मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

<मीच एकटा सर्वज्ञ कसा ?>

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? या एका प्रश्नासरशी अहंमन्यतेच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन विनम्र होतं; सुरुवातीला थोड चुकल्याचुकल्यासारखं वाटते, पण अहंकार हाच अहंमन्यतेचा आधार आहे, एकदा निराहंकारी झालो की सगळा माज संपला ! कुठला वाद-विवाद नाही; कसलं भांडण नाही, कोणलाही काहीही पटवुन देण्याचा अभिनिवेशष नाही. कुठल्याही विरुध्दमताला खोडुन काढण्याचा अट्टहास नाही, कोणताही गर्व नाही, की निर्बुद्ध मीपणाचे प्रदर्शन नाही. कोणतीही टोकाचा आग्रह नाही, "स्वतःचे ते सोवळं- अन दुसर्‍याचे ते ओवळं" असलं अज्ञान नाही, कुठे डोकं आपटायला नको, की शेवटी प्रत्येक धाग्यावर होणारी स्वतःची फजीती नाही. कुठे अक

कृतघ्न -7

बाप्पू ·
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 भाग -6 https://www.misalpav.com/node/46656 आता पुढे.... "या पाटील साहेब. बसा. यांची ओळख करून देतो. हे डॉक्टर मनोज रणदिवे, इथून पुढे रामदास ची केस हेच हॅन्डल करतील. यांनी आजपर्यंत गिया बारे सिन्ड्रोम च्या बऱ्याच केसेस यशस्वी रित्या हाताळलेत, आणि रामदास च्या केस मध्ये देखील हेच आपल्याला मदत करतील.

कृतघ्न -6

बाप्पू ·
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 आता पुढे.. गाडी निघाली, आणि थेट सोलापूर च्या दिशेने धावू लागली. रामदास ला बाहेर पाहायचे होते कि आपल्याला नेमके कुठे नेले जातेय, पण त्याची मान उचलली जात नव्हती. तो जिवंत तर होता पण शरीराचे सर्व अस्तित्व च संपून गेले होते. माने पासून खाली आपले शरीर तो ना पाहू शकत होता ना त्याला कंट्रोल करू शकत होता.

तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका - करोना महात्म्य ।।२।।

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
करोना माहात्म्य ||२||
तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका
 
       मनुष्य मरणाला भीत नाही आणि हाच करोनाशी लढताना सगळ्यात मोठा अडचणीचा भाग ठरणार आहे. जो मरणाला भीत नाही, तो स्वतः बेसावध असतो आणि दुसर्‍याचे जीवनही बेसावधपणे धोक्यात घालू शकतो.

कृतघ्न -5

बाप्पू ·
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी. मुलांच्या आणि बायकोच्या कानावर हि गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. त्यांचं तरी काय चुकीचं होत?? ज्यावेळी संधी होती तेव्हा रामदास ने सर्व विसरून चुकीच्या माणसांना निवडले आणि आता वाईट वेळेत आता आपण कश्याला मदत करावी?

हात, जंतू, पाणी आणि साबण

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता. आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात.

आजारांच्या जागतिक साथी

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूच्या आजाराची जागतिक साथ आल्याचे जाहीर केले आहे. ती साथ आटोक्यात राहावी म्हणून आपण सर्वजण योग्य ते प्रयत्न करीतच आहोत. आजाराच्या एखाद्या जागतिक साथीमुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघते. तसेच त्याचे अर्थकारण आणि समाजकारणावर गंभीर परिणाम होतात. या निमिताने जागतिक साथींच्या इतिहासात डोकावत आहे. त्याची थोडक्यात माहिती देतो. त्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करूयात. इ.स. १३०० ते २०१२ या कालावधीतील साथींचा हा आढावा आहे. ....... १. इ.स.

कृतघ्न -4

बाप्पू ·
लेखनविषय:
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 आता पुढे.... किसन्याने रामदास चा तो अवतार बघितला आणि त्याची घाबरगुंडी उडाली. जवळच्या विहिरीतून पाणी आणून तो रामदास च्या तोंडावर शिंपडू लागला. रामदास ला थोडीशी शुद्ध आली, पण बोलण्यासाठी कंठ फुटेना. घशातून फक्त पाय पाय असा पुसटसा आवाज येत होता. त्याच्या पायातील त्राण गेले होते. उभा राहण्याचा प्रयत्न केला तरी झोकांड्या खाऊ लागला होता.