मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

गरम आणि ‘ताप’दायक

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सस्तन प्राणी या वर्गानुसार आपण प्राणिमात्रांत उत्क्रांतीच्या सर्वोच्च पातळीवर आहोत. पृथ्वीवर आपण वेगवेगळ्या खंडांत राहतो. विशिष्ट खंडानुसार आपल्या सभोवतालचे तापमान ऋतूनुसार बदलते असते. कडाक्याच्या थंडीतील उणे ४० C ते भर उन्हाळ्यातील ५२ C हून अधिक, एवढा त्याचा व्यापक पल्ला आहे. आपण बाह्य तापमानाच्या एवढ्या विविधतेने गुरफटलेले असूनही आपल्या शरीराचे तापमान मात्र कायम स्थिर असते. शरीरातील विशिष्ट दमदार यंत्रणेमुळे आपल्याला हे अचंबित करणारे वैशिष्ट्य मिळाले आहे. निरोगी अवस्थेत आपण आपले तापमान सरासरी ३७ C ( ९८.६ F) इतके ठेवतो. विविध आजारांमध्ये हे तापमान वाढते.

पल्स ऑक्सीमीटरचे गमभन

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोविड महासाथीच्या निमित्ताने बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचे आगमन झालेले आहे. या आजारात काही रुग्णांना श्वसन अवरोध होऊ शकतो. परिणामी शरीरपेशींना रक्ताद्वारे मिळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. या परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता यावा, या उद्देशाने या घरगुती उपकरणाचे उत्पादन केलेले आहे. सध्या त्याचा लाभ बरेच जण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आरोग्य सर्वेक्षणातही त्याचा चाळणी चाचणीसारखा वापर होत आहे. या उपकरणातून ऑक्सीजन संबंधीचे जे मापन दिसते त्याबद्दल सामान्यांत कुतूहल दिसून आले.

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

पाषाणभेद ·
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.

मृत्यूंचा आकडा वाढला, आता 'राजि'नामे द्या

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सार्स कोविड- २ २०१९ मध्ये मानव प्रजातित उतरुन सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या १०८ दिवसात १०,००० मृत्यू झाले. त्या नंतर मागच्या ३७ दिवसात १०,००० जीव गेले त्यातील ५००० मागच्या १६ दिवसात गेलेत. संदर्भ पहिल्या १०८ दिवसात जे १०,००० गेले त्यातले ५२% मुंबईतले होते, नंतरच्या १०,००० मुंबईचा टक्का घसरून १९% म्हणजे गेल्या ३७ दिवसातील १०,००० मृत्यू पैकी ८१ % उर्वरीत महाराष्ट्रातून आलेत.

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

चित्रगुप्त ·
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

संपला फ्रेंडशिप डे......

सुधीर मुतालीक ·
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

लॉकडाउनमधील रनिंगचा अनुभव

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वांना नमस्कार! परभणीमध्ये गेल्या महिन्यामध्ये विद्यापीठाचा परिसर नुकताच मॉर्निंग वॉक व रनिंग करणा-यांसाठी खुला केला होता. तेव्हा खूप दिवसांनी तिकडे रनिंग चालू केलं. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग बंद होतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अंगणामध्येच आठवड्यातून दोन- तीनदा टायमर लावून रनिंग करत होतो. परिस्थिती काही काळ ठीक झाल्यावर रोडवर थोडे दिवस सायकलिंग केलं आणि विद्यापीठाच्या परिसरात रनिंग करण्याचा आनंद घेतला न घेतला तोच घरासमोरच कंटेनमेंट झोन आला. सरकारचे नियम काहीही असले तरी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन काळजी घेणं प्रत्येकाचं काम आहे.

कोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे

माहितगार ·
लेखनप्रकार
माझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध्ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली. ....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल Dr Tedros Adhanom Ghebreyesus, AIIMS चे डॉ.