मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

पगला गजोधर ·
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सचिन७३८ ·
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!! उध्दरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे ।। Babasaheb

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

आयुर्हित ·
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

आयुर्हित ·
आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.

महाभारत कथा: युद्धापूर्वी मंत्रीमंडळाची शेवटची बैठक

विवेकपटाईत ·
(उपस्थित सदस्य: सम्राट दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, दु:शासन, शकुनी, कर्ण आणि सभेत कधी कधी येणारा विकर्ण या शिवाय मुख्य शस्त्राधिकारी व गुप्तचर अधिकारी ) विकर्ण: महाराज, युद्धाचा निर्णय झाला आहे, पण आपण युद्धासाठी खरोखरच तैयार आहोत का?

मदतीचा हात हवाय…….

अनिकेत प्रकाश आमटे ·
नमस्कार ! हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते. ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत.

भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी

आयुर्हित ·
आलो रे धावून खास तुझ्यासाठी भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी करेल इच्छा पुरी चंद्रभागा काठी कर कटेवर ठेवुनी उभा हा जगजेठी ॥१॥ देईल सारे तुला जे सर्वांनाच हवे रोज रोज खाशील नवनविन मेवे सर्वांच्या आनंदाला उधाण यावे दही दुध तूप लोणी सर्वांनी खावे ॥ २॥ घेत असतो मी अधेमध्ये परीक्षा नापास झाल्यास देतो मोठी शिक्षा वेळ आली तर मागावी लागते भिक्षा अडल्याला करावी मदत ही खरी दीक्षा ॥ ३॥

बघतोय रिक्षावाला .. ग्ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

साळसकर ·
ट्रेन तशी रिकामीच होती, जे फर्स्टक्लास म्हटलं की ओघाने आलेच. पण जरा जास्तच रिकामी बघून ‘च्याईला सेकंडक्लासच्या तिकिटाने पण काम झाले असते की राव’ अशी चुटपुट लागलीच. आता एक पैसा वसूल झोप घ्यावी असे ठरवले आणि वारा खिडकीचे गज कापत आत येईल अशी विंडोसीट पकडून लवंडलो. दुसर्‍याच मिनिटाला डोळा लागला आणि पाचच मिनिटांत उघडावा लागला. च्याईला, फर्स्टक्लासमध्ये पण भिकारी. ते देखील इंग्लिशमध्ये गाणारे, पेटीच्या जागी गिटार आणि तबल्याच्या जागी ड्रमसेट. झोपेच्या नादात चुकून ट्रेन ईंग्लंडला तर नाही ना घेऊन आलो. श्या, वैतागतच डोळे उघडले तर समोरच एक महाशय मांडीवरती लॅपटॉप उघडून बसले होते.

वसुधैव कुटुंबकम

आयुर्हित ·
सध्या टीव्ही वर सुरु असलेली झी एंटरटेनमेंट इंटरप्राईस ची ही जाहिरात आहे ||वसुधैव कुटुंबकम|| The world is my family