मला भेटलेले रुग्ण - २३

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
14 Feb 2022 - 10:00 pm

https://misalpav.com/node/47104

“डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.”
पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला.
मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.”
बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही?
मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ?
बाप : जी हॉं !
मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है।

रिपोर्ट आल्यावर त्याला आणि मुलीला बोलावलं आणि सांगीतलं की रिपोर्ट नॉर्मल आहे. वर हे देखील सांगीतलं की तिला अस्थमा असता तरी सगळं आयुष्य चांगलंच जगता येईल. प्रेग्नसीसुद्धा सुखरूप पार पडेल.पण असल्या घरी मुलीचं लग्न करू नका ज्यांनी ही फालतू अट घातलीये.

परवा हा बाप आणि मुलीची आई ओपिडीत आले.मुलीचं लग्न ठरलंय , तुम्हाला साखरपुड्याला बोलवायला आलो आहोत.

मी : ये वही लोग हैं क्या जिन्हे अस्थमा नही ऐसा सर्टिफ़िकेट चाहीये था?
बाप : अरे नही सर , उनको तो हमने ही ना कर दिया । ये लोग तो बहूत अच्छे है । जब मैनें बताया की इसकी मॉं को बचपन मे अस्थमा था तो वो बोले हमें बस बेटी चाहीये , अस्थमा हो ना हो उससे कुछ लेना नही है।

———————————॰——————

ही पेशंट टिबीतून बरी झालेली. पण त्या नंतर दोन्ही फुफ्फुसांमध्ये काही प्रमाणात खराबी झाल्याने दमा सदृश आजारासाठी माझ्याकडे गेल्या वर्षंभरापासून ट्रीटमेंट घेत आहे.

गेल्या व्हिसीट ला तिनं विचारलं की “डॉक्टर क्या मैं प्रेग्नसी रख सकती हूँ?”

मी: कितने बच्चे है ?

ती : तिन लड़कियाँ है।

मी : तो फिर क्यों प्रेग्नसी का सोच रही हो ?

ती : घरवालो नें पुछा है की डॉक्टर से पुछो इस बारें मे ।

मी: देखो तुम्हो जो सॉंस की तकलिफ है उस में टिबी की वजह सें फेफडोंमे खराबी है। प्रेग्नसी बहुत ही मुश्किल है और डिलिव्हरी मै जान को खतरा होगा । इस सब को छोडो , तुम्हे कुछ हो गया तो तिनो बेटीयों का क्या होगा ये सोचे !

ती : ( खुश होऊन) आप ये मेरे शौहर और घरवालो को बताओगे?

——————————-॰———————

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनअनुभवप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

sunil kachure's picture

14 Feb 2022 - 10:04 pm | sunil kachure

मुलग्या कडचे योग्य च वागलेत असे माझे मत आहे .
आयुष्य एकत्र काढायचे आहे मुलगी आनुवंशिक रोगाची शिकार नाही ना हे समजून घेण्यात काहीच गैर नाही.

मुक्त विहारि's picture

14 Feb 2022 - 10:22 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

सौन्दर्य's picture

14 Feb 2022 - 11:53 pm | सौन्दर्य

एकवेळ भविष्याची कुंडली जमली नाही तरी चालेल पण आरोग्यविषयक कुंडली तपासलीच पाहिजे.

प्रमोद देर्देकर's picture

15 Feb 2022 - 6:28 am | प्रमोद देर्देकर

बापरे जवळजवळ दीड वर्षाने तुम्ही मीपवर परत आलात.
कोविडच्या काळात त्या बाबतीत काही किस्से असतील तर ते पण लिहा.

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2022 - 1:00 pm | चौथा कोनाडा

दोन्ही उदाहरणे आवडली.
समजाऊन सांगणारे आपल्या सारखे जाणते असतील तर अश्या समस्या नीट हाताळल्या जातात.. नाही तर नेहमी प्रमाणे लोकांची संबधितांची ससेहोलपट ठरलेली.
पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद डॉ श्रीहास !

हे किस्से कायप्पावर नावा सहीत समायिक करु शकतो का ?

डॉ श्रीहास's picture

16 Feb 2022 - 8:07 pm | डॉ श्रीहास

लोकं काय म्हणताहेत हे अवश्य कळवा.

Nitin Palkar's picture

16 Feb 2022 - 8:23 pm | Nitin Palkar

बऱ्याच काळानंतर मिपावर आलात.
वैयक्तिक प्रतिक्रिया: पहिल्या रुग्णाच्या बाबतीत मुलाकडच्यांनी जे केलं ते योग्य असं, वाटत नाही. त्यांनी मुलीबरोबर तुमच्याकडे (अथवा त्यांच्या माहितीच्या अस्थमा तज्ज्ञाकडे) जाऊन विवाहानंतर काही समस्या येऊ शकतील का याची माहिती करुन घ्यायला हवी होती.
दुसरी रुग्ण (आणि तिचे नातेवाईक ) ही सर्व सामान्य भारतीय मानसिकतेचे प्रातिनिधिक उदाहरण आहेत. वंशाला दिवा हवा (आपण महिपालीकेच्या उंदीर मारणाऱ्या विभागात कारकून असलो तरी) ही दृढ मानसिकता.
रुग्णांना समजावून सांगण्याच्या तुमच्या कौशाल्याबद्दल नेहमीच कौतुक वाटते.