मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका लेखाची चाळीशी

हेमंतकुमार ·

कंजूस 19/09/2022 - 08:36
या वेळी कट्ट्याला आलो नाही . मागच्या वेळी मालक नीलकांतच्या कट्ट्याला भेटलो होतो. पुन्हा तसेच अकरा वाजता पळावे लागणार म्हणून आलो नाही.

शेखरमोघे 19/09/2022 - 08:40
नेहेमीसारखाच छान लेख. चाळीस वर्षान्पूर्वीच्या अनेक अडचणी आणि समजुती आजही कायम असाव्यात. Weaning : मराठी प्रतिशब्द : स्तनपानसमाप्ती (जरा बोजडच आहे, सुचला तसा मान्डला)

In reply to by शेखरमोघे

हेमंतकुमार 19/09/2022 - 09:43
सहमती. पण...
Weaning : मराठी प्रतिशब्द : स्तनपानसमाप्ती
नाही. कारण ही प्रक्रिया 'समाप्ती' नसते. ती काही महिन्यांची संक्रमण अवस्था असते. त्यामुळे इंग्लिशमधला ing प्रत्यय चपखल आहे. रच्याकने... स्तनपान हा अयोग्य शब्द आहे. तो "स्तन्यपान असा हवा. स्तन्य = अंगावरचे दूध.

चाळिस वर्षापूर्वीची परिस्थिती आता बरीचशी बदलली आहे. आणि मोबाईल आणि इंटरनेटच्या प्रसाराने ती अजून वेगाने बदलत आहे. चाळीस वर्षांपूर्वीचा लेख तुम्ही जसाच्या तसा दिला आहे (कोणतेही इतर संस्कार न करता) असे गृहीत धरुन लिहितो की तेव्हाही तुमची लेखनशैली छान होती. प्रत्येक मुद्द्याचा बारकाईने विचार करुन वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याची हातोटी तेव्हापासुनच आहे. Weaning साठी मराठीत "उष्टावण" हा शब्द आहे. लहान बाळांना पहिला घन आहार देण्याच्या कार्यक्रमाला "ऊष्टावण काढणे" असे म्हणतात. साधारण कोणतीतरी खीर बनवून मग ती मामाच्या सोन्याच्या अंगठीने बाळाला चाटवायची असे या कार्यक्रमाचे स्वरुप असते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पाषाणभेद 19/09/2022 - 09:47
उष्टावण छानच शब्द आहे. लेख व तेथील अनुभव छान आहेत. आता आर्थिक परिस्थिती ग्रामिण भागात सुधारलेली आहे. गाव कोणते होते इंटरशिपचे?

प्रचेतस 19/09/2022 - 09:29
लेख आवडला. तेव्हाही तुमचे लेखन उत्तमच होते. बाकी Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राच्या इतिहासात मजेदार माहिती आहे मात्र येथे अवांतर होईल म्हणून लिहित नाही.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 28/09/2022 - 20:39
Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राच्या इतिहासात मजेदार माहिती आहे. मात्र येथे अवांतर होईल
प्रचूवल्ली सर, एक वेगळा धागा जरूर यावा.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 28/09/2022 - 20:40

हा लेख वाचतांना, मेळघाटातील मोहोर, ह्या पुस्तकाची आठवण झाली.. मेळघाटात, असेच वातावरण आहे डाॅक्टर कोल्हे यांच्यावर आधारीत पुस्तक आहे जमल्यास जरूर वाचा

हेमंतकुमार 19/09/2022 - 09:50
1.
उष्टावण
>>> हा देखील या प्रक्रियेसाठी पूर्ण पटत नाही कारण उष्टावण म्हणजे फक्त “पहिला घन आहार” देणे. ‘विनिंग’मध्ये अंगावरचे दूध कमी करत करत संपूर्ण घन आहाराकडे वाटचाल करणे असे अभिप्रेत आहे. त्यामुळे हा सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी असतो. " ing " चा भाव शब्दात यावा. … 2.
Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे
>>> रोचक. सवडीने अन्यत्र वाचू.

माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ४० वर्षांपूर्वी लिहिला लेख वाचला तेव्हा पाटी कोरी होती. वाटले पहिल्या लेखाला पहीला प्रतिसादक बनण्याचा मान मिळणार. जोपर्यंत प्रतिसाद पुर्ण केला तोवर कंजूसभौच्या गळ्यात हे पदक पडलं.असो परत कधीतरी. पण बाकी पहिलं सगळं भारी असतयं बघा. पहीली शाळा,पहीला काॅलेजचा दिवस,पहीला नोकरीचा दिवस,पहीला कांदेपोह्याचा कार्यक्रम, पहिली रात्र आणी बरेच काही. हे सर्व अनुभव वेरूळ लेण्यातील शिल्पा सारखे मनावर कोरले जातात आणी कधीच पुसत नाहीत. लेख मस्तच झालाय. " देवीचा रोगी कळवा हजार रूपये मिळवा" ,असे चुन्याने भिंतीवर सर्व गावात लिहीलेले असायचे. एक लहान मुल म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) बद्दल तिथल्या डाॅक्टर इतक्याच माझ्या आठवणी. एकच सांगतो. नसरापुर ,भोर संस्थानातील महत्वाचं गाव. संध्याकाळचे चार एक वाजले असतील. शांत पसरलेल्या गावात अचानक आरडाओरड सुरू झाली. आजोबांच्या वाड्यासमोरच डाॅक्टर रहात होते. धोतराच्या एक काठीवर बनवलेल्या झोळीत एक न दिसणारा रोगी घेऊन आदिवासी लोकांची वरात डाॅक्टरां च्या घरासमोर थांबली. आगंणात खेळत असलेल्या मुलांनी गराडा घातला. वाटलं फुरसं,घोणस असं काही चावले आसलं. काहीच कळत नव्हत.आमच्यातल्या एका मोठ्या मुलाने गौप्यस्फोट केला, अरे,त्याने 'ते'. कापलयं. सगळ्यांच्या लक्षात आलं. अशा गोष्टी शिकवायला लागत नाही. डाॅक्टर डोक्याला हात लावून बसले. कुठलीच हात्यारे नाही काय करायचे. आडगाव असल्यामुळे वाहतूक साधन नाही. शेवटी मुक्कामाच्या एस टी ला गावातल्या ठाणेदार आणी डाॅक्टर ने पुण्याकडे पिटाळले. कुठलेच विषय नसणाऱ्या गावात हा विषय बरेच दिवस पुरला. १९७३ साली दुष्काळग्रस्त भागातील तत्कालीन सरकारने पाझर तलाव ,नाला बंडीग आणी अशी बरीच दुष्काळी कामे काढली होती. नुकताच मॅट्रिक झालो होतो. नोकरीच्या शोधात होतो. जातो का? नोकरी आहे म्हणून विचारणा झाली. एका पायावर तयार झालो. कुठे जायचंय "कळमोडी",भीमाशंकर च्या जंगलात एक खेडेगाव. गेलो पण या गावाने जो हिसका दाखवला की खरोखरच कळ मोडली. ती पहीली नोकरी, अनुभव जसाच्या तसा डोळ्यासमोर आहे. पण आता नाही परत कधीतरी.

हेमंतकुमार 19/09/2022 - 10:26
अभिप्राय, पूरक माहिती आणि अनुभवकथन याबद्दल आपल्या सर्वांचे आभार ! १. ,
मेळघाटातील मोहोर,
>>>> उपयुक्त माहिती. पाहतो. .. २.
पहीली शाळा,पहीला काॅलेजचा दिवस,पहीला नोकरीचा दिवस,पहीला कांदेपोह्याचा कार्यक्रम, पहिली रात्र आणी बरेच काही. हे सर्व अनुभव वेरूळ लेण्यातील शिल्पा सारखे मनावर कोरले जातात आणी कधीच पुसत नाहीत.
>>> अ- ग - दी -च ! तुमचे अनुभव आवडले.

In reply to by हेमंतकुमार

पोटफाडी म्हणजे काय माहीतीच असेल. प्रा. आ. के. बरोबरच गावात दुर लांबवर एक सहा बाय आठची दगडी उतरत्या कौलारू छपराची छोटीशीच खोली. या बाजुला सहसा कुणीच फिरकत नसे. अपघाती,खुन किंवा अनैसर्गिक मृत्यू झालेला मृतदेह ठेवायचे.वर्षाकाठी एखादा दुसराच. सफाई कर्मचारीच जवळपास सर्व काम करायचा. त्याचा त्याला अभिमान वाटायचा तर अशा वेळेस डाॅक्टर करता तो अर्जुनाचा कृष्ण असायचा. अशिक्षित गावकरी त्याला पोटफोडी म्हणायचे. पाश्चात्य वैद्यकीय शब्दसंग्रहाला समांतर असा गावकऱ्यांचा शब्दसंग्रह असे व तो ओळखणे, समजणे व औषधोपचार करणे नवीन सुरवात करणाऱ्या डाॅक्टर करता एक अव्हानच असे. आपला काय अनुभव.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 19/09/2022 - 12:19
पाश्चात्य वैद्यकीय शब्दसंग्रहाला समांतर असा गावकऱ्यांचा शब्दसंग्रह असे व तो ओळखणे, समजणे व औषधोपचार करणे नवीन सुरवात करणाऱ्या डाॅक्टर करता एक अव्हानच असे.
>>> अगदी बरोबर ! असे काही खास ग्रामीण शब्द ऐकण्यात आलेले आहेत जरा सावकाशीने लिहून काढतो

चाळीस वर्षात फरक पडलाय सुद्धा आणि नाही सुद्धा.
एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत. असे कितीतरी अडथळे आणि विसंगती.
यात सुधारणा झाली असली, तरी अजूनही पावसाळ्यात ओढे-नाले ओलांडता न आल्यामुळे शिक्षण, आरोग्य या सुविधांपासून वंचित राहावं लागणं हे खूपच सर्वसामान्य आहे. एक जवळचं उदाहरण. मांजरी खुर्द नदीच्या पलिकडे आहे. पावसाळ्यात (वेगवेगळे) ८-१० दिवस नदीवरचा पूल पाण्याखाली जातो आणि हडपसर किंवा पुण्यात येणार्‍या विद्यार्थ्यांचा खोळंबा होतो. नोकरदार आणि तातडीच्या रुग्णांना वाघोली-खराडी मार्गे हडपसर किंवा पुण्यात न्यावे लागते. मांजरी गाव पुणे मनपामध्ये समाविष्ठ होऊन ३-४ वर्षे झालीत. वेल्हा, मुळशी, आंबेगाव, जुन्नर या सह्याद्रीच्या कुशीतील खेड्या-वस्त्या-वाड्यांची स्थिती कशी असेल?
“सन २००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य” हे स्वप्न साकार होण्याआधी ‘गरिबी हटाव’ पूर्णतः साध्य होणे आवश्यक आहे.
हे हे हे! आता २०२२ सुरू आहे. आणि हा लेख अजून ४१ वर्षांनी तुम्ही "एका लेखाचे सहस्रचंद्रदर्शन" नावाने पुनर्प्रकाशित केला तरी तो Contemporary वाटेल.
“काय मग. मुलेबाळे किती?” “ पाच मुली आणि एक मुलगा ! आपल्या सर्व सवलती सरकारने बंद केल्यास बघा !” (त्याचाही अभिमान) “अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?” “डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!” एकदा मुलगा झाल्यावर मात्र नसबंदी करून घेण्याकडे वाढता कल जाणवे; त्यातही अर्थात पुरुषापेक्षा स्त्रीचीच.
मला अशी किमान चार कुटुंबे माहिती आहेत. तीन मुली झाल्यावर नवर्‍याचा चौथ्या प्रयत्नासाठी आग्रह असतो आणि बायकोला आणखी एक बाळंतपण नको असतं. "आता पुरे" असा आग्रह बायकोने सुरू ठेवल्यास तिची परिस्थिती त्या चौथ्या बाळंतपणापेक्षा वाईट होते!

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 19/09/2022 - 12:34
यात सुधारणा झाली असली, तरी अजूनही पावसाळ्यात ओढे-नाले ओलांडता न आल्यामुळे शिक्षण, आरोग्य या सुविधांपासून वंचित राहावं लागणं हे खूपच सर्वसामान्य आहे.
>>> +११११ अगदी बरोबर. अत्यंत वास्तव मांडलेत. यासंदर्भात एकदा डॉ. अभय बंग यांनी एक प्रयोग केला होता. त्यात त्यांनी अगदी लहान खेड्यातील एका हगवण झालेल्या बालकाच्या केसचा अभ्यास केला. त्या बालकाचा आजार तीव्र झाला आणि त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी पोचेपर्यंत सुमारे २४ प्रकारचे अडथळे आले आणि ते योग्य रुग्णालयात पोहोचू शकले नाही. ते बालक दगावले. यावर त्यांनी एक अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अडथळ्यांमध्ये आर्थिक परिस्थितीपासून अनेक नैसर्गिक, सामाजिक अडथळे वगैरे असे तपशील होते. अशा प्रकारच्या अनुभवातून त्यांनी ‘आरोग्य सेवा’ संदर्भात एक छान विचार असा मांडलेला आहे : “ One accurate measurement is infinitely superior to a thousand intelligent opinions”.

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 19/09/2022 - 12:39

>>> असे बिलकुल होऊ नये ! “आपण आशावादी असावे, ज्या काही सुधारणा होणे अपेक्षित असतात त्यात आपलाही वाटा असावा” वगैरे विचार डोक्यात कायम गर्दी करतात. परंतु इच्छा, अपेक्षा आणि वास्तव या फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असो. बघूया काय होतेय...... निदान अजून वीस वर्षांनी !

चौकस२१२ 19/09/2022 - 11:55
आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण नर्सेस क्वार्टर्सच्या अगदी समोर होते बरोबर मैत्रिणी नाहीत हे खरे दुःख ! काय हे डाक्टर ,, एकाच लेखात असा विरोधाभास ! अहो केवढे भाग्य होते तुमचे,,, विंजिनियर लोकांचे हाल काय असतात तुम्हाला माहित नाहीत बहुतेक,, अगदी निमशहरी भागात वसतिगृहात ७५० मुलं आणि १३ मुली असला प्रकार .... असो गम्मत केली हो ... लेख आवडला ... मराठीतील "पंचायत " मालिका काढली तर प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेला शिकावू डॉक्टर अशिव व्यक्तिरेखा रंगवीत येतील !

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 19/09/2022 - 14:02
असो गम्मत केली हो ...
गंमत आवडली तर ! त्याचं काय आहे ना.... निव्वळ एखादी क्वार्टर्स समोर असणे आणि दिवसाचे आठ तास प्रत्यक्ष एखादी सहकारिणी बरोबर काम करत असणे यात फार फरक आहे हो 😀 🙏

खुसखुशीत लेख आहे. आपली लेखनशैली तेव्हाही छान होती असे मत नोंदवतो. अजुनही नवशिक्या डॉ. ना खेड्यात ईटर्नशिप करावी लागते का? की प्रायव्हेट कॉलेजमधुन शिकलेल्यांना सवलत असते?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 19/09/2022 - 15:15
धन्यवाद.
अजुनही नवशिक्या डॉ. ना खेड्यात ईटर्नशिप करावी लागते का?
>> अलीकडे खेड्यातील (बहुतेक) २/३ महिनेच असावी. (१०/९ महिने शहरातील रुग्णालयात). सरकारी कॉलेजमध्ये इंटरनशिपचे बर्यापैकी विद्यावेतन मिळते. खाजगी कॉलेजमध्ये विनावेतन करावी लागते. माफ कोणालाच नसते.

वामन देशमुख 19/09/2022 - 17:30
तुमचं पाहिलंवहिलं लिखाण आवडलं. लेखनशैली तेंव्हाही अगदी चांगली होती असे म्हणता येईल. --- अवांतर: शाळेत जाण्याचा रस्ता गावातल्या मुख्य बाजारपेठेतून जायचा. तेंव्हा लेखात दिलेली तांबीची वगैरे जाहिरात दिसायची. सुरुवातीला "दोन किंवा तीन मुले पुरेत" मग "दोनच पुरेत" शेवटी "मुलगा असो की मुलगी, एकच पुरे" अशी त्यात प्रगती होत गेली. (आणि आतातर मिपावर डिंकाचे लाडू खाण्याचे दिवस आलेत!) नुकतेच बऱ्यापैकी मराठी वाचता येऊ लागले होते. मग लहानग्या जॉर्जच्या कुऱ्हाडीप्रमाणे जे दिसेल ते सगळे आम्ही वाचत सुटायचो आणि "तांबी म्हणजे काय?" असे प्रश्न मोठ्यांना विचारून मग रागावून घ्यायचो. त्याशिवाय, "सुरक्षित अंतर ठेवा - दोन वाहनांत, दोन मुलांत" याचा अर्थ प्रभातफेरीला जाताना आपल्या पुढच्या मुलापासून थोडंसं अंतर ठेवायचे आहे. (हा अर्थ चक्क आमच्या इतिहासाच्या सरांनी आम्हाला सांगितला होता!) "पाळणा लांबवा" म्हणजे बाळाचा झुलणारा पाळणा आपल्या डोक्याला लागू नये म्हणून तो दूर राहील अश्या प्रकारे त्या खोलीतून जावे. (हे आमचंच लॉजिक होतं!) इतर पाठ झालेली वाक्ये म्हणजे - जुलाब होता बाळराजा, मीठ साखर पाणी पाजा. कुठलाही ताप, असू शकतो हिवताप. येत कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची. देवीचा रोगी कळवा, १००० रुपये मिळवा. --- शासकीय आरोग्य संबंधित जाहिरातींपैकी लक्षात राहिलेली कदाचित शेवटची म्हणजे - "बोल सखी बोल तेरा राज क्या है..." ही माला-डीची जाहिरात! --- अतिअवांतर: लहानपणी मेलडी चॉकलेट खायचे आणि मोठेपणी माला-डी गोळ्या खायच्या हा आयुष्यातील आकर्षकतेपासून ते आवश्यकतेपर्यंतचा प्रवास चित्रित करणारी प्रदीर्घ कादंबरी कुणी लिहिली आहे का? 😜

In reply to by वामन देशमुख

हेमंतकुमार 19/09/2022 - 17:43
धन्यवाद. सुंदर प्र. !
लहानणी मेलडी चॉकलेट खायचे आणि मोठेपणी माला-डी गोळ्या खायच्याप
>>> मस्त, आवडले ! इतर घोषणाही सर्व आठवल्या. त्या काळी अजून एक सुंदर व्यंगचित्र आरोग्य विभागाने काढले होते. त्यात नवव्या महिन्यात इतके पोट वाढलेला पुरुष दाखवला होता आणि खाली लिहिले होते : “पुरुषांवर अशी वेळ आली असती तर त्यांनी नक्कीच प्राधान्याने कुटुंब नियोजनाचा विचार केला असता !”

In reply to by वामन देशमुख

हेमंतकुमार 30/09/2022 - 21:01
नुकतीच माता बाल आरोग्य संबंधीची एक चांगली जाहिरात महाराष्ट्र शासनाने प्रसारित केली आहे. त्यातले ब्रीदवाक्य सुरेख : मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:24
कुमार सर, चाळीस वर्षांपूर्वीचा लेख म्हणजे थोडी तरी अपरिपक्वता अपेक्षित होती :-) पण तुमच्या तेव्हाच्याही लिखाणात चिकित्सा, स्थिरता, परिपक्वता जाणवतात! _/\_ डॉ. अभय बंग यांचा हा विचारही आवडला:
One accurate measurement is infinitely superior to a thousand intelligent opinions

हेमंतकुमार 20/09/2022 - 09:17
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! आज मीच माझा परीक्षक म्हणून या लेखाकडे पाहिल्यास काही विधानांचा किंवा मुद्द्यांचा मला पुनर्विचार करावा वाटेल. वाचकांना लेख आवडला याचा आनंद वाटतो

In reply to by शाम भागवत

हेमंतकुमार 28/09/2022 - 12:41
**हे विचारही वाचायला आवडतील. >>> लेखातील खालील उल्लेख: १.
एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत.
>>> देशातील सर्वांच्या मूलभूत गरजा भागल्याशिवाय आपण वैज्ञानिक प्रगतीवर किती लक्ष द्यावे आणि खर्च करावा हा खूप विचार करण्याचा मुद्दा आहे. आजही माझ्याकडे याचे समाधानकारक उत्तर नाही ! परंतु, वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजधुरिणांची काही अभ्यासपूर्ण मते वाचनात आलेली आहेत. त्यावर मी विचार करत राहतो. तरीसुद्धा विधानाच्या कोणत्या भागाकडे अधिक आणि प्राधान्याने लक्ष द्यावे हा पेच मला कोड्यात टाकतो.

In reply to by शाम भागवत

हेमंतकुमार 28/09/2022 - 13:38
२.
दारू पिऊन बायकोला मारझोड करणारा नवरा हा आर्थिक व सामाजिक विषमतेतूनच निर्माण होत नाही का?
>>> प्रथम ही जी निंद्य व्यक्ती आणि प्रवृत्ती आहे त्या दोन्हीचा निषेध. पण असा पुरुष समाजात निर्माण व्हायला तो एकटा जबाबदार आहे का ? आजूबाजूचा समाज देखील कारणीभूत असतो ना? या दोष- जबाबदारीची जर व्यक्ती आणि समाज अशी विभागणी करायची झाली, तर ती आपण कशी करावी: 99 :1 80 :20 का 50: 50 ? पुन्हा एकदा विचारांच्या गर्तेत पडायला होते.

टर्मीनेटर 20/09/2022 - 10:42
मस्त लिहिला होतात कि हा लेख चाळीस वर्षांपूर्वी 👍 बाकी लेखाशी सुसंगत अशा लहनपणी वाचलेल्या दोन सरकारी घोषणा अजूनही आठतवतात. एक एस.टी. बसच्या मागच्या बोर्डावर लिहिलेली, "तांबी बसवा... पाळणा लांबवा..." आणि दुसरी ग्रामीण भागांत भिंतींवर लिहिलेली, "गप्पी मासे पाळा...हिवताप टाळा..."

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 20/09/2022 - 12:41
**"गप्पी मासे पाळा...हिवताप टाळा..." >>> ही जाहिरात तर अजूनही काही भिंतीवर दिसेल. या संदर्भातील माझा २००२ ते ४ च्या दरम्यानचा एक अनुभव लिहीतो. त्या काळात मी पुणे लोणावळा लोकल ट्रेन ने नियमित प्रवास करत होतो. माझ्या डब्यात नेहमी एक रेल्वे कर्मचारी असायचे. साधारण दापोडी च्या आसपास ते आसनावरून उठून दारात जायचे आणि तिथून खाली जो नदीचा प्रवाह आहे त्यात त्यांच्या पिशवीतलं काहीतरी टाकायचे. माझा असा समज झाला होता की हा माणूस नदीत निर्माल्य टाकतो आणि त्यामुळे मनात एक प्रकारचे अढी निर्माण झाली होती( प्रदूषण वगैरे). एकदा ते आणि मी असे दोघेच डब्यात होतो तेव्हा मी माझे कुतूहल शमवले आणि त्यांना विचारले की तुम्ही नदीत काय टाकता ? तेव्हा ते म्हणाले, की मी गप्पी माशांसाठी जे खाद्य लागते ते टाकतो. जेवढे गप्पी मासे नद्यांमधून वाढतील तेवढे चांगलेच. हे ऐकल्यावर मी त्यांचे कौतुक केले आणि त्यांना मनोमन वंदन केले !

आधीच्या प्रतिसादात लिहायचं राहिलं ते लिहिते. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे, भात खाल्ला तर जखमेत पू होतो याचा मी देखील अनुभव घेतला आहे. माझ्या लहानपणी आम्ही काही वर्ष वालचंदनगरला राहायचो. तिथे एक शहा नावाचे डॉक्टर होते. ते नेहमी रंगीबेरंगी औषध गोळ्या द्यायचे. मी लहानपणी खूप धडपडी असल्याने मला नेहमी कुठे न कुठेतरी जखम झालेली असायची. तर, शहा डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांचं सांगणं असायचं, भात खाऊ नको. बरं...नाही खात. दोन दिवसांनी ड्रेसिंगला गेल्यावर bandage काढले की त्यांचा पहिला प्रश्न, hmm, काय खाल्लं काल? किती भात खाल्ला?... नाही खाल्ला, पोहे खाल्ले फक्त! ... अगं पोहे म्हणजे भाताचा भाऊ ना? बघ किती पस झालाय ते... मग ते hydrogen peroxide टाकायचे आणि जखम स्वच्छ करायचे. आणि मला इतक्या वेळा लागलेलं असायचं की त्या सगळ्या भानगडीत माझं भात खाणं कमी झाल ! तर आजतागायत मला हा प्रश्न पडला आहे, की खरंच असं काही संबंध असेल का? की आपलं अनमान धपक्याने या गोष्टी घडतात?

In reply to by चष्मेबद्दूर

हेमंतकुमार 20/09/2022 - 12:11
@ च ब भात खाल्ल्याने जखमेत पू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. थोडे अधिक समजून घेऊ. जखमेत पू होण्याचा अर्थ जंतुसंसर्ग होणे. जर एखाद्या व्यक्तीला अनियंत्रित मधुमेह असेल तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे जास्त असते आणि त्यामुळे कुठल्याही जखमेत जंतुसंसर्ग व्हायला सहज आमंत्रण मिळते. पूर्ण ठणठणीत निरोगी व्यक्तीने भात खाल्ला काय किंवा पोळी भाकरी खाल्ली काय, त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे नॉर्मलच असणार ना ! त्यामुळे वरील समज हा पूर्णपणे अशास्त्रीय आहे.

In reply to by चष्मेबद्दूर

चौकस२१२ 20/09/2022 - 15:34
चष्मेबद्दूर, पुढे डॉक्टर कुमार यांनी भात आणि "रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण" संधर्भ दिला आहे त्या नुसार डॉक्टर शहा काळजी घेत असतील असे गृहीत धरले तर दोन शक्यता उदभवतात १) लहानपणी आपल्याला मधुमेह झाला होता किंवा २) उगाच धोका नको म्हणून डॉक्टर शहा धरून चालले कि या मुलाला मधुमेह झाला आहे पण असे गृहीत कसे काय एखादा चला वैद्य धरू शकेल? पण या पैकी काहीच नसेल तर मग डॉक्टर शहा असे का विचारायचे ? डॉक्टर कुमार काही सांगू शकाल का ?

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 20/09/2022 - 15:52
मी न पाहिलेल्या एखाद्या डॉक्टरांच्या पदवी किंवा अभ्यास शाखेबद्दल कोणतीही माहिती नसताना त्यावर मी टिप्पणी करणे योग्य नाही. मी जे आधुनिक वैद्यक शिकलो त्यानुसार स्पष्टीकरण मी दिलेले आहे. त्याचे अनेक संदर्भ कोणीही जालावर सुद्धा पाहू शकतात. याउपर जर काही वेगळ्या उपपत्ती/ सिद्धांत असतील तर त्या संबंधिताने पुढे येऊन मांडाव्यात एवढेच म्हणता येईल. अर्थात त्याचे संदर्भ दिल्यास बरे होईल.

In reply to by चौकस२१२

हे खरंय की नंतर जेंव्हा जेंव्हा काही जखमा झाल्या त्या वेळेला भात खाऊन / न खाऊन ज्या वेळेला त्या बऱ्या होणार तेंव्हाच आणि तशाच बऱ्या झाल्या. मला डॉ नी वरती उल्लेख केल्यामुळे माझ्या lahanapnchi आठवण झाली हे खरं. आणि मी काही नंतर परत त्याची उकल करत बसले नाही. पण आता शोध घेतेच. काय भानगड होती ते.... (मला मधुमेह नव्हता आणि नाही.)

वामन देशमुख 20/09/2022 - 13:11
भात खाल्ल्याने जखमेत पू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
याबद्धल दुमत नाहीच, पण भात, वांगी वगैरे पदार्थ खाल्ल्याने पू होतो असे आमच्या लहानपणी सगळेच मोठे लोक (गावातील डॉक्टर्स देखील) सांगायचे. मीदेखील आत्तापेक्षा लहान असताना खूप धडपड्या होतो आणि बऱ्याचदा कुठेतरी काहीतरी लागलेले असायचे. मग भात खायला मिळायचा नाही. --- अवांतर १: पू, शेंबूड इत्यादी बाबी २०-३०-४० वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजकाल कमी झाल्यात का? अवांतर २: आमच्या शाळेच्या पुस्तकांत पटकी, विषमज्वर, गोवर, स्पायरोगायरा वगैरे रोग असायचे; आजकाल कमी झालेत का?

In reply to by वामन देशमुख

हेमंतकुमार 20/09/2022 - 14:20
१. आहार आणि आजार या संदर्भातील अभ्यास व संशोधन ही काही कायमस्वरूपी स्थिर असलेली गोष्ट नाही. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या संशोधनातून जुने गैरसमज दूर होतात आणि नवीन उपपत्ती समोर येतात. या संदर्भातील मधुमेह आणि आहार या संदर्भात समजुती कशा बदलल्या ते सांगतो. 1980 च्या दशकात पोळी आणि भात यांच्या रक्तातील ग्लुकोज वाढवण्याच्या प्रमाणावरून खूपच बाऊ केला गेलेला होता. मधुमेह झाला म्हणजे जणू काही भात बंद करायचा असे सल्ले अनेक डॉक्टरही देत असत. कालांतराने त्यात बदल झालेला आहे. या दोन्ही धान्यांच्या glycemic इंडेक्स मध्ये जरी फरक असला तरी तो बाऊ करण्या इतका नक्कीच नाही. त्यामुळे भात बंद वगैरे सल्ला देणे साधारण 90 च्या दशकांमध्ये तसे बंद झाले. इथे मुद्दा हा आहे, की एका वेळेस जे काही उष्मांक आहाराद्वारे मिळणार आहेत ते प्रमाणात ठेवणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे रोजच्या महाराष्ट्रीयन जेवणात पोळी आणि भात हे एका जेवणात खाल्ले जाते. त्यातून गरजेपेक्षा जास्त उष्मांक शरीरात जातात आणि मग रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जेवणानंतर झपझप वाढते. त्यामुळे अलीकडे तज्ञांचे असे मत झालेले आहे की एका जेवणात एकच धान्य कर्बोदकांच्या रूपाने खाल्ले जावे- म्हणजेच पोळी किंवा भात यापैकी काहीतरी एकच एकावेळी खाणे योग्य. जोडीला प्रथिनांसाठी वरण पाहिजेच. याच्या जोडीला कच्चे खाण्याचे प्रमाण वाढवणे आणि शिजलेल्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे हे ओघाने आलेच. अमुक एक पदार्थ खाणे आणि जखमेत पू होणे यांचा मात्र काहीही संबंध नाही यावर मी ठाम आहे.

In reply to by हेमंतकुमार

चौकस२१२ 20/09/2022 - 15:39
त्यामुळे अलीकडे तज्ञांचे असे मत झालेले आहे की एका जेवणात एकच धान्य कर्बोदकांच्या रूपाने खाल्ले जावे यावरून आठवले उत्तर हिंदुस्थानी मित्र म्हणतात कि आमच्य्या आहारात एक वेळीस एकतर राजमा चावलं/ मांसाहार किंवा मग रोटी + भाजी / मांसाहार असे असते एकाच वेळी दोन्ही नसते पण हे तरी खरे का?

