मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाट्य

सिटीबसमधले नाट्य

पाषाणभेद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सिटीबसमधले नाट्य प्रवासी: आपलं हे एक द्या हो. कंडक्टर (वैतागून): हे म्हणजे काय? प्रवासी: अहो हे म्हणजे तिकीट द्या. एक सर्पोद्यान द्या. कंडक्टर: काय नागाचा नाच बघायला चालला वाटतं? प्रवासी: नाही हो. हे आपलं.. कंडक्टर: मग काय नागाला दुध पाजायला चाललात वाटतं? प्रवासी: नाही नाही. तसं काही नाहीये. कंडक्टर: मग तेथे नागाला तेथेल्या पाळणाघरात सोडायला चालले वाटतं? नाही म्हणजे पिशवी बरीच मोठी दिसतेय. गारूडी दिसताय अगदी. (कंडक्टर "मन डोले मेरा तन डोले मेरा दिलका गया खयाल..." या चालीवर नाचतो. प्रवासीही त्यात सहभागी होतो.) प्रवासी (भानावर येत): अहो नाही हो.

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

नवीन नाटक - "गांधी आडवा येतो"

श्रीगुरुजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राध्यापक बुद्धीभास्कर एक विद्वान आणि प्रथितयश प्राध्यापक. संध्या (पत्नी), माया (डॉक्टर असलेली मुलगी) व (श्याम) मुलगा असे त्यांचे चौकोनी कुटंब. त्यांचा मुलगा कोणत्याच नोकरीत टिकत नसल्याने प्राध्यापक अस्वस्थ आहेत. महाविद्यालयातल्या आपल्या एका विद्यार्थिनिशी अतिप्रसंग केल्याचा आरोप त्यांच्यावर येऊन त्यांना सध्या निलंबित केले आहे व त्या प्रकरणाची एक समिती चौकशी करत आहे. यामुळे घरात तंग वातावरण आहे. अचानक मुलगी त्यांच्यावर बॉम्बगोळा टाकते.

'कट्टा... On The Rocks': संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध

रमताराम ·
लेखनविषय:
'कट्टा' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका.कधी चहाची टपरी नसेल तर कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोल च्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशी पासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा.

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

तक्षकयाग : एक सुरेख नाटक.

मनोज श्रीनिवास जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो असे म्हणतात ! अनेक संघर्ष एकवटून “तक्षकयाग” हे प्रा.ल. मयेकर यांच्या कसदार लेखणीतून साकारलेले सुरेख नाटक काल पहिले. सहकुटुंब “ मुद्दाम पहावे” अश्या शिफारासीने ही हया नाटकाची ओळख ! महांकाळ व हब्बाल हे दोन समाज एका देशात राहत आहेत राहत आहेत. ओमर (?) नी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी रचली आहे हीच नाटकाची सुरवात ! फाळणी पासून सुरु होणारे नाटक लेखकांच्या मनाचा ठाव घेत घेत पहिल्या अंकात सापते तेंव्हा सेश स्वतंत्र झालेला असतो. दुसऱ्या संकट स्वतंत्र देशाचे नवे राजकारण सुरु होते आणि दहशतदाशी येवून थांबते.

काटकोनी त्रिकोण

तिमा ·
लेखनविषय:
'काटकोन त्रिकोण' हे नाटक साधारण वर्षापूर्वी बघायचे ठरवले होते. तिकिटेही काढून आणली होती. पण ऐन वेळेस सभागृहावर पोचलो आणि, डॉ. मोहन आगाशे' यांची तब्येत बरी नसल्याने प्रयोगच कॅन्सल झाला. त्यानंतर, या ना त्या कारणाने बेत लांबणीवरच पडत गेला. अचानक, गणेशचतुर्थीलाच, शिवाजी मंदिर ला प्रयोग लागल्याचे कळताच फोन बुकिंगवर प्रयत्न केला. ते फक्त दोनशेचीच तिकिटे ठेवतात हे कळले. पण गणपतीच्या गडबडीत सगळे असल्याने आयत्या वेळेसही तिकीट मिळेल असा विचार करुन गेलो.