द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय.
आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे.
माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील
या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या.