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 20/09/2022 - 16:02
एकूण आहार = 30 टक्के कच्च म्हणजे कोशिंबिरी + उरलेल्या 70 टक्के मध्ये कर्बोदके, प्रथिने आणि किमान मेद पदार्थ याचे योग्य ते प्रमाण ठेवले म्हणजे झाले. वरण, उसळ की मांसाहार हे ज्याने त्याने आपापले ठरवावे. होतं काय की बहुसंख्या भारतीय आणि प. आशियाई आहारामध्ये कर्बोदके ठासून भरणे हे परंपरागत आहे. अगदी महाराष्ट्राचेच बघाना : पोट भरेपर्यंत पोळ्या/ भाकरी खायची आणि मग समाप्तीचा म्हणून पुन्हा भात वर ढोसायचा ! ज्या दिवशी उकडलेल्या बटाट्याची चमचमीत भाजी खातोय त्या दिवशी एक पोळी आपसूक वजा व्हायला हवी :) याच्या जोडीला शारीरिक हालचाली, व्यायाम दिवसेंदिवस कमी होत चाललेले. साधे तीन मजले जिने उतरताना सुद्धा आपल्याला लिफ्ट पाहिजे. कोपऱ्यावर भाजी आणायला जाताना स्वयंचलित वाहन पाहिजे. .... मग का नाही मोठ्या प्रमाणावर मधुमेह , इ. फोफावणार ?

In reply to by वामन देशमुख

सुरिया 20/09/2022 - 14:27
आमच्या शाळेच्या पुस्तकांत पटकी, विषमज्वर, गोवर, स्पायरोगायरा वगैरे रोग असायचे; आजकाल कमी झालेत का?
स्पायरोगायरा नावात रोग असला तरी ती वनस्पती/शैवाल असायची ना? आकृती काढताना त्याची ती डीएनए सारखी संरचना लक्शात आहे अजून.

In reply to by वामन देशमुख

हेमंतकुमार 20/09/2022 - 14:39
२. विषमज्वर बऱ्यापैकी होत असतो पटकी : याचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. परंतु पावसाळ्यात अधून मधून उद्रेक होतात. दहा वर्षातील भारतातील एकूण केसेसचा आढावा घेणारा संख्याशास्त्रीय अहवाल इथे वाचता येईल : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9099871/ गोवर : लसीकरणामुळे नियंत्रणात आहे परंतु तरीही आजार होतो. यावर्षी गेल्या काही महिन्यांमध्ये गंभीर(fatal) गोवराने झिंबाब्वे मध्ये किती हाहाकार माजवला आहे ते इथे वाचता येईल : https://www.bloomberg.com/news/articles/2022-09-05/zimbabwe-says-measles-outbreak-has-killed-700-children

In reply to by वामन देशमुख

हेमंतकुमार 20/09/2022 - 19:13
३. पू, शेंबूड इत्यादी बाबी २०-३०-४० वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजकाल कमी झाल्यात का? >>> असे मला अजिबात वाटत नाही. शासकीय किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये येणारे अत्यंत खराब स्थितीतले काही रुग्ण पाहण्यात येतात. त्यांच्या जखमामधले पू सामान्य माणसाला बघणार नाही इतके भयानक असतात. विविध ऍलर्जीचे प्रमाण तर वाढलेले आहे. त्यामध्ये नाक आणि श्वसन मार्गावर आघात होतोच त्यामुळे शेंबूडनिर्मिती होतच असते. असे भरपूर लोक दिसतात

तर्कवादी 20/09/2022 - 17:19
छान लेख या निमित्ताने "लाखों मे एक" या वेबसिरीजच्या दुसर्‍या पर्वाची आठवण झाली. बर्‍यापैकी वास्तव वाटावे असे चित्रण असलेली , सामाजिक आशय मांडणारी ही वेबसिरीज आवर्जुन बघण्याजोगी आहे.

हेमंतकुमार 20/09/2022 - 17:48
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल वरील सर्वांचे आभार ! "
लाखों मे एक"
ही मालिका कोणत्या ओटीटीवर आहे ?

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 20/09/2022 - 19:58
मग सवडीने नक्की बघेन.
जमल्यास अभिप्रायसुद्धा द्या.. अशा वेबमालिका फारसं कुणी बघत नाही. बहुतेकांना वेगवान थ्रिलरच फक्त बघायच्या असतात.

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 20/09/2022 - 20:07
मग सवडीने नक्की बघेन.
दुसरे पर्व बरं का .. म्हणजे पहिलेही तुम्ही बघू शकता पण मी ते पाहिलेले नाही त्यामुळे मी इथे फक्त दुसरे पर्व सुचवत आहे.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 20/09/2022 - 20:19
"लाखों मे एक" ही मालिका मला प्राईम वर काही सापडली नाही. तुम्ही फार पूर्वी पाहिली आहे का? आता त्यांनी काढली असावी का पूर्ण नाव वेगळे आहे ? भारताबाहेरच्या प्राईम मध्ये नाही ना?

In reply to by नचिकेत जवखेडकर

हेमंतकुमार 21/09/2022 - 12:40
हे सरकारमान्य आहे का ?
खरं म्हणजे नाही, परंतु आपल्याकडे नियमांची कडक अंमलबजावणी होत नाही. मध्यंतरी आयुर्वेदिक डॉक्टरांना काही ठराविक प्रकारच्या शल्यक्रिया करण्यासाठी परवानगी दिल्याचे वाचले होते. त्यावर खूप वाद झाला पुढे त्या प्रकरणाचे काय झाले ते माहित नाही. कदाचित न्यायप्रविष्ट असावे.

चौथा कोनाडा 21/09/2022 - 13:18
सुंदर लेख !
“ हो, इंटर्नशिपसाठी आलोय, प्रशिक्षण असतं आमचं” “म्हंजे शिकावू डॉक्टर म्हना की !” ... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.
“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?” “डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”
“डॉक्टर, आम्ही काय पैशासाठी आपरेशन करतो का? ते जादूवाली भानगड काय नगं. पद्धतशीर टाक्याचे आपरेशन होऊ द्या. पायजे तर आम्ही पैसे देतो !”
अश्या खुसखुशीत किस्स्यांमुळे लेख अ ति शय वाचनीय झाला आहे ! ३०-३५ वर्षांपुर्वी माझा एक डॉक्टर नातेवाईक उमेदवारीच्या काळात पानशेतजवळच्या दुर्गम भागात प्रॅक्टीस करत असे ... त्याच्या बरोबर ५-७ दिवस राहण्याचा योग आला ... असेच काहीबाही किस्से घडायचे त्याची आठवण झाली ! खुप छान कुमार१ साहेब ... आणखी किस्से वाचायला आवडतील !

In reply to by चौथा कोनाडा

हेमंतकुमार 22/09/2022 - 07:25
धन्यवाद तुमचे उत्साही रसग्रहण आवडले. लेखातील सहा महिन्यांच्या कालावधीत आयुष्यातील एक गोष्ट पहिल्यांदा केली होती ती म्हणजे नीलपट (XXX) पाहणे. परंतु हा लेख मुळात कॉलेजच्या वार्षिकासाठी असल्याने हे त्यात लिहीणे तेव्हा तरी नको वाटले होते.! या चोरट्या अनुभवाबद्दल सविस्तर या धाग्यात लिहीलेलेच आहे.

In reply to by चौथा कोनाडा

हेमंतकुमार 29/09/2022 - 16:32
दोन किंवा तीन मुले पुरेत च्या त्या जमान्यात लोकशिक्षणाच्या हेतूने हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. जरूर ऐका : आता पेटेना माझी चूल नको हे चौथ मूल… https://youtu.be/UiCEopmJZSs

अनिंद्य 24/09/2022 - 21:30
'युनिव्हर्सिटी ऑफ पूना', 'दोन किंवा तीन पुरेत' वगैरे चित्रांवरून काळ लक्षात आला आणि सोबतीला प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध झालेले लेखन, आवडलेच ! साधारण २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत मध्यम लोकवस्तीच्या गावातूनसुद्धा सरकारी दवाखाना असे, तिथे कंपाउंडर, नर्सबाई /मिडवाईफ असत. डॉक्टर 'रोज' OPD ला थोडावेळ / काहीवेळ का असेना उपलब्ध असत आणि क्रोसीन / मलेरियाच्या क्विनाईन सारखी औषधे 'विनामूल्य' उपलब्ध असत. मग पुढे शिक्षणसेवकाच्या धर्तीवर 'आरोग्य सेवक' आले आणि ....... ह्या लेखामुळे अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती आठवल्या. मुद्देसूद लिहिण्याचे, प्रसंग खुलवण्याचे आणि उत्तम भाषा वापरण्याचे कसब हे तुम्ही फार कमी वयातच कमावले होते हे दिसून आले !

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 25/09/2022 - 02:52
*युनिव्हर्सिटी ऑफ पूना', >>> पुण्याचे ब्रिटिशकालीन नाव लक्षात यावे हा हेतू होताच. पुढे मी एमडी झालो तेव्हा मात्र नाव पुणे केले होते आणि त्या पदवीचे प्रमाणपत्र इंग्लिश व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असल्यामुळे आकाराने भले मोठे आहे ! अजून एक दिसेल. तेव्हा तशी प्रमाणपत्रे घाऊक प्रमाणावर छापलेली होती आणि एमबीबीएस चे कोणते वर्ष (एक दोन का तीन) ते चक्क बॉलपेनने लिहिले जात होते. .... *पुढे शिक्षणसेवकाच्या धर्तीवर 'आरोग्य सेवक' आले आणि ग्रामीण महाराष्ट्रातून ठीकठाक दर्जाची....>>> +११११ अधोगती.....

चामुंडराय 28/09/2022 - 02:42
तुमच्या खास "कुमारेक लेखन शैलीचा" तरुण लेख आवडला. तुम्हीच मिपा व इतरत्र प्रचलित केलेल्या शब्दात सांगायचे झाले तर लेख "रोचक" आहे. आणि लेखात तत्कालीन समाज जीवनाचे यथायोग्य दर्शन घडते. "हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" अशा भित्तीघोषणा बघितल्या आहेत किंवा "बाळाला द्या बॉन बॉन, बाळ होईल गुटगुटीत छान" अशा जाहिराती येष्टीत बघितल्या आहेत. आयुर्वेदामध्ये पथ्य ह्या संकल्पनेला खूप महत्व आहे. कोणते खाद्यपदार्थ कोणत्या आजारासाठी तारक किंवा मारक आहेत ह्याबद्दलचा अभ्यास आहे. तेव्हा आधुनिक वैद्यकीय आणि आहार शास्त्राला कदाचित अजून ह्या गोष्टींचा उलगडा झाला नसेल काय अशी शंका मनात डोकावते.

In reply to by चामुंडराय

हेमंतकुमार 28/09/2022 - 05:35
धन्यवाद ! १. खरं सांगायचं तर रोचक हा शब्द मी मराठी संस्थलावर येण्यापूर्वी अजिबात वापरत नव्हतो. मी तो इथेच कुठेतरी शिकलो. पूर्वी रुचकर शब्द माझ्या वापरात होता. २.
कोणते खाद्यपदार्थ कोणत्या आजारासाठी तारक किंवा मारक आहेत
शंका योग्य आहे. आधुनिक वैद्यकातही ठराविक गोष्टी खाव्यात किंवा खाऊ नयेत असे काहींच्या बाबतीत सप्रमाण सिद्ध केले गेलेले आहे. ते स्पष्टीकरण आपल्याला समजते आणि पटते. पारंपरिक माहितीच्या बाबतीत असे संशोधन संदर्भासहित स्पष्ट केलेले वाचायला मिळाले तर आनंदच होईल.

In reply to by चामुंडराय

हेमंतकुमार 28/09/2022 - 08:44
आहार व आजार आणि आधुनिक वैद्यक यांची सुरेख सांगड गाऊट च्या बाबतीत घातलेली दिसते. अशा रुग्णांना जो आहार सल्ला दिला जातो त्यामध्ये: *अमुक एक पदार्थ टाळा, *अमुक एक प्रमाणात चालतील व *अंड्यासारखे पदार्थ प्राणीजन्य असले तरी जरूर खा असा संशोधनसिद्ध त्रिस्तरीय सल्ला दिलेला आहे. या संदर्भातील हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

हेमंतकुमार 27/07/2023 - 18:39
मध्यरात्री चिखलात अडीच किलोमीटरची पायपीट, प्रसूतीवेदना अन् पाऊस, गर्भवती महिलेचा मृत्यू ,मन सुन्न करणारी घटना. सदर गर्भवतीला झोळीतून नेण्यात आले हे वाचूनही वाईट वाटले. … जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील अन्य एका गर्भवतीची बातमी सुद्धा मन हेलावून टाकणारी आहे. तिला लाकडी ओंडक्यावर बसवून नदीतून प्रवास करून रुग्णालय गाठावे लागले.

प्रास्ताविक : माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ३९ वर्षांपूर्वी लिहिला. तेव्हा मी नुकताच एमबीबीएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर एक वर्षे इंटर्नशिपचा कालावधी असतो. त्या काळी त्यापैकी सहा महिने ग्रामीण भागात राहायला लागायचे. मी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात माझे ग्रामीण प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वास्तव्याच्या अनुभवावर आधारित मी प्रस्तुत लेख लिहिला. तो नंतर कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला. यंदा त्या प्रथम लेखनाने चाळीशीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त तो लेख जसाच्या तसा इथे प्रकाशित करीत आहे.

मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग

मार्गी ·

In reply to by धर्मराजमुटके

MipaPremiYogesh 12/09/2022 - 22:41
मी एका सायकलिस्ट मित्राला विचारात होतो तेंव्हा त्याने सांगितली कि त्याच्या बायकोची सायकल विकायची आहे मी तात्काळ खरेदी केली , दीड वर्षांपूर्वी ७, ५०० ला घेतली. FB मार्केटप्लेस वर तुम्ही बघू शकता

मार्गी 21/09/2022 - 15:39
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार! @ कंजुस जी, हो, खरं आहे. पण जीवनात प्रत्येक क्षणी अपघाताची शक्यता आहेच. सायकलिंग तसंच आहे. @ धर्मराज मुटके जी, ओएलएक्सवर असतात. किंवा काही सायकलिंग ग्रूप्सवरही येतात सूचना. आपल्याला कशा स्वरूपाची सायकल हवी आहे व कशी राईड करू इच्छिता, त्यानुसार अनेक पर्याय समोर येऊ शकतात.

मार्गी 27/09/2022 - 15:43
सर्वांना नमस्कार. ह्या मोहीमेचा दिवस 4 पूर्ण झाला. कुडाळ- गोवा (बिचोलिम) 72 किमी, नंतर बिचोलिम- बेळगांव 89 किमी, नंतर बेळगांव- लोकापूर 107 किमी व आज लोकापूर- बागलकोट- कोल्हार 71 किमी राईड झाली. अतिशय जबरदस्त अनुभव मिळतोय. साध्या सायकलीवरही सह्याद्रीतला चोरला घाट बराचसा चढता आला. सायकलीने खूपच छान साथ दिली आहे. वाटेत अनेक संस्था- ग्रूप्स व लोक भेटत आहे. खऱ्या अर्थाने incredible India चा अनुभव येतोय. खूप लोकांशी संवाद साधता येतोय. शक्य होईल तसे अधून मधून अपडेटस देईनच. धन्यवाद.

मार्गी 02/10/2022 - 12:57
सर्वांना नमस्कार. ह्या सायकल प्रवासाचे 9 दिवस पूर्ण झाले. 9 दिवसांमध्ये साधारण 785 + किमी झाले. आज हैद्राबादला पोचलो. अनेक ठिकाणी विद्यार्थी, शाळा, वेगवेगळ्या संस्था व अन्य लोकांसोबत भेटी व चर्चा होत आहेत. अजून 9 दिवस बाकी आहेत व 11 ऑक्टोबरला नागपूरला सायकल प्रवास संपेल. सर्वांना धन्यवाद.

मार्गी 14/10/2022 - 14:11
सर्वांना नमस्कार. सिंधूदुर्ग- गोवा- कर्नाटक- तेलंगणा- गडचिरोली- नागपूर हा सायकल प्रवास ११ ऑक्टोबर रोजी ठरलेल्या प्लॅननुसार पूर्ण झाला. १८ दिवसांमध्ये साधारण १४४२+ किमी पूर्ण झाले. ह्या प्रवासामध्ये मदत व सोबत करणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ह्या प्रवासात खूप वेगळे अनुभव आले. विद्यार्थी व मुलांसोबत माझा फिटनेसचा आनंद शेअर करता आला व व्यायाम व मानसिक आरोग्याबद्दल त्यांच्यासोबत शेअरिंग करता आलं. ह्या प्रवासात सोबत असलेल्या सर्व संस्थांना धन्यवाद. त्याबरोबर निसर्गालाही धन्यवाद. आणि ज्या सायकलने सर्व खड्डे, धक्के सहन केले व विलक्षण म्हणजे इतक्या अंतरातही तिचं पंक्चर झालं नाही, तिलाही धन्यवाद. लवकरच ब्लॉगमध्ये अनुभव लिहेन. धन्यवाद.

4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर नमस्कार. आपण ठीक आहात अशी आशा करतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. अनेकदा आपण बघतो की, लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात (वस्तुत: कोणतंही मोठं सांगितलं जाणारं कारण हे एवढी मोठी गोष्ट करण्यासाठी नेहमीच किरकोळ असतं). कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे.

थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिकता

हेमंतकुमार ·

विवाहपुर्व समुपदेशन हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहेच पण वैद्यकीय जागरूकता व आसलेल्या आजाराची स्वीकारार्हता त्याहूनही अधिक महत्त्वपूर्ण आहे. स्किझोफ्रेनिया हा मनाचा एक तीव्र प्रकारात मोडणारा विकार. यात त्या व्यक्तीला भास होतात. संशय वाटू लागतो पती-पत्नीला चारित्र्याबद्दल संशय येणं, कधी आपण खूप ‘ग्रेट’ आहोत, महान आहोत असं वाटणं हे भ्रम होऊ शकतात. याच आजारात कानात कोणी बोलत आहे, असा भास होतो. स्किझोफ्रेनिया हा दीर्घकाळ चालणारा विकार आहे. यात त्या व्यक्ती सोबत कुटुंबातील इतरांना देखील समुपदेशनाची गरज भासते. कुटुंबिय या गोष्टीकडे लक्ष देत नाही.आजार लपवतात. लग्नाकडे यावर उपचार या दृष्टिकोनातून बघीतले ज्यामुळे दोन कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते. स्वस्थ व्यक्तीची फसवणूक होते. यावर बरेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ जीव तोडून काम करत आहेत. सरकारने त्याला कायद्याची जोड देण्याची गरज आहे मला वाटते.

हेमंतकुमार 01/08/2022 - 11:45
असलेल्या आजाराची स्वीकारार्हता त्याहूनही अधिक महत्त्वपूर्ण आहे.
+११ चांगला मुद्दा आहे.

Bhakti 01/08/2022 - 12:19
खूप महत्त्वाचा विषय आहे.उत्तम लेख आहे.मनाचा संभ्रम पालकांपुरता असल्यास ठीक पण दोघांना शंका असेल तर विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. आणखिन कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत?

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 01/08/2022 - 12:41
आणखिन कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत?
भारतात थॅलसेमिया व्यतिरिक्त हिमोग्लोबिन संदर्भातील सिकल सेल आजार आणि अन्य काही जनुकीय बिघाड मुख्यत्वे पाहावेत. अन्य काही दुर्मिळ आजारांसाठी कौटुंबिक इतिहास बघून चाचण्यांचा निर्णय घेता येतो

वा कुमारसर!! वैद्यकिय क्षेत्रातला अजुन एक वेगळा पैलु मांडणारा उत्तम लेख!! तुम्ही म्हणालात तसे, या गोष्टीला सामाजिक,कायदेविषयक्,आर्थिक्,मानसिक असे अनेक पैलु आहेत. तुमच्या मित्राच्या केसमध्ये जर मुलीकडच्यांनी ही माहिती लपवुन ठेवली असती तर कदाचित लग्न झाले असते अणि होणारे मुलही निरोगी किवा टी. मायनर झाले असते. शिवाय वाहक व्यक्तीमध्ये वाढ खुंटणे वगैरे लक्षणे नसल्याने ते कधीच उघडकीला आले नसते. आपल्या आसपास असे कितीतरी टी. मायनर लोक असतील कोणास ठाउक? एक प्रश्न--एकुणच लग्न ठरवताना पत्रिका ,आर्थिक, कौटुंबिक,सामाजिक परिस्थिती वगैरे बघण्यापेक्षा वैद्यकिय बाजुकडे जास्त लक्ष द्यावे का? आणि तसे करायचे तर कोणत्या चाचण्या कराव्यात?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 01/08/2022 - 13:27
धन्यवाद राजेंद्र. तुम्ही उपस्थित केलेले दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. स्वतंत्रपणे घेतो. 1.
आपल्या आसपास असे कितीतरी टी. मायनर लोक असतील कोणास ठाउक?
अगदी खरे आहे. लेखात दिल्याप्रमाणे भारतात ही एकूण संख्या सुमारे 4.2 कोटी आहे. त्यामुळे आपल्या नात्यात व परिचितांमध्ये देखील कोणी ना कोणी असे सापडेलच. गम्मत काय असते बघा. आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर झालेल्या एखाद्या आजाराचे निदान होत नसले की मग सविस्तर चाचण्या केल्या जातात आणि मग अशी एखादी दोषवाहक अवस्था लक्षात येते. माझ्या नात्यात दोघांना वयाच्या पन्नाशीत टी. मायनर लक्षात आला. हरकत नाही. यामध्ये फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे. एक निरोगी आणि एक वाहक यांची लग्न जरूर व्हावीत. परंतु एकाच आजाराच्या दोन दोषवाहकांमध्ये लग्न टाळली तर नक्कीच फायदा होईल

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 01/08/2022 - 13:45
२.
एकुणच लग्न ठरवताना पत्रिका ,आर्थिक, कौटुंबिक,सामाजिक परिस्थिती वगैरे बघण्यापेक्षा वैद्यकिय बाजुकडे जास्त लक्ष द्यावे का?
>>> आज हा प्रश्न तुमच्याप्रमाणेच अनेक सुशिक्षित आम्हाला विचारतात याचा आनंद होतो. मी असं म्हणेन, की कौटुंबिक, आर्थिकच्या इतकेच वैद्यकीयलाही महत्व द्यावे ! आनुवंशिक आजार ही आरोग्याची एक बाजू आहे. परंतु चयापचयाशी संबंधित मधुमेह, लठ्ठपणा आणि अन्य काही आजार देखील समाजात खूप फोफावले आहेत. माझी एक व्यक्तिगत सूचना आहे. त्यावर सर्वांना विचार करता येईल. लग्नाला इच्छुक असलेल्या दोन्ही व्यक्तींच्या घराण्यात त्यांच्या दोनही पालकांना मधुमेह/ लठ्ठपणा या स्वरूपाचे आजार असतील तर यावरही त्या दोघांत शांतपणे विचार झाला पाहिजे. अशा आजारांमध्ये आनुवंशिकतेचा काही हिस्सा आहेच. त्यामुळे लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींनी दोन्ही घराण्यात वरच्यासारखे आजार समान नाहीत ना, हेसुद्धा बघायला हरकत नाही. ( यावरून लगेच विवाहप्रतिबंध व्हावा असे बिलकुल म्हणायचं नाही. परंतु असा एक दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे).

In reply to by हेमंतकुमार

कुटुंब आणी येणाऱ्या पिढीवर अनुचित प्रभाव पडणाऱ्या मानसिक व शारीरिक आजारांवर, जसे सिझोफ्रेनीया,एच आय व्ही पि सी ओ डी, रक्तगट व आर एच फॅक्टर इ.बद्दल जरूर विवाहपुर्व समुपदेशन व्हायलाच हवे. बाकी मधुमेह, स्थुलता इ वर विचार झाला तर उत्तम पण हे बेशिस्त जीवनशैली मुळे सुद्धा होऊ शकतात.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 01/08/2022 - 16:02
आर एच फॅक्टर इ.बद्दल जरूर विवाहपुर्व समुपदेशन
काही दशकांपूर्वी हा काळजीचा विषय असायचा. माझ्या वैद्यकीय शिक्षणा दरम्यान यावर मोठी चर्चासत्रे होत असत. परंतु आता अँटी- डी इंजेक्शनचे उपचार निघाल्यापासून त्यावर तोडगा निघालेला आहे. हा मुद्दा आता तितका महत्त्वाचा नाही.

टर्मीनेटर 01/08/2022 - 12:53
'थॅलसिमीया' हा आजार लेखनविषय म्हणुन निवडलात त्यासाठी आपले विशेष आभार! वर मुविकाका म्हणालेत त्याप्रमाणे मलाही ह्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत ह्या आजाराविषयी माहिती नव्हती. बायकोच्या कंपनीत सर्व कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी दर वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात येते. वयाच्या ठराविक टप्प्यांवर तपासण्याही वाढत जातात (महिला कर्मचाऱ्यांच्या थोड्या जास्तच) ह्या वर्षी नुकतीच चाळीशी ओलांडलेल्या तिच्या सहकारी मैत्रिणीची 'थॅलसिमीया' तपासणीही करण्यात आली आणि त्यात ती तुम्ही म्हंटल्याप्रमाणे सदर दोषाची वाहक ( T. minor) असल्याचा अहवाल आला. तिला एक मुलगा असल्याने डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणुन तीच्या नवऱ्याचीही तपासणी करण्याचा सल्ला दिला पण त्याच्या अहवालात त्याला असा काही दोष नसल्याचे आल्यावर आणखीन खबरदारीचा उपाय म्हणुन आता मुलाचीही तपासणी करून घ्यायला सांगितली आहे परंतु ह्यावर्षी तो 10 वीत गेला असल्याने त्या दांपत्याने त्याच्या अहवालात काही गडबड आल्यास उगाच त्याच्या मनावर ताण येऊन महत्वाच्या शैक्षणिक वर्षात अभ्यासावर विपरीत परिणाम व्हायला नको म्हणुन त्याची तपासणी पुढच्या वर्षी करण्याचे ठरवले आहे आणि डॉक्टरांनीही तसे करण्यास मान्यता दिली आहे. एक शंका : गेल्या एकदोन वर्षांपासून सदर महिलेस ऐकायला कमी येणे आणि मासिक पाळीचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत होणे अशा समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यातल्या दुसऱ्या समस्येचे कारण हे एकवेळ वाढते वय असू शकेल असे मानता येईल कारण हल्ली तो प्रकार सुरु होण्याचे मुलींचे वय जसे कमी होत चालले आहे तसेच तो संपण्याचे वयही कमी होत असताना दिसत आहे. पण चाळीशीच्या आत श्रवणदोष होण्याचा आणि थॅलसिमीयाचा काही संबंध असू शकेल का?
"थॅलसिमियाच्या संदर्भात सौदी अरेबिया, इराण व सायप्रसमध्ये विवाहपूर्व चाचण्या करणे आणि समुपदेशन सक्तीचे आहे."
ही चांगली गोष्ट आहे! बाकी नैतिकता आणि पुनरुत्पादन या संदर्भात त्यांना काय करता येईल ह्याविषयी जे मुद्दे आपण सांगितले आहेत तेही योग्यच वाटतात त्यातला,
"१. डोक्याला कुठलाच त्रास नको असेल तर मुले होऊ न देणे हा एक उपाय आहे ! समजा, तशीही त्यांची "डिंक" पद्धतीने सुखात राहायची तयारी असेल तर मग प्रश्नच मिटला."
ह्या उपयाशी तर मी संपूर्णपणे सहमत आहे 🙁 अर्थात मी आणि माझ्या बायकोने अशी कुठली शारीरिक वा मानसिक समस्या नसतानाही आमची दोघांची जीवनशैली, आवडी निवडी आणि कार्यक्षेत्र ह्यांचा विचार करून एकमताने "डिंक" पद्धतीने राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता हे आज स्वानुभवावरून सांगू शकतो. त्यावेळी आमच्या दोघांच्या घरच्यांना / नातेवाईकांना / मित्रमैत्रिणींना आणि हितचिंतकांना आमचा निर्णय अजिबात पटला नव्हता. आम्ही स्वार्थी आहोत, जवाबदारी टाळण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेत आहात अशा गोष्टी त्यावेळेस आम्हाला ऐकवणाऱ्या, भावनिक आवाहने वगैरे करणाऱ्यांपैकी बहुतांश जण आता आसपासची सामाजिक परिस्थिती, मुलांच्या समस्या, जवाबदाऱ्या बघितल्यावर आमचा निर्णय योग्य असल्याची स्पष्ट कबुली देतात! दुसरा आणि तिसरा उपायही चांगलाच आहे. सुवर्णमध्य काढण्यासाठी सांगितलेल्या उपायांतील पहिल्या मूल दत्तक घेण्याबद्दल मी व्यक्तिगत पातळीवर थोडा असहमत आहे. कारण माझ्या बाबांच्या एका मित्राचा त्याबाबतचा अनुभव अतिशय वाईट आहे. त्यांच्या दत्तकपुत्राने त्या राजाला रंक करून दाखवले आणि त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीला अक्षरशः देशोधडीला लावले आहे. अर्थात हे अपवादत्मक उदाहरण असू शकेल पण तरी मी ह्या उपायाशी वैयक्तिकरित्या सहमत नाही होऊ शकत! राहिला दुसरा उपाय,
"२. स्वतःचेच मूल हवे असल्यास अपत्यांची संख्या एकदम मर्यादित ठेवणे- शक्यतो एकच. "
+1000 लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे! धन्यवाद 🙏

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 01/08/2022 - 14:47
सुंदर लघुलेखरुपी प्रतिसाद. आवडला.
चाळीशीच्या आत श्रवणदोष होण्याचा आणि थॅलसिमीयाचा काही संबंध असू शकेल का?
नाही. या आजाराचा आणि श्रवणदोष याचा काही संबंध नाही. त्याची वेगळी तपासणी तज्ञांकडून करावी लागेल. तसेही सदर महिलेला T मायनर असल्यामुळे आजाराची लक्षणे अशी काही नसतात; काहींचे हिमोग्लोबिन थोडे कमीच्या बाजूला राहते एवढेच.

In reply to by टर्मीनेटर

तर्कवादी 12/08/2022 - 18:11
टर्मीनेटर जी
अर्थात मी आणि माझ्या बायकोने अशी कुठली शारीरिक वा मानसिक समस्या नसतानाही आमची दोघांची जीवनशैली, आवडी निवडी आणि कार्यक्षेत्र ह्यांचा विचार करून एकमताने "डिंक" पद्धतीने राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता हे आज स्वानुभवावरून सांगू शकतो.
मिपावर समविचारी व्यक्ती भेटल्याने आनंद वाटला. मी ही "चाईल्ड फ्री" जीवनशैली विचारपूर्वक स्वीकारली आहे. या विषयावर एखादा धागाच काढूयात की... मिपावर आणखी कुणी समविचारी लोक व्यक्त होवू इच्छित असल्यास ते पण लिहीतील .काय म्हणता ?

In reply to by तर्कवादी

टर्मीनेटर 13/08/2022 - 12:46
मिपावर समविचारी व्यक्ती भेटल्याने आनंद वाटला.
सेम पिंच!
या विषयावर एखादा धागाच काढूयात की... मिपावर आणखी कुणी समविचारी लोक व्यक्त होवू इच्छित असल्यास ते पण लिहीतील .
कल्पना आवडली! धागा काढण्याचे मनावर घ्याच, चांगली चर्चा होऊ शकेल.

लेख आवडला. थॅलसिमिया असलेले ३-४ वर्षांचे मूल पाहण्यात आहे. सध्या तरी त्याला जास्त त्रास नाहीये, त्यामुळे प्रश्न पडला की थॅलसिमिया मध्येही सौम्य/तीव्र असा काही प्रकार असतो का?

