२०२३ : वैद्यकीय संशोधनाची झेप
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about २०२३ : वैद्यकीय संशोधनाची झेप
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
२०२३ ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षातील आधुनिक वैद्यकातील संशोधनाचा वार्षिक आढावा घेणारे हे सदर यंदापासून चालू करतोय. त्यात आपण वैद्यकाच्या काही महत्वाच्या क्षेत्रातील संशोधनांवर नजर टाकू. अशा विविध संशोधनांची ३ गटांमध्ये वर्गवारी करतो :
• रोगनिदान पद्धती
• रोगोपचार व प्रतिबंध
• वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणे
• रोगनिदान पद्धती
१. कर्करोगाचे अत्यंत लवकरच्या अवस्थेत(शून्यावस्था) निदान झाल्यास त्यावरील उपचार प्रभावी ठरतात आणि रुग्णाचे आयुष्य सुसह्य होते. असे निदान करण्यासाठी सोप्या व सुटसुटीत चाचणीचा शोध गेली काही वर्षे चालू आहे.