मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

....विश्वाची उलगड होते.....

कानडाऊ योगेशु ·
....विश्वाची उलगड होते..... केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते.. केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते.. पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते. मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते. तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते! मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते. मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.** असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते... नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी. निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते... सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते मी तुझा पुजारी बनतो...

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

बायको कोण असते...

निओ ·
एक हलकी फुलकी कविता. बायको कोण असते... कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते कधी समजून घेणारी मित्र असते कधी त्रास देणारी डोकेदुखी असते कधी मस्का लावणारी असते कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते आणि कधी नको असताना जवळ असते कधी न सांगता समजून घेते कधी गैरसमज करून घेते कधी मुलांची काळजी करते कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते कधी नवर्याला नावे ठेवते कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते कधी फिरायला नेलं कि नखरे करते कधी हट्टउन हौस पुरवून घेते कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते कधी शॉपिंगने बेजार कर

माझा गाव

निलम बुचडे ·
लेखनविषय:
हिरव्या डोंगराच्या कुशीत विसावणारा ! खळखळणार्या नद्यांच्या, काठावर वसणारा !! मंदिरातील घंटानादातून, चैतन्य फुलवणारा ! साग्रसंगीत पूजेच्या, सुगंधात रमणारा !! परंपरांची कास धरणारा, रिवाजांचा मान ठेवणारा ! नव्या युगाचे स्वागत , उत्साहाने करणारा !! निसर्गाचे उपकार मानणारा, निसर्गाचा ठेवा जपणारा ! मुक्या जीव-जनावरांना, प्रेमाने वाढवणारा !! सत्याचा मान राखणारा, अन्यायाला ठेचणारा ! आणि उदार मनाने, क्षमा करणारा !! स्वाभिमान जपणारा, मान - सन्मान देणारा ! दुःखितांच्या वाटेवरही, फुले पसरवणारा !! *****----------******------------- Written by - Nilam Buchade.

तुझी वाट बघता बघता........

एक एकटा एकटाच ·
लेखनविषय:
तुझी वाट बघता बघता नेहमी मला हे असेच होते प्रहरावर प्रहर उलटून जातात अन दिवसाची रात्र होते तूझ्या येण्याची चाहुल रातराणी हलकेच सांगुन जाते आठवणीने तुझ्या चंद्र शहारतो अन चांदणीही मोहरुन जाते नकळत कुठुनसा अल्लड वारा ओठी गीत तुझे गुणगुणत येतो उगाच सैरावैरा पळुन वैरी उरी घालमेल वाढवून जातो आठवत नाही कितीवेळ मी इथे एकाकी नि:शब्द बसुन आहे वेड्यापरी इथे येणार्‍या वाटांवरती तुझ्या पाउलखुणा शोधत आहे रात्र चढता चढत जाते, मात्र तू काही येत नाही तुला न भेटता निघण्यास हे पाउलही मग धजत नाही तु न आलेली पाहून चांदणी ही आता हिरमुसली आहे तिची ती घालमेल पाहुन पहाटही वेशीवर विसावली आहे दर रात्री य

अनुवादः तू भेटतेस अशी. मूळ कविता: जरूरी है

मिसळलेला काव्यप्रेमी ·
लेखनविषय:
"एस" यांची अनुवादित कविता: तू भेटतेस अशी जसा चंद्र तरंगतो-बुडतो शांत-स्तब्ध डोहात तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला जशी तू हृदयाच्या किती नकळत त्याच्या सर्वात खोल कप्प्यात उतरतेस अलवार तुला कसं जमतं गं? असं मला तुझ्या सोबत रहायला भाग पाडायला? तू सोबत हवीयेस जवळ हवीयेस. अशी. ..................................... मिसळलेला काव्यप्रेमी यांची मूळ हिंदी रचना: -जरुरी है..!! ठहरे हुए पानीमे तैरते डूबते चांद की तरह होता है तेरा मिलना कहनेको चांद पानीको कभी छूता तो नही बस पानीमे डुबा हुआ तैरता रहता है जैसे तू दिलकी सत

..विचारेन त्यालाच कॉफी चहा..

कानडाऊ योगेशु ·
लेखनविषय:
भरोसा करावा कुणाचा जरी.. भरोसाच नाही कशाचा जरी..! विचारेन त्यालाच कॉफी चहा घरी दूत आला यमाचा जरी मिळो गार माझी तुला सावली किती त्रास मजला उन्हाचा जरी मनी मान्य केले शशीचोर मी! खुळा आळ आहे नभाचा जरी. म्हणे वाघ गेल्याच जन्मातला अता जन्म आहे सशाचा जरी किती त्यात जो तो पुरा गुंतला खरा खेळ होता मनाचा जरी अरे वाकला तो कशाने असा.? तसा भार नव्हता जगाचा जरी! खरा भक्त त्याला मिळो एकदा तिथे प्रश्न असला युगाचा जरी! - कानडाऊ योगेशु

पहायचं होत ग तुला एक नजर...!!!

kunal lade ·
लेखनविषय:
काव्यरस
तिच्या भावाच्या लग्नात हे घडल होत....!!!!! पहायचं होत ग तुला एक नजर त्यासाठीच आलो होतो उन्हात फरफटत पण नशीब खोट नाही होता आल हजर.... म्हणून परत तुझ्या घरी आलो पण तू निघालीसाच नाही बाहेर.... म्हणून मित्रांच्या घोळक्यात पुन्हा शिरलो आणि तुझा भाऊ आला समोर.... म्हंटल परत करावा प्रयत्न म्हणून पोट भारलेल असताना देखील मुद्दाम पंगतीत घुसलो आणि जेवण संपल पाहून स्वतावरच हासत बसलो.... पहायचं होत ग तुला एक नजर पण नाहीच ग पाहता आल मग शेवटी काय गेलो बारवर मारली चार बिअर आणि झोपलो ढाराढूर....!!!!.

सैराट - काव्यांजली

जव्हेरगंज ·
==================================== "सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा.... °°°° झुडपात जाऊन तोंडाला लय फासलाय साबण चाललू हिरीत मुटका मारायला तर आरची म्हणली " हु म्हागं" - लंगडा प्रदीप °°°°°° केळीच्या बागा तुडवून पाय दुखतात सारखे आसं काय करती येड्यावणी "घरची उठत्याल की आरचे" - परश्या ================================== "सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !!

एक पावसाळी कविता

पथिक ·
लेखनविषय:
निळे घन हिरवे रान थरथरे पान आर्त वारा ओल्या दिशा जीव पिसा धुंद मन धुके दाट चुके वाट वीज पडे घरटे जळे झाडासंगे अवचित सरी येती भिजविती पडो थेंब फुटो कोंभ अंतरात