In reply to by श्वेता व्यास

हेमंतकुमार 01/08/2022 - 15:39
धन्यवाद.
सौम्य/तीव्र असा काही प्रकार असतो का?
>> होय, असतो तर. १. thalassemia trait = thalassemia minor = वाहक. यात सौम्य ते मध्यम anemia होतो. हिमोग्लोबीन थोडे कमीच राहील. परंतु यासाठी उपचार घ्यायची गरज नसते. २. मध्यम आजार हिमोग्लोबीन ७ ग्राम्सच्या आसपास. पण रक्तसंक्रमण घ्यावे लागत नाही. ३. तीव्र आजार जन्मजात हिमोग्लोबीन खूप कमी, वाढ खुरटलेली. रक्तसंक्रमण उपचार वारंवार.

टिनटिन 01/08/2022 - 19:06
मी स्वत: thalassemia minor आहे. लग्नाच्या आधी जेव्हा मुलींना भेटायचो , आमच्या फॅमिली डॉक्टरने आधीच वॉर्निंग दिली असल्यामुळे साधारण पहिल्या भेटीनंतर मी सांगायचो (असे समजून कि पुढे अजुन भेटीगाठी होऊ शकतात). बऱ्याच जणांचा लगेच नकार यायचा. अनेकांना हा काय प्रकार आहे कळायचा नाही. मी मग त्यांचा Hb नंबर विचारुन (आणि त्यांनी सांगितलं तर ), अंदाज घ्यायचो . थोडा अवांतर - minor वाल्यानी रक्तदान केले तर चालते का ?

In reply to by टिनटिन

हेमंतकुमार 01/08/2022 - 19:27
तुम्ही स्वानुभव लिहिलात ते बरे झाले. टी minor वाल्यानी रक्तदान केले तर चालते का ? >>> होय, रक्तदान केले तर चालते; फक्त हिमोग्लोबिन 12.5 ग्रॅमच्या पुढे पाहिजे ( आणि अर्थातच रक्तदानास प्रतिबंध असलेले अन्य आजार नसावेत). इथे दात्यांसाठी भारत सरकारची मार्गदर्शक तत्वे पाहता येतील. वयोमर्यादा त्यानुसार असावी.

हेमंतकुमार 02/08/2022 - 09:28
थॅलसेमिया या शब्दाची व्युत्पत्ती रोचक आहे. ग्रीक भाषेत Thalassa = समुद्र. हा आजार प्रथम भूमध्य समुद्राभोवती राहणाऱ्या वसाहतींमध्ये आढळला होता. याव्यतिरिक्त तो आफ्रिका खंड, आखाती देश आणि भारतासह द. आशियाई देशांमध्ये बर्यापैकी आढळतो.

हेमंतकुमार 02/08/2022 - 11:46
ह्या रोगाचे प्रमाण कच्छी समाजात जास्त आहे
>> बरोबर. कच्ची पटेल या जमातीमध्ये त्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. परंतु भारतात सर्वात जास्त प्रमाण (17 टक्के) हे लारखाना सिंधी या जमातीमध्ये आहे. या संदर्भात इथे भारतातील सहा प्रमुख शहरांमध्ये विविध जाती-जमाती आणि वंशांमध्ये झालेले संशोधन आहे.

हेमंतकुमार 03/08/2022 - 09:18
सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार ! ...... हा आजार मोठ्या प्रमाणात असणारे जे भौगोलिक प्रदेश आहेत त्यांचे हवामान उष्ण व दमट असते. तिथे पाऊसही चांगल्यापैकी पडतो. पावसाळ्यात डबकी साठतात. त्यातून डासांची उत्पत्ती होते. यातून त्या भागांमध्ये मलेरिया स्थिरावला आणि फोफावला. १. तिथल्या माणसांच्या अनेक पिढ्यांना वारंवार मलेरिया झाल्यानंतर शरीरात जनुकांच्या पातळीवरील उत्क्रांती हळूहळू सुरू झाली. २. मलेरियाचा जंतू लाल पेशींवर हल्ला करतो. निरोगी माणसातील लाल पेशींपेक्षा थॅलेसेमिया ( व सिकल सेल आजार) या रुग्णांच्या लाल पेशींचे विशिष्ट गुणधर्म असतात( ते अजून पूर्णपणे समजलेले नाहीत). त्यामुळे मलेरियाच्या जन्तूला या पेशींवर हल्ला करणे अवघड जाते. जरी त्याने हल्ला करून तो आत शिरला तरी तिथे त्याची वाढ रोखली जाते आणि त्याचे आयुष्यही कमी राहते. ३. या सर्व कारणांमुळे संबंधित व्यक्तीला तीव्र मलेरिया होण्यापासून चांगल्यापैकी संरक्षण मिळते. ४.कायमस्वरूपी मलेरियामुळे इतक्या बऱ्याच जनतेला थलसिमियाची नैसर्गिक “भेट” मिळाली. तिचे अन्य काही तोटे असले तरी मलेरीयापासून बऱ्याच प्रमाणात संरक्षण हा फायदाही मिळाला. T. minor च्या बाबतीत तर हे विशेष उपयुक्त ठरले.

हेमंतकुमार 12/08/2022 - 17:40
लेखातील प्रकरणात प्रगती आहे. मित्राच्या मुलाने तीच चाचणी करून घेतली. त्यात कोणताही दोष नाही. आता ते दोघे लग्न करणार आहेत. त्यांना शुभेच्छा !

Nitin Palkar 21/08/2022 - 20:38
अतिशय सुंदर लेख.... नेहमी प्रमाणेच. थॅलसेमिया या आजाराची इत्थंभूत माहिती समजली. चांगला लेख आणि चांगली चर्चा.

हेमंतकुमार 08/05/2023 - 08:12
जागतिक Thalassemia दिनानिमित्त (८ मे) सर्व संबंधित बंधू-भगिनींना उत्तम आरोग्यपूर्ण शुभेच्छा !

हेमंतकुमार 07/06/2023 - 15:44
काल माझ्या मित्राचा फोन आला. तो त्याच्या मुलीसाठी स्थळ बघतो आहे. एका मुलाच्या बाबतीत त्यांने शंका विचारली की या दोघांचेही एबी आणि आरएच प्रकारातील रक्तगट पूर्ण वेगळे आहेत. तर मग पुढे जाऊ का ? मी त्याला सांगितले, “ ते रक्तगट वेगळे असणे हा स्थळ नाकारण्यातील मुद्दा अजिबात नाही (त्याची सर्व वैद्यकीय तरतूद आता झालेली आहे). परंतु जर तुझ्या मुलीने कधीच रक्तदान केलेले नसेल तर आता थॅलसिमिया वाहकाची चाचणी जरूर करून घे. ते अधिक महत्त्वाचे आहे”. पाहून लग्न करणाऱ्या दोन्ही बाजूंनी आता या मुद्द्याकडे लक्ष द्यायची गरज आहे..

हेमंतकुमार 19/10/2023 - 08:58
लेखामध्ये जो प्रसंग दिला आहे त्या संदर्भातील एक गोड बातमी काल समजली. गेल्या वर्षी मित्राच्या मुलाचे लग्न झाले होते. नुकतीच त्यांना एक गोंडस मुलगी झालेली आहे. जन्मताच तिची थॅलसीमिया चाचणी करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आहे !

हेमंतकुमार 29/01/2024 - 07:56
भारतातील बऱ्याच जनुकीय आजारांबाबत हैदराबाद येथील K Thangaraj या CCMB वैज्ञानिकांनी त्यांचे असे मत व्यक्त केले आहे :
फक्त स्वतःच्याच जातीत लग्न करणे काय किंवा अगदी जवळच्या नात्यात लग्न करणे काय, या दोन्हीही गोष्टी जनुकीय आजार होण्याच्या संदर्भात समान आहेत.
भारतीयांच्या उगम आणि वंशाबाबत त्यांनी काही अभ्यासपूर्ण विधाने केलेली आहेत.

नुकताच घडलेला एक किस्सा. माझ्या मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला. तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे. त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती. त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या. त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते". संबंधित मुलीच्या वडिलांनी माझ्या मित्राला ते सर्व रिपोर्ट्स दाखवले. आता त्या मुलीतील तो रक्तदोष पाहता काय करावे असा पेच त्याला पडला.

रंगदृष्टीचे तिरंगी सूत्र

हेमंतकुमार ·

मला बरेच दिवस असा प्रश्न पडला आहे की लाल असे म्हटल्यावर माझ्या मेंदूत जी प्रतिमा उभी रहाते तशीच प्रतिमा दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभी रहात असेल का? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हेमंतकुमार 11/07/2022 - 16:11
माझ्या मेंदूत जी प्रतिमा उभी रहाते तशीच प्रतिमा दुसर्‍या व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभी रहात असेल का?
>>> अगदी बरोबर. कोणी लाल म्हणेल त्यालाच कोणी तांबडा वगैरे म्हणेल. म्हणूनच हे लेखात दिले आहे : एखादा माणूस जेव्हा असे म्हणतो की, अमुक एक गोष्ट या ठराविक रंगाची आहे, तेव्हा ते त्याचे व्यक्तिगत आकलन असते. अशा आकलनात काही प्रमाणात व्यक्तीभिन्नता आढळते.

वामन देशमुख 11/07/2022 - 17:57
रंगजाणिवांच्या विश्वाची शरीर-वैद्यक परिप्रेक्ष्यातून मांडणी करणारा हा लेख आवडला. या चर्चेत भर घालण्याची माझी पात्रता नाही. पण तज्ज्ञ मिपाकर्स भर घालतीलच. --- उत्तर 74 आहे का? --- अवांतर: रंगांच्या तंत्रविश्वात - वेगवेगळ्या माध्यमांवर रंग उमटवण्याच्या वेगवेगळ्या प्रणाली असतात - त्यांपैकी RGB CMYK RYB ह्या काही. रंग उमटवण्याच्या प्रणाली लेखानुरूप चर्चा सुरु राहायला हवी; इथेच आवरते घेतो.

मालविका 12/07/2022 - 12:28
लेख मनापासून वाचला. माझा मुलगा यातल्या partial colour blind प्रकारात येतो . लहान असताना मी त्याला रंग शिकवले. पण तेव्हा जाणवल नाही कधी. लहान आहे म्हणून चुकीचे रंग सांगतो असं वाटायचं. साधारण ६ वर्षाचा झाल्यावर आम्ही मुद्दाम त्याला रंग विचारायला लागलो. पण पोपटपंची करून त्याला माहित झालं होत. त्यामुळे हिरवा रंग दाखव म्हटलं कि पानांचा सांगायचा. पण खोडाचासुद्धा हिरवाच सांगायचा. डॉक्टरला दाखवल्यावर डॉक्टरनि कन्फर्म केलं कि त्याला रंगदृष्टिदोष आहे. त्याला लाल, निळा, हिरवा, पिवळा असे मेन रंग कळतात पण त्याची शेड कमी जास्त झाली कि गोंधळतो. त्याला देखील याची कल्पना दिलेली आहे. त्यामुळे चित्रकला हा विषय आम्ही ऑप्शनला टाकलाय (म्हणजे त्यात त्याला किती का मार्क मिळेना आम्ही लक्ष देत नाही)तसंच शाळेत देखील सांगून ठेवलेलं आहे ,नाही त्याला जमलं तर सोडून द्या.आपणहून केलं तर ठीक आहे. डॉक्टरनि याच कारण अनुवंशिकता हे सांगितल्यावर आमची ट्यूब पेटली. माझ्या दादाला सेम प्रॉब्लेम होता. आणि जेव्हा इतर भावंडांशी हा विषय झाला तेव्हा माझ्या मामाला देखील रंग कळत नाहीत हे कळले. आता आजोबा हयात नसल्याने आणखी पाठी जाणे शक्य नाही. पण निदान आईकडून हा अनुवंशिकतेने आलाय. मामा - दादा आणि आता माझा मुलगा असा याचा प्रवास आहे. मामाच्या मुलाला हा दोष नाही किंवा दादाच्या दोन्ही मुलांना हा दोष नाही. अर्थात फार मेजर काही नसल्याने आणि त्यावर उपाय नाही हे डॉक्टर नि स्पष्ट सांगितल्याने आमचं रुटीन कुठे बिघडलं नाही. फक्त आता मुलाच्या करियर च्यादृष्टीने विचार करता लेखात म्हटल्याप्रमाणे काही ऑप्शन्स रद्द करावे लागले. डॉक्टरना जेव्हा विचारले तेव्हा स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले, कि जे पूर्णपणे रंगदृष्टिदोष असतात त्यांना ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर कसा दिसेल त्याप्रमाणे जग दिसत असत. त्यातही थोड्या शेड्स असतातच. मग ते लोक त्या शेड्स ना लाल, निळा, पिवळा हि नावं देऊन त्यांच्या डोक्यात शेड्स पक्क्या करतात. लहान असताना आम्ही दादाला रंग काळात नाहीत तेव्हा खूप हसायचो. मुद्दाम दादाला हा रंग कोणता आहे ? विचारायचो आणि त्याने चुकीचे सांगितल्यावर हसायचो. तेव्हा आई, आजी कोणाला असं काही असेल याची माहिती नव्हती. आता नेट वर वाचून, वगैरे माहिती असल्याने आम्ही वेळेत जाऊन डॉक्टरला दाखवून सल्ला घेतला. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे दादाचे देखील नुकसान काही झाले नाही. गाडी चालवताना सिग्नल जगभरात सेम असतात. लाईट ऑन /ऑफ कळतो. त्यामुळे वरचा लाईट लागला कि लाल सिग्नल लागला हे कळतं. त्यामुळे ड्रायविंगला प्रॉब्लेम येत नाही. त्यात इथे गावाकडे सिग्नल नसल्याने मोठ्या शहरात जाईल तेव्हाचाच प्रश्न असतो. पण तरीही कधीही त्याच्या हातून अपघात झाला नाही कि मुंबई - पुण्यात आल्यावर सिग्नल तोडल्याबद्दल पावती फाडावी लागली नाही. प्रतिसाद फारच मोठा झाला पण माझ्या अनुभवाचा विषय असल्याने जरा जास्त लिहिले गेले .

हेमंतकुमार 12/07/2022 - 12:37
सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार ! .. मालविका, सुंदर अनुभवजन्य प्र. त्यातले काही मुद्दे स्वतंत्रपणे घेतो.

हेमंतकुमार 12/07/2022 - 13:47
त्यामुळे चित्रकला हा विषय आम्ही ऑप्शनला टाकलाय
>>> हरकत नाही. पण .. हेही रोचक आहे : 1. Clifton Pugh हे ऑस्ट्रेलियाचे नामवंत चित्रकार. त्यांना रंगदृष्टीदोष होता. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही नौदलात प्रवेश मिळाला नाही. पुढे ते उत्तम दर्जाचे चित्रकार झाले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. 2. Jin Kim या कोरीआच्या कलाकारांनी Animation क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. त्यांनाही हा दोष होता.

हेमंतकुमार 12/07/2022 - 15:11
दोष असलेल्या व्यक्तींना सिग्नल ओळखायला मदत व्हावी म्हणून कॅनडामधील हे नियंत्रक दिवे पहा. प्रत्येक रंगाचा दिवा वेगळ्या आकाराच्या मुशीत बसवला आहे : ok लाल दिवा : चौरस चौकट पिवळा दिवा : हिर्‍याच्या आकाराची हिरवा : वर्तुळाकार

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 14/07/2022 - 22:00
रत्येक रंगाचा दिवा वेगळ्या आकाराच्या मुशीत बसवला आहे :
आपल्याकडेही लाल दिवा गोल व स्थिर असतो, पिवळा चालू बंद (ब्लिंक) होतो व हिरवा बाणाच्या स्वरुपात असतो

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 15/07/2022 - 07:33
होय, बरोबर आणि चांगले निरीक्षण. हिरवा दिवा बाण स्वरूपात दाखवण्याचे तंत्र भारतात गेल्या दोन दशकांपासून दिसून येते आहे. माझ्या लहानपणी मला आठवते त्यानुसार तीनही रंगाचे दिवे हे निव्वळ प्रकाशगोल असायचे.

हेमंतकुमार 13/07/2022 - 07:44
सर्व नवीन प्रतिसादकांचे उत्साहवर्धनाबद्दल आभार ! आपणा सर्वांच्या सहभागानेच चर्चा चांगली होत आहे. तुमचे प्रतिसाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. हा विषय तसा क्लिष्ट आहे. त्यामध्ये शरीरशास्त्र, जनुकशास्त्र, पदार्थविज्ञान आणि गणित या सर्व अभ्यासशाखांचा संबंध येतो. काही मुद्दे तसे क्‍लिष्ट असून त्यांना सोपे करण्याच्या मर्यादा आहेत. परंतु या विषयातील व्यक्तिगत अनुभव आणि विषयाचे सामाजिक अंग या गोष्टी सर्वांना आवडतील या उद्देशानेच हे लेखन केले.

हेमंतकुमार 14/07/2022 - 12:12
काही स्त्रियांमध्ये एक्स गुणसूत्रावर एक विशिष्ट प्रकारचा जनुकबदल झालेला असतो. त्यातून त्यांच्या दृष्टीपटलात ४ प्रकारच्या शंकुपेशी निर्माण होतात. (लेखात म्हटल्याप्रमाणे निरोगी व्यक्तीत फक्त ३ प्रकारच्या असतात). या चौथ्या प्रकारच्या पेशीमुळे अशा स्त्रियांना एका अतिरिक्त तरंगलांबीचा प्रकाश दिसू शकतो. याला रंगदृष्टीचे चौरंगी सूत्र असे म्हटले जाते. अशा स्त्रिया सामान्यांपेक्षा कित्येक पट अधिक रंग(छटा) पाहू शकतात. ….. याव्यतिरिक्त मानवी उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातूनही काही रंजक मुद्दे पुढे आले आहेत. तीन प्रकारच्या शंकुपेशी व तिरंगी सूत्र ही अंतिम उत्क्रांती आहे काय? तर तसे नसावे. अजून काही हजार वर्षांनी अशी शक्यता आहे, की चौथ्या प्रकारची शंकुपेशी माणसांमध्ये तयार होऊ शकते. त्या परिस्थितीत मानवाने उत्क्रांतीचा वरचा टप्पा गाठलेला असेल आणि रंगदृष्टीही चौरंगी सूत्रावर आधारलेली असू शकते.

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 14/07/2022 - 22:02
अशा स्त्रिया सामान्यांपेक्षा कित्येक पट अधिक रंग(छटा) पाहू शकतात.
अशा स्त्रियांना कपडे खरेदी करताना सामान्यांपेक्षा कित्येक पट अधिक वेळ लागत असावा :)

हेमंतकुमार 14/07/2022 - 20:37
धन्यवाद मंडळी. तुमच्या प्रोत्साहनामुळेच लेखनासाठी नेहमी प्रेरणा मिळते. ........ अजून काही.... मासे व पक्ष्यांच्या काही जातींमध्ये दृष्टीचे चौरंगी सूत्र असते. पक्ष्यांना त्यांचे अन्न शोधणे आणि पुनरुत्पादनासाठी जोडीदार निवडण्यासाठी नीलातित (UV) प्रकाशदृष्टीची गरज असते. त्यामुळे त्यांच्यात चौथ्या प्रकारच्या शंकुपेशी आहेत. पृष्ठवंशीय प्राण्यांचे पूर्वज खरेतर चौरंगी दृष्टीचे होते. पुढे उत्क्रांती दरम्यान पहिले सस्तन प्राणी दुरंगी दृष्टीचे झाले. माकड आणि वानर यांच्यापासून तिरंगी सूत्र दिसू लागले. ….. आता इथून पुढच्या उत्क्रांतीमध्ये मानव पुन्हा चौरंगी दृष्टीकडे जाणार काय, हा सध्याच्या संशोधनाचा विषय आहे !

तर्कवादी 14/07/2022 - 22:07
माहितीपुर्ण लेखाबद्दल धन्यवाद डॉक्टर istotine व अन्य काही eye drops रंगदृष्टीदोषावर गुणकारी असल्याचा दावा करतात. याबद्दल काही सांगू शकाल काय ? istotine

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 15/07/2022 - 08:00
चांगला प्रश्न. आता हा मुद्दा मुळातून समजून घेऊ. अनुवंशिकतेने आलेल्या रंगदृष्टी दोषावर “बरा” करणारा सध्या कोणताही उपाय नाही. कारण हा दोष जनुकीय पातळीवरचा आहे. तो अंतिम “बरा” (cure) करायचा असल्यास जनुकीय उपचारच करावे लागतील. हे सध्या तरी उपलब्ध नाहीत. आपल्या दृष्टीपटलात दंडपेशी व शंकुपेशी असून त्यांच्यामुळे आपल्याला अनुक्रमे सामान्य दृष्टी आणि रंगदृष्टी प्राप्त होते. जर का दृष्टपटलाची झीज सुरू झाली तर आपली संपूर्ण दृष्टीच अधू होऊ लागते, ज्यामध्ये रंगदृष्टी देखील अंतर्भूत आहे ! वरील दावा करणारे औषध उत्पादक असा युक्तिवाद करतील, की आमच्या औषधाने दृष्टिपटलाची झीज थांबते. याचा अर्थ असा असतो, की जी काही संपूर्ण दृष्टी आहे ती आधीइतकी टिकून राहील, अधिक वाईट होणार नाही. परंतु त्या औषधाचा निव्वळ रंगदृष्टी सुधारण्यासाठी काहीही संबंध नाही. एकंदरीत तो फसवा युक्तिवाद असतो !

टर्मीनेटर 19/07/2022 - 19:16
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख! एका दृष्टीक्षेपात चित्रातला आकडा मला 74 वाटला. ह्या लेखाची लिंक रंगदृष्टीची समस्या असलेल्या माझ्या शारजास्थित मित्राला पाठवत आहे. तो केरळी असला तरी उत्तमरीत्या मराठी वाचू -बोलू शकतो. पंधरा एक वर्षांपूर्वी तो भारतातून यूएई ला स्थलांतरित झाला तेव्हा ह्या समस्येमुळे त्याला तिथला वाहन चालवण्याचा परवाना मिळू शकला नाही!
वैद्यकीय पेशात सुद्धा खरेतर निरोगी रंगदृष्टीची गरज आहे. काविळीच्या रुग्णाचा रंग, सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे विविध जंतू आणि पेशींचा रंग, तसेच विविध दुर्बिणींद्वारा केलेल्या शरीराच्या अंतर्गत तपासण्यांमध्ये रंग अचूक ओळखण्याचे महत्त्व नक्कीच आहे. भारतीय वैद्यक परिषदेचा एक पूर्वापार नियम होता, की वैद्यकीय शिक्षण-प्रवेश घेण्यासाठी रंगदृष्टी निरोगी पाहिजे. परंतु 2017 मध्ये या नियमाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाचा निकाल याचिकाकर्त्याचे बाजूने लागला. मग न्यायालयीन आदेशानुसार भारतीय वैद्यक परिषदेने समिती नेमून तो नियम काढून टाकलेला आहे.
न्यायालयाचा हा निवाडा मला तरी पटला नाही!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/07/2022 - 19:47
धन्यवाद. १.74 अगदी बरोबर ! २. रंगदोष असलेल्या व्यक्तींना वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासंबंधी जगभरातच धोरण एकंदरीत शिथिल आहे. अगदी पाश्चात्त्य देशांमध्ये सुद्धा. तोच संदर्भ देऊन भारतीय न्यायालयात बाजू मांडण्यात आली होती. इथल्या एका संदर्भानुसार तैवान मध्ये धोरण कडक दिसते https://onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1111/j.1444-0938.2009.00434.x काही देशांमध्ये मूलभूत वैद्यकीय पदवीला काहीच अडथळा ठेवलेला नाही. परंतु पुढे योग्य ती पदव्युत्तर शाखा निवडावी असे समुपदेशन केले जाते.

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 19/07/2022 - 20:18
रंगदृष्टीदोष राहू द्या, त्याही पुढची ही घटना आहे: एका पूर्ण अंध डॉक्टरने पदव्युत्तर नीट ही परीक्षा पार केली असून त्याने एमडी मानसोपचार या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मागितला होता परंतु तज्ञ समितीने त्याचा अर्ज फेटाळला आहे. त्याविरुद्ध संबंधित डॉक्टर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. जगभरात या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अंधांना प्रवेश दिला गेल्याची उदाहरणे आहेत. आता आपले न्यायालय काय निर्णय देते हा उत्सुकतेचा विषय राहील. संदर्भ

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 21/07/2022 - 11:50
"आता आपले न्यायालय काय निर्णय देते हा उत्सुकतेचा विषय राहील."
बापरे... गंभीर प्रकरण आहे!

हेमंतकुमार 28/10/2022 - 10:21
जगातील प्राचीन संस्कृतींमध्ये असलेल्या भिन्न ‘रंगज्ञाना’वर प्रकाश टाकणारा एक छान लेख: त्यांच्या व आजच्या आपल्या ‘रंगज्ञाना’त बराच फरक आहे. विविध वस्तूंच्या शोधानुसार रंगज्ञान विकसित होत गेले.

पृथ्वीवरील जीवसृष्टीत निसर्गाने अनेक रंगांची उधळण केलेली आहे. ती अर्थातच मनमोहक आहे. विविध वनस्पती आणि प्राणी हे भिन्नरंगी असून ते वेळोवेळी आपापले ‘रंग’ दाखवत असतात ! मानवनिर्मित अनेक गोष्टीही रंगीत आहेत. विविध रंगांच्या दर्शनातून मनात वेगवेगळे भाव उमटतात. आपल्या दैनंदिन जीवनातील सुसूत्रता अनेक रंगांवर आणि रंगबदलांवर अवलंबून आहे. मुळात आपल्याला रंगज्ञान होण्यासाठी आपले डोळे व मेंदू यांच्यातील विशिष्ट यंत्रणा कारणीभूत आहेत. या अद्भुत व अमूल्य अशा जीवशास्त्रीय प्रणालीवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा लेख. निसर्गातील ज्या विद्युतचुंबकीय लहरी आपल्या डोळ्यांना जाणवतात त्याला आपण प्रकाश म्हणतो.

कोंडून घेण्याचा जपानी प्रकार

हेमंतकुमार ·

गवि 21/06/2022 - 09:19
जगात कुठे कुठे काय काय समस्या असतील त्याचा थांग लागणे कठीण. एक सहज निरिक्षण, जे चुकीचंही असू शकेल,.. की एखाद्या देशात अधिकाधिक संपन्नता, समृद्धी आली (saturation point) की यासदृश मानसिक समस्या जास्त आढळताना दिसतात. संशयग्रस्तता, अंदाधुंद फ़ायरिंग, एकलकोंडेपणा, अघोरी पंथ वगैरे. अर्थात यासाठी वस्तुनिष्ठ विदा नाही. अर्थात आर्थिक विपन्नावस्था आणि मागासपणा याने इतर काही वेगळ्या समस्या (अभावग्रस्ततेतून उद्भवणार्या) येतातच म्हणा.

In reply to by गवि

हेमंतकुमार 21/06/2022 - 09:40
अगदी बरोबर. संपन्नावस्था आणि विपन्नावस्था या दोन्ही स्थिती वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना जन्म देतात. किंबहुना हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

In reply to by हेमंतकुमार

संपन्नावस्था आणि विपन्नावस्था या दोन्ही स्थिती वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना जन्म देतात. >> सहमत!

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 21/06/2022 - 14:17
११^११ या चिन्हाचा अर्थ अकरा गुणिले अकरा वेळा असा असतो का ? बरेच दिवस कुतूहल आहे मनात.

जेम्स वांड 21/06/2022 - 10:06
एक दंडवत तुमच्या चिकित्सक वृत्तीला, नीट अभ्यास करून एखाद्या विषयाला हात घालण्याचा तुमचा गुण वाखाणण्याजोगा आहेच, त्याशिवाय विषय वैविध्य पण भरपूर, माझ्या बघण्यात तरी अजून हिमो केस आलेली नाही आप्त मित्रांत माझ्या पण ह्यापुढे नक्की लक्षात ठेवेन ही बाब अन विषय.

छान विश्लेषण! आमच्या अभ्यासक्रमात जपानमधल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची मुलाखत घ्यायची संधी मिळाली.आमच्या गटाला ज्यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली ते स्वतः या समस्येमधून गेले आहेत. त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या अगदी हिकीकोमोरीबद्दल पण. साधारणपणे असे लोक बरेच अहंकारी होतात की मी कशाला कोणाची मदत घेऊ(बऱ्याच संस्था आहेत की ज्या अशा लोकांना मदत करतात. अगदी ८०-५० च्या समस्येबद्दल पण बस मध्ये वगैरे जाहिराती दिसतात) पण यांच्या वडिलांनी व्यवस्थित समजून घेतली त्यांची अवस्था आणि त्यांना हिमोमधून बाहेर पडण्यास मदत केली. आज ते अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत.

नेहमी विविध वैद्यकीय विषयांना हात घालुन त्यांचा सर्वांगाने परामर्श घेण्यात तुमचा एक नंबर आहे मिपावर. आज एका नवीनच समस्येची ओळख झाली. हे काहीतरी जपान्,अमेरिकेतील फॅड आहे असे मात्र म्हणता येत नाही. भारतातही , किंबहुना जगभरच करोनामुळे आणि ऑनलाईन शाळा/कॉलेज/ऑफिस मुळे सर्वसामान्य माणसे सुद्धा हिमोग्रस्त होउ लागली आहेत की काय असा संशय येण्यासारखी परिस्थिती आहे. आणि ती समजुन घेणे इतके सोपे नाही,मग उपचार तर दुरच राहिले. सम्पन्नावस्था किवा विपन्नावस्थेशी याचा थेट संबंधही नसावा. तुम्ही जी ईतर कारणे दिली आहेत ती सुद्धा विचार करण्यासारखी आहेत. सुदैवाने आता जनजीवन पुर्वपदावर येउ लागले आहे त्यामुळे अशा केसेसचे प्रमाण कमी होईल अशी आशा करतो. एका नवीन विषयाशी तोंड ओळख करुन दिल्याबद्दल आभार.

हेमंतकुमार 21/06/2022 - 12:44
आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! … १.
माझ्या बघण्यात तरी अजून हिमो केस आलेली नाही आप्त मित्रांत
>>> माझ्याही नाही. परंतु कोवीड काळात माझ्या संकुलातील एक स्त्री तब्बल पाच महिने घरात बंदिस्त होती. त्यांना मधुमेह आणि हृदयविकार या सहव्याधी असल्याने त्यांनी खूप धसका घेतला होता. … २.
साधारणपणे असे लोक बरेच अहंकारी होतात की मी कशाला कोणाची मदत घेऊ
>>>> अगदी बरोबर. त्यामुळे त्यांना गर्तेतून बाहेर काढणे हे खरोखरच आव्हान असते.

हेमंतकुमार 21/06/2022 - 12:49
हे काहीतरी जपान्,अमेरिकेतील फॅड आहे असे मात्र म्हणता येत नाही.
>>> सहमत आहे. एकटेपणाच्या समस्या बऱ्यापैकी जागतिक झालेल्या आहेत. हळूहळू जशी या संबंधातील सर्वेक्षणे वाढतील तसा अधिक प्रकाश पडेल. म्हणूनच मला लेखनासाठी हा वेगळा विषय लिखाणासाठी निवडावा वाटला.

