खासियत खेळियाची - मार्क वॉ
लेखनविषय:
- Read more about खासियत खेळियाची - मार्क वॉ
- 18 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
Crush - हो हो ! तुम्हाला अभिप्रेत आहे तोच crush. ह्याला का कोणास ठाऊक मराठीत प्रतिशब्द सापडतच नाही. आणि नाही सापडत तेच बरंय. Crush मधला भाबडेपणा, त्यातली निरागसता आणि निर्भेळ असं प्रेम हे तसंही इतर कुठल्या शब्दात व्यक्त होणं अवघडंच.
क्रिकेट आपलं पहिलं प्रेम असेल तर क्रिकेटमधला आपला पहिला क्रश म्हणजे मार्क वॉ. "कितने भी तू करले सितम, हस हसके सहेंगे हम" हे गाणं मार्क वॉ इतकं कोणाला चपखल बसत नसेल. ह्या माणसात मुळातच एक आपलेपणा वाटायला लावणारं काहीतरी होतं. ठाव न लागणारं काहीतरी. "ना समझे वो अनाडी है" म्हणणारी नूतन जशी कुठल्याही मेकअप, कॉस्चूम शिवाय देखील कमालीची सुंदर दिसायची तसंच काहीसं.