मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

मद्यपानाचे वैद्यकीय निदान

हेमंतकुमार ·

मद्यपान

- एक बहुचर्चित आणि ज्वलंत विषय !! समाजात विविध कारणांसाठी मद्यपान करणारी भरपूर माणसे आहेत. उत्सुकता, आवड, चैन, व्यसन आणि मानसिक असंतुलन अशा अनेकविध कारणांमुळे माणसे मद्यपान करतात. जोपर्यंत मद्यपि ही कृती त्यांच्या घरी शांततेत किंवा सार्वजनिक परवाना असलेल्या ठिकाणी स्वपरवान्यासह करीत असतात तोपर्यंत ते कायदेशीर ठरते.

हृदयसंवाद (४) : हृदयविकाराचे प्रकार

हेमंतकुमार ·
भाग ३ इथे ……….. सर्वसाधारणपणे ‘हृदयविकार’ असा शब्द उच्चारला की सामान्यजनांच्या डोळ्यासमोर ‘हार्ट अटॅक’ आलेला(च) रुग्ण येतो ! हार्ट अटॅक हा करोनरी वाहिन्यांशी संबंधित महत्त्वाचा हृदयविकार नक्कीच आहे. परंतु, त्या व्यतिरिक्तही हृदयाच्या अंतर्गत रचनेनुसार त्याच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. या लेखात त्यातल्या प्रमुख आजारांची प्राथमिक ओळख करून घेऊ. इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा. हृदय आणि रक्तवाहिन्या यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे.

हृदयसंवाद (३) : नाडी, रक्तदाब व ‘इसीजी’

हेमंतकुमार ·
भाग २ इथे .. .. .. हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत : 1. नाडी तपासणी 2. रक्तदाब मोजणी 3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी 4. इसीजी तपासणी इथे एक मुद्दा लक्षात येईल. या चाचण्या जशा संबंधित रुग्णावर करतात त्याचप्रमाणे त्या निरोगी व्यक्तींसाठी सुद्धा आरोग्यचाळणी चाचण्या म्हणून वापरल्या जातात.

हृदयसंवाद (२) : हृदयरचना आणि कार्य

हेमंतकुमार ·
भाग १ ... .. .. .. या लेखात आपण हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान, त्याची बाह्य व अंतर्गत रचना आणि त्याचे रक्ताभिसरणातील मध्यवर्ती स्थान यांचा आढावा घेऊ. मूलभूत रचना व कार्य हृदय आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये मधोमध वसलेले असून ते थोडेसे डाव्या बाजूस झुकलेले आहे. एखाद्या बलदंड पैलवानाच्या एका मुठीत मावेल एवढाच त्याचा आकार आणि वजनही जेमतेम 300 ग्रॅम. खालील चित्रात हृदयाची अंतर्गत रचना दाखवलेली आहे.

हृदयसंवाद (१) : प्रास्ताविक व स्वागत

हेमंतकुमार ·
सन 2018 मध्ये मी आपल्या आणि अन्य एका संस्थळावर “ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’वर शिक्कामोर्तब“ हा लेख लिहिला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023मध्ये ध्यानीमनी नसताना त्या लेखाच्या एका वाचकांनी अन्यत्र स्वतःच्या हार्ट अटॅकसंबंधी अनुभवकथन केले. त्यात त्यांनी ट्रोपोनिनच्या त्या लेखाचा जीवरक्षक म्हणून उपयोग झाल्याचे नमूद केले. ते वाचून आनंदयुक्त समाधान वाटले. त्या निमित्ताने हृदयविकारावर अनेकांशी व्यक्तिगत संपर्कातून ओझरती चर्चा झाली.

कोलेस्टेरॉल : Statins, बुरशी व घातकता

हेमंतकुमार ·
नव्या वाचकांसाठी : कोलेस्टेरॉलवर मूलभूत माहिती देणारा लेख इथे आहे. ………….......................................................................................................................................... रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही गेल्या ७५ वर्षांत जाणवलेली एक मोठी आरोग्यसमस्या आहे. हृदयविकाराच्या धोका वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये या घटकाचा समावेश होतो. त्या अनुषंगाने कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी कमी करणे इष्ट असते. त्यासाठी औषध म्हणून अनेक घटकांचा वापर देश-विदेशांमध्ये होताना दिसतो.

स्वेच्छामरणाच्या वैद्यकीय पद्धती

हेमंतकुमार ·
काही दिवसांपूर्वी नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस व्हेन एग्त आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यांच्या देशात कायद्याने मंजूर असलेले स्वेच्छामरण वयाच्या 93 व्या वर्षी स्वीकारले. अधूनमधून अशा बातम्या वाचनात येतात. आजच्या घडीला जगभरात सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकारच्या मरणाला कायदेशीर मान्यता आहे. त्यापैकी नेदरलँडस, बेल्जियम, कॅनडा आणि स्वित्झर्लंड ही आघाडीची मंडळी आहेत.

अल्पवयीन मातृत्वाची गंभीर समस्या

हेमंतकुमार ·
११ वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाली होती. परंतु आता गर्भ ३१ आठवड्यांचा असल्यामुळे तिला गर्भपाताची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली
नुकतीच ही जयपूरची बातमी वाचली आणि सुन्न व्हायला झाले. इतक्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेतून जे मातृत्व लादले जाते ते अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या निमित्ताने या विषयाचा घेतलेला हा शास्त्रीय कानोसा.

आवडती, आवश्यक आणि आरोग्यदायी

हेमंतकुमार ·
नमस्कार ! सन 2020मध्ये ‘सुखी झोपेचा साथी’ हा लेख इथे लिहिला होता. त्यामध्ये फक्त मेलाटोनिन या झोपेशी संबंधित एकाच हॉर्मोनचा विचार केलेला होता. त्या धाग्यावरील चर्चेदरम्यान वाचकांनी सूचना केली की, झोपेची एकंदरीत प्रक्रिया या विषयावर सविस्तर लेखन करावे. या चांगल्या सूचनेचा विचार करून हा लेख लिहीतोय. यामध्ये आपण झोपेची आवश्यकता, तिच्या दरम्यान होणारे शारीरिक बदल, तिचे शास्त्रीय प्रकार, तिचा वयाशी संबंध आणि झोप-जाग चक्र या मूलभूत गोष्टींचा विचार करणार आहोत.

आवळी-जावळी, ‘आवळी-आवळी',.. इत्यादी !

हेमंतकुमार ·
२०२४ : आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक आरोग्यपूर्ण शुभेच्छा !. ********************************* गेल्या पंधरवड्यात अमेरिकेतील 32 वर्षीय Kelsey Hatcher यांनी एका विशेष प्रकारच्या ‘जुळ्या’ मुलींना जन्म दिल्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या.