साहना 21/06/2022 - 15:44
अश्या विषयांना गांभीर्याने घेण्याच्या आधी एकदा ह्या मानस-शास्त्रज्ञाचे विचार वाचावेत. https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Szasz#%22Myth_of_mental_illness%22 हिकीकोमोरी ह्याला मानसिक रोग मानणे कदाचित पूर्णता चुकीचे आणि जपानचे पाश्चात्यी करण असू शकते (आहेच असे मी म्हणत नाही फक्त दुसरी बाजू पाहावी). पाश्चात्य देशांत हल्ली प्रत्येक गोष्टीला मानसिक रोग म्हणण्याची सवय जडली आहे. प्रत्येक गोष्टीला काही तरी फोबिया, ADHD आणि इतर असंख्य नावे देण्याची पद्धत आली आहे. हिकीकोमोरी सुद्धा त्याचाच एक प्रकार असू शकतो. थॉमस जॅझ ह्यांच्या मते मानसिक रोग आणि त्यांच्या व्याख्या ह्या विविध सरकारांनी लोकांना ठराविक पद्धतीने वागायला भाग पाडण्यासाठी निर्माण केल्या. ज्या पद्धतीने सावळ्या रंगाचे लोक विनाकारण फेर अँड लवली वर पैसे खर्च करतात त्याच प्रमाणे काही लोकांना आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने वाजवण्यासाठी काही शक्तिशाली संघटनांनी विविध गोष्टींना मानसिक रोगाचे नाव दिले. विविध देशांत सध्या "climate change denier" मंडळींना वेडे ठरविण्याची मोहीम सुरु आहे. काही दशके आधी अमेरिकेत टीन्स खूप सेक्स आणि दारूबाजी करतात म्हणून तथाकथित तज्ञ् मंडळी चिंता व्यक्त करायची. सध्या अमेरिकेत ह्या दोन्ही गोष्टींचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे आणि टिन आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे आता कदाचित मागचा गोंधळ बरा होता असे लोक म्हणून लागले आहेत.

In reply to by साहना

हेमंतकुमार 21/06/2022 - 15:49
अद्याप हिमोला मानसिक रोग असे म्हटलेले नाही. लेखात म्हटल्याप्रमाणे तो सीमारेषेवरील प्रश्न आहे. अशा व्यक्तीमध्ये दबलेला मानसिक रोग किंवा त्याची पूर्वावस्था आहे का हे तज्ञ मंडळी पाहतात. या विषयावर भरपूर मतांतरे असणे स्वाभाविक आहे.

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 21/06/2022 - 20:10
अद्याप हिमोला मानसिक रोग असे म्हटलेले नाही.
बरोबर आहे. सामान्य नियमाला अपवाद बनणे (व्हेरिएशन वा देव्हिएशन) हा नेहमीच रोग नसतो. माणूस हा समाजशील प्राणी आहे - हा झाला नियम. पण या नियमाला कुणी अपवाद होत असेल (काही काळ / दीर्घकाळ) तरी त्याला रोग म्हणायचे की डेव्हिएशन वा व्हेरिएशन हा प्रश्नच आहे. फक्त एक समजले नाही हिमो अवस्थेत हे लोक पोटापाण्याचा उद्द्योग कसा करतात ? बाकी इतर शारिरिक परिणाम काय असतात का ? जसे भूक कमी लागणे, न जेवणे, लैंगिक आयुष्य ई.

मला वाटते, समाजातील संवाद कमी होणे या परीस्थीतीला कारणीभूत आहे का! कदाचित परस्पर संवादांमुळे मन मोकळे झाल्याने मानसिक स्वास्थ्य निट रहाण्यास मदत मिळेल व आशा लोकांची संख्या कमी होईल. नाहीतरी समुपदेशन एक महत्वाची उपचार पद्धती आहेच ना. आपले लेख काहीतरी नविन शिकवून जातात.

हेमंतकुमार 21/06/2022 - 20:28
१. हे लोक पोटापाण्याचा उद्द्योग कसा करतात >>> लेखातील हे पाहा: "अति परावलंबित्व....जपानची ८०-५० ची समस्या” असे म्हटले गेले आहे". म्हणूनच असे प्रकार उच्चमध्यम वर्गामध्ये दिसतात. गरिबीत असल्या अवस्था परवडत नाहीत ! ... २. समाजातील संवाद कमी होणे या >>> हा मुद्दा महत्वाचा आहेच.

नवीन माहिती समजली, अर्थात आपल्याकडेही पाल्याचा एकलकोंडेपणा वाढलेला पालकांच्या लक्षात येतो आणि ते चिंताग्रस्तही होतात. पण जपानमधील परिस्थिती नव्याने समजली, धन्यवाद.

हेमंतकुमार 18/12/2022 - 09:45
जपान संस्कृती आणि त्यांची घटत जाणारी लोकसंख्या यावर प्रकाश टाकणारा एक चांगला लेख : जपान खरंच संपून जाईल?
जपानमध्ये आज तिशी ओलांडलेले २५ टक्के तरुण-तरुणी ‘विवाह’ हा शब्दच झुरळासारखा झटकून टाकतात....... मुलांच्या डायपरपेक्षा वृद्धांचे डायपर जास्त प्रमाणात उत्पादन करणारा जपान हा जगातला एकमेव देश आहे........

हेमंतकुमार 27/03/2023 - 15:28
Hikikomori ने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवण्याचा एक अभिनव मार्ग जपानमध्ये काढला आहे. त्यांनी esports या प्रकारच्या नव्या शाळांची निर्मिती केली आहे. या शाळांमध्ये नेहमीच्या शिक्षणाच्या जोडीने व्हिडिओ गेम्सचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. यातून पुढे व्यावसायिक व्हिडिओ गेम्स निर्माते व्हावेत अशी संकल्पना आहे. पूर्वी Hikikomori मुळे पारंपरिक शाळा बंद केलेले विद्यार्थी गेम्सच्या आकर्षणामुळे या नव्या शाळांकडे येत आहेत.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यात अग्रेसर असलेले राष्ट्र म्हणून जपानला आपण ओळखतो. प्रचंड मेहनत, वक्तशीरपणा आणि काटेकोर शिस्त हे तिथल्या नागरिकांचे गुण कौतुकास्पद आहेत. दुसऱ्या बाजूस तिथल्या औद्योगिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेले ताणतणाव हेही प्रचंड आहेत. त्यातूनच निरनिराळ्या मानसिक समस्यांचे प्रमाण तिथे खूप आहे. या लेखात अशाच एका मानसिक समस्येचा आढावा घेत आहे. 1970 ते 80 च्या दशकात जपानमधील पौगंडावस्थेतील मुले आणि तरुण यांच्यात एका मनोवृत्तीची लागण होऊ लागली. ही मुले शाळा-कॉलेजला विनाकारण वारंवार दांड्या मारू लागली आणि स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागली.

औषध-प्रवेश (२) : इंजेक्शन्सचे अस्त्र

हेमंतकुमार ·

नगरी 23/05/2022 - 07:12
छान व माहितीपूर्ण लेख. आता या औषधांचे निष्कसन कसे होते? माझ्या माहिती प्रमाणे जवळपास सर्व औषधे लघवी वाटे बाहेर पडतात,म्हणजेच किडनीवर लोड.पॅरॅसिटोमोल अपवाद

In reply to by नगरी

हेमंतकुमार 23/05/2022 - 07:56
सर्व रासायनिक औषधांचा चयापचय यकृतात होतो. त्यानंतर तयार झालेले पदार्थ पाण्यात विरघळणारे असतात. त्यामुळे ते सहजगत्या मूत्रपिंडाच्या माध्यमातून लघवीत उत्सर्जित केले जातात. ठराविक औषधांचा अल्प भाग शौच आणि घामाद्वारे बाहेर पडतो. विशिष्ट प्रकारची भूलकारक औषधे चयापचयानंतर श्वासातूनही बाहेर पडतात. पॅरासिटॅमॉल हा काही अपवाद नाही. त्याचे भवितव्य वर उल्लेखिलेल्या मार्गानेच असून मुख्यत्वे ते पदार्थ लघवीवाटे बाहेर पडतात.

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 23/05/2022 - 10:34
प्रेग्नंसी दरम्यान ८ महिने घेतले होते.गर्भातल्या बाळाला रक्त पुरवठा नीटसा होत नाही , असं doctor ना लक्षात आलं.पोटावरच्या बेंबीच्या आसपास त्वचेवर घेतले.

तर्कवादी 23/05/2022 - 19:01
माहितीपुर्ण लेख. पुर्वी कुत्रा चावल्यावर पोटावरच १४ इंजेक्शन्स घ्यावे लागायचे असे ऐकून आहे. पुढे ह्या इंजेक्शन्स्ची संख्या कमी झाली. बहुधा आता पोटावरही दिले जात नाही.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 23/05/2022 - 19:14
कुत्रा चावल्यावर पोटावरच १४ इंजेक्शन्स
>> तुम्ही म्हणताय ती अ‍ॅन्टीरेबिजची पोटावरची 14 इंजेक्शन्स प्रकार आता खूप जुना झाला ! आता अलीकडील २ प्रकार म्हणजे : १. त्वचेमध्ये देणे (ID) : डब्ल्यूएचओनुसार २. स्नायूंमध्ये देण्याचा पर्याय (IM) सुद्धा उपलब्ध आहे. देशानुसार यातील एक पर्याय निवडला जातो

सलाईन मधून किंवा इंजेकशनद्वारे हवेचा बुडबुडा आत गेला तर धोकादायक असतो ना? मग त्यावर मात कशी करतात?. आणि जर गेला तर काय लक्षणं आहेत व काय उपाय आहे?

In reply to by प्रमोद देर्देकर

हेमंतकुमार 23/05/2022 - 21:35
*इंजेक्शनद्वारा रक्तप्रवाहात हवा जाणे >>> १. प्रत्येक वेळेस याची लक्षणे दिसतातच असे नाही. ,२. हवेचा बुडबुडा छोटा असेल तर तो सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये विघटित होतो. ३.मोठ्या प्रमाणात हवा गेल्यास फुफुसाना आणि हृदयाला धोका संभवतो रुग्णालयात काही विशिष्ट प्रकारच्या प्रोसिजर्स करताना या गोष्टीचा धोका संभवतो. तो कमीत कमी करता येईल यादृष्टीने खालील प्रतिबंध करता येतो : १.रुग्णाला सोफ्यावर आरामात बसल्यासारखे बसवणे २. त्याचे डोके पायांपेक्षा खालच्या पातळीवर ठेवणे उपचार: ही घटना घडल्याचे लक्षात आले तर तातडीने रुग्णाला डाव्या कुशीवर आणि पुन्हा एकदा डोक्याची पातळी खाली ठेवणे इथे चित्र पहा : https://en.m.wikipedia.org/wiki/Trendelenburg_position खूप त्रास होऊ लागला असेल तर१०० % ऑक्‍सिजन आणि अन्य आणीबाणीचे उपाय करतात.

एकदा दुसरीला असताना उजवा हात मोडला होता. तेव्हा एकदा पूर्ण भूल दिली होती. (ऑपरेशन नव्हते झाले. केवळ प्लास्टर केलेले). त्यावेळी तळहाताच्या मागे इंजेक्शन दिलं होतं बहुतेक. नंतर अकरावीला (परत) उजवा हात मोडला. यावेळी प्रकरण गंभीर असल्याने हातात दोन रॉड बसवले. (अजून आहेत). ऑपरेशन असल्याने पूर्ण भूल होती. तेव्हा उत्सुकता म्हणून इंजेक्शन दिल्यापासून आकडे मोजायला सुरुवात केली. सहा पर्यंत मोजू शकलो. ही साधारण नऊला दिली आणि दुपारी दोनला हळू हळू शुद्ध आली. रात्री नऊ दहापर्यंत मी गुंगीत होतो. तिसऱ्यांदा केवळ स्थानिक भूल म्हणून पोटामागील एका मणक्यात भूल दिली. इन्स्टंट बधीर :D ही सुद्धा सकाळी दहाला दिली, दुपारी तीनपर्यंत बधिरपणा होता. भुली संबंधी अवांतर प्रश्न: १. भूल द्यायच्या आधी रात्रभर खायचे प्यायचे नसते. ते का? २. अपघातासारख्या इमर्जन्सीमध्ये भूल कशी देतात? तेव्हा तर दहा बारा तास वाट बघता येणार नाही. ३. भूल किंवा कोणतेही इंजेक्शन हातातील शिरेतून दिल्यावर ते हृदयामार्गे संपूर्ण शरीरात पोहचायला कितीवेळ लागतो?

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 24/05/2022 - 05:59
चांगले प्रश्न १. आपण जागृतावस्थेत असताना जर का जठरातील अन्न आणि द्रव ढेकरेच्या रूपात अन्ननलिकेत वर आले, तर प्रतिक्षिप्त क्रियेमुळे ते श्वसनमार्गात अजिबात जात नाही. ही अतिशय महत्त्वाची संरक्षक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. मात्र, जेव्हा संपूर्ण शरीराला भूल दिली जाते तेव्हा भूल इंजेक्शनच्या प्रभावाने वरील प्रतिक्षिप्त क्रिया खूप कमी झालेली असते. जर का रुग्णाने शस्त्रक्रियेच्या आधी व्यवस्थित भरपेट खाल्लेले असेल, आणि टेबलवर झोपलेले असताना ते अन्नपाणी जर वरच्या दिशेने आले, तर त्यातून ते श्वसनमार्गे फुफ्फुसात जाण्याचा धोका असतो (Pulmonary aspiration).

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 24/05/2022 - 06:04
*अपघातासारख्या इमर्जन्सीमध्ये भूल >>> अशा आणीबाणीच्या परिस्थितीत भूलतज्ञ आणि शल्यक्रियातज्ञ यांनी एकमेकांशी चर्चा करून तारतम्याने निर्णय घ्यायचा असतो. अपघाताचे स्वरूप, कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेची तातडी हे सर्व मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. एका बाजूला तातडीची गरज तर दुसर्‍या बाजूला अस्पिरेशनचा धोका हे दोन मुद्दे तराजूत ठेवून फायदे व तोटे याचा हिशोब करावा लागतो. त्यानुसार निर्णय घेतला जातो.

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 24/05/2022 - 07:16
*शिरेतून दिल्यावर ते हृदयामार्गे संपूर्ण शरीरात पोहचायला कितीवेळ लागतो? >> याचे उत्तर लेखात दिलेले आहे: अशा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो.

In reply to by तुषार काळभोर

Bhakti 24/05/2022 - 07:27
@तुषार जरा अवांतर प्रश्न,मेटल डिटेक्टरमधून तुम्ही जातांना सायरन वाजता का? हातातल्या rod मुळे.मी असे किस्से ऐकून आहे :)

In reply to by Bhakti

अजून तरी नाही :) मंदिरे आणि मॉल सारख्या ठिकाणी असलेले मेटल डिटेक्टर्स दिखाव्याकरता असावेत. कधी वाजतात, कधी वाजत नाहीत. वाजतात तेव्हा खिशातील नाणी, चावी यामुळे वाजत असावीत. पण विमानतळावर कधीच वाजत नाहीत. तरी प्रत्येक वेळी भीती वाटते, इथूनच माघारी पाठवतात की काय!!

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 24/05/2022 - 09:55
या विषयावर काही शोधनिबंध प्रसिद्ध झालेले दिसतात. उदाहरणार्थ : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1964703/ त्या अभ्यासानुसार 47 टक्के लोकांमध्येच धातूचे रॉड डिटेक्टरने ओळखले गेले. गुडघ्यामधले सहज ओळखले जातात परंतु खुब्यामधले नाही, असे दिसते.

In reply to by तुषार काळभोर

तर्कवादी 24/05/2022 - 10:15
पण विमानतळावर कधीच वाजत नाहीत. तरी प्रत्येक वेळी भीती वाटते, इथूनच माघारी पाठवतात की काय!!
विमानतळावरील मेटल डिटेक्टर वाजत नाही असा माझाही अनुभव आहे (माझ्या उजव्या मनगटात टिटॅनियमची प्लेट आहे) आणि वाजला तरी घाबरण्याचे कारण नाही. हॉस्पिटलमधून सर्टिफिकेट घेवून ठेवा आणि विमानप्रवासाच्या वेळी त्याची प्रत जवळ बाळगा. खासकरुन आंतरराष्ट्रीय प्रवासाचे वेळी दक्षता घ्यायला हवी.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 24/05/2022 - 11:32
. अपघातासारख्या इमर्जन्सीमध्ये भूल कशी देतात? तेव्हा तर दहा बारा तास वाट बघता येणार नाही. तातडीची शस्त्रक्रिया असेल तर जठरात नळी टाकून आत असलेले सर्व पदार्थ खेचून बाहेर काढतात आणि जठर परत सलाईनने धुवून घेतात.(gastric lavage) म्ह णजे बेशुद्धावस्थेतून शुद्धीत येताना भूल देण्याच्या औषधामुळे जरी उलटी झाली तरी पोटातील आम्ल मिश्रित पदार्थ फुप्फुसात जात नाहीत.

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 24/05/2022 - 12:48
**तेव्हा तर दहा बारा तास वाट बघता येणार नाही >>> हा मुद्दा आलाच आहे तर याबद्दल उपयुक्त लिहितो. दहा ते बारा तास हे फार अतिरिक्त आहेत. त्यातून शस्त्रक्रिया संपल्यानंतर काही अन्य समस्या निर्माण होतात. मी एका ज्येष्ठ भूलतज्ञांशी चर्चा केली. त्यांनी सांगितल्यानुसार खाण्यापिण्याचा प्रकार आणि तो भूलीच्या अगोदर किती तास बंद पाहिजे याचे कोष्टक असे आहे : * भरपेट जेवण : ८ तास * हलके जेवण : ६ तास *अपारदर्शक द्रव : ४ तास *पारदर्शक द्रव (शहाळे फक्त पाणी) : २ तास

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 24/05/2022 - 14:47
पण प्रत्यक्षात या कोष्टकाप्रमाणे रग्णालये काम करत नाहीत. माझी मनगटाची शस्त्रक्रिया सकाळी होणार होती तर रात्रीपासूनच पाणी पिण्यास मनाई केली होती.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 24/05/2022 - 15:19
बरोबर आहे तुमचं. बऱ्याचदा अतिरिक्त काळजीपोटी तो कालावधी वाढवून ठेवला जातो. अगदी आंतरराष्ट्रीय संदर्भ पाहिले तरी ६ तासांच्यावर शिफारस नाही. किंबहुना दीर्घकाळ बिनपाण्याचा उपास घडवल्याने डीहायड्रेशन आणि ग्लुकोजची पातळी कमी होणे अशा समस्या देखील काही वेळेस उद्भवतात. फक्त एक आहे. वृद्ध रुग्ण, वेगवेगळ्या प्रकारच्या सहव्याधी असल्या तर मग डॉक्टरांच्या तारतम्यानुसार तो कालावधी योग्य तेवढा वाढवता येतो. तरुणांच्या बाबतीत तो कोष्टकाप्रमाणे असायला काहीच हरकत नाही.

In reply to by हेमंतकुमार

माझा अंदाज असा होता. मला वाटायचं की ग्लुकोज ची पातळी कमी झाल्याने भुलीचा परिणाम लवकर/योग्य प्रकारे होत असावा. आज बरेच शंकानिरसन झाले :)

In reply to by सुक्या

हेमंतकुमार 25/05/2022 - 08:41
**बारावी नंतर डॉक्टरकीला जायला >>> त्याचं काय आहे ना... दुरून डोंगर साजरे किंवा शेजाऱ्याची हिरवळ सुंदर ! असं असतंय ते. :))

In reply to by हेमंतकुमार

सुक्या 25/05/2022 - 23:59
शेजाऱ्याची हिरवळ सुंदर ! रसिक दिसताय डॉक्टर साहेब :-) (कृपया हळू घ्या) बाकी तुमचे लेख माहीतीपुर्ण असतात. क्लिष्ट विषय सहज सोपा करुन सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे.

विजुभाऊ 25/05/2022 - 12:45
मला पोटाच्या ऑपरेशनसाठी पाठीच्या मणक्यात इंजेक्षन दिले होते. हे इंजेक्षन कसे काम करते. दुसरे म्हणजे इंजेक्षन वाटे औषधे देता येतात हे सर्वप्रथम कोणी शोधून काढले

In reply to by विजुभाऊ

हेमंतकुमार 25/05/2022 - 12:55
स्नायूतील इंजेक्शनचा शोध अतिप्राचीन असावा (500 AD.) असे विकिपेडिया म्हणते. तुम्हाला दिलेली भूल स्पायनल प्रकारची असणार. त्याबद्दल जरा वेळाने लिहितो.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 27/05/2022 - 05:17
सन 1650 ;: पास्कल यांनी हायड्रोलिकस चे प्रयोग केले त्यातून सिरींज कल्पनेचा उगम झाला. 1660 :Christopher Wren यांनी कुत्र्यांमध्ये शिरेतून इंजेक्शनचा प्रयोग केले. Drs Major and Esholttz : यांनी वरील पद्धत वापरून माणसांमध्ये प्रयोग केले परंतु रुग्णांचा मृत्यू झाला. तेव्हा निर्जंतुकीकरण वगैरे गोष्टी आलेला नव्हत्या. यानंतर दोनशे वर्ष असे प्रयोग बंद ठेवले होते !

In reply to by विजुभाऊ

हेमंतकुमार 25/05/2022 - 14:08
Spinal anaesthesia जेव्हा शरीराच्या बेंबीपासून ते तळपायापर्यंतच्या भागातील शस्त्रक्रिया करायची असते तेव्हा या प्रकारच्या भूलीचा वापर केला जाऊ शकतो. संपूर्ण शरीराला जेव्हा भूल दिली जाते तेव्हा रुग्ण बेशुद्धावस्थेत जातो. सर्वांगीण भूल देण्याचे काही अंगभूत तोटे असतात. म्हणून शरीराच्या खालच्या भागापुरतीच बधिरीकरणची गरज असल्यास या प्रकाराचा उपयोग होतो. आपल्या पाठीच्या कण्यात जो मज्जारज्जू असतो त्याच्या भोवताली दोन थरांमध्ये आवरणे असतात. दोन थरांमध्ये CSF हा द्रव असतो. पाठीच्या कमरेजवळच्या भागातून या द्रवामध्ये विशिष्ट सुई घातली जाते आणि मग तिच्याद्वारा बधिर करणारे औषध सोडले जाते. या प्रकारचे बधिरीकरण सर्वप्रथम 1898 मध्ये जर्मनीमध्ये केले गेले.

In reply to by शुभावि

हेमंतकुमार 28/05/2022 - 20:04
साधारणतः आशा भुलीच्या जोडीने काही वेदनाशामक औषधेही दिली जातात. त्यांचा प्रभाव शस्त्रक्रियेनंतर सहा तासांपर्यंत टिकतो. त्यामुळे बहुसंख्य रुग्णांमध्ये वेदना जाणवत नाही. अर्थात शस्त्रक्रियेच्या प्रकारानुसार काहीशी व्यक्तिसापेक्षता राहिल.

sunil kachure 25/05/2022 - 13:44
मनक्यात इंजेक्शन दिले होते.बेंबी मध्ये harnia चे ऑपरेशन होते. पण इंजेक्शन दिल्या नंतर मला सर्व समजत होते.dr शी बोलत पण होतो. त्यांनी एक जाळी टाकण्या ऐवजी दोन टाकल्या हे ऑपरेशन चालू असताना च सांगितले.भुल तज्ञ dr मात्र डोक्या जवळ पूर्ण वेळ उभ्या होत्या. प्रश्न हा आहे की ठराविक भाग च कसा संवेदना नसणार केला जातो.बाकी सर्व शरीर संवेदनशील असते. हे कसे घडते.

In reply to by sunil kachure

हेमंतकुमार 25/05/2022 - 14:30
हे कसे घडते ते वरच्या प्रतिसादात मी दिलेच आहे. तुमच्या प्रश्नात एक अन्य उपप्रश्न दडलेला आहे. त्याबद्दल आता लिहितो. जेव्हा आपल्याला संपूर्ण शरीराला भूल द्यायची असते तेव्हा आपण ते औषध मुख्य रक्तप्रवाहात सोडतो. त्यामुळे ते मेंदूपर्यंत पोचते. परिणामी रुग्ण बेशुद्धावस्थेत जातो आणि शरीर संवेदनेला बधीर होते. स्पायनल भूलीच्या प्रकारात आपण कमरेच्या इथून CSF द्रवामध्ये बधिर करणारे औषध सोडतो. त्यामुळे शरीराचा फक्त खालचा अर्धा भाग बधिर होतो. मेंदू ठणठणीत जागा असतो ! मात्र या प्रकारच्या भूलीच्या वेळेसही भूलतज्ञाला सर्वांगीण भूलीइतकेच दक्ष रहावे लागते. रुग्णाच्या हृदयकार्य व श्वसनासंबंधी काहीही अडचण निर्माण झाल्यास तातडीने हालचाली कराव्या लागतात.

हेमंतकुमार 25/05/2022 - 16:00
गर्भनिरोधना संबंधी असल्याने इथे लिहितो. उद्यानशेती संघटनेच्या विद्यमाने नव्या प्रकारचे पर्यावरणपूरक निरोध तयार केलेले आहेत. हे वापरून झाल्यावर कुंडीतल्या मातीत पुरता येतात. तिथे त्यांचे नैसर्गिक विघटन होते.

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 25/05/2022 - 19:00
पर्यावरणपूरक निरोध
खरेतर पर्यावरणपूरक++ म्हणायला हवे...निरोध वापरणे हेच मुळात अतिशय पर्यावरणपूरक आहे . :). (लोकसंख्या नियंत्रणात रहात असल्याने )

पुर्वी कुत्रा चावल्यावर पोटावरच १४ इंजेक्शन्स घ्यावे लागायचे असे ऐकून आहे.
बॉसकडे कोणी गेला की एक महर्षी टिप्पणी करायचा: आता याला १४ इन्जेक्शने घ्यावी लागणार विविध प्रकारच्या व्हेहिकल्सबद्दल माहिती घ्यायला आवडेल. छान लेखांबद्दल धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

तर्कवादी 25/05/2022 - 23:17
बॉसकडे कोणी गेला की एक महर्षी टिप्पणी करायचा: आता याला १४ इन्जेक्शने घ्यावी लागणार
हा हा... म्हणजे १४ पेग :)

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 26/05/2022 - 05:34
विविध प्रकारच्या व्हेहिकल्सबद्दल माहिती
>>म्हणजे... Drug carrier का ? ही माहिती द्यायला माझ्यापेक्षा तुमच्यासारखे औषधशास्त्रज्ञ जास्त योग्य ठरतील. :)

चौकस२१२ 26/05/2022 - 08:01
कुमारजी .. रोचक माहिती दिलीत .. आपल्या सारख्यांनी मिपा च्या बाहेर जाऊन स्वतःचा ब्लॉग किंवा इतर प्रसिद्धी माध्यमातून विस्तृत जाणते पर्यंत पोचवण्यस्तही प्रयत्न करावेत अशी विनन्ती एक प्रश्न ४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) : साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे : a. काही रोगांसाठी लसीकरण मग लस जर रक्तप्रवहात जात नाही तर दंडातून ती दीर्घकाळासाठी म्हणून असते तर ती कोठे जाते आणि करते यावर वेगळा लेख लिहाल का? एक अनुभव सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते : · लेझर तंत्र मी एकदा थोडे दिवस एकाउद्योगात संशोधनात्मक कि ज्यांनी हे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न केलं होता , कल्पना अशी कि टोचताना जी वेदना होते ती भासू नये म्हणून त्वचेवर स्थानिक जागी लावण्याचे भूल देणार जे औषद मिळते हळू वेगाने भूल देते.. म्हणून एका लेसर किरणांद्वारे ३ मी मी चा गोल भाग थोडा जाळायचा ( अबलेट ) आणि मग लावयायाचे जेणे करून ते लवकर शोषले जाईल आणि त्वचा बधिर होईल आणि मग इंजेकशन द्यायचे .. पुढे पैसे सॅमसंपले किंवा इतर काही कारणाने तो उद्योग बंद पडला

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 26/05/2022 - 08:44
आस्थेने प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे ! तुम्ही उपस्थित केलेले दोन मुद्दे चांगले असून त्याची स्वतंत्रपणे दखल घेतो. १.
आपल्या सारख्यांनी मिपा च्या बाहेर जाऊन स्वतःचा ब्लॉग किंवा इतर प्रसिद्धी माध्यमातून विस्तृत >>>
जालावर लिहिण्यापूर्वी (आणि नंतरही काही काळ) मी आरोग्यविषयक काही लेख एका दैनिकाकडे पाठवत असे. ते मानधनाशिवायच प्रसिद्ध झाले. त्यावर त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांचे अजब स्पष्टीकरण मिळाले ते असे: "
आम्ही वृत्तपत्राच्या पुरवणीतील कुठल्याच लेखाला मानधन देत नाही".
पण त्याचदैनिकाचे एक धोरण असे होते : त्यांचेकडे अनाहूत लेखकांसाठी काही सदरे आहेत. त्यापैकी ‘अनुभव’ प्रकारातले एक सदर मुख्य अंकात होते. यात वाचक-लेखक दैनंदिन सामान्य जीवनातले सपक अनुभव लिहायचे – जेमतेम ३०० शब्दांत. त्याला ते किरकोळ मानधन देत असत. या दैनिकाच्या पुरवणीत निरनिराळ्या वारी विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांवर तज्ञांचे लेख येत असतात. हे अभ्यासपूर्ण लेख आकाराने पुरेसे मोठे असून ते संबंधित तज्ञांनी लिहिलेले असतात. पण या लेखांना मात्र अजिबात मानधन नसते. या सर्व तज्ञांनी लेखन ही समाजसेवा समजावी अशी या दैनिकाची अपेक्षा आहे ! .............. असले विचित्र धोरण पाहिल्यानंतर मी वृत्तपत्रांना टाटा केला. मिपा व माबोवर वाचकांशी होणारी चर्चा मला पुरेसे समाधान देते. काही सुजाण वाचक इथल्या लेखांचे दुवे त्यांच्या मित्रपरिवारात पाठवत असतात. तेवढा प्रसार होतो ते ठीक म्हणायचे.

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 26/05/2022 - 09:18
*मग लस जर रक्तप्रवहात जात नाही तर ती कोठे जाते? >> हा अपेक्षित आणि स्वाभाविक प्रश्न आहे. यातील विज्ञान हे गुंतागुंतीचे आहे आणि त्यावर सवडीने स्वतंत्र विचार करता येईल. तूर्त थोडक्यात सांगतो. त्वचेमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या इम्यून पेशी असतात. त्यांचे स्थानिक लिंफ ग्रंथींशी दळणवळण असते. या समन्वयातून लसीकरणानंतर शरीरात अँटीबॉडीज होतात. तसेच अन्य प्रकारची रोगप्रतिकारशक्तीही निर्माण होते.

चौकस२१२ 26/05/2022 - 08:07
संपूर्ण भूल दिली असेल आणि ती उतरल्यावर रुग्णालयात आईसक्रीम असा माझा अनुभव आहे ते का? ( हा अनुभव एक देशातील आहे - सर्व देशात असेलंच अशी प्रथा असे नाही )

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 26/05/2022 - 09:35
*संपूर्ण भूल दिली असेल आणि ती उतरल्यावर रुग्णालयात आईसक्रीम >>> आईस्क्रीम असा नियम नक्कीच नाही ! साधारण सूत्र असे आहे. रुग्णांना सुरुवातीस विविध प्रकारचे द्रवपदार्थ द्यावेत. त्यानंतर गिळायला सोपे जातील असे मऊ पदार्थ द्यावेत. म्हणून परदेशात आईस्क्रीम /जेली/ पुडींग अशी परंपरा असावी. भारतात आपण पेज किंवा खीर देऊ शकतो.

