Skip to main content

कविता

ती विलासींनी मदालसा,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 31/05/2016 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
ती विलासीने मदालसा,मिठीत कैद होती अनंग कथा ऐकण्यात, ति जरा गुंग झाली असावी चुंबीत अधर लाल,लागता हात उरोजास कोवळी लावण्य कळी ,ती जरा लाजली असावी घुसता आरपार तो मदन शर हृदयात रतीसम सुंदरी ,ती जरा घायाळ झाली असावी कुरवाळीता ,त्या मोकळ्या रेशीम कुंतलास त्या काम गंधाने, ती जरा बेभान झाली असावी मधाळ हसून,टाकता कटाक्ष त्या दर्पणात तो भंगला पाहून,ती जरा चकित झाली असावी अर्पीता कोवळी कोरी तनू, ह्या पौरुषाला ती कोमलांगी ,पौरुषा पुढे हरली असावी Avinash

"व्वा…क्या बात है…!"

लेखक अश्विनी वैद्य यांनी सोमवार, 30/05/2016 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
"व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर जीव ओवाळून टाकावा त्या शब्दांवर, त्या सुरांवर, त्या मधुर आवाजावर, त्या अभिनयावर एकूणच त्या साऱ्या बेभान कलाकृतीवर, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर भान हरपून स्वत्वही हळुवार निसटावं अगदी स्वतःच्याही नकळत, पार आत खोलवर कुठेतरी काहीतरी कधीतरी असं भिडावं नसलेल्यातलं असणं डोळ्यासमोर उभं राहावं, असलेल्याच्याही नकळत, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर बंद डोळ्यांच्या पडद्याआड सगळे संदर्भ, स्पष्टीकरणासहित लागावेत, संवेदनशीलतेच्या परिसीमा तिची हद्द ओलांडून जाव्यात, पंचेंद्रियांच्या जाणीवा तृप्ततेच्य
काव्यरस

पावसामधल भंकस इंद्रधनुष्य

लेखक सुशेगाद यांनी सोमवार, 30/05/2016 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस पडत नसताना किंवा पाउस पडून गेल्यावर जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होत असेल त्याच्या मधल्या कालावधीत सिटी बसने मी प्रवास करत असतो खिडकीतून बाहेर पाहत राहतो बाहेर ओली झालेली जमीन झाडांवरून ठिबकणार पाणी त्यांना आता खास पाणी घालायचं काही कारण नाही आं करून पाऊसपाणी पिल्यासारख ताज टवटवीत शहर शहराच्या कोपर्य कोपर्यात cartoonist ला श्रन्धाजली देणारी ग्राफिटी कुठल्यातरी stop वर बस चे automatic दरवाजे उघडतात ती बस मध्ये येते अप्रोन घालून माझ्या बाजूला बसते आम्ही एकमेकांना नाव न विचारता बोलायला सुरु करतो मानसाच डिसेक्शन करताना कस वाटत यावर बोलतो ती म्हणते मी इझिली फाडू शकते सगळा आतडी , फुफ्फुस आणखी

..कुणी दार माझे ठोठावले..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 28/05/2016 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
उगा आग्रहाने बोलावले. किती आज तेही सोकावले. कुठे चोर दडला अकस्मात तो? कुणी दार माझे ठोठावले..!!! पुन्हा झूळुकिशि सख्य सांधले पुन्हा एक वादळ घोंघावले. तिचे बेत होते,तिला धार्जिणे. तिने बेत माझे धुडकावले.

विस्तारभयास्तव

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 27/05/2016 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
विस्तारभयास्तव मी स्वप्नांची लांबीरुंदी कमी केली गजराची धारदार कात्री वापरून काटछाट केलेली ती स्वप्ने गळत असतात पापण्यांमधून विस्तारभयास्तव कंटाळवाणा प्रवास टाळत गेलो हा अधिकचा प्रवास दिला साठवून आता प्रवास शक्य होत नाही विस्ताराचे अजिबात भय नसून विस्तारभयास्तव कितीतरी विचारांना दिली जन्मठेप काही पॅरोलवर सुटले कैदेतून मी परत त्यांना कैदेत टाकतो सावधगिरीचा उपाय म्हणून विस्तारभयास्तव घराला भिंतीमध्ये बंद केले कहर केले त्याला छप्पर देऊन आता खिडकीतून पाहत बसतो वादळवारागारापाऊसऊन ----////-----------////------- Self-censored:- विस्तारभयास्तव कविता लिहताना मात्रा मोजल्या कादंबऱ्या लघुकथेत को

..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 26/05/2016 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो. अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो हाताने ती भरवीत होती घास कुणाला . तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो.

व्हिडीओ शूट

लेखक चाणक्य यांनी बुधवार, 25/05/2016 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
......आणि मग थोडं पुढे गेल्यावर मला दिसला एक नेता जो देत होता आश्वासन कसलेतरी पाच वर्षापूर्वी तो हेच बोलला होता...असं मला पाच वर्षापूर्वी वाटलं होतं ते आठवलं . . पुढे जात होतो तसतसं बातम्या ऐकायला येत होत्या रोज एक पुतळा पडल्याच्या काही पुतळे बनले होते घाईघाईत तर काहींना लोकांनी पाडले होते काहीचे पायच तकलादू होते म्हणे तर काहींची डोकी फार उंच गेल्यामुळे तोल गेला होता काही मात्र पडले होते हकनाक ....माझ्या शहरात खूप पुतळे झालेत . . थोड्या वेळाने एका डोंगरावर चढलो तिथून दिसत होती ठिकठिकाणी भांडणारी लोकं काहींकडे कारणं होती भांडायची काही विसरून गेली होती कारणं भांडता भांडता काहींना माहिती नव्हती

मायीवाली ग्लोबल कविता

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 25/05/2016 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
'कविता वृत्तात हवी' 'हओ' 'कवितेला लय हवी' 'हओ 'कवितेत सुयोग्य यमक हवेत' 'हओ 'कविता जगातल्या कुठल्याही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी हवी' 'मंजे?' 'म्हणजे कविता ग्लोबल हवी रे' 'अच्छा!

बारा अमावास्यांचे अंधार

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 25/05/2016 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
संभोगावेशात मला तू एकट्याला सोडून गेलीस तेव्हा बारा अमावास्यांचे अंधार भोवती दाटून आले अन् आठ दिश्यांची वादळे अंगात भरून राहिली मग अनामिक ग्लानीने मी कोसळून पडलो. तू दिलेल्या सुगंधी सहवासाची आवर्तने भोवती रुंजी घालू लागली अन् मनात दाटले वासनामृग आवेशी गवतांचे भाले कुरतडू लागले, सारी हिरवळ नष्ट होवून मातीला सूर्य दिसू लागला पण माझ्याभोवती दाटलेल्या अंधाराला माझी दया आली नाही.

वारूळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 25/05/2016 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी सुटता सुटता टिपला फलाटावरील माणसांच्या दलदलीत रुतलेला तुझा कमळासारखा देखणा चेहरा.. स्लीव्हलेस ब्लाऊज व साडीतला तुझा मादक रेखीव आकृती बंध.. काहीतरी पडलेल उचलण्या साठी वाकली तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं.... गाडी सुटता सुटता ओझरतं झालेलं तुझं दर्शन रात्र झाली की क्षिताजा पर्यंत पसरते अंधाराची चादर निरव शांतता करते गप्प सारा कोलाहल.. अश्या वेळी क्षितिजा पालींकडून खुणावत असतो तुझा देखणा मादक आकृती बंध मला वारंवार अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत... अविनाश