ’ हाती घेऊन पहा
बघ माझी आठवण येते का?

पाने चाळ, पाचव्या ऍक्टचा पहा पाचवा प्रसंग
मॅकबेथची सॉलिलॉकि वाचून टाक
बघ माझी आठवण येते का?

डोक्यावरून जाणारे इंग्रजी शब्द ऑक्सफ़र्डमध्ये बघ
डोके आपटून घे, वैतागून जा
नाहीच कळलं काही तर बंद कर ते,’सॉनेट्स’ घे
त्या डोक्यावरून जातीलच,शब्दांची जुळवाजुळव करून अर्थ लावून पहा
भंडावून जाशील तू, बघ माझी आठवण येते का?

काव्यरस

तुम्ही आहात का सुपरटेस्टर????????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 05/04/2017 18:24 या दिवशी प्रकाशित केले.

माणुस हा असा प्राणी आहे जो फक्त पोट भरण्यासाठी खात नाही,जे खातो त्याची चव कशी आहे याचा सखोल विचार करणारा माणुस हा एकमेव प्राणी असावा.पण प्रत्येक माणसाला एखाद्या पदार्थाची चव सारखीच लागते असा आपला समज आहे.पण तो खरा नाही.याचा शोध म्हणावा असा प्रकार १९३१साली लागला.

एक 'मळमळ-झल'

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 21/03/2017 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

रात्री डब्यात आलेले छोले खाऊन सोडलेली ही 'मळमळझल' पेश-ए-खिदमत आहे.

उथळ जळाची खळखळ
अटळ वळूची मळमळ

कशास या वेटोळ्या
कशास रे ही वळवळ

सुरी असे ही बोथड
उगाच का ही चळचळ?

जखम दिसावी गहिरी
खरी असावी कळकळ

झुळूक वाहत नसली
तरी असावी सळसळ

इनो जरासा घ्यावा
रुकेल तुमची जळजळ

भरून येती डोळे
प्रवाह वाहे भळभळ

कळी कळे का कोणा?
करा कशाला खळखळ?

कुटाळ टाळा 'स्वामी'
विटाळ आहे चळवळ

- स्वामी संकेतानंद

आईचा तिळगूळ

लेखक नूतन यांनी शनिवार, 14/01/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.

सकाळची कामं आटोपून, मस्त आल्याच्या चहाचे घोट घेत, वर्तमानपत्र हातात घेतलं. आजचच आहे ना बघण्यासाठी तारीख बघितली, १३ जानेवारी २०१७ (आम्ही इतके शिस्तीचे नाही बरं, कुठल्याही तारखेचं वर्तमानपत्र हाती येऊ शकतं) अरे बापरे! म्हणजे उद्या १४ जानेवारी, मकर संक्रांत! तिळगुळ करायचा राहुनच गेलाय अजून. आळस झटकून मी उठले. तिळगुळाचं साहित्य साटपपणे कध्धीच आणुन ठेवलं होतं पण परिक्षेचा अभ्यास कसा आदल्या दिवशी, ताजा ताजा करायचा असतो, मी तिळगुळही तसाच करते, अगदी ताजा ताजा.

आठवणी दाटतातः आठवणीतले पदार्थ

लेखक पूर्वाविवेक यांनी शुक्रवार, 23/12/2016 18:20 या दिवशी प्रकाशित केले.

आठवणीतील पदार्थ लिहायचे झाले तर मला कुठल्या हॉटेलात काय खाल्लं यापेक्षा लहांपणीच्याच आठवणी जास्त येतात. बालपणीच्या आठवणी जितक्या निर्मळ, सुखद, चिंतेचा लवलेशही नसलेल्या असतात तितक्या कुठल्याही नसाव्यात. आणि या आठवणी खास असतात त्या आजी-आजोबा, गाव, खेळताना केलेली मजा आणि अर्थातच खादाडी. आयुष्यातली पहिली दहा वर्ष मुरुड सारख्या छोट्या गावात गेली. टीव्ही असून नसल्यासारखा. हॉटेल नव्हती आणि बाहेर जाऊन जेवायचीची पद्धतही नव्हती. पण तरीही आई-आजीच्या हाताच्या त्या साध्याश्या स्वयंपाकाची आणि गावात मिळणाऱ्या काही पदार्थांची चव अजून जिभेवर रेंगाळते. आजही ते पदार्थ खाल्ले की जुन्या आठवणी मनात रुंजी घालतात…

(कोरडी भाकर)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 11/12/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.

मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता,
त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा

फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर
जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर

मी किती दडवून ठेवले या ढेरीला
कुत्सित नजरा घाव घालती.. या..! मनावर

फेरफटका मारण्याचे, आजकाल टाळतो मी
एक एक पाउल उचलणे, जाहले खूप खडतर

तू नको आणूस सुगंध, ऐक वाऱ्या
एक वडा खायचा, होईल मोह अनावर

नुकतेच जरीही, जेवण असले जाहले ना
काकडी-खिचडी, सहज खायचो मी त्या नंतर