जेम्स वांड 26/05/2022 - 09:40
मेनंजायटीसची तपासणी करताना किंवा इतर काही न्यूरॉलॉजीकल प्रोसिजर्समध्ये मणक्यातून सेरेब्रो स्पायनल फ्लूईड काढतात त्या सिरिंजला इतकी भली मोठी सुई का असते हो ? ते जंगम प्रकरण पाहूनच धास्ती वाटते मला तरी, खूप दुखत असेल न ते ? बाकी आम्ही पडतो चिकन हार्ट, त्यातही आमच्या पोरीला अगदी लसीचे इंजेक्शन द्यायचे असले तरी माझा जीव कालवतो, फुलराणी आहे न ती बाबाची, गंमत म्हणजे आमची झाशीवाली तयार असते, परवाच सेकंड बूस्टर दिलं तेव्हा स्वतःच पेडला म्हणाली "डॉक्टर अंकल आय एम रेडी फॉर इंजेक्शन" मायला मलाच भडभडून आलं एकदम, त्यामुळे तिला सुया टोचताना सोबत उभं राहायचं डिपार्टमेंट तिच्या आईकडे दिलं आहे पर्मनंट आम्ही

In reply to by जेम्स वांड

हेमंतकुमार 26/05/2022 - 10:12
**त्या सिरिंजला इतकी भली मोठी सुई का असते हो ? खूप दुखत असेल न ते ? >>> चांगला प्रश्न.( या लेखातील भूल या विषयावर अनेक चांगले प्रश्न येत आहेत). मुळात ही मोठ्या आकाराची सुई एकदम मणक्यात घालत नाहीत. त्यापूर्वी संबंधित भागाच्या त्वचेवर स्थानिक भूलीचे इंजेक्शन दिले जाते. या सुईचा व्यास रक्त काढण्याच्या सुईपेक्षा मोठा का, हा प्रश्न स्वाभाविक आहे. रक्ताशी तुलना करता CSF हे घट्ट व चिकट (viscous) आहे. पारंपरिक मोठ्या व्यासाच्या सुयांमधून ते काढल्यानंतर काही रूग्णांना डोकेदुखी होते. त्यादृष्टीने अलीकडे कमी व्यासाच्या सुया वापरण्याबाबत संशोधन झालेले आहे. अर्थात खूप कमी व्यासाची वापरून चालणार नाही कारण मग तो द्रव बाहेर यायला त्रास होईल. त्यामुळे या दोन्हींचा सुवर्णमध्य साधेल अशा व्यासाची सुई वापरतात. ...... * डिपार्टमेंट तिच्या आईकडे >>> ते बर असतंय.:))

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 26/05/2022 - 10:29
:)होय होय
त्यामुळे तिला सुया टोचताना सोबत उभं राहायचं डिपार्टमेंट तिच्या आईकडे दिलं आहे पर्मनंट आम्ही
हे डिपार्टमेंट आईकडेच असते.मुलीचा बाबा धीट नसतोच मुळी,हळवाच असतो!

In reply to by Bhakti

जेम्स वांड 27/05/2022 - 07:56
&#128557 मध्यरात्री बाप घरी आल्यावर झोपेतून उठून बाबा तुझे पाय चेपून देते म्हणणाऱ्या पोरींचे बाप तर अजूनच हळवे असतात, पोरगं आईचं असतं कायम अन पोरगी बापाची

In reply to by जेम्स वांड

हेमंतकुमार 27/05/2022 - 08:25
पण... एकदा का मुले प्रौढ झाली की मग मात्र वेगळा अनुभव येतो ! मुलगी आईची चांगली मैत्रीण होते. परंतु मुलगा वडिलांपासून काहीसा दूर जातो..... :)

In reply to by हेमंतकुमार

जेम्स वांड 28/05/2022 - 21:58
तोवर बबडी अंगभर नाचण्याचे सुख अनुभवायचे. नंतर पोरं मोठी झाली का हाती लागत नाहीत बारकी आहेत तोवर हाती लागतील तेव्हा धरून त्या जॉन्सन/ हिमालयाच्या बेबी पावडरचा छातीभरून सुगंध घेत मुके घेऊन टाकावेत पोरांचे, नंतर एकदा पाय फुटले का पोरे हाती लागत नाहीत.

sunil kachure 26/05/2022 - 10:30
मी जेव्हा २५ वर्षाचा असेन तेव्हा .थोडे बर वाटत नव्हते म्हणून डॉक्टर कडे गेलो. ताप वैगेरे होता.. डॉक्टर नी खुभ्यात इंजेक्शन दिले पण इंजेक्शन दिल्यावर काहीच वेळात कमरे खालचा भाग सुन्न झाला.. पाय ची सुद्धा हालचाल करणे अशक्य झाले. मी घाबरलो.पण dr बोलले घाबरु नको .थोडा वेळ तिथेच झोपवून ठेवले. काही वेळात सर्व ठीक झाले. Dr हे कशा मुळे घडले असेल.औषध तर चुकीचे नसणार. इंजेक्शन चुकीच्या जागी दिले गेल्या मुळे घडले असेल का?

In reply to by sunil kachure

हेमंतकुमार 26/05/2022 - 11:22
खुब्यावरील इंजेक्शनच्या बाबतीत sciatic nerve ला इजा संभवते. म्हणून ते काळजीपूर्वक द्यायचे असते. अर्थात इथून निव्वळ ऐकीव माहितीवर कुठलेही मत देणे बरोबर नाही.

सच्चा 31/05/2022 - 12:27
लहानपणी एकदा वर्तनमापत्रात इंजेक्शन्सविषयी एक लेख वाचला होता, त्यानंतर इंजेक्शन्सविषयी मनात भीती (Phobia) निर्माण झाला, आणि अजूनही बऱ्याच प्रमाणात आहे. एकदा तर प्लेटलेट्स दान करण्यासाठी गेलो तर Freak Out होत होतं. नंतर २००७ ला काही कारणांमुळे जवळपास आठवडाभर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, त्यावेळी मात्र सुईची सगळी हौस फिटली. सलाईन २४/७ आणि इंजेक्शन्स, काही इंजेक्शन्स नाभीच्या त्वचेखाली आणि काही सलाईनच्या कनेक्शनमधून शिरेत दिले, जसजसा इंजेक्शन्समधील द्राव शिरेतून जायचा तसतसा दाह व्हायचा.

Trump 22/06/2022 - 11:42
हा लेख तुम्हीच लिहीला आहे का? खुप साधर्म आहे. ----------- विश्लेषण : औषधांना कसं समजतं शरीरात कोठे जायचं? जाणून घ्या https://www.loksatta.com/explained/explained-how-medicine-know-where-your-pain-is-known-it-works-prd-96-2983871/

In reply to by Trump

हेमंतकुमार 22/06/2022 - 11:57
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद ! तो लेख मी लिहिलेला नाही. लोकसत्तेतील लेखावर कालची तारीख आहे. (21 जून). तो गोळाबेरीज करून लिहिल्या सारखा वाटतो खरा. माझा मिपावरील लेख १६ मे २०२२ चा आहे अधिक काय बोलणे ? :) असे अनुभव अधून-मधून येत आहेत....

In reply to by Trump

सुबोध खरे 24/06/2022 - 09:53
लेख भंपक आहे. औषधे शरीरभर पसरतात आणि त्याचा परिणाम शरीरभर दाखवतात. आपले केवळ लक्ष दुखऱ्या भागावर केंद्रीत झालेले असल्यामुळे आपल्याला असे वाटते कि औषध बरोबर तेथे पोचले आहे. युरोकायनेज किंवा स्ट्रेप्टो कायनेज हे औषध शरीरात कुठेही रक्ताची गुठळी झाली असेल तर ती विरघळवण्यासाठी वापरली जातात. यात कोरोनरी आर्टेरि मध्ये गुठळी होऊन हृदयविकार आला असेल तर हे औषध तातडीचे म्हणून वापरले जाते किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीत गुठळी होऊन पक्षाघात झाला असेल तर हे औषध ६ तासाच्या आत देऊन हि गुठळी विरघळवता येते. पण याचा परिणाम म्हणून काही रुग्णांना अगोदरच्या काही दिवसात शरीरात जेथे इजा होऊन रक्तस्त्राव झालेला असेल आणि रक्त थांबलेले असेल ( रक्ताची गुठळी होऊन) तर ती गुठळी सुद्धा विरघळून शरीरात कुठेही रक्तस्त्राव होऊ शकतो. हीच प्रक्रिया घोणस गटाचा साप चावल्यामुळे होते. या गटाचे सर्पविष आपल्या रक्ताच्या गुठळ्या विरघळवायचे काम करत असल्यामुळे रुग्णाला शरीरभर रक्तस्त्राव होतो आणि भयानक असे रक्ताचे फोड येतात. viper bite गुगल केल्यास हि भयानक चित्रे दिसू शकतील. पॅरासिटॅमॉल, क्रोसीन हे औषध जसे अंगदुखी साठी उपयुक्त आहे तसेच ते तापासाठी उपयुक्त आहे. अंगदुखी आहे कि ताप आहे हे औषधाला कसे समजेल. (तापाचे) तापमान नियंत्रक केंद्र मेंदूच्या तळाशी असते तर अंगदुखी शरीरभर कुठेही असते. लोकसत्तेच्या एकंदर दर्जा आजकाल शंकास्पद झालेला आहे.

नगरी 24/06/2022 - 19:41
मी लहान होतो तेव्हा भारत रशिया मैत्री वगैरे प्रकरणे चालू होती. तेव्हा राशियातून रशियन शिकण्याची पुस्तकेही येत असत. पण आज एक प्रश्न आज पडतो , शास्त्रीन्ना कसे मारले असेल? कदाचित मी काही केजीबी च्या कथा वाचल्या होत्या त्यात instant kill down without any evidence असे वाचले होते,खरेच असे होऊ शकते?

In reply to by नगरी

सुबोध खरे 24/06/2022 - 20:02
त्यांच्या पार्थिवाचे ना शव विच्छेदन झाले ना कसून चौकशी. प्रकरण दाबून टाकले मग मृत्यूचे कारण सारखी य: कश्चित गोष्ट कशी बाहेर येणार?

In reply to by नगरी

हेमंतकुमार 24/06/2022 - 20:16
हा विषय रंजक आहे खरा, परंतु त्यासंदर्भात विषबाधातज्ञ नीट सांगू शकतील. पूर्वीच्या काळी जेव्हा शरीरात गेलेली विषे ओळखण्याचे तंत्रज्ञान फारसे उपलब्ध नव्हते त्याकाळी आर्सेनिक, thallium किंवा तत्सम काही रसायने खुनासाठी वापरली जात. संबंधिताला दिसणारी लक्षणे काही आजारांशी मिळतीजुळती असायची. त्यामुळे विष देणाऱ्याचे फावत असे. सध्याच्या काळात विषबाधा ओळखण्याचे तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. त्यामुळे विषबाधा केली असता पुरावा मिळणार नाही हे अवघड वाटते. अर्थात मी या शाखेचा तज्ञ नसल्यामुळे याहून अधिक लिहिणे बरोबर नाही. न्याय वैद्यकशास्त्रातील एक प्रसिद्ध अवतरण असे आहे: Dead men tell tales !

हेमंतकुमार 18/10/2022 - 05:53
हाडांच्या जंतुसंसर्गासाठी स्थानिक औषध रोपण करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामध्ये एखादे प्रतिजैविक बोन सिमेंटमध्ये मिसळून या मिश्रणाचा implant हाडांमध्ये केला जातो त्यातून उपयुक्तता खूप वाढते

हेमंतकुमार 04/04/2023 - 11:24
तामिळनाडूतील ग्लोबल फार्मा या कंपनीने बनवलेले डोळ्यांचे औषधी थेंब अमेरिकेतील लोकांसाठी बऱ्यापैकी वापरले गेले. या औषधी थेंबांमधून सुमारे 68 जणांना Pseudomonas या जंतूचा संसर्ग झाला आणि तो गंभीर स्वरूपाचा होता. परिणामी तीन जणांचा मृत्यू आणि आठ जणांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. ग्लोबल फार्मा उद्योगाची अमेरिकी औषध प्रशासनाकडून तपासणी झाली असता तिथल्या औषध निर्मितीमध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत. निर्जनतुकीकरणाविषयी बेफिकिरी ही त्यातील महत्त्वाची बाब. त्या कंपनीच्या डोळ्यांच्या औषधी थेंबांमधून संबंधित लोकांना Pseudomonas या जंतुसंसर्गाचा त्रास झाला. हा जिवाणू चांगल्यापैकी घातक आहे. जर त्याने व्याधीग्रस्त लोकांच्या शरीरात शिरकाव केला तर अनेक अवयवांना गंभीर इजा होतात. डोळ्यांना झालेली इजा खूपदा शोकांतिक ठरते. या जंतू विरोधात औषधे असूनही अलीकडे तो पारंपरिक औषधांना दाद देईनासा झालेला आहे.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 04/04/2023 - 11:55
आता कंपनीने बाजारातील सर्व बाटल्या परत मागवल्यात. https://www.fda.gov/safety/recalls-market-withdrawals-safety-alerts/global-pharma-healthcare-issues-voluntary-nationwide-recall-artificial-tears-lubricant-eye-drops-due …. या दुर्घटनेनंतर भारतात केंद्रीय आणि राज्य पथकांनी अप्रमाणित औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात धडक कारवाई चालू केली आहे. 76 औषध कंपन्यांची तपासणी होऊन त्यापैकी 18 जणांचा परवाना रद्द झाला आहे.

सिरुसेरि 07/05/2023 - 21:54
उपयुक्त माहिती . --- D. सांध्यामध्ये दिलेले इंजेक्शन काही प्रकारच्या संधिदाहांत स्टिरॉइड्सचे इंजेक्शन हे विशिष्ट सांध्यांमध्ये देता येते. -- माझ्या माहितीप्रमाणे पेन मॅनेजमेंट तज्ञ जास्त करुन त्यांच्या संधिदाहांत संबंधी pain management clinical procedures मध्ये या स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर करतात . बरेचदा शरीरातील अनेक विशिष्ट सांध्यांमध्ये खुप वापर झाला / झीज झाली तर तेथील बाह्य भागावर सुज येते . हि सुज सांध्यांच्या आतील भागांमधे दुषित पाणी / synovial fluid / joint inflammation / joint effusion या स्वरूपात जमा होते . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय या माध्यमांमधुन याचा तपास करता येतो . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय यांच्या रीपोर्ट मधे याचा उल्लेख effusion / joint effusion किंवा fluid असा होतो. हि सुज शोधणे व ती extract करणे / शरीराबाहेर काढण्यामधे orthopedic तज्ञांपेक्षा pain management तज्ञांचा जास्त उपयोग होतो . हि सुज extract करणे / शरीराबाहेर काढ्ण्याच्या कृतीला joint aspirate procedure असे म्हणतात . त्यानंतर joint inflammation कमी व्हावे म्हणुन मेडिकल मान्यताप्राप्त स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर केला जातो . गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी कमी होण्यासाठी या pain management clinical procedures चा उपयोग होतो . अनेक मोठ्या hospitals मधे pain management तज्ञांचा वेगळा विभाग असतो तसेच त्यांची क्लिनिक्सही असतात . या विभागातर्फे गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी या संबधी operations postpone करणे वा टाळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात जसे की - स्टेम सेल थेरपी , प्लासमा सेल थेरपी , पी आर पी इंजेक्शन्स .

भाग १ इथे : https://www.misalpav.com/node/50235 .................... या भागात आपण औषधे देण्याचे जे शरीरमार्ग बघणार आहोत ते असे : · इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे · इंजेक्शनचे अतिविशिष्ट मार्ग · स्थानिक मार्ग ok इंजेक्शन इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढतात भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य.

औषधांचा कायाप्रवेश (१)

हेमंतकुमार ·

Nitin Palkar 17/05/2022 - 12:40
नेहमी प्रमाणेच खूप माहितीपूर्ण लेख. एनिमा हा फक्त पोट साफ होण्यासाठी देतात असे वाटत होते. एनिमाद्वारे औषधही दिले जाते हे पहिल्यांदाच समजले. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.

In reply to by Nitin Palkar

हेमंतकुमार 17/05/2022 - 14:34
धन्यवाद. एनिमा >> याचा अजून एक उपयोग हा मोठ्या आतड्याच्या तपासणीसाठी होतो. एनिमाद्वारे बेरियम आत सोडले जाते आणि मग एक्स-रे च्या साह्याने पाहणी केली जाते. एकेकाळी याचा वापर बराच होत होता. परंतु आता नवी प्रतिमातंत्रे उपलब्ध झाली असल्याने हे मागे पडले आहे.

Bhakti 17/05/2022 - 13:53
वाह! नेहमी प्रमाणे खुप माहिती पूर्ण विवेचन.वाखू साठवली. महाविद्यालयात असताना एडिबल वक्सिन (Edible Vaccine)अशी संकल्पना थोडी शिकवली जायची.एक दिवस आपणही सफरचंद किंवा इतर फळातून वक्सिन मिळेल तयार करु अशी स्वप्ने मला पडायची :). दुसर्‍या भागात एडिबल औषधांची माहिती वाचायला आवडेल.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 17/05/2022 - 14:37
Edible Vaccine
>>> ही संकल्पना रोचक आहे. परंतु त्यामध्ये वनस्पतिशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान यांची सांगड घालावी लागते. ही शास्त्रे माझ्या अभ्यासाचा भाग नसल्यामुळे त्याबाबत माझा विशेष अभ्यास नाही. योग्य त्या तज्ञाने आपणा सर्वांनाच माहिती दिल्यास उत्तम होईल.

पुढील भागात बहुधा शीरेतून दिल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश असेल. Diclofenac औषध suppository स्वरूपात वेदनाशामक म्हणून वापरलेले पाहिले आहे.

नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनिय लेख आवडला चघळून खायच्या गोळ्यां पैकी सगळ्यात आवडते औषध म्हणजे सी व्हिटॅमिनच्या गोळ्या, आमचे डॉक्टर म्हणायचे कितीही खा, तसेच खोकला झाला की कंठसुधारक वटी, व्हिक्स किंवा कॉफसीलच्या गोळ्या खायला मजा येते. दात दुखत असला तर दाताखली धरायला लवंग देतात त्यानेही बराच आराम मिळतो. पैजारबुवा,

हेमंतकुमार 18/05/2022 - 10:01
अभिप्राय आणि पूरक रंजक माहितीबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! दुसरा भाग हा 'इंजेक्शन्स महोत्सव' असणार आहे. :)

नगरी 18/05/2022 - 14:53
माझा प्रश्न बाळबोध असू शकेल कदाचित कारण तो मला लहानपणापासूनच पडलाय पण तुम्हालाही विचारून टाकतो.औषध कोणतेही असो अलोपॅथिक मग ते कोणत्याही स्वरुपात असो,आयुर्वेदिक किंवा होमियोपॅथिक ते योग्य जाऊन तिथेच कसे काम करते?

In reply to by नगरी

हेमंतकुमार 18/05/2022 - 16:47
खूप चांगला व रंजक आहे ! त्याचे सविस्तर उत्तर म्हणजे लघुलेख होईल. मी उद्या सकाळपर्यंत याचे उत्तर दोन टप्प्यांत देईन- फक्त आधुनिक वैद्यकाच्या दृष्टिकोनातून. अन्य शास्त्रांच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात

In reply to by नगरी

हेमंतकुमार 18/05/2022 - 20:07
औषधांच्या रासायनिक गुणधर्मानुसार ती तीन प्रकारची असतात : १. अत्यंत निवडक कृती करणारी २.मध्यम निवडक ३.विशिष्ट पेशी निवड नसणारी म्हणजेच, पहिल्या गटातील औषधे शरीरातील अत्यंत निवडक प्रकारच्या पेशींवरच काम करतील. तर तिसऱ्या गटातील औषधे एकदा का रक्तप्रवाहातून सर्वत्र पोहोचली की शरीरभर परिणाम दाखवू शकतील. आता हे असे का होते ? औषध जेव्हा रक्तप्रवाहमार्फत एखाद्या वैयक्तिक पेशीच्या आवरणापर्यंत पोचते, तिथे त्याचे स्वागत करण्यासाठी काही विशिष्ट प्रथिने असतात (Receptors). या प्रथिनांचे वेगवेगळे प्रकार असतात. काही औषधांच्या बाबतीत, ते औषध फक्त एकाच प्रकारच्या R शी सलगी करू शकते आणि मगच त्याला पेशीच्या आत घेतले जाते. ( एक कुलूप ; एकच किल्ली). परंतु, काही औषधांच्या बाबतीत परिस्थिती एकदम उलट आहे. ती औषधे कुठल्याही प्रकारच्या Rs शी संयोग करू शकतात. त्यामुळे त्यांचा प्रवेश अनेक प्रकारच्या पेशींमध्ये होऊ शकतो. ( येथे मास्टर की ची उपमा द्यावी लागेल!)

In reply to by नगरी

हेमंतकुमार 18/05/2022 - 20:29
आता वरील प्रत्येक गटाचे एकेक उदाहरण : 1.digoxin : मुख्यतः हृदयपेशीशी सलगी करते. 2. aspirin : शरीरात जिथे जिथे दाह झाला असेल तिथे काम करते 3. atropine : पचनसंस्था, डोळ्यांचे स्नायू आणि श्वसनसंस्था अशा विविध ठिकाणी काम करू शकते.

जेम्स वांड 20/05/2022 - 08:14
नेहमीप्रमाणे झक्कास लेख, डोकं दुखतंय म्हणून जेव्हा आपण डिस्प्रिन गोळी घेतो ती पाण्यात घालून तिच्यात सोड्यासारखे बुडबुडे येऊन ती पूर्ण विरघळली की घेण्यामागे काय योजना असेल ? बाकी ती एक गोळी शरीरात पोचवण्यामागचे अफाट विज्ञान सुलभ दृष्टीकोनातून मांडल्याबद्दल आपले असंख्य आभार सर. ह्याच निमित्ताने २००१ सालची अमेरिकन एनिमेटेड सिरीज ओझी अँड ड्रीक्स आठवली, ओझी नावाची एक श्वेत रक्तपेशी आणि ड्रीक्स नावाची एक कोल्ड कॅप्सूल ह्यांच्या "हेक्टर क्रूझ" नावाच्या मुलाच्या अंगात/ शरीरातील मुशाफिरी आणि मलेरिया/ स्कारलेट फिव्हर वगैरे रोगांशी लढाई त्यात दाखवली आहे, अंतर्गत अवयव आणि शरीर हे एक शहर आहे असे रूपक वापरून ओझी अन ड्रीक्स ते "शहर" रोगरूपी व्हीलन्सपासून कसे वाचवतात हे तुफान चित्रण त्यात आहे. .

In reply to by जेम्स वांड

हेमंतकुमार 20/05/2022 - 08:48
*डिस्प्रिन गोळी घेतो ती पाण्यात घालून>>> चांगला प्रश्न. जी गोळी घट्ट स्वरूपात असते ती पचनसंस्थेत गेल्यानंतर विरघळणार आणि मग शोषली जाणार. यात बराच वेळ जातो. डिस्प्रिनसारखी पाण्यात विरघळणारी गोळी आहे तिचा हेतू गोळीने त्वरित काम करावे असा असतो. तसेच त्यामुळे तिची परिणामकारकता वाढते. ....... *
एनिमेटेड सिरीज
>>> छान चित्रफीत सुचवली आहे सवडीने पाहतो.

हेमंतकुमार 22/05/2022 - 12:00
तोंडातून घ्यायच्या गोळ्यांच्याबद्दल थोडी भर घालतो. चघळायच्यागिळायच्या गोळ्या गोळीच्या रासायनिक गुणधर्मानुसार काही औषधे चघळायच्या स्वरूपात करता येतात. विशेषता मुलांमध्ये अशा गोळ्यांचा फायदा होतो. तसेच ज्या वृद्धांना गोळी किंवा कॅप्सूल गिळण्याची नेहमी भीती वाटते त्यांनाही अशा गोळ्यांचा फायदा होतो. चघळायच्या गोळ्यांचे अन्य काही फायदे असे: १. प्रवासात बरोबर पाणी नसेल तरी त्या पटकन घेता येतात २.गिळण्याच्या गोळीला तयार करताना ठराविक वजनाची मर्यादा असते (एक ग्रॅमपेक्षा कमी).चघळायच्या गोळ्या अधिक वजनाच्या बनवता येतात. ३. अशा गोळ्यांचा परिणाम लवकर व अधिक दिसतो.

Trump 22/06/2022 - 11:42
हा लेख तुम्हीच लिहीला आहे का? खुप साधर्म आहे. ----------- विश्लेषण : औषधांना कसं समजतं शरीरात कोठे जायचं? जाणून घ्या https://www.loksatta.com/explained/explained-how-medicine-know-where-your-pain-is-known-it-works-prd-96-2983871/

In reply to by Trump

हेमंतकुमार 22/06/2022 - 11:58

निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे. पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत.

स्त्री-लैंगिकतेचे गूढ

हेमंतकुमार ·

In reply to by गवि

सहमत. एका संवेदनशील विषयाची अतिशय संयत मांडणी. निळे चित्रपट हे वास्तव नाही हे समजून घेतलं तरी बरेच गैरसमज दूर होतील :).

चौथा कोनाडा 28/03/2022 - 12:48
महत्वाचा विषय. लेखातील तपशिल चपखल आहेत.
या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही.
या बद्दल लेख वाचण्यात आले होते, पण "हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे" हे प्रथमच वाचण्यात आले. या अनुषंगाने स्त्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त झाल्यातर आणखी जागरूकता येऊ शकेल.

In reply to by nanaba

हेमंतकुमार 28/03/2022 - 13:34
सहमत. कळसबिंदू हीच लेखाची मध्यवर्ती कल्पना आहे. अन्य तपशील घेतलेले नाहीत. संभोगपूर्व प्रक्रियांमधून कळसबिंदूची प्राप्ती होतेच असे नाही. या संदर्भात बरीच उलट-सुलट चर्चा वाचण्यात आली. म्हणून तो मुद्दा टाळला आहे

हेमंतकुमार 28/03/2022 - 13:30
स्वागत केल्याबद्दल वरील तिघांचे आभार ! ... १.
निळे चित्रपट हे वास्तव नाही हे समजून घेतलं
>> अ-ग-दी ! +१११ .. २.
G बद्दल लेख वाचण्यात आले होते,
>>> बऱ्याच वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक नियतकालिकांमध्ये या बिंदूवर भरमसाठ चर्चा होत असते. ज्यांच्यामते तो आहे, ते हिरीरीने पटवून द्यायचा प्रयत्न करतात. पण त्याचे नक्की स्थान दाखवता येत नाही. त्यावर एक वैज्ञानिक म्हणाल्या, “ते कसे आहे ना, ‘हवा किंवा वारा दाखवा’ असं म्हणण्यासारखं आहे ! ‘तो’ आहे पण बिंदू म्हणून दाखवता येत नाही ... 😀

माहितीपूर्ण लेखन आहे. चर्चा सुरु ठेवा. पण, इतरही काही निसटलेला भाग असावा असे वाटले, म्हणजे 'बिंदूवर' पोचता येत असेल, जाता येत असावे. वगैरे. बिंदुगामी चर्चेच्या प्रतिक्षेत. लेखातला फोटो उच्च आहे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by चौथा कोनाडा

>>>असहमत ! या पेक्षा उत्तम फोटो वापरता आला असता. क्षणभर असहमतीशी सहमती दाखवली आणि तुम्हाला समजा लेखकाने सांगितलं असतं की दुसरा फोटो टाका तर, तुम्ही कोणता फोटो टाकला असता ? मला तर वरील फोटो वरुन काल्पनिक चलचित्र डोळ्यासमोर आले की ती महिला आता उत्कलन बिंदूच्या सॉरी, कळसबिंदूच्या यात्रेला निघाली आहे, बस आता कोणत्याही तो क्षण आणि त्या क्षणी पापण्या हळूहळू कमळ पाकळ्याप्रमाणे अलगद मिटतील आणि मान डाव्या आणि उजव्या बाजुच्या घाटवळणांनी वळणे घेणा-या मोटारीप्रमाणे वळत राहील आणि आनंदलोकाच्या बागेत फुलपाखरी झालेलं मन या फुलावरुन त्या फुलावर काही वेळ विहरत राहील. आनंदावेग ओसरु लागला की मोग-याच्या गंधाने हळुहळु मलुल झालेले डोळे उघडू लागतील असा तो 'लै. गुढतेचा' प्रवास फोटो वरुन वाटला होता. च्यायला, तात्या आज या धाग्यावर असता तर एकसे एक फोटो टाकले असते आणि म्हणाला असता बिरुटेशेठ योग्य फोटो निवडा. आता फक्त आठवणी. मिस यू तात्या. -दिलीप बिरुटे (प्रवासी ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 29/03/2022 - 17:50
च्यायला, तात्या आज या धाग्यावर असता तर एकसे एक फोटो टाकले असते आणि म्हणाला असता बिरुटेशेठ योग्य फोटो निवडा. आता फक्त आठवणी. मिस यू तात्या.

👍

हेमंतकुमार 28/03/2022 - 16:24
१.
इतरही काही निसटलेला भाग असावा असे वाटले,
>>> संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व यावर एक नवा परिच्छेद मूळ लेखात संपादित करून घेतला आहे. त्यात या क्रीडांचे महत्व आणि मर्यादा दिल्यात. ... २.
'सफर है मंजिल से ज्यादा हसीन'
>>> छान . सहमत.

विंजिनेर 28/03/2022 - 23:48
निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का?
उत्तर संकुचित वाटलं - विषेशतः पुनरुत्पादनाशी जोडलेला संबंध oversimplified/cherry picking क्याटॅगरीतला वाटला.

In reply to by विंजिनेर

>>मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? डिस्कवरी का नॅशनल जिओग्राफीवर लायन्स प्राईड वरचे काही भाग पाहिले होते. त्यात काही सिंह (३-४ किंवा अगदी ५ ही असु शकतात) हे एका कळपाचे प्रमुख असतात ज्यात जवळपास १०-१२ सिहिंणी असतात.त्यात असे पाहिले होते कि एखादी सिहिंण माजावर आली कि हे सिंह आळीपाळीने तिच्याशी संभोग करत होते. त्या भागात तरी तो सिंह सिहिंणीमधला राजीखुशीचा मामला वाटला. पण दरवेळेला तसे नसावे. त्यामूळे इच्छा नसतानाही मादीला अश्या प्रकाराला सामोरे जावे लागत असावे. त्यामूळे निसर्गतः मादीची जडणघडणच अशी झाली असावी. म्हणजे उलट बाजुने विचार केला तर स्खलीत झालेल्या नराला पुन्हा दुसर्या माद्यांशी संकर करायची जबरदस्ती केली तर त्याची जी अवस्था होईल ती होऊ नये म्हणुन मादीची संभोगा बद्दल ची रचना अशा पध्दतीने गुंतागुंतीची झाली असावी.

In reply to by कानडाऊ योगेशु

हेमंतकुमार 30/03/2022 - 07:27
त्याची जी अवस्था होईल ती होऊ नये म्हणुन मादीची संभोगा बद्दल ची रचना अशा पध्दतीने गुंतागुंतीची झाली असावी.
>>> विचार करण्याजोगा मुद्दा. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अधिक वाचावे लागेल

पुष्कर 29/03/2022 - 04:43
महत्त्वाचा विषय, उत्तम मांडणी, वाचनीय. इतका चांगला लेख लिहिल्याबद्दल तुमचे एक वाचक म्हणून आभार मानतो.

हेमंतकुमार 29/03/2022 - 07:29
उत्तर संकुचित वाटलं - विषेशतः पुनरुत्पादनाशी जोडलेला संबंध
>>> इथे शास्त्रीय विवेचन आहे.
In men, orgasms are under strong selective pressure as orgasms are coupled with ejaculation and thus contribute to male reproductive success. By contrast, women's orgasms in intercourse are highly variable and are under little selective pressure as they are not a reproductive necessity.

Bhakti 29/03/2022 - 08:44
नाजूक विषय अतिशय शास्त्रीय पद्धतीने लेख लिहून मांडल्याबद्दल अभिनंदन!

अर्धवटराव 29/03/2022 - 20:58
अभिनंदन. अवांतरः शरीरशास्त्र जर स्त्रीदेहाविषयी अशी सगळी मांडणी करतेय तर मग लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या, मानसीक नाहि) आधार काय असावा? इतर प्राणीमात्रांमधे गंधस्त्राव, विशिष्ट प्रकारचे आवाज करणे वगैरे प्रकार होतात पार्टनरला आकर्षीत करायला. मनुष्यप्राण्यात तर असं काहि होत नाहि. तेंव्हा चुकुन एखादा गंध समलिंगी व्यक्तींना शरीरसंबंधाकडे आकृष्ट करतो म्हणावं तर तसंही दिसत नाहि.

