मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

एका लेखाची चाळीशी

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रास्ताविक : माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ३९ वर्षांपूर्वी लिहिला. तेव्हा मी नुकताच एमबीबीएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर एक वर्षे इंटर्नशिपचा कालावधी असतो. त्या काळी त्यापैकी सहा महिने ग्रामीण भागात राहायला लागायचे. मी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात माझे ग्रामीण प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वास्तव्याच्या अनुभवावर आधारित मी प्रस्तुत लेख लिहिला. तो नंतर कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला. यंदा त्या प्रथम लेखनाने चाळीशीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त तो लेख जसाच्या तसा इथे प्रकाशित करीत आहे.

मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर नमस्कार. आपण ठीक आहात अशी आशा करतो. सध्याच्या काळात मानसिक आरोग्य, हा अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. अनेकदा आपण बघतो की, लोक अतिशय क्षुल्लक कारणाने आत्महत्या करताना दिसतात (वस्तुत: कोणतंही मोठं सांगितलं जाणारं कारण हे एवढी मोठी गोष्ट करण्यासाठी नेहमीच किरकोळ असतं). कोरोना आणि आर्थिक संकटाच्या काळानंतर मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिक आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी झाल्या आहेत. त्यामुळे हा विषय आपण सर्वांचा आहे.

थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिकता

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच घडलेला एक किस्सा. माझ्या मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला. तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे. त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती. त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या. त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते". संबंधित मुलीच्या वडिलांनी माझ्या मित्राला ते सर्व रिपोर्ट्स दाखवले. आता त्या मुलीतील तो रक्तदोष पाहता काय करावे असा पेच त्याला पडला.

रंगदृष्टीचे तिरंगी सूत्र

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पृथ्वीवरील जीवसृष्टीत निसर्गाने अनेक रंगांची उधळण केलेली आहे. ती अर्थातच मनमोहक आहे. विविध वनस्पती आणि प्राणी हे भिन्नरंगी असून ते वेळोवेळी आपापले ‘रंग’ दाखवत असतात ! मानवनिर्मित अनेक गोष्टीही रंगीत आहेत. विविध रंगांच्या दर्शनातून मनात वेगवेगळे भाव उमटतात. आपल्या दैनंदिन जीवनातील सुसूत्रता अनेक रंगांवर आणि रंगबदलांवर अवलंबून आहे. मुळात आपल्याला रंगज्ञान होण्यासाठी आपले डोळे व मेंदू यांच्यातील विशिष्ट यंत्रणा कारणीभूत आहेत. या अद्भुत व अमूल्य अशा जीवशास्त्रीय प्रणालीवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा लेख. निसर्गातील ज्या विद्युतचुंबकीय लहरी आपल्या डोळ्यांना जाणवतात त्याला आपण प्रकाश म्हणतो.

कोंडून घेण्याचा जपानी प्रकार

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यात अग्रेसर असलेले राष्ट्र म्हणून जपानला आपण ओळखतो. प्रचंड मेहनत, वक्तशीरपणा आणि काटेकोर शिस्त हे तिथल्या नागरिकांचे गुण कौतुकास्पद आहेत. दुसऱ्या बाजूस तिथल्या औद्योगिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेले ताणतणाव हेही प्रचंड आहेत. त्यातूनच निरनिराळ्या मानसिक समस्यांचे प्रमाण तिथे खूप आहे. या लेखात अशाच एका मानसिक समस्येचा आढावा घेत आहे. 1970 ते 80 च्या दशकात जपानमधील पौगंडावस्थेतील मुले आणि तरुण यांच्यात एका मनोवृत्तीची लागण होऊ लागली. ही मुले शाळा-कॉलेजला विनाकारण वारंवार दांड्या मारू लागली आणि स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागली.

औषध-प्रवेश (२) : इंजेक्शन्सचे अस्त्र

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ इथे : https://www.misalpav.com/node/50235 .................... या भागात आपण औषधे देण्याचे जे शरीरमार्ग बघणार आहोत ते असे : · इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे · इंजेक्शनचे अतिविशिष्ट मार्ग · स्थानिक मार्ग ok इंजेक्शन इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढतात भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य.

औषधांचा कायाप्रवेश (१)

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे. पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत.

स्त्री-लैंगिकतेचे गूढ

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शास्त्रीय विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्ती बाहेरचे आहेत). स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे.

मला भेटलेले रुग्ण - २३

डॉ श्रीहास ·
https://misalpav.com/node/47104 “डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.” पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला. मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.” बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही? मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ? बाप : जी हॉं ! मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है। रिपोर्ट आल्यावर त्याला आणि मुलीला बोलावलं आणि सांगीतलं की रिपोर्ट नॉर्मल आहे. वर हे देखील सांगीतलं की तिला अस्थमा असता तरी सगळं आयुष्य चांगलंच जगता येईल.

शोधायला गेले एक, अन......

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत.