Skip to main content

कविता

गझल - आणि हा खेळ झाला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/06/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
जरा हासलो आणि हा खेळ झाला तुझा भासलो आणि हा खेळ झाला तसा संयमी नित्य मी राहणारा जरा त्रासलो आणि हा खेळ झाला मला वाटले वेळ आलीच होती तरी वाचलो आणि हा खेळ झाला मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला जरा शेवटी हात जोडावयाला उभा ठाकलो आणि हा खेळ झाला अता थांबता येत नाही अपूर्व जरा धावलो आणि हा खेळ झाला - अपूर्व ओक
काव्यरस

पाऊसगाणे...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 26/06/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंगणात आज वाजे पावसाचा ताशा सोहळ्यात पर्जन्याच्या रुजे उद्याची रे आशा.. माझे घर झाले आज आनंदाने ओलेचिंब दिसे प्रवाही पाण्यात भविष्याचे प्रतिबिंब... माझ्या घरात नाचते पावसाचे स्वैरगाणे आणि त्याच्या तालावर मन विभोर उधाणे... माझ्या मनात गुजते जुन्या पावसाची गाज गेल्या ओल्या दिवसाची सल छळते रे आज...

पाऊस...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 26/06/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
जडावल्या तिन्हिसांजेला ओल्या पावसाचा गंध ... झुगारले सारे बंध ओला पाऊस दाटतो आभाळात अनवट ... भाळावरी मळवट चिंब रात्रीच्या उरात पेटलेली आग आग ... उगा अंधाराला जाग अंधाराच्या अंगावर उजेडाचा कवडसा ... पाण्यावर ओल्या रेषा

अश्याच एका पावसाळ्या रात्री .........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 24/06/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
अश्याच एका पावसाळ्या रात्री, जेव्हा ती मला भेटली होती लखलखत्या काळोखात, तेव्हा तिच्या कानातली चांदणी चमकली होती एकुलत्या एका शेडखाली मला खेटुन ती उभी होती अन माझ्या नकळतच्या स्पर्शाने तिची ओली काया शहारत होती बाहेर रस्त्यावरती पाउस मात्र, एकसारखा कधीचा कोसळत होता मला वाटलं की तोही तिच्यासाठीच आज ज़रा जास्तीचा रेंगाळत होता वाटलं की तिला कवेत घेउन ह्या पावसात चिंब भिजावं मिठीत तिच्या विरघळून जावं अन स्वता:लाही विसरावं ढगांच्या गडगडाटांनी घाबरून ती अशी काही मला बिलगावी की, हि धरणीही त्याला अशी कधी भेटत नाही, पाहून त्या पावसाचीही जिरावी पाउस ही आता जरा जास्तच इरेला पेटला होता वाऱ्य

तुझ्या नकळत

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 24/06/2016 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुला, रतीने बघावे अन पाहून तव रूप ,लज्जित व्हावे . असा ,सखे लयबद्ध पदन्यास तुझा पैंजणास वाटे, तुज बिलगुनि राहावे . अशी लाजरी अबोध रमणी, असे तू आला वसंत देही,तुज ठाऊक नसावे. . नाभीत जशी त्याच्या ,कस्तुरी दरवळे तसे मम हृदयी तू ,दरवळत राहावे . हे काय झाले,तुला हि कळेना ते पाहून ,मदनाने गाली हसावे . तारकांच्या साक्षीने विवाहबद्ध व्हावे मी तुला अन तू सौभाग्यास मिरवावे

बंद पडलं..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/06/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!

मनातले माइ्या

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शनिवार, 18/06/2016 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
शान्त थन्ड झुलुक खुनवते मज नव दिशा, मनाचे बान्ध तुटले, अश्र्रचा पुर अाला नेत्रि भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले अायुश्याच्या कुठल्या तरी वाटेवर पुन्हा ते रेन्गालले निशब्द मनातल्या वेदना अश्र्रनि व्यक्त होउ लागल्यात, अाठवुनि अाइचि माया जाग्या झाल्या अाठवनि जुन्या, भावनाच्या खोल डोहात तरन्ग उठले कोनते नवे........? अन्धाराच्या मागे धावनारि मि अाज अाशेचा किरन शोधु लागले........

सार्थक जन्म-समर्पण अर्थात नर्मदाख्यान लोककथा.

लेखक खुशि यांनी मंगळवार, 14/06/2016 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
असूर संहारा नंतर थकून बैसले त्रिपुरारी। निढळावरचा घर्मबिंदू एक टपकला भूमिवरी॥ त्या बिंदूतुन प्रगटली एक कन्या सुंदरी। कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥ मी तर असे आपुलीच तनुजा बोले नमस्कारुनी। घर्मबिंदूमधुन आपुल्या जन्म माझा पावनी॥ दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती उरी। तुझ्या जन्माने सुरसे आज तीही झाली पुरी॥ आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी। येई गे मुली बैस अंकी हसून बोले शर्वरी॥ दोन बंधू एक भगिनी मोदे खेळती अंगणी। सुखी गृहस्थी पाहून डोलती उमा आणि मदनारी॥ स्कंद गजानन लपून बैसती शोधतसे मंदाकिनी। कोठे लपले बंधू दोघे खूणे दाखवि
काव्यरस

कविता

लेखक आ युष्कामी यांनी रविवार, 12/06/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
कविता करणे माझा छंद आहे आपणही काहीतरी करतो इतरांपेक्षा वेगळं साहजिकच झुंडीपेक्षा वेगळा मी भलताच देऊन जातो आत्मसन्मान शब्दाला शब्द अन यमकांचा खेळ लहानपणी वाचलेलं सुभाषित लख्ख आठवतं काव्य, शास्त्र , विनोद यांत रस नसलेला माणूस शेपूट, शिंग नसलेला पशु आहे मीही सरसावतो घेऊन पेन , ओढून पुढ्यात कागद वगैरे फर्रकन मीही गलबलतो शेतकरयांचे, कष्टकरयांचे दु:ख ऐकून , पाहून कधी कधी विषण्ण सुद्धा होतो drawingroom मधल्या खुर्चीत सैलावत माझेही अश्रू ओघळतात महागड्या कार्पेटवर हिंदकळतो हातातला ग्लास मीही शोक व्यक्त करतो बलात्काराच्या घृणास्पद घटनांवर अन् विचार करतो आज interview ला आलेली पोरगी एकदम मस्त ह