हेमंतकुमार 29/03/2022 - 21:09
१.
मजेशीर व्हिडीओ.
>>> हा हा ! विविध मैथुने आवडली !! ... २.
नाजूक विषय अतिशय शास्त्रीय पद्धतीने
>>> होय, तसा प्रयत्न केलाय. ... ३.
लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या, मानसीक नाहि) आधार काय
>>> मुद्दा रोचक आहे. सवडीने वाचन करून शोधावे लागेल

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 30/03/2022 - 10:53
लेस्बीयन संबंधांचा (केवळ शारीरीक दृष्ट्या) आधार
>> या मुद्द्यावर काही वाचन केले असता काही गोष्टी अंधुकश्या समजल्या. मुळात (स्त्री अथवा पुरुष) समलैंगिकता का निर्माण होते हा गहन प्रश्न आहे. त्याचे ठाम असे उत्तर सापडलेले नसल्याने विविध जैविक थिअरीज मांडल्या गेल्या आहेत : १. व्यक्तीच्या X गुणसूत्रावरील डीएनए संबंधित विशिष्ट रचनेतील भेद. २. गर्भावस्थेत असताना आईच्या हार्मोन्सचा झालेला कमी-अधिक प्रभाव. तूर्त एवढेच म्हणता येईल.

गवि 30/03/2022 - 08:22
डॉक्टर, एक शंका आहे. फक्त नरालाच refractory period का असतो? वर काहीसा संदर्भ दिसतोय. पण यामागे निसर्गाची शरीर / मेंदू यांच्या दृष्टीने काही प्रोटेक्टिव्ह व्यवस्था आहे का?

In reply to by गवि

हेमंतकुमार 30/03/2022 - 10:12
फक्त नरालाच refractory period का असतो?
>>>> चांगला प्रश्न. पुरुषांमध्ये लागोपाठ संभोग करण्यासंबंधी जो अकार्यक्षमता कालावधी ( RP) असतो तो सर्वपरिचित आहे. मात्र या संदर्भात स्त्रियांमध्ये तुलनेने कमी अभ्यास झालेले आहेत. त्यामुळे फार मोजका विदा उपलब्ध आहे. पुरुष व स्त्री या दोघांमध्येही एका संभोगक्रियेनंतर प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन मोठ्या प्रमाणात स्रवते. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्या क्रियेत अडथळा येतो. पहिली क्रिया संपल्यानंतर स्त्रियांची शिस्निका अतिसंवेदनक्षम झालेली असते. ती पुन्हा चेतविण्याचा प्रयत्न केल्यास वेदना होतात. त्यामुळे लागोपाठ दुसरी क्रिया नकोशी वाटते. स्त्रियांत RP चा कालावधी पुरुषांच्या तुलनेत बराच कमी राहतो असे काही संदर्भ सांगतात.

अकार्यक्षमता कालावधी ( RP) एक्न्दरीत निसर्गाची रचना बघता सर्वच गोश्टी विचार पुर्वक केलेल्या वाटतात. वात्सायन ते मस्तराम पर्यन्त साहित्य सम्पदा आसताना एकेकाळचा समजाभिमुख विशय निशीध कसा काय झाला. आज यावर सकारात्मक विचार होतोय . खजुराहो मन्दिरे याचे एक उदाहरण आहे. पस्तीस वर्शापुर्वीचे फोटो शेअर करत आहे, कुमार सर अभिनन्दन . mipa mipa mipa mipa

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 31/03/2022 - 12:25
दिवसभर ते फोटो दिसत होते. एकदा दिसणारे फोटो 24 तासात का गायब होतात यासंबंधी टर्मिनेटर यांनी मार्गदर्शन करावे :)

टर्मीनेटर 30/03/2022 - 15:06
चांगला विषय आणि उत्तम मांडणी!
"स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही."
स्त्रियांना प्रणयक्रिडेत कळसबिंदू गाठण्यात शिस्निकेला (clitoris) अनन्यसाधारण महत्व आहे हे कित्येक पुरुषांना माहितच नसते. लज्जा किंवा संकोच वाटत असल्याने बहुतांश स्त्रिया त्यांना नक्की कुठल्या क्रियेतून परमोच्च (लैंगिक) सुख प्राप्त होते ह्याची वाच्यता आपल्या जोडीदाराकडे करत नाहीत ही एक मोठी समस्या आहे!
"पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता" आहे."
+१००० स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात. जोडीदार अतृप्त राहिलाय हे त्यांच्या गावीही नसते. मित्रांच्या बरोबरीने कुठल्याही विषयावर बिनधास्त मोकळेपणाने चर्चा / अनुभव शेअर करणाऱ्या भरपूर मैत्रिणीही लाभल्या असल्याने "स्त्रीच्या बिंदूबाबतची अनुभवभिन्नतेशी" बऱ्यापैकी परिचित आहे. त्यांच्याकडून मिळालेली काही माहिती शेअर करतो. "काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे" हे तुम्ही लेखात लिहिलेलंच आहे आणि "काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते" हे देखील अगदी बरोबर आहे. ह्या क्रियेत पुरुषाच्या हाताचे मधले बोट आणि जीभ ह्यांचा वापर केलेला स्त्रियांना विशेष आवडतो. काही जणींना संभोगाच्या जोडीने/नंतर शिस्निकेप्रमाणेच स्तानाग्रे, कानाच्या पाळ्या चेतवल्यावर Orgasm येते. शिस्निका, स्तानाग्रे आणि कानाच्या पाळ्या हे स्त्रीदेहाचे संवेदनशील भाग असतात त्यामुळे त्यांना चेतवून Orgasm येणे तसे स्वाभाविक वाटते पण एका मित्राचा अनुभव थोडा वेगळा वाटतो. Foreplay ते संभोग सर्व क्रिया झाल्यावर त्याने बायकोच्या कानात काहीवेळ जीभ घोळवल्या शिवाय तिला Orgasm येत नाही! असो, एका महत्वाच्या विषयावरील छान लेखासाठी आभार आणि बिरूटे सरांनी प्रतिसादात चित्राबद्दल लिहिलंय त्याच्याशी प्रचंड सहमत! अतिशय समर्पक चित्राची निवड केली आहेत तुम्ही 👍

In reply to by टर्मीनेटर

तर्कवादी 30/03/2022 - 22:56
स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात
पण मग स्खलन झाल्यावर पुरुषाने काय करणे अपेक्षित असते ? त्यापेक्षा स्खलन लांबवण्याचे प्रयत्न करुन स्वतःला आणि जोडीदार स्त्रीला अधिक वेळ आनंद देण्याचा प्रयत्न करणे अधिक वास्तववादी उपाय असू शकेल काय ? आणि स्खलन झाल्यावर थोडा वेळ (निदान लगेचचा काही काळ तरी) स्त्री देहाबद्दल खरंच आकर्षण जागृत असते ? संभोग ही पुनरुत्पादनाकरिता आवश्यक कृती - पण मानवात पुनरुत्पादनाशिवायही संभोग ही आनंदाकरिता करण्याची कृती आहे - हे सत्य आहे आणि ते मान्य केले तरी ते सगळ्याच व्यक्तींच्या बाबत सदासर्वकाळ लागू होत असेल का नक्की ? ह्या 'सत्याचा' विविध माध्यमांनी , जाहिरातींनी इतका मारा केलाय की संभोग न करणे म्हणजे काहीतरी अपराधच जणू असे झाले आहे. या दबावातून संभोग हा जबाबदारी म्हणून उरकला जातो मग जोडीदाराची तृप्ती दुर्लक्षिली जाते. यात फक्त पुरुषालाच दोष देणे योग्य कसे ? कदाचित हा एकुणच कुटूंबसंस्थेचा/ समाजरचनेचा दोष असू शकतो.. अगदी प्रत्येकाला नेहमीच ते ही वर्षानुवर्षे एकाच जोडिदारासोबत संभोगातुन आनंद मिळू शकेल हे कशावरुन ? मग अशा वेळी ते न करण्याचेही स्वातंत्र्य हवेच ना. स्त्री-पुरुष दोघांनाही - पण लग्नाच्या जोडीदारापैकी एकाला ते नको आहे आणि दुसर्‍याला ते हवेच आहे अशी परिस्थिती असेल तर ओपन मॅरेज , विवाहबाह्य संबंध वा घटस्फोट घेवून पुनर्विवाह यापैकी एखादा मार्ग चोखाळावा लागेल. विवाहसंस्थाही टिकवायची (ते ही अगदी आदर्श स्थितीत - जोडीदाराखेरीज इतर कुणाचा विचारही मनात आणायचा नाही वगैरे नियम पाळत) आणि संभोगातुन पुर्ण समाधानही मिळवायचे व द्यायचे ही दोन्ही धेय्ये साध्य करणे ही आदर्श वाटणारी कल्पना नेहमीच प्रत्यक्षात उतरेल ही अपेक्षा अगदीच भाबडी आहे. बहुतेक वेळेस कोणत्यातरी एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे लागेल. असो. जाता जाता : यानिमित्ताने नेटफ्लिक्स वरील Sex/Life ही वेबसिरीज सुचवू इच्छितो.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 31/03/2022 - 09:31
पण मग स्खलन झाल्यावर पुरुषाने काय करणे अपेक्षित असते ?
>>> चांगला मुद्दा. बहुसंख्य जोडप्यांमध्ये निव्वळ संभोगातून दोघांनाही एकाच वेळेस कळस बिंदूस पोहोचणे हे खूप दुर्मिळ असते. बऱ्याचदा पुरुष एका प्रमाणाबाहेर स्खलन लांबवू शकत नाही- विशेषता तारुण्यात. स्त्रीला कळसबिंदूचे सुख मिळणे तसेही तुलनेने अवघड आहे. त्यामुळे एकतर तिचा बिंदू आधी आणून देणे हा पर्याय राहतो, किंवा पुरुषाचा कार्यभार उरकल्यावर त्याने अन्य मार्गाने स्त्रीला चेतवून तिला बिंदूपर्यंत नेले पाहिजे. दोघांनाही अंतिम सुख नियमित मिळत राहिले तरच स्त्रीच्या बाजूने याची गोडी दीर्घकाळ टिकून राहील.

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 31/03/2022 - 13:30
बऱ्याचदा पुरुष एका प्रमाणाबाहेर स्खलन लांबवू शकत नाही- विशेषता तारुण्यात.
काहीसा असहमत - माझ्या मते पुरुषाला जोडीदाराबद्दल अतिशय आकर्षण असेल (शारिरिक , भावनिक ई सगळ्या पातळीवर) तर स्खलन लांबवून त्याला अधिकाधिक आनंद मिळेल आणि अधिक आनंद /समाधान मिळवण्याकरिता तो प्रयत्न करेलच... व विशेष काही शारिरिक समस्या नसल्यास त्याला ते नक्कीच शक्य होईल बाकी पुरुषाकरिता कळसबिंदू ही समागमाची संपुर्णता असली तरी कळसबिंदू गाठला म्हणजे त्याला पुर्ण समाधान वा तृप्ती लाभलीच असे नाही.. त्यामुळे "खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात". पण केवळ स्खलन झालंय म्हणजे या महाभागाचं समाधानही झालंय हा निष्कर्ष कितपत योग्य आहे ? पुरुषासाठी तरि स्खलन = समाधान हे समीकरण १००% लागू आहे का ? नसल्यास इथे पुरुष हा अन्याय करणारा आणि स्त्री ही अन्यायग्रस्त अशीच मांडणी इथे अनावश्यक वाटते... तसेही स्त्रीच्या कळसबिंदूबद्दल अनभिज्ञ असलेल्या पुरुषाला त्याबद्दल दोषी ठरवणे अयोग्य.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 31/03/2022 - 14:02
केवळ स्खलन झालंय म्हणजे या महाभागाचं समाधानही झालंय हा निष्कर्ष कितपत योग्य आहे ? पुरुषासाठी तरि स्खलन = समाधान हे समीकरण १००% लागू आहे का ?
>> माझ्या मते तरी याचे उत्तर होय असे आहे. याहून वेगळे समाधान म्हणजे तरी नक्की काय ? पुरुषाच्या कळसबिंदूची पाठ्यपुस्तकातील ही व्याख्या देतो :
Male orgasm is defined as a subjective, perceptual-cognitive event of peak sexual pleasure that in normal conditions coincides with the moment of ejaculation.

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 31/03/2022 - 16:47
माझ्या मते तरी याचे उत्तर होय असे आहे. याहून वेगळे समाधान म्हणजे तरी नक्की काय ? पुरुषाच्या कळसबिंदूची पाठ्यपुस्तकातील ही व्याख्या देतो :
माफ करा डॉक्टर, माझा वैद्यकीय क्षेत्राशी फारसा संबंध नाही. आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाला आव्हान देण्याचा माझा वकुब नाही. पण तरीही नमूद करावेसे वाटते की ही व्याख्याच म्हणते की Male orgasm is defined as a subjective, perceptual-cognitive event of peak sexual pleasure that in normal conditions coincides with the moment of ejaculation. यातील subjective , perceptual व in normal conditions या शब्दांचा अधिक खोल अर्थ लावण्याची गरज वाटते का ? तसेच शास्त्रीय व्याख्या orgasm वा ejaculation ची असू शकते .. pleasure वा समाधानाची नाही असे मला वाटते. स्खलन = समाधान इतके सुलभ समीकरण असते तर एखादा पुरुष कधी एखाद्या विशिष्ट स्त्री करिता वेडा झाला नसता, किंवा एक लैंगिक जोडीदार असताना दुसर्‍या स्त्रीकडे बघण्याची कधी इच्छाही झाली नसती .. फार काय एकूणातच त्याला स्त्रीची फारशी गरज वाटली नसती... स्खलन तर काय स्वहस्तेही होतेच की !! अवांतर : या निमित्ताने "Don Jon" या प्राईमवरील चित्रपटाचा अल्पपरिचय द्यावासा वाटतो. (स्पॉइलर अ‍ॅलर्ट : मी संपुर्ण कथाच संक्षिप्तपणे लिहित आहे.) adult comedy प्रकारातील या चित्रपटाच्या नायकाला पॉर्न बघण्याचे ( आणि अर्थातच ते बघत हस्तमैथुन करण्याचे) व्यसन आहे. जरी त्याला नियमितपणे वेगवेगळ्या मुलींशी लैंगिक संबंध ठेवायला मिळत असले तरी त्याला जास्त मजा पॉर्न मध्येच येते.. पुढे एक सुंदर मुलगी त्याची प्रेयसी बनते. तरी त्याचे पॉर्नचे व्यसन सुटत नाही. प्रेयसीला एकदा संशय येतो तेव्हा तो आपण कधीच पॉर्न बघत नाही - जे आता चालू होते ते केवळ अपघातानेच असे खोटे सांगून वेळ मारुन नेतो. तरी "पॉर्न बघणे हे कसे वाईट, व्यर्थ व मुर्खपणाचे ई ई वर" सुनावत त्याची प्रेयसी त्याला पुन्हा एकदा बजावते.. मग पुढे सार काही सुरळीत चालू असतं पण नायकाचे व्यसन काही सुटत नाही. पुढे या प्रेयसीला नायकाच्या या व्यसनाबद्दल पुरावाच हाती लागतो. त्याच्याशी भांडून ती त्याला सोडून देते. नायक कसलासा अर्धवेळ कोर्स करत असतो. तिथे एक विधवा- वयाने काहीशी मोठी स्त्री त्याच्याशी जवळीक करायचा प्रयत्न करत असते. आधी तो तिला अक्षरशः हुसकून लावतो पण प्रेयसीशी झालेल्या ब्रेकअप नंतर तिच्याशी संवाद साधतो.. पुढे त्यांच्यात प्रेम वगैरे होत नाही पण मैत्री व जवळीक होते. तो तिला आपल्या व्यसनाबद्दल सांगतो, त्याला खर्‍या आयुष्यातील स्त्रियांसोबतच्या संबंधापेक्षाही पॉर्न जास्त आवडते हे सांगतो तेव्हा ती अजिबात न चिडता त्याला नेमकेपणाने विश्लेषण करुन समजावते की त्याच्याबाबतीत असे का घडत आहे, तो कुठे चुकत आहे. त्यालाही तिचे म्हणणे पटते व तो पॉर्न पाहणे सोडतो आणि तिच्यासोबत संबंधात त्याला मजा वाटू लागते.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 31/03/2022 - 17:20
शास्त्रीय व्याख्या orgasm वा ejaculation ची असू शकते .. pleasure वा समाधानाची नाही असे मला वाटते.
>>> कळसबिंदू आणि वीर्यस्खलन ह्या एकदम घडणाऱ्या घटना आहेत असे त्या व्याख्येवरून दिसते. माझ्या मते हेच त्या क्षणीचे समाधान देखील आहे. अर्थात समाधान, मानसिक समाधान या शब्दांच्या आपण जेवढे खोलात जाऊ तेवढे ते अधिक गहन होत जातील. तुम्ही वेगळा विचार मांडल्याचा आनंद आहे. थोडीफार मतभिन्नता असूद्या.... त्यामुळेच तर मजा येते. छान चर्चा होते आहे !

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 31/03/2022 - 17:27
कळसबिंदू आणि वीर्यस्खलन ह्या एकदम घडणाऱ्या घटना आहेत असे त्या व्याख्येवरून दिसते.
सहमत कळसबिंदू = वीर्यस्खलन याबद्दल दुमत नाहीच. मतभिन्नता आहे ती वीर्यस्खलन (किंवा कळसबिंदू ) = समाधान याबद्दल. असो.
थोडीफार मतभिन्नता असूद्या.... त्यामुळेच तर मजा येते. छान चर्चा होते आहे !
सहमत.. मलाही माझा काहीसा वेगळा मुद्दा मांडायला व्यासपीठ मिळाले,. धन्यवाद.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 31/03/2022 - 17:39
कळसबिंदूच्या क्षणी परमानंद होतो हे तर सर्वमान्य आहे - निदान असे सर्व लैंगिक साहित्यात दिलेले आहे. सहज म्हणून मी या तीन इंग्लिश शब्दांचे अर्थ कोशात एकत्र बघितले. ते खाली डकवत आहे. तिन्ही शब्द एकमेकात कसे गुंतलेले आहेत हे लक्षात येईल : 1. ecstasy =a feeling or state of great happiness. खूप आनंद झाल्याची भावना किंवा स्थिती; हर्षोत्फुल्लता, परमानंद. 2. pleasure = the feeling of being happy or satisfied. आनंद किंवा समाधानाची भावना; सुख, संतोष. 3. satisfaction = the feeling of pleasure that you have when you have done, got or achieved what you wanted; something that gives you this feeling. तुम्हाला हवे ते मिळाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर किंवा करता आल्यानंतर येणारी सुखाची भावना. सुखसमाधान, संतोष, संतुष्टता; समाधान देणारे काही.

In reply to by हेमंतकुमार

तर्कवादी 31/03/2022 - 18:36
कळसबिंदूच्या क्षणी परमानंद होतो हे तर सर्वमान्य आहे - निदान असे सर्व लैंगिक साहित्यात दिलेले आहे
तसे होणे अपेक्षित आहे.. पण तसे होते का हा प्रश्न.. लैगिंक साहित्यात तर बहुधा स्त्री-पुरुष दोघांनाही त्यावेळी परमानंद होतच असावा. आधीचाच प्रश्न पुन्हा विचारतो. कळसबिंदू = परमानंद असे सहजसोपे समीकरण असेल तर पुरुषाला नेहमीच परमानंद मिळायला हवा (अगदीच काही शारिरिक समस्या नाही असे गृहीत धरल्यास). आणि एखाद्या स्त्रीबद्दल अतीव ओढ, आकर्षण (पॅशन) वाटायचे काहीच कारण नाही.. पुरुषाला कळसबिंदू गाठायला कोणतीही स्त्री चालू शकेल - हस्तमैथुनामुळे तर स्त्रीची ही गरज नाही. माझ्या मते स्त्री व पुरुषातील शारिरिक, मानसिक , भावनिक असे सर्व पातळीवरचे आकर्षण , जवळीक हे जितके तीव्र तितकी या समीकरणाची शक्यता जास्त .. मग त्यावेळची मनस्थिती, शारिरिक स्थिती, आजूबाजूच्या वातावरणातील प्रसन्नता, निवांतपणा ई तात्कालिक गोष्टी अनुकूल असल्यास दोघांनाही परमानंद मिळणे कठीण असू नये.

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 31/03/2022 - 18:58
**तसे होणे अपेक्षित आहे.. पण तसे होते का हा प्रश्न.. >>> माझ्यापुरते तसे दर वेळेला नक्की होते इतके सांगून मी थांबतो. :)) अन्य लोकांचे अनुभव मी नाही सांगू शकणार.:)

In reply to by तर्कवादी

आनन्दा 06/04/2022 - 07:25
>>आणि एखाद्या स्त्रीबद्दल अतीव ओढ, आकर्षण (पॅशन) वाटायचे काहीच कारण नाही.. हे तर्काला धरून नाही. कळसबिंदू आल्यानंतर ते तसेच राहते का हा प्रश्न संयुक्तिक आहे.. बाकी डोपामाईन बद्दल वाचले आहे का?

In reply to by आनन्दा

तर्कवादी 06/04/2022 - 11:48
माझे म्हणणे आहे की कळसबिंदू = पुर्ण समाधान हे जर पुरुषाच्या बाबत खरे असेल तर त्याला एखाद्या विशिष्ट स्त्रीबद्दल अतीव ओढ वाटायचे कारण नाही किंवा एक लैंगिक जोडीदार असतानाही दुसर्‍या स्त्रीबद्दल आकर्षण वाटते (मग आणखी अफेअर वगैरे होणे) हे घडण्याचे कारणच नाही. कारण कळसबिंदू गाठायला कोणतीही स्त्री पुरेशी आहे .. फार काय हातानेही कळसबिंदू गाठता येतो.
बाकी डोपामाईन बद्दल वाचले आहे का?
माहित आहे. पण तुमचा मुद्दा काय आहे ? तुम्हीच विस्ताराने सांगा.

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 06/04/2022 - 12:49
मूलभूत फरक समजून घ्या. प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येक पेशीत एक्स X आणि एक Y गुणसूत्र असते आणि हे प्रत्येक मेंदूच्या पेशीतही असते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाला सुंदर स्त्री बद्दल आकर्षण वाटत असते मग वय ९० वर्षे असले तरी. यात सेक्स चा भाग नाही. याशिवाय पुरुषाचे स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण हे शारीरिक स्वरूपात असते यामुळे पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर मानसिक गुंतवणूक न करता सहजासहजी रत होऊ शकतो. परंतु प्रेमस्वरूप आकर्षण असते त्यात लैंगिकता असेलच असे नाही त्यामुळे पुरुषाला एखाद्या स्त्रीबद्दल अतीव आकर्षण आणि प्रेम असले तरीही तो दुसऱ्या स्त्रीशी कोणतीही भावनिक गुंतवणूक न करता सहज संबंध ठेवू शकतो. याउलट ज्या स्त्रीवर तो अतिशय प्रेम करतो त्या स्त्रीशी संबंध ठेवताना त्याला मिळणारे सुख हे केवळ लैंगिक निचऱ्यापेक्षा किती तरी उच्च कोटीचे असते. स्त्री च्या प्रत्य्रेक पेशीत आणि प्रत्येक मेंदूच्या पेशीत दोन X गुणसूत्रे असतात त्यामुळे रजोनिवृत्ती झाली आणि स्त्रीच्या संप्रेरकांची पातळी अगदी कमी झाली तरी तिचे स्त्रीत्व नाहीसे होत नाही ते प्रत्येक पेशीत कायमच असते. यामुळेच प्रेमळ स्वभाव वात्सल्य हे गुण स्त्री जिवंत असेपर्यंत तिच्या स्वभावात कायम राहतात. पुरुषाशी रत होण्यात स्त्रीची केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक गुंतवणूक असते त्यामुळे पुरुष जसे समोर येणाऱ्या कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवू शकतात तसे स्त्रीच्या बाबतीत होत नाही. संबंध ठेवल्यानंतर होणारी संतती हि स्त्रीला आयुष्यभर जखडून ठेवणारी असते यामुळे अवांछित संतती होऊ नये हि निसर्गाची उर्मी स्त्रीला कोणत्याही पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यापासून प्रतिबंध करते. याचे कारण पुरुषाचे शुक्राणू एका वीर्यस्खलनात १० कोटी इतके असतात आणि तरुणपणात दररोज असे कोट्यवधी शुक्राणू तयार होत असतात. या उलट साधारणपणे स्त्रीबीज हे एक महिन्यात एकच तयार होत असते. ३०० कोटी शुक्राणूंपैकी एकाच शुक्राणूचा स्त्रीबीजाशी संपर्क आला तर गर्भ धारणा होते. म्हणजे २९९ कोटी ९९ लाख ९९ हजार ९९९ शुक्राणू दार महिन्याला फुकट जात असतात. प्रत्येक प्राण्यात पुनरुत्पादन करण्याची नैसर्गिक उर्मी अत्यंत प्रबळ असते त्यामुळे माणसात नराला स्त्रीचे शारीरिक आकर्षण अत्यंत प्रबळ असते जेणेकरून तो जास्तीत जास्त स्त्रियांशी संबंध ठेवून आपली पुढची पिढी निर्माण व्हावी असा प्रयत्न करत असतो. याउलट स्त्रीचे एकच स्त्रीबीज महिन्याला तयार होत असत त्याशिवाय त्यातून तयार होणाऱ्या गर्भाला स्त्रीला आपल्या पोटात ९ महिने आणि पुढे सहा महिने दूध पाजून वाढवावे लागते. यामुळे स्त्रीची गुंतवणुकी फार जास्त असल्यामुळे स्त्रिया सहज सहजी कोणत्याही पुरुषाशी रत होत नाहीत. याकारणामुळे पुरुषाची नैसर्गिक उर्मी अशी असते कि उत्कर्ष बिंदू शी लवकरात लवकर पोचून शुक्राणू स्खलन करणे आणि आपले पुरुष बीज स्त्री मध्ये पोचवून पुढच्या संबंधाला तयार होणे. याउलट स्त्रीची भावनिक गुंतवणूक नसेल तर स्त्री या उत्कर्षबिंदू पर्यंत पोचतच नाही. केवळ उपचार म्हणून संबंध ठेवला जातो. यामुळेच स्त्रीला फुलवून मानसिक दृष्ट्या तयार करून उत्तेजित केल्यास स्त्री या परमोच्च बिंदू पर्यंत पोहोचू शकते. यावर बरेच काही लिहण्यासारखे आहे पण टँकाळा आहे

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 06/04/2022 - 17:55
विस्तृत विवेचनाबद्दल धन्यवाद, पण माझा प्रश्न काहीसा वेगळा होता...
पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर मानसिक गुंतवणूक न करता सहजासहजी रत होऊ शकतो
टेक्निकली (म्हणजे बायोलॉजिकली) - होय ... पण त्याला असे रत व्हायला आवडेलच असे नाही. एखादी स्त्री लैंगिक संबंधाकरिता सहज उपलब्ध असूनही तिच्याबद्दल आकर्षण न वाटल्याने पुरुष तिला टाळतो - असे प्रत्यक्षात होते ना ? मग त्याचे कारण काय (इतर काही फॅक्टर्स असतील उदा: नको असलेली स्त्रीशी नाते जोडावे लागेल की काय ही भिती ई - ते बाजूला ठेवू) ? फार काय पैसे देवून सुख विकत घ्यायचे तेव्हाही पुरुष आपल्या पसंतीच्या स्त्रीकरिता प्रसंगी बरेच जास्त पैसे खर्च करतो. मग जर वीर्यस्खलन = कळसबिंदू = समाधान इतके साधे गणित असेल तर पुरुषाला एखाद्या विशिष्ट स्त्रीकरिता विशेष धडपड करण्याची काय गरज ? मला वाटते की जेव्हा पुरुषाला एखादी स्त्री अतिशय आवडते, हवीहवीशी वाटते तेव्हा त्याला अंतःप्रेरणेने असे वाटत असावे की ह्या स्त्रीशी संबंध ठेवताना/समागम करताना विलक्षण अद्वितीय असा आनंद मिळणार आहे - याचे नेमके जीवशास्त्रीय शब्दात स्पष्टीकरण मला देता येणार नाही. पण कुठेतरी त्याच्या मेंंदूतून वा शरीतातुन हे संकेत त्याला मिळालेले असतात आणि भविष्यात त्या स्त्रीशी होणार्‍या संभोगातून मिळू शकणारा विलक्षण अद्वितीय असा आनंद /लैंगिक समाधान हे त्याच्या त्या स्त्रीला मिळवण्याकरिता केलेल्या धडपडीमागील प्रेरणा होय. - याचीच दुसरी बाजू अशी की ज्या स्त्रीबद्दल अशी ओढ त्याला वाटत नाही पण संबंध ठेवायचे आहे तिच्याबाबत त्याची वृत्ती कदाचित तुम्ही म्हंटल्याप्रमाणे "उत्कर्ष बिंदू शी लवकरात लवकर पोचून शुक्राणू स्खलन करणे" अशी असू शकेल. मग त्या संभोगाचे वर्णन फक्त "लवकरात लवकत उत्कर्ष बिंदू वा कळस बिंदू गाठणे" असे असल्याने त्यातून स्त्री वा पुरुष कुणालाही त्यातून समाधान मिळण्याची शक्यता कमीच.

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 06/04/2022 - 18:35
प्रेम आणि वासना या संपूर्णपणे वेगळ्या भावना आहेत. वासनेने अंध झालेले नराधम दोन तीन वर्षाच्या कोवळ्या बालिकांवर सुद्धा बलात्कार करू शकतात. याच उलट जिच्यावर माणूस प्रेम करतो तिला थोडीसुद्धा इजा होणार नाही याची अतीव काळजी घेतो. आकर्षण हि या दोन भावनांच्या मधली एक भावना आहे. यामुळेच स्त्री एखाद्या वेळेस आकर्षणाला बळी पडून एखाद्या माणसाबरोबर वाहत जाते. परंतु केवळ आकर्षणापायी सहजासहजी त्याच्या बरोबर संबंध करेलच असे नाही. याउलट आकर्षणापायी पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर संबंध ठेवू शकतो. कारण संबंधात पुरुषाची गुंतवणूक हि काही क्षणापुरता असते तर स्त्रीची गुंतवणूक आयुष्यभराची असू शकते संतती नियमनाची साधने उपलब्ध झाल्याने स्त्रीला भावनिक गुंतवणूक न करता सुद्धा आकर्षक वाटणाऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणे शक्य झाले आहे परंतु हे त्या अगोदर शक्य नव्हते. पुरुषाला एखाद्या स्त्री बद्दल( किंवा स्त्रीला पुरुषाबद्दल) आकर्षण का वाटते हा एक फार गहन विषय आहे. पण अशा आकर्षक वाटणाऱ्या स्त्री शी संबंध ठेवण्यास पुरुष सहज तयार होतो आणि ज्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटत नाही तिच्याशी संबंध टाळतो. या कारणासाठी लग्न झालेल्या स्त्रीपुरुषांनी आपण आपल्या जोडीदारास आकर्षक वाटतो का हा विचार ठेवणे आवश्यक आहे. आधुनिक काळात पुरुषांच्या उच्शृंखलपणावर बंधने आली आहेत परंतु पूर्वी बायको आकर्षक वाटत नाही या कारणासाठी माणसे सहज दुसरे लग्न करत किंवा अंगवस्त्र ठेवत असत किंवा देवदासी या प्रथेला पुरुषप्रधान संस्कृतीने मान्यता दिलेली होती. यात केवळ आकर्षण वाटते म्हणून आणि वासना शमन यासाठी दुसरी स्त्री राजरोसपणे "उपलब्ध" असे आणि त्याला समाजमान्यताही होती. असो मुद्दा विश्लेषण करण्यासाठी फार पाल्हाळ लावून लिहिले आहे क्षमस्व पुरुषाला एखाद्या विशिष्ट स्त्रीकरिता विशेष धडपड करण्याची काय गरज ? याचे उत्तर अतिशय त्रोटक शब्दात असे देता येईल. अल्कोहोल ३५ रुपये लिटर असताना माणसे सिंगल माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली च्या बाटली साठी ६-७००० रुपये ( लिटर मागे दहा हजार रुपये) का खर्च करतात? नशा त्यातील अल्कोहोल मुळेच येते ना?

