माझी आई नेहमी म्हणत असते, "काय हल्लीची मुलं हुशार झाली आहेत, आम्ही ऐकल्या नाहीत आणी पहिल्या नाहीत अश्या गोष्टी काय सहजपणाने वापरतात, आदित्य जो खेळ खेळतो फोनवर तो खेळायचा मी विचार सुद्धा करू शकत नाहीं.”
असं काही ऐकलं कि मला मात्र खूप गोंधळून जायला होतं, कि हल्लीच्या मुलांचं कौतुक करावं कि ते जगत असलेल्या परिस्थितीची कीव करावी? मला तर कधी कधी वाटतं कि आईवडील मुलांना वेळ देण्याच्या कटकटीतुन सुटका करून घेण्यासाठी त्यांना हि सगळी खेळणी देत असावेत किंवा मुलाच्या मित्रा कडे आहे, म्हणजे त्याच्या कडे असलेच पाहिजे, ह्या भावनेतून देत असावेत, ह्याला पियर प्रेशर असं म्हणतात.