भरोसा करावा कुणाचा जरी..
भरोसाच नाही कशाचा जरी..!
विचारेन त्यालाच कॉफी चहा
घरी दूत आला यमाचा जरी
मिळो गार माझी तुला सावली
किती त्रास मजला उन्हाचा जरी
मनी मान्य केले शशीचोर मी!
खुळा आळ आहे नभाचा जरी.
म्हणे वाघ गेल्याच जन्मातला
अता जन्म आहे सशाचा जरी
किती त्यात जो तो पुरा गुंतला
खरा खेळ होता मनाचा जरी
अरे वाकला तो कशाने असा.?
तसा भार नव्हता जगाचा जरी!
खरा भक्त त्याला मिळो एकदा
तिथे प्रश्न असला युगाचा जरी!
- कानडाऊ योगेशु
वाचने
2103
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
धन्यवाद रातराणी.
In reply to सुरेख! by रातराणी
आवडली रे योगेशा.
आवडली राव कविता.
काही कळली काही न कळली पण
सुरेख सुरेख !
अहा
का यो