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 08/04/2022 - 17:40
या वरून आठवले, मी काही वर्षांपुर्वी एका इंग्लिश मासिकात वाचले होते की काही स्त्रिया क्वचित प्रसंगी नुसत्या नटण्या-मुरडण्याने कळसबिंदू (ऑर्गॅजम) अनुभवू शकतात . यावर कुणी प्रकाश टा़कू शकेल ?

In reply to by चौथा कोनाडा

हेमंतकुमार 08/04/2022 - 18:31
स्त्रीचा कळस बिंदू दोन प्रकारे येऊ शकतो: १. जननेंद्रिय, स्तनाग्रे किंवा शरीराचे अन्य अवयव चेतवल्यामुळे २. लैंगिक स्पर्शाविना चेतावणी. मात्र या प्रकारात स्त्रीला स्वतः कल्पनाविलास करून लैंगिक भावनांनी युक्त अशी प्रतिमासृष्टी मनात उभी करावी लागते. काही स्त्रियांना स्वप्नात बिंदूचे सुख मिळालेले आहे. इथे एका स्त्री ची केस दिली आहे. ज्यात तिने योग आणि अन्य काही तंत्राच्या साह्याने अशाप्रकारे बिंदूचे सुख अनुभवले होते

In reply to by तर्कवादी

हेमंतकुमार 31/03/2022 - 14:11
तसेही स्त्रीच्या कळसबिंदूबद्दल अनभिज्ञ असलेल्या पुरुषाला त्याबद्दल दोषी ठरवणे अयोग्य.
>> ही अनभिज्ञता प्रौढपणी राहू नये हेच तर यासारख्या लेखनाचे प्रयोजन आहे ! त्यादृष्टीने हा विषय विविध दृक-श्राव्य माध्यमातूनही हाताळला जात आहे आणि तो पुरेसा हाताला जावाच. लेखात मी लस्ट स्टोरीज चे उदाहरण दिलेले आहे त्यातील काही संवाद आणि एकंदरच मांडणी सुरेख आहे.

In reply to by तर्कवादी

माझ्या मते पुरुषाला जोडीदाराबद्दल अतिशय आकर्षण असेल (शारिरिक , भावनिक ई सगळ्या पातळीवर) तर स्खलन लांबवून त्याला अधिकाधिक आनंद मिळेल आणि अधिक आनंद /समाधान मिळवण्याकरिता तो प्रयत्न करेलच... व विशेष काही शारिरिक समस्या नसल्यास त्याला ते नक्कीच शक्य होईल
खरेतर उलट प्रकार असावा. म्हणजे आकर्षण निर्माण झाले कि स्खलन लवकर होत असावे. नील फिती पाहताना हे विशेष्तः जाणवते.सगळ्याच हालचाली यांत्रिकपणे उरकत असल्यामूळे व भावनिक दृष्ट्या अजिबात न गुंतल्यामुळे कळसबिंदु बराच वेळ लांबवला जात असावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

सुबोध खरे 08/04/2022 - 19:24
आकर्षण निर्माण झाले कि स्खलन लवकर होत असावे. नाही. प्रत्यक्ष आणि प्रतिमा यातील फरक आहे. शिवाय निल फिती मध्ये असणाऱ्या सर्व स्त्रिया उत्तान आणि तारुण्याने मुसमुसलेल्या असतात आणि पुरुष मदनाचे पुतळे असतात. पुरुषांची लिंगे असाधारण अशी मोठी असतात. ( एकतर असेच पुरुष/ स्त्रिया निवडले जातात आणि पुरुषांना कृत्रिम लिंगे लावलेली असतात. यामुळे त्यातील पुरुष लिंग शैथिल्य न येता तासनतास रतिक्रीडा करू शकतात यामुळे या फिती पाहणाऱ्या पुरुषाला स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड येऊ शकतो/ येतो. त्याशिवाय performance anxiety ( कार्यसाफल्याची चिंता) म्हणजेच आपण स्त्रीला आनंद देऊ शकू का आणि स्त्रीला कळसबिंदु पर्यंत पोहोचे पर्यंत रतिक्रीडा करू शकू का याची चिंता/ तणाव आल्यामुळे लवकर वीर्यस्खलन होते. यातून आपल्या पौरुषाबद्दल आपली सखी शंका घेईल का हि पण चिंता मनात खात असते. याचाच बाबा कमाल खान बंगाली, वैद्यराज कृष्णभूषण उपाध्याय, आयुर्वेद भुवन, कतरी सराय सारखे लोक फायदा घेताना गल्लोगल्ली दिसतात. नवरा तरुण आणि सुंदर स्त्रीला समाधानी ठेवू शकत नाही म्हणूनती त्याच्या पश्चात ड्रायव्हर, धोबी, सुरक्षा रक्षक, विक्रेता यांच्याशी शरीर संबंध ठेवते अशा तर्हेच्या असंख्य नीलफिती पाहायला मिळतात. आपण सखीला अत्युच्च आनंद देऊ शकलो नाही तर ती आपल्याला सोडून जाईल हि भीती असलेलय पुरुषाच्या मनातील हि भीती अशा तर्हेच्या निल फिती पाहून अधिकच बळावते.

Nitin Palkar 30/03/2022 - 20:04
अतिशय संवेदनशील विषयावरील शास्त्रीय माहितीने परिपूर्ण अस लेख. अनेक जाणकारांचे प्रतिसादही रोचक. 'निरामय कामजीवन' या डॉ. विठ्ठल प्रभूंच्या खूप पूर्वी वाचलेल्या पुस्तकातील एक वाक्य आठवले, ते असे आहे, 'पुरुष हा संभोगासाठी प्रेम करतो तर स्त्री प्रेमासाठी संभोग देते'.पौगंडावस्थेत हे पुस्तक वाचले होते, तेव्हा हे वाक्य मनात ठसले होते. पुढे अनुभवांती हे चुकीचे असल्याचे जाणवले. स्त्री कळसबिंदूबद्दल काव्यात्म वर्णन असलेली हि दोन सदाबहार मराठी गीते. विशेष म्हणजे या दोन्हींचे गीतकार मंगेश पाडगावकर आणि सुरेश भट हे पुरुष आहेत. https://www.youtube.com/watch?v=NUZ8EmudfLQ https://www.youtube.com/watch?v=8BvLj2KYvCg उत्तम लेखाबद्दल अभिनंदन.

हेमंतकुमार 30/03/2022 - 20:11
१.
स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात.
>>> चपखल वर्णन ! आवडलेच.
बायकोच्या कानात काहीवेळ जीभ घोळवल्या शिवाय
>> हीच ती विविधता. रोचक ! ...... २.
स्त्री कळसबिंदूबद्दल काव्यात्म वर्णन असलेली हि दोन सदाबहार मराठी गीते
>>> सवडीने नक्की ऐकणार. आभार !

लग्नाच्या आगोदर मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते! कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते! लग्नानंतर वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही! उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? आशीच काही आनाडी जोडप्यांची आवस्था आसते.

मदनबाण 30/03/2022 - 22:14
अतिशय उत्तम लेख ! स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. हा.हा.हा... का कोणास ठावूक, पण मला मीच एक लिहलेला प्रतिसाद आठवला ! :))) [ तो खाली देतो ] साहित्यः- गुबगुबीत,लुसलुशीत टच्च पाखरु, स्वतः मधील प्रयोगशिलता. ;) कॄती:- पाखराला "मंद आचेवर" ठेवावे,त्याच्या फडफडी प्रमाणे आच कमी-जास्त करावी.पाखराचा राग-रंग पाहुन त्याला इथुन-तिथुन "व्यवस्थितपणे" परतवुन घ्यावे.चुंबनाची खमंग फोडणी द्यावी.साहित्य अत्यंत नाजुक असल्याने त्याची हाताळणी "हळुवारपणे" करावी.पाखरु व्यवस्थित "तयार" झाले आहे याचा अंदाज येताच,नजाकतीने त्याचा आस्वाद घ्यावा ! ;) (प्रेमळ ससाणा) जाता जाता :- मेंदू मधील न्यूरॉन्स अ‍ॅक्टीव्ह असणे देखील महत्वाचे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kelewali... :- Pandu

kool.amol 30/03/2022 - 23:31
ह्या विषयावर लेखात उल्लेख केलेल्या डॉ मास्टर्स ह्यांच्या कार्यावर Masters of Sex ही वेबसिरीज आहे, amazon Prime वर. त्यांचं कार्य, आलेल्या अडचणी आणि संशोधन हे खूप छान पद्धतीने दाखवले आहे.

In reply to by kool.amol

हेमंतकुमार 02/04/2022 - 10:25
Masters of Sex ही वेबसिरीज
>>> काल या मालिकेचा पहिला भाग बघितला. विषय सुंदर हाताळला आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पश्चिमी देशांमध्ये सुद्धा ‘लैंगिकतेवर संशोधन’ या विषयाची टिंगल-टवाळी होत होती. प्रसूतीशास्त्र तज्ञ असलेल्या डॉ. मास्टर्स यांना, लैंगिकता हेदेखील एक विज्ञान आहे हे रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांच्या गळी उतरवायला किती कष्ट पडले, हे त्यात दाखवले आहे. विविध लैंगिक प्रयोग, त्यासाठी त्यांनी स्वतः तयार केलेली विविध उपकरणे हा भाग कौतुकास्पद आहे. एकंदरीत मालिकेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून नग्न आणि संभोग दृश्यांची रेलचेल असणार आहे याची झलक मिळाली. मालिका खूप मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण बघण्यासाठी वेळ देता येणे अवघड वाटते. धन्यवाद !

हेमंतकुमार 31/03/2022 - 07:29
चांगल्या मनमोकळ्या चर्चेबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! १.
कदाचित हा एकुणच कुटूंबसंस्थेचा/ समाजरचनेचा दोष असू शकतो..
>>> विचार करण्याजोगा मुद्दा या लेखात मी लैंगिक जोडीदार हाच शब्दप्रयोग ठरवून वापरलेला आहे. विवाहित जोडपे हा या विषयाचा एक महत्त्वाचा आणि अन्य पैलू आहे. त्यावर स्वतंत्र लेखन व चर्चा देखील होऊ शकते. जाणकारांनी मनावर घ्यायला हरकत नाही ..... २.
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?
>>> छान काव्यात्मिक !

हेमंतकुमार 31/03/2022 - 07:36
३.
मेंदू मधील न्यूरॉन्स अ‍ॅक्टीव्ह असणे देखील महत्वाचे.
>>> +११११ यासंदर्भात थोडी भर. लेखामध्ये योनीमार्गातील G बिंदूचा लेख आहे. अलीकडे वैज्ञानिकांनी या संदर्भात अधिक संशोधन केलेले आहे. G बिंदूतून निघणारे संदेश हे मेंदूतील एका विशिष्ट ठिकाणी पोहोचतात. त्याला तूर्त C बिंदू असे नाव दिलेले आहे. जसा स्त्रीचा संभोग अनुभव वाढत जातो तसा C अधिक विकसित होत जातो असे एक गृहितक आहे. मात्र सध्या हे संशोधन बाल्यावस्थेत आहे. .... ४.
डॉ मास्टर्स ह्यांच्या कार्यावर Masters of Sex ही वेबसिरीज आहे
>>> उपयुक्त पूरक माहिती. छान. पाहीन.

कामावर निघाल्यावर कामाची कमान कामिनीकडे देऊन आपण सुखरुप पडून राहून कार्यभाग साधावा हाच कमीतकमी श्रमात जास्तीत जास्त कर्मफळ मिळवून देणारा आणि काम सिद्धिस नेणारा उपाय दिसतो. अवांतर : स्त्रीयांचे शरीर आणि मन इतके गुंतागुंतीचे असते तर प्रयोग म्हणून एखाद्या शहराचा / राज्याचा कार्यभार केवळ स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात यासाठी एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही. कदाचित त्यातून काही चांगल्या गोष्टींचा शोध लागू शकेल.

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे 04/04/2022 - 19:09
स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात हे पण तितकंच गुंतागुंतीचं आहे एकीकडं श्रीमती शीला दीक्षित किंवा श्रीमती सुमित्रा महाजन आहेत आणि दुसरीकडे श्रीमती जयललिता, श्रीमती मायावती आणि श्रीमती ममता बॅनर्जी आहेत

In reply to by सुबोध खरे

माफ करा , पण ...
श्रीमती शीला दीक्षित किंवा श्रीमती सुमित्रा महाजन ,श्रीमती जयललिता, श्रीमती मायावती आणि श्रीमती ममता बॅनर्जी
ह्या धाग्यात ही नावे अपेक्षित नाहीत , अ‍ॅक्चुअली ही नावे वाचुन ठसकाच लागला =)))) सगळीकडे राजकारण आणायलाच हवे का ? थोडं थंड घ्या . २०२४ मध्ये मोदीच जिंकणार आहे हो , तुम्ही नका लोड घेऊ सर्वत्र ! आपण स्त्री लैंगिकतेचे गुढ ह्यावर बोलत होतो ना ? जरा चांगली नावे घ्या : सनी ताई लीऑनी , मियां खलिफां , डॅनी डॅनियल्स , एल्सा जीन्स वगैरे ... ;) हे सगळे आमच्या जनरेशन चे कदाचित तुम्हाला माहीती नसेल तर किमान तुमच्या जनरेशन्ची नावे सांगा हो , लेन्ना फोर्सेन आज्जी वगैरे ;) a

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 07/04/2022 - 10:17
राजकारण मी आणलं नाही. एखाद्या शहराचा / राज्याचा कार्यभार केवळ स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात यासाठी एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही. या वाक्याला दिलेला तो प्रतिसाद होता

हेमंतकुमार 31/03/2022 - 20:18
* कामावर निघाल्यावर कामाची कमान कामिनीकडे देऊन आपण सुखरुप पडून राहून * अगदी बिंदूगामी
>> वरील वाक्यरचना आणि शब्दप्रयोग दोन्ही भलतेच आवडलेले आहेत ! बाकी, कामिनीस कामास लावून कमी श्रमात जास्त सुख कमवायची कल्पना भन्नाट आहे खरी... 😀

हेमंतकुमार 09/04/2022 - 07:44
लेख व चर्चेत न आलेला एक रंजक मुद्दा आता घेतो. उत्कटबिंदूच्या क्षणी पुरुषाप्रमाणे स्त्रीमध्ये सुद्धा द्रवस्खलन असते का, हा कुतूहल चाळवणारा प्रश्न आहे. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा. पुरुषांमध्ये सर्वांनाच वीर्यस्खलन होते. पण स्त्रियांमध्ये मात्र अनुभवभिन्नता भरपूर आहे. संभोगादरम्यान ज्या स्त्रियांमध्ये एका द्रवाचे स्खलन होते तो द्रव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. तो चवीस गोड असतो आणि अर्थातच लघवीपेक्षा भिन्न असतो. तीन प्रकारचे अनुभव वैद्यकात नोंदले गेले आहेत : १. ज्या स्त्रियांच्या ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद चांगल्यापैकी असते त्या स्त्रियांमध्ये संभोगादरम्यान हा द्राव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. मुळात तो त्या छित्राच्या भोवती असलेल्या विशिष्ट छोट्या ग्रंथींमधून आलेला असतो. २. ज्या स्त्रियांच्या ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद कमी असते त्यांना वरील प्रमाणे अनुभव येत नाही. ३. अन्य काही स्त्रियांमध्ये या क्रियेदरम्यान प्रत्यक्ष लघवीचे थेंबही मूत्रछिद्रातून बाहेर येतात.

In reply to by हेमंतकुमार

संभोगादरम्यान ज्या स्त्रियांमध्ये एका द्रवाचे स्खलन होते तो द्रव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. तो चवीस गोड असतो
"मेरे प्यार का रस जरा चखना..ओय मखना" हे गीत वरील माहीतीनंतर एकदम अर्थपूर्ण वाटु लागले आहे. ;)

जेम्स वांड 09/04/2022 - 08:20
बरेच दिवसांनी मिपावर फिरकल्याचे सार्थक झाले असे वाटले एकदम. विषय खरेच सखोल आहे, अन ह्याचा सम्यक परामर्ष घेणे काळाची गरज आहे, जननस्वास्थ्य, स्त्री रोग परामर्ष, संभोग विज्ञान ह्यांची चर्चा करणे अतिशय गरजेचे आहे, नाहीतर स्त्री/ पुरुष लैंगिकतेवषयी अगम्य मते असणारे सुशिक्षित लोकही दिसतात भरपूर समाजात आपल्या.

In reply to by जेम्स वांड

हेमंतकुमार 09/04/2022 - 15:41
विषय खरेच सखोल आहे, अन ह्याचा सम्यक परामर्ष घेणे काळाची गरज आहे,
>>> या व्यापक विषयाकडे बघता मला त्याचे तीन विभाग स्पष्ट दिसतात : १. बिंदूसुखाशी शरीर रचनेतील विविधतेचा संबंध २. मानसिक स्थितीचा संबंध ३. विवाहितांचे कामजीवन : या लेखात मी ठरवून लैंगिक जोडीदार हा शब्दप्रयोग वापरला आहे. एकदा का नवरा बायको या नात्याने या विषयाकडे पाहिले, की त्याला अनेक कंगोरे आहेत. वरील पहिल्या विभागातील संशोधन मला रोचक वाटले आणि सहसा ते इतर माध्यमांत या संदर्भातील लेखनात येत नाही. म्हणून एक प्रास्ताविक टीप देऊन हा मर्यादित विभाग लिहिला आहे. तिन्ही विभाग एकत्र करून भला मोठा लेख लिहिणे माझ्या आवाक्याबाहेर होते. अन्य विभागांवर सवडीने वाचन करून काही उपयुक्त माहिती मिळाल्यास इथे लिहीन. ....... बरेच दिवसांनी तुमची भेट झाल्याचा आनंद आहे.

वामन देशमुख 10/04/2022 - 15:48
लेख आणि त्यावरचे प्रतिसाद, प्रति-प्रतिसाद सुरुवातीपासून वाचत आहे. माहितीपूर्ण आणि संयत मांडणी, कुमारेक. मूळ लेख आणि अनेक प्रतिसाद्स् आवडले. या धाग्यावर मिपावरच्या बहुतांश दिग्गजांनी हजेरी लावलीय आणि संयत ते उत्तेजक या दरम्यानचे सर्वच रंग उधळलेत (त्यातले काही रंग इतर काही धाग्यांवरही गेलेत!); मी पामर त्यात कसल्या करड्या छटा दाखवणार! बाकी, स्वतःसोबतच स्व-स्त्रीलाही कामतृप्ती मिळावी या प्रकारे प्रणय करणारा पुरुष, आणि त्याला तेवढीच भरभरून साथ देणारी स्त्री अशी जोडी असलेल्या मानवांसाठी, पृथ्वीवरचा स्वर्ग त्यांच्या बेडरूममध्येच (किंवा जिथे जमेल तिथे 😉) असतो असे म्हणता येईल! --- अवांतर: अ. प्रणय: १. फोरप्ले २. इंटरकोर्स ३. कुरवाळणे यांची तुलना - आ. जेवण: १. स्टार्टर्स २. मेन कोर्स ३. डेझर्ट यांच्याशी करता येईल का? --- अवांतरचे सवांतर: वरील अ १, अ २ साठी योग्य मराठी शब्द आणि अ ३ साठी मराठी व इंग्लिश शब्द सुचवता येईल का?

In reply to by वामन देशमुख

हेमंतकुमार 10/04/2022 - 16:02
धन्यवाद. अ /आ तुलना रोचक ! छान. १. फोरप्ले : संभोगपूर्व कामक्रीडा (लेखात दिलाय) / रतिक्रीडा २. इंटरकोर्स : संभोग, समागम, विषयोपभोग; रतिसुख; मैथुन. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%97+) ३. कुरवाळणे : fondle, caress (https://www.google.com/search?q=fondle+meaning&sxsrf=APq-WBvv3h8pmdAUYqRVkIwbJ1YymevArA%3A1649586288748&source=hp&ei=cLBSYrr8K9HP2roPoPidmAo&iflsig=AHkkrS4AAAAAYlK-gBRR20k0eKtphRprEYW-DqqeGaoa&oq=fondle&gs_lcp=Cgdnd3Mtd2l6EAEYADINCAAQgAQQsQMQRhD5ATIFCAAQgAQyBQgAEIAEMgUIABCABDIFCAAQgAQyBQgAEIAEMgUIABCABDIFCAAQgAQyBQgAEIAEMgUIABCABDoLCAAQgAQQsQMQgwE6BwgAELEDEEM6CAgAEIAEELEDOgwIABCxAxBDEEYQ-QFQAFggYJ8paABwAHgBgAGNAogBiQeSAQUwLjEuM5gBAKABAQ&sclient=gws-wiz) ˈ

In reply to by हेमंतकुमार

वामन देशमुख 10/04/2022 - 16:13
अरेच्चा, हे सर्व शब्द आणि त्यांचे अर्थही खरंतर मला माहीतच आहेत की! चव्वेचाळीशी उलटली, Educational Dysfunction (ED) होतंय की काय? 😉

In reply to by हेमंतकुमार

वामन देशमुख 10/04/2022 - 16:22
बाकी, तुम्ही मिपावर रुळवलेल्या अनेक शब्दांचा कळसबिंदू हा कळसबिंदु शब्द आहे असे म्हणावे लागेल! 👏

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 10/04/2022 - 16:23
असे "इडी" का होते यावर पुलं उवाच : सामाजिक संभाषणात इंग्लिशचा आधार घेण्यावरून पुलंनी त्यांच्या १९७४मधील लेखात मार्मिक टिपणी केलेली आहे ती अशी :
“.....त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटर्कोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो”.
( एक शून्य मी मधून )

(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शास्त्रीय विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्ती बाहेरचे आहेत). स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे.

मला भेटलेले रुग्ण - २३

डॉ श्रीहास ·

sunil kachure 14/02/2022 - 22:04
मुलग्या कडचे योग्य च वागलेत असे माझे मत आहे . आयुष्य एकत्र काढायचे आहे मुलगी आनुवंशिक रोगाची शिकार नाही ना हे समजून घेण्यात काहीच गैर नाही.

चौथा कोनाडा 16/02/2022 - 13:00
दोन्ही उदाहरणे आवडली. समजाऊन सांगणारे आपल्या सारखे जाणते असतील तर अश्या समस्या नीट हाताळल्या जातात.. नाही तर नेहमी प्रमाणे लोकांची संबधितांची ससेहोलपट ठरलेली. पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद डॉ श्रीहास ! हे किस्से कायप्पावर नावा सहीत समायिक करु शकतो का ?

Nitin Palkar 16/02/2022 - 20:23
बऱ्याच काळानंतर मिपावर आलात. वैयक्तिक प्रतिक्रिया: पहिल्या रुग्णाच्या बाबतीत मुलाकडच्यांनी जे केलं ते योग्य असं, वाटत नाही. त्यांनी मुलीबरोबर तुमच्याकडे (अथवा त्यांच्या माहितीच्या अस्थमा तज्ज्ञाकडे) जाऊन विवाहानंतर काही समस्या येऊ शकतील का याची माहिती करुन घ्यायला हवी होती. दुसरी रुग्ण (आणि तिचे नातेवाईक ) ही सर्व सामान्य भारतीय मानसिकतेचे प्रातिनिधिक उदाहरण आहेत. वंशाला दिवा हवा (आपण महिपालीकेच्या उंदीर मारणाऱ्या विभागात कारकून असलो तरी) ही दृढ मानसिकता. रुग्णांना समजावून सांगण्याच्या तुमच्या कौशाल्याबद्दल नेहमीच कौतुक वाटते.

https://misalpav.com/node/47104 “डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.” पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला. मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.” बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही? मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ? बाप : जी हॉं ! मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है। रिपोर्ट आल्यावर त्याला आणि मुलीला बोलावलं आणि सांगीतलं की रिपोर्ट नॉर्मल आहे. वर हे देखील सांगीतलं की तिला अस्थमा असता तरी सगळं आयुष्य चांगलंच जगता येईल.

शोधायला गेले एक, अन......

हेमंतकुमार ·

गवि 07/02/2022 - 11:35
अत्यंत रोचक लेख. धन्यवाद. याप्रमाणेच उलट: खास तर्कशास्त्र वापरुन विशिष्ट परिणाम साधायचा हे ध्येय पक्के करुन त्यानुसार वेगवेगळ्या रेण्विक रचना तयार करणे, टेस्टिंग करणे हाही एक मोठा कौतुकास्पद भाग असतो. मला वाटते रक्ताच्या कर्करोगावरील imatinib हे औषध हे असे एक उदाहरण आहे.

In reply to by गवि

हेमंतकुमार 07/02/2022 - 12:01
धन्यवाद ! छान उदाहरण दिलेत. imatinib हे औषध त्याच्या शोधापासून आणि नंतरही बरेच गाजले. मुळात ते विशिष्ट प्रकारच्या उच्चरक्तदाबासाठी म्हणून विचारात घेतले होते. परंतु त्यात मात्र संशोधकांना यश आले नाही. नंतर ते काही कर्करोगांच्या बाबतीत जादूची कांडी वाटावी असे उपयुक्त ठरले होते. पुढे या औषधाच्या भारतातील स्वामित्व हक्कासंबंधीचा खटलाही खूप गाजला आणि पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता.

In reply to by गवि

विजुभाऊ 07/02/2022 - 13:23
हल्ली बरीचशी औषधे ही अगोदर रेणू ची रचना ठरवायची , ती रचना कसे वागेल हे ठरवायचे आणि त्यानुसार मोल्यूक्यूल बनवायचे . ती रचना औषध म्हणून जाहीर करून त्याच्या ट्रायल घ्यायचा असा ट्रेंड दिसतो. ( काय शोधायचे आहे ते अगोदर ठरवायचे आणि त्या नंतर शोधायचे)

In reply to by विजुभाऊ

हेमंतकुमार 07/02/2022 - 13:55
म्हणजे ते असं झालं: संगीताच्या रचना आधीच तयार असतात. त्यात गीतकाराचे शब्द नंतर जमेल तसे बसवून टाकायचे :))

In reply to by हेमंतकुमार

गवि 07/02/2022 - 14:14
तयार रचनेत जमेल तसे बसवून टाकायचे ही तुलना चपखल वाटत नाही. काहीतरी अन्य प्रयोग करताना, किंवा असेच काही कोम्बिनेशन्स ट्राय करताना अपघाताने लागलेले शोध हा एक रोचक प्रकार. पण समस्येचा नीट खोलवर अभ्यास करुन त्यावर संपूर्ण कार्यकारणभाव जाणत नेमके काय आकाराचे रेणू काम करतील हे आडाखे आधीच बनवून त्या आकाराचा रेणू कसा बनेल हे पाहणे हा मार्गही अत्यंत कष्टाचा, बुद्धीचा आणि सर्जनशील आहे. माझ्या माहितीनुसार आधी उल्लेखलेले औषध हे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे कारण असणारा जनुकीय बिघाड (उदा. एखादी जागा रिकामी राहणे आणि त्यामुळे पेशी विभाजनावरचे नियंत्रण सुटून कर्करोग होणे या कार्यकारणभावाच्या अनुषंगाने नेमकी त्या आकाराची पाचर बसेल अशा आकाराचा रेणू शोधून जणू त्या दोषामुळे अनियंत्रित झालेल्या विभाजनाला ब्रेक लावला जावा असे करणे हा विलक्षण शोध वाटतो.

हेमंतकुमार 07/02/2022 - 14:56
प्रतिसाद आणि चांगल्या चर्चेबद्दल सर्वांचे आभार ! ...
औषध हे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचे कारण असणारा जनुकीय बिघाड
>>> हा मुद्दा चर्चेला चांगला आहे. काही दिवसांपूर्वी एका कर्करोग परिषदेला गेलो होतो. भविष्यातील कर्करोग उपचारांची दिशा ही कशी असेल हे त्यात छान समजले. त्यातला महत्त्वाचा मुद्दा लिहितो. बहुतेक महत्त्वाच्या कर्करोगांच्या बाबतीत संबंधित रुग्णाचा जनुकीय अभ्यास केला जातो. त्यानुसार उपचारांची दिशा ठरते आणि बदलू शकते. पुढच्या पंचवीस-तीस वर्षात यामध्ये एक महत्त्वाची घडामोड होईल. एखाद्या व्यक्तीला झालेला कर्करोग हा कुठल्या अवयवाचा आहे हा भाग तसा दुय्यम राहील. परंतु त्या रुग्णामध्ये कुठल्या प्रकारचा जनुकबदल आढळून आला आहे याला अधिक महत्त्व असेल. त्यानुसारचे उपचार हे अधिक महत्त्वाचे ठरतील.

भागो 07/02/2022 - 17:46
“Nature makes penicillin, I just found it; one sometimes finds what one is not looking for" Fleming. मी इंग्लिश भाषेचा अभ्यासक असल्याने serendipitous ह्या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल वाचत होतो. serendipitously माझ्या वाचनात एक लेख आला. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2323527/ https://newhumanist.org.uk/articles/4852/science-and-serendipity-famous-accidental-discoveries वरील ncbi च्या लेखात पेनिसिलीन आणि विअग्रा ह्यांच्या शोधाबद्दल जरा निराळी माहिती आहे. ती निदर्शनास आणावी एवढाच हेतू. जिज्ञासूनी जरूर वाचावे.

रोचक व रंजक माहीतीपुर्ण. संशोधन हा एक खूप वेळ काढू आणी खर्चिक बाब आहे.आपल्या देशात पुरेसे प्राधान्य आणी पैसा नसल्यामुळे खास करून वैद्यकीय क्षेत्रात हवे तेवढे संशोधन होत नाही म्हणून भारतीय फारमाकोपिया एवढा समृद्ध नाही. त्याचे कारण कदाचित हे ही असेल तो इतरांच्या मानाने वयाने खुपच लहान आहे. दुसरे कारण उपचार पद्धती आयुर्वेदिक आणी अँलोपँथी ही साहेबांनी आणली. परंतू चालू असलेल्या महामारी मध्ये भारतीय संशोधकांनी कमालच केली. माझी मुलगी सध्या मिशिगन विद्यापीठात संशोधन टीम मधे काम करतेय, तीच्या अनुभव प्रमाणे संशोधना करता लागणारी सामुग्री जर भरपूर प्रमाणात उपलब्ध झाली तर आपले शास्त्रज्ञ कमालच करतील. भारतीय फारमाकोपिया समृद्ध झाला तर मेडिसीन ची उपलब्धता आणि कीमंत यावर खुप फरक पडू शकेल. डाँक्टर यावर प्रकाश टाकाल काय, धन्यवाद

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 07/02/2022 - 20:12
कर्नल, धन्यवाद. तुमच्या मुद्द्याशी मी तत्वतः सहमत आहे. अर्थात मी संशोधक नसल्यामुळे अनुभवजन्य काही लिहू शकणार नाही. अनौपचारिक गप्पांमधून आणि वाचनामधून जे काही जाणवलं ते लिहितो. सुमारे वीस वर्षांपूर्वी एका डॉक्टरांनी आयुर्वेदात पीएचडी मिळवल्याची बातमी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ठळकपणे आली होती. त्यात त्यांनी भावी देशी संशोधकांना एक सल्ला दिला होता की, भारतात आपण संशोधन करताना आधुनिक संशोधन पद्धतींचा अवलंब केलाच पाहिजे. तसे न केल्यास आपण जगाच्या नजरेत भरणार नाही आणि मागेच पडू. हा मुद्दा अगदी पटण्यासारखा आहे. आपल्या देशातील पारंपारिक वैद्यक संशोधनात बऱ्याचदा असे ऐकू येते की, पारंपरिक औषध शास्त्रांच्या आपापल्या संशोधन पद्धती आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य देशातील संशोधन पद्धतींचा आपण अवलंब केलाच पाहिजे का ? असे काही उलटसुलट वाचनात येते. प्रत्यक्ष देशी संशोधकाने त्याबाबत काही लिहिल्यास सर्वांना उपयुक्त ठरेल.

