मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लॉकडाऊन सुरु आहे.

श्रीकांतहरणे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माया सारख्या कमीत कमी नव्वद टक्के लोकांचा, वर्क फ्रॉम होम म्हजे घरून ऑफिसच काम अन घरच काम अस नवीन कार्येक्रम सुरु झाला हाय. तोसंपून, किंवा त्यातून थोडा का होईना, चोरटा वेळ काढून, जर म्या वॉट्सअँप मेसेजेस वाचला नाय, त मंग माया दिवस कामी कसा लागण भाऊ? हेच त एक सोशल मीडिया, म्या सध्या पकळून ठेवल हाय. अलग अलग ग्रुप मध्ये ही पोस्ट अलाऊड नाही, ती पोस्ट अलाऊड नाही असे म्यासेज वाचले, की कितीही होबासक्या करून, ग्रुप अडमिन (गट प्रमुख) झालेला मी मला, कायची तरी भीती वाटण ना बे! मग काय पाठवू, काय नाय पाठवू, काय वाचू, काय नाय वाचू नुस्ती मनात भीती! अशातच आमच्या काही ओळखीच्या आणि आदरणीय दोस्तांच्या कधी काही पोस्ट आल्या. म्या म्हणलं, कायचिबीन मस्त लिहिते बे हे लोक, काई कलाकार आहे लेका, यायले सार कस मस्त मस्त सुचते बे? देवांन आपल्या संगती पार्शलीटी केली की काय बे? आपल्यासाठी नुस्ती कामाचं हाय काय? ऑफिसची काम, माया वाट्याला आलेली घरची अर्धा डझन काम, होममिनिस्टरला खुश ठेवण्यासाठी म्हण, की दोन येळच जेवण गुपचाप भेटायला लफडा नको म्हण, हसरा थोबाड करून करायच होत, ते काम म्हण. त्यात पोरीच्या शाळेला सुट्ट्या लागल्या , आमची एकुलती एक लाडाची लेक, "बाबा हॉटेल बंद हाय ना? मग आज हे करून बघू का? बाबा आज ते?, बाबा तुम्ही काय बनवता बाबा, लयच मस्त! तुम्ही तर नोकरी सोडून तुमच हॉटेलचं टाका ना!” अशा तिच्या गोष्टी. म्हणजे या इतक्याश्या वयात तिले जमाले लागलेलं इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि त्यात जाणूनबुजून अडकणारा आणि तिचे लाड पुरविणारा म्हणजे मी, माझी चांगलीच हजामत चालू आहे. आधीच लय लोड असलेला माया छोटा का असुदे पण एक मेंदू, त्याले आता हे माया दोस्तांना जमणार मस्त मस्त लिहीलेल्या पोस्ट बघून, अबे आपल्याले जमेल का बे अस? की आधीच आयुष्याचे बारा वाजले असतांना, नवीन उचापत्या, कोण बे सांगितल्या कराला? काय बे, त्याच शुद्ध मराठीतल ते लिहिण, इथे मी तर मुळाचा , म्हणजे जर आमी लोकानी, वाक्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी वापरल नाही त आमच वाक्य पूर्ण तरी होत काय बे? अन समजा झाल, तरी त्या वाक्याले अमरावतीकराच्या वाक्याचे वेटेज तरी कुठे रायते का बे? झाल डोक्याले नाई ते काम लागल. म्हणते ना. ”मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर.” ठरलं! काय होईन? लोक हासन , म्हणण "ऊठसूट, जो देखो बटे, रायटर बन रहा." पण आता उपाय नाय. लोक काय म्हणते, या चिंतेन मेल्यापेक्षा, थोडे चिंतन केल त? तुकाराम महाराज न म्हणतात ना “काळ सारावा चिंतने”. आपण पण काय तरी लिहू. आपल्याले कोणता मोठा लेखक बनाच. पण लॉकडाऊन मदे , हे पण पाहू का करून? जेव्हढे हाय गाठीशी, तीच शिदोरी बघू का उघडून?, आपल्याले देवान कमी देल किंवा पार्शलिटी केली, अश्या विचारान कुजत बसण्यापेक्षा, जे देल , त्याचा वापर,बघू का करून? असले धंदे कराले आपल्याले वेळ भेटते का बे , हे आपले नेहमीचे बहाणे. अरे भाऊ वेळ भेटत नसते, वेळ काढायची असते, अस कोण्या महात्म्याचे शब्द कानात पडल्यासारखे झाल. अमरावतीकरच्या भाषेत सांगायच झाल् त "बेटे बारिश भलेही लोगोने जादा देखी होगी, लेकिन भिगा तो तू भी किसी से कम नही." त मंग कोणाच्या थम्स अप किंवा थम्स डाउन चा लोड न घेता, अन आमच्या आदरणीय, ज्यांच्यामुळे ह्या उचापत्या सुचल्या, त्यांची माफी मागुन (तसा मी वयाने लहान, त्यामुळे त्यांनी मला मोठ होऊन आधीच माफ केल हाय ), आणि त्यांचा आदर्श डोया पुढे ठेऊन, चला अमरावती स्टाईल मदे , देऊ काही गमतीदार आठवणींना उजाळा. || नम्र निवदेन || मले कोणत्या व्यक्ती, भाषा किंवा प्रदेशाचे माया आठवणीतून मजाक उडवायचा नाही . कुणावर टिका कारण्याएव्हढी मायी लायकी पण नाही. तरी काही चुकलं असं वाटत असलं त ही एक पोट्टामशाही गोष्ट समजून माफ करा बावा.

वाचन 3282 प्रतिक्रिया 0