मदनबाण 07/02/2022 - 21:22
जागतिक अर्थकारणावर वाचन करताना माझ्या वाचनात आणि क्लिप्स मधुन पाहण्यात The Wolf Of Wall Street हा चित्रपट आला होता. यात लियोनार्डो डिकैप्रियो याने जॉर्डन बेलफोर्ट च्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारीत ही भुमिका साकारली आहे. यावर अधिक माहिती घेताना Quaaludes बद्धल माहिती मिळाली होती. हा पार्टी ड्रग आहे आणि याची एका काळी अमेरिकेत क्रेझ निर्माण झाली होती आणि नंतर ते बॅन करण्यात आले होते, पण याची उत्पत्ती हिंदुस्थानात झाली होती ही रोचक माहिती मिळाली होती. युफोरिया अनुभवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आपल्या देशात आजही अवैध्य पद्धतीने सेवन केले जाते आणि त्यासाठी अ‍ॅडिक्ट मोठी किंमत देखील मोजतात. याची निर्मीत अनावधानानेच झाली का ? ते नक्की मला समजले नाही. The Wolf of Wall Street मधला एक सीन :- या विषयावरच जॉर्डन बेलफोर्ट ची मुलाखत देखील पाहिली होती :- Jordan Belfort reveals THE TRUTH about Quaaludes!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Simplicity is the ultimate sophistication.” :- Leonardo da Vinci.

In reply to by मदनबाण

हेमंतकुमार 08/02/2022 - 07:51
मबा बरोबर. या औषधाचे शास्त्रीय नाव Methaqualone हे असून ते 1951 मध्ये सर्वप्रथम भारतात शोधले गेले. त्या संशोधनाचा मूळ हेतू एक मलेरियाविरोधी औषध शोधणे हा होता. हे झोप आणणारे औषध असून त्यावर भारतात बंदी आहे.

शेखरमोघे 08/02/2022 - 10:22
नेहेमीसारखाच माहितीपूर्ण, उपयोगी आणि सर्वन्गसुन्दर लेख. अभिनन्दन. आपण लिहिले आहे - ‘serendip’ याचा अरबी भाषेतील अर्थ म्हणजे श्रीलंका(सिंहलद्वीप)- . पण ‘serendip’ हा शब्द "सिन्दबादच्या सफरी"मध्ये श्रीलंका(सिंहलद्वीप) करता वापरला गेला आहे. म्हणजे मुम्बईला जसे इन्ग्रज बॉम्बे म्हणत असल्यामुळे त्या जागेचे नाव सगळ्या जगाकरता बॉम्बे हे झाले, तसे अरबी जग श्रीलंका(सिंहलद्वीप) करता ‘serendip’ हा शब्द सगळे अरब व्यापारी/खलाशी वापरत म्हणून वापरू लागले असावे. आयुर्वेदात जास्त सन्शोधन करताना येणारे मोठे प्रश्न म्हणजे आयुर्वेदातील बरीचशी नैसर्गिक औषधे non-standardised प्रमाणात असणे आणि म्हणून standardised dose देता न येणे. उदा. जेव्हा हळद ही औषध म्हणून वापरली जाते त्यावेळी ती जितकी "तयार' असेल (पक्व, वाळलेली, साफ केलेली) तितके त्यातील Curcumin (active ingredient) जास्त असेल आणि म्हणून जर शास्त्रोक्त आणि काटेकोर सन्शोधन करायचे असेल तर ते Curcumin वापरून करावे लागेल (की जे मग आयुर्वेदिक ठरणार नाही). आणखी एक उदाहरण - बरीच आयुर्वेदिक औषधे मधातून दिली जातात पण मधाचे हजारो प्रकार असू शकतात. त्यामुळे आयुर्वेदातील सर्पगन्धा (Rauvolfia serpentina) ही भारतात मिळणारी/वापरली जाणारी वनस्पती अभ्यासून पाश्चिमात्य शास्त्रज्ञानी त्यातील reserpine या मूल घटकाचा (active ingredient) anti-hypertensive drug म्हणून वापर सुरू केला (की ज्या करता सर्पगन्धा या नैसर्गिक वनस्पतीचा उपयोग करायचा असेल तर जगभराकरता standardised dose देता येणे कठीण झाले असते).

In reply to by शेखरमोघे

शेखरमोघे 08/02/2022 - 10:27
serendip’ हा शब्द "सिन्दबादच्या सफरी"मध्ये श्रीलंका(सिंहलद्वीप) करता वापरला गेला आहे जिथे सिन्दबाद दुसर्‍या वेळी गेल्यावर त्याला आपण तेथे एकदा येऊन गेल्याचे लक्षात येते आणि त्यामुळे "पुनर्भेट", "पुन्हा अनुभव येणे" अशासारखाही serendipity हा शब्द वापरला जातो

In reply to by शेखरमोघे

हेमंतकुमार 08/02/2022 - 10:37
छान प्रतिसाद ! रंजक पूरक माहितीबद्दल आभार ! serendipity या शब्दाचा अभ्यास करतानाच हा वैद्यकीय लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

In reply to by शेखरमोघे

चौकस२१२ 10/02/2022 - 04:29
आयुर्वेदात जास्त सन्शोधन करताना येणारे मोठे प्रश्न म्हणजे आयुर्वेदातील बरीचशी नैसर्गिक औषधे non-standardised प्रमाणात असणे आणि म्हणून standardised dose देता न येणे. अग्दि बरोबर पन हलु हलु त्यात बदल झालाय ? कि त्यासाठी लागणारी प्रयोगशाळेतील उपकरणे अजूनही महाग असल्यामुळे अवघड आहे ? अनेक वर्षे पडलेले प्रश्न १) ऍलोपॅथी ची औषधच्या मुळाशी गेले तर ती कोणत्या न कोणत्या नैसर्गिक वस्तू पासूनच बनवलेली असतात ना? मग आयुर्वेदिक म्हणजे शुद्ध आणि ऍलोपॅथी म्हणजे एकप्रकारची "कृत्रिम" असे का मानले जाते ? उदाहरण : परसिटॉमाल ची गोळी नक्की कशाची बनलेली असते? २) इतर खायद्यपदार्थ टिकावेत म्हणून त्यात इतर रसायने घातली जातात तसे औषधांना करावे लागते का ? परत परसिटॉमाल चे उद्धरण घ्या

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 10/02/2022 - 08:40
चांगल्या चौकस प्रश्नाबद्दल धन्यवाद ! आयुर्वेदिक औषधाच्या निर्माणसंबंधी संबंधित तज्ञाने बोलल्यास बरे. मी आधुनिक वैद्यकातील एक उदाहरण देतो - Aspirin हे औषध. यावर माझा मिपाच्या दिवाळी अंकात एक विस्तृत लेख येथे आहे : https://www.misalpav.com/node/43382 त्यातील काही निवडक भाग उद्धृत करतो: "Salicylic acidच्या वेदनाशामक उपयोगाची पहिली नोंद सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुमेरिअन संस्कृतीत झालेली आढळते. हे आम्ल अनेक झाडांच्या खोडात असते. त्यात प्रामुख्याने ‘विलो’ या झाडाचा समावेश आहे. यापुढील टप्प्यात विलोपासून पिवळ्या रंगाचा एक पदार्थ वेगळा करण्यात यश आले आणि त्याला Salicin हे विलोचे लॅटिन नाव दिले गेले. पुढे Salicin हे शुद्ध स्फटिक स्वरूपात तयार केले गेले आणि मग जर्मनीतील एका कंपनीने Salicylic acidचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. पुढे Felix Hoffmann या तंत्रज्ञाने विचारांती Salicylic acid च्या रेणूत एक रासायनिक बदल केला. तो म्हणजे त्यात Acetyl group घालून Acetylsalicylic acid हे नवे रसायन तयार केले.= Aspirin"

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 10/02/2022 - 09:15
२. **इतर खायद्यपदार्थ टिकावेत म्हणून त्यात इतर रसायने घातली जातात तसे औषधांना करावे लागते का ? >>>> होय, मूळ औषधाचे संरक्षण करण्यासाठी अन्य अनेक पूरक रसायने औषधांमध्ये घातली जातात. इथे विस्तृत माहिती पाहता येईल: https://pharmapathway.com/preservatives-used-in-pharmaceutical-industry/

अनिंद्य 08/02/2022 - 12:07
रोचक ! serendipity शब्दाची उगमकथा पूर्वी कोठेतरी वाचली होती पण वैद्यकातल्या शोधांमागच्या कहाण्या रंजक आहेत.

वेगळी माहिती.... तंत्रज्ञाना बाबतीत सांगायचे तर, X-Ray फोटो, हा एक असाच लागलेला शोध आठवतो आणि तर्कशुद्ध विचारसरणी असेल तर, माझ्या गाडीला, व्हॅनिला आइस्क्रीम आवडत नाही. इतर आइस्क्रीम घेतले की, गाडी लगेच सुरू होते,.... अशी तक्रार आल्यावर, जनरल मोटर्स इंजिनीयर लोकांनी केलेली मेहनत आठवते... https://youtu.be/ZvEB_ZoR9o0

In reply to by हेमंतकुमार

मी नेहमी हेच उदाहरण देत होतो .... एका व्हेवर कंट्रोल व्हाॅल्वचा CV बदलला गेला होता, त्यामुळे प्राॅडक्शन टाईम दुप्पट झाला होता. मुळ कारण शोधतांना, हाच फंडा उपयोगी पडला होता... RCA सारखी मजा कधीच आली नाही

In reply to by मुक्त विहारि

हेमंतकुमार 11/02/2022 - 18:50
तो कार व आइस्क्रीमचा किस्सा ही संपूर्ण सत्य घटना आहे की त्याला तिखट मीठ लावलेले असावे ? तुम्हीच सांगू शकाल :)

हेमंतकुमार 08/02/2022 - 13:56
अनिंद्य, मुवि >> आभार ! ... ,
X-Ray फोटो, हा एक असाच लागलेला शोध
>>> यावरून हे पुन्हा आठवले : डिसेंबर १८९५ मध्ये वैज्ञानिक Roentgen यांनी त्यांच्या बायकोच्या हाताचा एक्स-रे काढला. हा जगातील जिवंत माणसाचा पहिला एक्स-रे होता. या क्रांतिकारक घटनेचे वैज्ञानिक जगतात स्वागत झाले खरे. परंतु तत्कालीन सामान्यजनांनी या घटनेकडे साशंकतेने पाहिले होते. लंडनच्या मार्च १८९६च्या Pall Mall Gazette मधल्या संपादकीयात याचे प्रत्यंतर येते. ते संपादक म्हणतात, “मानवी शरीराच्या आतील गोष्टी अशा ‘फोटो’ काढून चव्हाट्यावर आणणे हे असभ्य आहे ! अशा अनैतिक तंत्रज्ञानावर राज्यकर्त्यांनी बंदी घालावी !! “

Nitin Palkar 09/02/2022 - 20:48
अतिशय सुंदर लेख.... नेहमी प्रमाणेच. वायग्राचा शोध ज्या प्रकारे लागला त्याची गम्मतच वाटली. आणखी एक गोष्ट आठवली.... विंचू दंशावर संशोधन करताना प्रसिद्ध डॉ. बावसकर यांना असे आढळले होते, 'विंचू दंशावरील उपचारासाठी आलेल्या पुरुष रुग्णांमध्ये शिस्न ताठरता येते'. सहज आठवले म्हणून...

In reply to by Nitin Palkar

हेमंतकुमार 10/02/2022 - 04:17
धन्यवाद व सहमती. विंचू, साप आणि अन्य काही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विषाचा यासंदर्भात बराच अभ्यास झालेला आहे. त्यातील रासायनिक घटक शुद्ध करून काही औषधनिर्मिती करता येईल का, यासंदर्भात संशोधन चालू असते.

निनाद 10/02/2022 - 09:49
इम्प्लांट करण्यायोग्य पेसमेकरचा शोध असाच लागलेला आहे असे वाचल्याचे स्मरते. हृदयाची लय रेकॉर्ड करणारे उपकरण तयार करण्याचा प्रयत्न चाललेला असतांना हे उपकरण तयार झाले. क्ष-किरण, लाफिंग गॅस, अँटी-डिप्रेसंट आणि एलएसडी हे पण अपघाताने सापडलेले आहेत. यांच्या कथापन रोचक आहेत. डॉक्टरांनी त्या ही भाग दोन मध्ये घ्याव्यात अशी नम्र विनंती!

In reply to by निनाद

हेमंतकुमार 10/02/2022 - 11:23
धन्यवाद ! सूचना चांगली आहे वैद्यकीय उपकरणे किंवा तंत्रज्ञान यावर आधारित भाग 2 चा विचार सवडीने करता येईल.

सुबोध खरे 10/02/2022 - 12:27
औषध संशोधन शास्त्रात फार्मसी ( औषध निर्माण शास्त्राचा) फार मोठा वाटा आहे. त्यात एक PHARMACEUTICAL CHEMISTRY हा एक विषय येतो. ज्यात रसायनांच्या रेणूची रचना आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो. याला structure activity relationship म्हणतात. मूळ औषधाच्या रेणूच्या संरचनेत बदल केल्यास शरीरावर काय परिणाम होतो हे यात तपासले जाते. उदा. नॉर फ्लोक्सासिन या रेणूला एक सायक्लोप्रोपेनचा रेणू जोडल्यामुळे तयार होणारे सिप्रो फ्लोक्सासिन हे औषध नॉरफ्लोक्सासिन पेक्षा कितीतरी अधिक जिवाणूंवर उपयोगी ठरले. सिप्रोफ्लोक्सासिन च्या सायक्लो प्रोपेन च्या जागी एक ऑक्सिजनचा रेणू टाकल्यावर तयार झालेले ओफ्लोक्सासिन हे ( सेकंड जनरेशन) औषध जास्त काळ शरीरात राहते आणि शिवाय ते अधिक जास्त जिवाणूंवर गुणकारी ठरते. ओफ्लोक्सासिन हे लेव्हो आणि डेक्सट्रो अशा दोन रेणूंचे मिळून बनलेले असते त्या पैकी केवळ लेव्हो आयसोमर हे प्रतिजैविक म्हणून काम करते त्यामुळे डेक्सट्रो आयसोमर काढून टाकून लेव्होफ्लोक्सासिन हे औषध तयार केले गेले ज्याचा गुण तितकाच येतो परंतु डेक्सट्रो आयसोमर काढून टाकल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स अर्धे झाले. याच तर्हेने पेनिसिलीन केफॅलोस्पोरीन सारख्या प्रतिजैविकांसह डॉक्सोरुबीसीन सारख्या कर्करोग प्रतिबंधक औषधांच्या रेणूत बदल करून अनेक औषधांच्या रेणूत थोडासा बदल करून जास्त गुणकारी किंवा कमी साईड इफेक्टस असणारी औषधे शोधण्यात येतात. उदा डॉक्सोरुबीसीन मध्ये बदल करून डॉनोरुबीसीन एपीरुबीसीन आयडारुबीसीन यतयार करण्यात आली. मूळ पेनिसिलीन मध्ये अमायनो फेनीलअमायडो गट अंतर्भूत करून अँपिसिलीन हे औषध निर्माण करण्यात आले. याचअमायनो फेनीलअमायडो ऐवजी हैड्रोक्सि अमायनो फेनीलअमायडो गट अंतर्भूत करून ऍमॉक्सीसिलीन हे औषध निर्माण करण्यात आले. याचा औषधात क्लोरीनच्या रेणूचा अंतर्भाव करून क्लॉक्सासिलीन हे प्रतिजैविक रोधक जिवाणूंविरोधी (semisynthetic modifications of natural penicillins that are resistant to bacterial enzyme beta-lactamase, which accounts for typical penicillin resistance) पेनिसिलीन निर्माण करण्यात आले अशा अनेक कहाण्या आहेत. आयुर्वेदिक औषधातील उपयुक्त रेणू विलग करून त्याचे मूळ गुण काय आहेत त्या वर संशोधन करून त्यातून उपयुक्त औषध कसे विकसित करता येईल याचे संशोधन सतत चालू असते. उदा अडुळसा या औषधात असलेले व्हॅसिसीन हे औषध विलग करून त्याच्या वरून ब्रॉमहॅक्सिन हे कफ पातळ करणारे औषध विकसित करण्यात आले. फार्मा कंम्पन्याना कोणतेही औषध वर्ज्य नसते. त्यांचा मूळ हेतूच औषध निर्मिती करून नफा कमावणे हाच असल्यामुळे आयुर्वेदिक युनानी सिद्ध अशा कोणत्याही पॅथीती लौषधे त्यांना वर्ज्य नाहीत. होमिओपॅथी मध्ये मूलभूतच गृहीत चूक असल्याने (औषध जितके विरळ कराल तितके ते जास्त गुणकारी होईल- मीठ अगदी क्षुल्लक मात्रेत घातले तर पदार्थ खारट होईल का?) फार्मा कंम्पन्या यांच्या नादाला साधारणपणे लागत नाहीत. आजही असे अनेक पारंपरिक औषधी ज्ञान जगभरात अनेक ठिकाणी उपलब्ध आहे ज्याचा वापर करून मानवजातीला उपयुक्त अशी औषधे निर्माण करता येतील हि खात्री आहे.

In reply to by सुबोध खरे

जनरीक औषधांमध्ये आणि त्यांच्या मूळ औषधांमध्ये असे काही बदल असतात का? मूळ औषध अधिक प्रभावी होण्यासाठी औषध कंपन्या काही गोष्टी दडवून ठेवू शकतात का?

हेमंतकुमार 10/02/2022 - 12:49
अभिप्राय आणि पूरक माहितीबद्दल सर्व सहभागी यांचे आभार ! ….. पारंपरिक पद्धत आणि आधुनिक वैद्यक यांची सुरेख सांगड घातलेले अजून एक उदाहरण म्हणजे मलेरियावर शोधलेले हे औषध. यासाठी 2015 चे वैद्यकीय नोबेल पारितोषिक दिले गेलेले आहे. पारंपरिक चिनी वैद्यकामध्ये sweet wormwood हा एक पदार्थ असतो. त्यातून artemisinin हे रसायन संबंधित वैज्ञानिकाने वेगळे काढले आणि पुढे त्याचा मलेरियाविरोधी औषध म्हणून विकास केला.

सर टोबी 10/02/2022 - 15:02
व्हलकनायझेशन म्हणजे नैसर्गिक रबराला अधिक टिकाऊ बनविण्याची पद्धत अशीच अपघाताने सापडली. नैसर्गिक रबर फार लवकर झिजते. ते टिकाऊ बनविण्याची पद्धत काही केल्या सापडत नव्हती. अशातच संशोधनाच्या ठिकाणी रबराच्या भट्टीत चुकून गंधक पडले. गंधक बाजूला करण्याच्या प्रयत्नांत असे जाणवले की ते मिश्रण अधिक लवचिक पण टिकाऊ बनले आहे. अशा तऱ्हेने नैसर्गिक रबर आणि गंधक यांचे संयुग बनविण्याच्या पद्धतीचा शोध लागला. बेनझीन चे रासायनिक सूत्र समजले पण सहा कार्बनचे अणु आणि सहा हायड्रोजनचे अणु यांच्या संयुगाची रचना काही केल्या कल्पिता येत नव्हती. अशातच फ्रेडरिक केक्युल विचार करता करता शेकोटी जवळ झोपी गेला. गाढ झोपेत त्याच्या स्वप्नात साप आले आणि ते समोर येऊन गुंडाळी करून आपलीच शेपूट तोंडात कोंबतयात असे त्याला दिसले. त्या वरून बेंझिन ची संयुग रचना बंदिस्त, गोलाकार असावी असे त्याला सुचले. ग्रॅहॅम बेलच्या टेलिफोनच्या उपयुक्ततेची कुणाला फारशी महती वाटली नाही. फारशी ये जा न करता आणि न ओरडता थोड्या अंतरावरील माणसं एकमेकांशी बोलतात झालं, अशी त्या संशोधनाची समीक्षा झाली होती. पहिल्यांदा जो मुलगा टीव्ही वर झळकला तो त्याच्यावर टाकलेल्या प्रकाश झोत, तारांची भेंडोळी यामुळे घाबरून पळून गेला. त्या अगोदर निर्जीव वस्तू व्यवस्थित दिसत होत्या, पण मग मुलगाच का नाही दिसत या चिंतेने जेव्हा तो संशोधक स्टुडिओ मध्ये आला तर तो मुलगा जागेवर नाहीच असे त्याला दिसले. कशी तरी परत त्याची समजूत काढून त्याला बसविले आणि तो प्रयोग यशस्वी झाला.

In reply to by सर टोबी

हेमंतकुमार 10/02/2022 - 15:27
सुरेख विवेचन. सर्व शोधांचे किस्से आवडले. असेच विविध क्षेत्रातील किस्से जरूर यावेत

औषधांच्या शोधांवरचा हा माहितीपूर्ण लेख अन त्यावरचे प्रतिसाद आवडले. तीन वर्षांपूर्वी Serendipity हा टिव्हीवर चित्रपट पाहिला होता. त्यावेळी या शब्दाबाबत प्रथमच कळले होते. या लेखानिमित्ताने ती आठवण जागी झाली.

हेमंतकुमार 12/02/2022 - 09:04
अभिप्राय व प्रोत्साहनाबद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार.! **Serendipity चित्रपट >>> माहितीबद्दल धन्यवाद माझ्याकडे नेटफ्लिक्स नसल्यामुळे पाहता येणार नाही. झलक तेवढी बघेन.

हेमंतकुमार 05/05/2022 - 07:47
औषधे, औषधनिर्माण शास्त्र आणि आरोग्य यासंबंधीच्या काही घडामोडींचे संकलन या धाग्यावर करीत राहीन. ही एक बातमी : सध्या निर्माण होणाऱ्या औषधांपैकी तब्बल 88 % औषधांमध्ये कच्चामाल म्हणून वापरले जाणारे आयसोप्रोपील अल्कोहोल हे नॉन-आयपी दर्जाचे असून ही औषधे सेवन करणाऱ्याबरोबरच निर्माण करणाऱ्या लोकांनाही धोकादायक आहेत ( संदर्भ : छापील सकाळ मुख्य अंक पान 2, ५ मे २०२२ )

हेमंतकुमार 05/05/2022 - 07:48
अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री, अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई (डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय) https://marathi.abplive.com/crime/case-against-e-commerce-portal-amazon-for-selling-abortion-pills-1055776

हेमंतकुमार 11/06/2022 - 21:06
28 वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या मनाने वायग्राचा प्रचंड मोठा डोस घेतला आणि हा आचरटपणा चांगलाच अंगाशी आला. त्यातून सुटका होण्यासाठी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

हेमंतकुमार 28/06/2022 - 09:43
Thalidomide या औषधाचा इतिहास रंजक आहे. 1960 मध्ये हे औषध गरोदरपणातील मळमळ कमी करण्यासाठी वापरात होते. परंतु त्याचा अत्यंत विपरीत परिणाम गर्भावर दिसून आला. अशा अनेक स्त्रियांना जन्मजात व्यंग असलेली मुले झाली. परिणामी 1961 मध्ये या औषधावर बंदी घातली गेली. पुढे सुमारे 25 वर्षांनी या औषधाचे अन्य गुणधर्म लक्षात आले. 1998 मध्ये त्याला एक प्रकारच्या कुष्ठरोगाच्या उपचारासाठी मान्यता मिळाली. त्याही पुढची प्रगती पुढील दशकात दिसून आली. 2012 मध्ये त्याला अस्थिमज्जेच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी मान्यता मिळाली. गरोदर स्त्रिया वगळता हे औषध वरील आजारांसाठी वापरले जाते.

हेमंतकुमार 03/10/2022 - 11:56
औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती. ही योजना सरकारच्या विचाराधीन : https://www.esakal.com/desh/indian-government-planning-to-start-tress-and-track-system-to-know-duplicate-medicine-npk83

हेमंतकुमार 18/10/2022 - 15:26
एक चांगला लेख : https://www.loksatta.com/chaturang/patent-law-on-breast-cancer-medicine-... पेटंट कायदा जागते रहो!
.....जयंती मुरलीधरन या एक सेवानिवृत्त बँक कर्मचारी होत्या. त्यांना महिन्याला २८,००० रुपये निवृत्तिवेतन मिळत होते. ‘मासिक उत्पन्न इतके असताना त्याच्या दुप्पट किमतीचे औषध मला परवडणेच शक्य नाही. माझा आणि माझ्यासारख्या अनेक कर्करोगग्रस्त स्त्रियांचा जीव वाचावा म्हणून सरकारने हे औषध स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत,’ असा विनंती अर्ज जयंती यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह औषध आणि व्यापारविषयक विविध विभागांना केला. त्यावर पुढे काही विशेष घडले नाही. सरकारने या बाबतीत लक्ष घालावे आणि पेटंट कायद्यातील सोयी वापरून या औषधाच्या किमती कमी कराव्यात, असे केरळ उच्च न्यायालयाने जून २०२२ मध्ये सरकारला सांगितले. दुर्दैवाने दरम्यान जयंती यांचा कर्करोगाने बळी घेतला. हे केरळ उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला येताच १६ सप्टेंबर २०२२ रोजी न्यायालयाने स्वत:हून याची दखल घेतली आणि सरकारला औषधाच्या किमती कमी करण्यास बजावले.....

हेमंतकुमार 08/11/2022 - 08:45
Paracetamol च्या गोळ्या ऑस्ट्रेलियामध्ये सुपर मार्केटमध्येही विकण्यास ठेवलेल्या असतात. परंतु या गोळ्यांची घाऊक खरेदी करून लोक घरी साठवतात. त्यातून आत्महत्येचे प्रकार वाढतात असे लक्षात आले. म्हणून तज्ञांच्या एका समितीने अशा विक्रीवर निर्बंध घालावेत आणि अठरा वर्षाखालील मुलांना ती सुपर मार्केटमधून घेता येऊ नयेत अशी शिफारस केली आहे. त्यावरील उलट सुलट प्रतिक्रिया

हेमंतकुमार 23/11/2022 - 12:51
'Goodyear टायर्स' आपल्याला परिचित आहेत. ते व्यापारी नाव Alan Goodyear यांच्यावरून दिलेले आहे. त्यांनी संशोधन करून तयार केलेले विशिष्ट रबर हे serendipity चे एक उत्तम उदाहरण आहे. इंडियन रबर कमी चिकट करण्याचे Goodyear सातत्याने प्रयत्न करीत होते पण त्यांना यश येत नव्हते. एकदा त्यांच्या हातून गंधक लावलेले रबर चुकून विस्तवात पडले आणि त्यातून त्यांना अपेक्षित दर्जाचे रबर मिळाले. हे नवे रबर करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी vulcanization असे नाव दिले. Vulcan ही रोमच्या लोकांची अग्निदेवता आहे.

हेमंतकुमार 25/11/2022 - 11:58
Saccharine, cyclamate, aspartame & Sucralose हे रासायनिक पदार्थ नैसर्गिक साखरेला पर्याय म्हणून अस्तित्वात आले. त्यांचे शोधही वैज्ञानिकांना योगायोगानेच लागले आहेत. प्रत्यक्षात काही वेगळी रसायने किंवा औषधांचा शोध चालू असताना एखाद्या वैज्ञानिकाने आपले बोट चुकून चाटले आणि त्याला एकदम तीव्र गोड चव जाणवली ! त्यावर अधिक संशोधन करता एका वेगळ्याच गोड रसायनाचा शोध लागून गेला. अशी काही रसायने आणि प्रत्यक्षात चालू असलेले संशोधन असे होते : 1. Saccharine : दगडी कोळशावरील प्रयोग. 2. Cyclamate : तापशामक औषधाचा शोध. 3. Aspartame : जठराच्या अल्सरवरील औषधाचा शोध. हा चालू असताना संबंधित वैज्ञानिकाने एक कागद उचलण्यासाठी म्हणून बोटाला थोडीशी थुंकी लावली होती. 4. Sucralose : याच्या शोधाची कथा अजूनच मजेशीर. Sucrose व chlorine या दोन रसायनांचे संयोग करण्याचे प्रयोग चालू होते. त्यातील वरिष्ठ वैज्ञानिकाने अन्य एकाला तोंडी सांगितले, की आता हे रसायन “test” करून बघ. पण संबंधित व्यक्तीच्या ऐकण्यात “taste” अशी गफलत झाली ! त्याने ते “टेस्ट” करून बघितले आणि त्याला अतिशय गोड चव जाणवली.

हेमंतकुमार 07/02/2023 - 17:58
लेखात उल्लेख केलेल्या औषधांच्या यादीत अजून एकाची भर घालतो. छातीच्या अंजायनासाठी नायट्रोग्लिसरीन (NTG) या औषधाची गोळी जिभेखाली ठेवतत. हा एक तातडीचा प्रथमोपचार असतो. या औषधाचा शोधही खूप रंजक आहे. सुरुवातीस Sobrereo या वैज्ञानिकांनी त्याचा शोध लावला परंतु त्यांना त्याचा उपयोग काही माहीत नव्हता. त्यानंतरच्या काळात अनेक बांधकामाच्या मोठ्या कामांसाठी विविध स्फोटकांचे शोध घेणे सुरू होते. या कामी अल्फ्रेड नोबेल यांचा पुढाकार होता. त्यांनी या रसायनामध्ये अन्य रसायन मिसळले आणि त्यातून त्यांना एक स्फोटक मिळाले. त्याला डायनामाइट असे म्हटले गेले. त्याचा अनेक बांधकामांमध्ये वापर केला गेला. याच घटकाचे पुढे औषधे कसे बनले हेही रंजक आहे. Sobrereo यांनी एकदा ते जिभेवर ठेवून त्याची चव घेतली होती. त्यांना ते खूप गोड लागले आणि त्यानंतर प्रचंड डोकेदुखी झाली. यावर अधिक संशोधन करून पुढील वैज्ञानिकांनी असे शोधले की हे औषध ठराविक प्रमाणात पोटातून दिले असता रक्तदाब कमी होतो आणि हृदयाच्या आणि अन्य रक्तवाहिन्या देखील प्रसरण पावतात. अशा तऱ्हेने हे औषध अंजायनावरील प्रथमोपचार म्हणून प्रस्थापित झाले अजून एक मजेदार गोष्ट. या औषधाचा मोठा साठा जर एखाद्या बॅगेत भरून विमानतळावर नेलेला असेल आणि तो जर तिथल्या बॉम्बशोधक यंत्रणा व कुत्री यांच्या संपर्कात आला तर स्फोटक असल्याचा सिग्नल येतो ! अशा एक दोन घटना विमानतळांवर घडल्यात.

हेमंतकुमार 14/02/2023 - 08:54
विनापरवाना औषधं विकणं महागात, ई-फार्मसींना DCGI ची कारणे दाखवा नोटीस DCGI ने शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी Tata 1 MG, Amazon आणि Flipkart सह अनेक ऑनलाईन फार्मसींना नोटिसा बजावल्या आहेत.

अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत.